उपसरपंच अधिकार व कार्य Duties of upsarpanch in marathi सरपंचाच्या सोबतीने त्याची जबाबदारी आणि कर्तव्य पार पाडण्यासाठी ग्रामपंचायत मध्ये एक उपसरपंच असतो. ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका झाल्यानंतर तहसीलदार सर्व सदस्यांची पहिली बैठक बोलावतात व त्या बैठकीमध्ये सदस्यांमार्फत उपसरपंचाची निवड करण्यात येते. उपसरपंच पदासाठी आरक्षण लागू नसते.
उपसरपंचाचे अधिकार आणि कर्तव्य नेमकी काय आहेत याबाबत समाजात पुरेशा माहितीचा अभाव दिसून येतो. उपसरपंचाची कर्तव्य म्हणजे सरपंच नेमून देईल अशी कामगिरी बजावणे हे समीकरण झाले आहे. सरपंचाच्या उपस्थितीमध्ये कायद्याने कोणतेही विशेष अधिकार उपसरपंचाला दिले नाहीत. परंतु, सरपंचानंतर उपसरपंच हाच ग्रामपंचायतीचा मुख्य कार्यकारी अधिकारी असतो आणि त्याला सरपंचासारखेच अधिकार प्राप्त होतात.
उपसरपंचाबाबत ठळक मुद्दे
• सरपंचाने सोपविलेली कार्ये व जबाबदा-या पार पाडणे, सरपंच अनुपस्थित असेल अथवा त्याची निवड झाली नसेल तर उपसरपंच सरपंचाची कार्ये करतो.
• मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम ३५ नुसार उपसरपंचावर अविश्वास ठराव दाखल करता येतो.
• अकार्यक्षमता, गैरवर्तणूक, भ्रष्टाचार, सरपंचाच्या अनुउपस्थित ग्रामसभा न घेणे या कारणांमुळे मुख्य कार्यकारी अधिका-यांच्या अहवालावरून जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीस उपसरपंच यांना पदावरून दूर करण्याचा अधिकार असतो.
• सरपंचांच्या अनुपस्थितीत उपसरपंचाने पुरेशा कारणाशिवाय आर्थिक वर्षात ग्रापंचायतीच्या सभा बोलविणास कसूर केल्यास असा उपसरपंच पदासाठी अपात्र ठरतो. याबाबतचा जिल्हाधिकाऱ्यांचा अंतिम निर्णय असतो.
• उपसरपंचाला सरपंचकडे राजीनामा द्यावा लागतो.
उपसरपंचाचे कार्य व अधिकार कोणते?
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम ३८ मध्ये सरपंचसोबतच, उपसरपंचाची कार्य व अधिकार याबाबत माहिती दिली आहे.
१) सरपंचाच्या गैरहजेरीत ग्रामपंचायतीच्या सभेचे /ग्रामसभेचे अध्यक्षस्थान भूषविणे व त्या सभेचे नियमन करणे.
२) सरपंचाने स्वतःचा अधिकार कर्तव्यांपैकी व सरपंचाकडे सोपवलेल्या अधिकाराचा वापर करून कर्त्यव्य पार पाडणे.
३) सरपंच गावात सलग १५ दिवसापेक्षा जास्त दिवस गैरहजर असल्यास सरपंचाचे अधिकार व कर्तव्य पार पाडणे.
४) सरपंचाचे पद रिक्त असल्यास नवीन सरपंचाची निवडणूक होई पर्यंत सरपंचाच्या अधिकाराच्या वापर करणे व त्यांची कर्तव्ये पार पाडणे.
५) कायद्यातील तरतुदींप्रमाणे सरपंचपद रिकामे असेल तर सह्यांचे अधिकार उपसरपंचांना प्राप्त होतात.
याशिवाय, सरपंचाची कार्य आणि कर्तव्य सुरळीतपणे पार पडावीत म्हणून, उपसरपंचाला महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमात वेळोवेळी सूचित करण्यात आलेली कार्य उपसरपंचला करावी लागतात.
हे देखील वाचा : पॅन कार्ड - आधार कार्ड कसे लिंक करावे?
उप-सरपंचासोबत समन्वय गरजेचा
ग्रामपंचायतीचे मुख्य पदाधिकारी असलेले सरपंच, उपसरपंच आणि सचिव यांना असमान अधिकार कायद्याने बहाल केले असले तरीही, गावविकासाच्या दृष्टीकोनातून त्यांच्यावर समान जबाबदारी असते. त्यापैकी सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य हे गावातील स्थानिक नागरिक असतात. म्हणून आपापली जबादारी व कर्तव्ये यांचा एकमेकांमध्ये समन्वय साधणे गरजेचे आहे.
सरपंचाच्या कर्तव्य व जबाबदाऱ्या मध्ये झालेली वाढ लक्षात घेता, सरपंचाने आपल्या जबादारीचा भाग उपसरपंचावर सोपविता येऊ शकतो. उपसरपंचाला सतत कार्यरत ठेवण्याची जबाबदारी सरपंचाची असते. त्यामुळे, सरपंच आणि उपसरपंच यांनी ग्रामपंचायतीचा कारभार एकत्र पहिला तर गावाच्या विकासाला चालना मिळते. असे नाही झाले तर, उपसरपंच पद नावापुरतेच किंवा निष्क्रिय राहते आणि उपसरपंचास ग्रामपंचायत सदस्यां इतकेच मर्यादित अधिकार प्राप्त राहतात.
पूर्वी उपसरपंचाना मानधन दिले जात नव्हते. गावांच्या विकासासाठी सरपंचांबरोबर उपसरपंचांचेही योगदान आणि महत्व लक्षात घेता, शासनाने दिनांक १ जुलै, २०१९ पासून उपसरपंचानाही मानधन लागू केले. मात्र, उपसरपंचाला कायद्यातील अधिकारात अद्याप बदल केले नाहीत. ग्रामपंचायतीचा वाढता कारभार आणि जबाबदाऱ्या पाहता सरपंचाच्या सोबतीनेच गाव विकासाचा कार्यभार वाहताना उपसरपंचाच्या अधिकारात आणि जबाबदारी मध्ये वाढ होणे काळाची गरज आहे. याबाबत आपलं मत खाली टिप्पणी करून नक्की कळवा.
हे देखील वाचा : ग्रामपंचायतीची विविध बँक खाती
तुम्हाला या पोस्ट आवडू शकतात
5 टिप्पण्या
होय उपसरपंच ना देखील अधिकार मिळाले पाहिजे
उत्तर द्याहटवाHo
हटवाहोय,
उत्तर द्याहटवाउपसरपंचाना सुध्दा सरपंच प्रमाणे अधिकार असायला हवेत. सरपंच ग्रामपंचायत मध्ये अनुपस्थितीत काही अंशी सह्यांचे ही अधिकार असावेत. ह्या नोंदी आपण सरकार दरबारी मांडाव्यात.
धन्यवाद,
ऊपसंरपच यांना संरपच ऐवढे अधिकार मिळायलाच पाहीजे, नुसते नाव पुरत काय ऊपयोग नाही, संरपच आरक्षण मुळेच कमी शिक्षण असलेला बसतो त्यामुळे योग्य नियोजन तो करु शकत नाही, नवीन युगा प्रमाणे बदल हे लक्षात यायला वेळ लागतो सबब ऊपसंरपच यांना अधिकार मिळाल्यास गावाचा विकास होण्यास मदत होईल
उत्तर द्याहटवासरपंचा प्रमाणे upsarpancha la पण अधिकार द्यावेत
उत्तर द्याहटवाआपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत.