MahaDBT farmer Registration महाडीबीटी ऑनलाईन पोर्टल रजिस्ट्रेशन

Mahadbt Login | महाडीबीटी ऑनलाईन पोर्टल रजिस्ट्रेशन | MahaDBT farmer Registration | महा डीबीटी पोर्टल | महा डीबीटी पोर्टलवर | महा डीबीटी पोर्टलवर लॉगीन करावे | महा डीबीटी पोर्टल योजना

महाराष्ट्र शासनाचे आपले सरकार DBT Portal (Direct Benefit Transfer Portal) हा महाराष्ट्र शासनाचा एक महत्वाकांक्षी उपक्रम असून, सामान्य नागरिकांना योजनांच्या माध्यमातून थेट लाभ मिळवून देण्यासाठी उभारलेले एक ऑनलाईन व्यासपीठ आहे.

राज्य DBT आणि सेवा पोर्टलचे मुख्य पृष्ठ विकसित करणे आणि विविध शासकीय योजनांच्या सेवा पुरवणे हे आपले सरकार DBT चे मुख्य उद्दिष्ट आहे. सदर लेख मध्ये महाडीबीटी या ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी कशी केली जाते याबाबत माहिती पाहणार आहोत. ही एक एकदा करण्याची प्रक्रिया आहे. त्यानंतर, पोर्टलवरील विविध सरकारी योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करता येतो.

Mahadbt Login | महाडीबीटी ऑनलाईन पोर्टल रजिस्ट्रेशन | MahaDBT farmer Registration | महा डीबीटी पोर्टल | महा डीबीटी पोर्टलवर | महा डीबीटी पोर्टलवर लॉगीन करावे | महा डीबीटी पोर्टल योजना

आपले सरकार MahaDBT ची मुख्य वैशिष्ट्ये:

1. महाराष्ट्रातील शेतकरी कोणत्याही वेळी, कुठूनही आपले सरकार DBT च्या पोर्टलवरून नोंदणी करून राज्य आणि केंद्र पुरस्कृत कृषी योजनेसाठी अर्ज करू शकतात.

2. शेतकरी त्यांनी केलेल्या अर्जाची सद्यस्थिती त्यांच्या वापरकर्ता आयडी (User Name) वापरून कधीही पाहू शकतात.

3. सुलभ पडताळणी आणि पारदर्शकता यासाठी ७/१२ प्रमाणपत्र, ८ अ प्रमाणपत्र, आधार संलग्न बँक खात्याच्या पासबुकची प्रत, खरेदीच्या पावतीची प्रत, इ. ऑनलाईन  अपलोड करू शकतात.

4. आपले सरकार DBT च्या अर्ज प्रक्रियेच्या विविध स्तरांवर अर्जदारांना एसएमएस आणि ईमेल अलर्टची सुविधा आहे.

5. नोंदणीकृत अर्जदार/ शेतकरी यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभ वितरण केले जाते.

6. मंजूरी प्राधिकरणासाठी अर्ज मंजुरीची सुलभ प्रक्रिया.

7. युनिक वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड उपलब्ध.

8. विभाग / राज्य प्राधिकरण यांच्याद्वारे कृषी योजना अर्जांच्या देखेरेखीची पारदर्शकता.

आपले सरकार DBT पोर्टल नोंदणी/MahaDBT farmer Registration:

अर्जदार ऑनलाईन नोंदणीद्वारे स्वतः नोंदणी करू शकतात. आपले सरकार DBT पोर्टलवर नोंदणी/Registration करण्यासाठी सर्वप्रथम https://mahadbtmahait.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या.


1. नवीन नोंदणीसाठी 'New Applicant Registration' बटणवर क्लिक करा.

2. 'Registration Type' मध्ये नोंदणी प्रकार निवडा. (वैयक्तिक किंवा शेतकरी गट).

3. आधारकार्ड आहे किंवा नाही ते निवडून 'Yes' पर्याय निवडून 'Continue' बटणवर क्लिक करा.

4. 'OTP' द्वारे तुमचा तुमचा मोबाईल क्रमांक 'Verify' करा.

5. OTP यशस्वीपणे तपासणी झाल्यावर अर्जदाराची वैयक्तिक माहिती, पत्ता, बँक तपशील इत्यादी प्रसिद्ध होईल. तपशील मध्ये काही बदल असल्यास अर्जदाराने UIDAI किंवा जवळच्या आधार नोंदणी केंद्राशी संपर्क साधा. त्यानंतर, अर्जदाराचे वापरकर्ता नाव आणि पासवर्ड (User Name & Password) तयार करावा लागतो.

MahaDBT farmer Registration वापरकर्ता नाव (User Name) - सूचना:

• अर्जदाराने वापरकर्ता नाव असे निवडावे कि जे याअगोदर प्रणालीमध्ये वापरलेले नाही.

• वापरकर्ता नावामध्ये (User Name) केवळ अक्षरे आणि संख्या असाव्यात आणि कमीत कमी ४ व जास्तीत जास्त १५ वर्ण असावेत.

• अर्जदाराने वापरकर्ता नाव आणि पासवर्ड) आणि संकेतशब्द (पासवर्ड) पुष्टी प्रविष्ट करा. 

• अर्जदाराने आपला वैयक्तिक वैध मोबाईल क्रमांक प्रविष्ट करावा. अर्जदाराची ओळख पटवण्यासाठी ही पायरी अनिवार्य आहे. 

• अर्जदाराने मोबाईल क्रमांक प्रविष्ट करून 'Get OTP for Mobile Number Verification' या बटनवर क्लिक करा. 

• अर्जदाराने प्राप्त OTP दिलेल्या मजकूर बॉक्समध्ये प्रविष्ट करून 'Verify OTP for Mobile Number' बटन वर क्लिक करावे. प्राप्त OTP  केवळ ३० मिनिटांसाठी वैध असेल. अर्जदार नोंदणीकृत यूजर आयडी व पासवर्ड वापरून आपले सरकार डीबीटी पोर्टलवर लॉगइन करू शकतात.

६. त्यानंतर, अर्जदाराने प्रोफाइल तपशील भरण्यासाठी 'Profile' बटन वर क्लीक करा. त्यामध्ये, वैयक्तिक तपशिल, कुटुंब तपशिल, अधिवास तपशील, पात्रता तपशील, जातीचा तपशील, जमीन तपशील, पीक तपशील,सिंचन स्रोत, इत्यादी माहिती भरावी.

MahaDBT  वैयक्तिक माहिती:

अर्जदाराने या फॉर्ममधील सर्व फिल्ड भरणे अनिवार्य आहे.  वैयक्तिक माहितीमध्ये नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, जन्म तारीख, वय, लिंग, पाहिले नाव, मधले नाव, आडनाव पॅन क्रमांक इत्यादी माहिती भरावी.

MahaDBT  जात तपशील:

अर्जदारांनी या फॉर्ममधील सर्व फिल्ड भरणे अनिवार्य आहे. यामध्ये, जातीचा वर्ग, जात, उपजात, जात प्रमाणपत्र आहे का? असल्यास, बारकोड नमूद आहे का? जात प्रमाणपत्र क्रमांक.

MahaDBT  उत्पन्न तपशील:

अर्जदारांनी या फॉर्ममधील सर्व फिल्ड भरणे अनिवार्य आहे. ७/१२ तपशील सर्वेक्षण क्रमांक - अर्जदाराने सर्वेक्षण क्रमांक प्रविष्ट करावा.

वैयक्तिक मालकी (हेक्‍टर आणि आर) - अर्जदाराने वैयक्तिक जमिनी मालकी असलेले हेक्टर आणि आर मधील एकूण क्षेत्र प्रविष्ट करावे.

संयुक्त मालकी (हेक्टर आणि आर) - अर्जदाराने संयुक्त जमीन मालकी असलेले हेक्‍टर आणि आर मधील संयुक्त क्षेत्र प्रविष्ट करावे. जर मालमत्तेचा मालकी हक्क एकापेक्षा जास्त व्यक्तींकडे असेल तर त्याला संयुक्त मालकी असे म्हणतात.

सामान्य मालकी (हेक्‍टर आणि आर) - अर्जदाराने सामान्य जमीन मालकी असलेले हेक्‍टर आणि आर मधील एकूण क्षेत्र प्रविष्ट करावे. सामान्य जमीन ही बहुसंख्य व्यक्तींच्या एकत्रितपणे मालकीची असते.

आपल्या मालकीच्या अंतर्गत एकूण क्षेत्र - हे फील्ड अक्षम केलेले आहे आणि एकूण वैयक्तिक, संयुक्त आणि सामान्य मालकीची गणना केल्यानंतर येणारी एकूण संख्या प्रदर्शित केली जाईल.

MahaDBT ७/१२ प्रमाणपत्र दस्तऐवज:

- अर्जदाराने ७/१२ प्रमाणपत्र दस्तऐवज अपलोड करावे.

- भूमीचे विवरण जतन करा:  जमिनीशी संबंधित माहिती प्रविष्ट केल्यांनतर, अर्जदाराने डेटा जतन करण्यासाठी 'भूमीचे विवरण जतन करा' या बटण वर क्लिक करावे.


MahaDBT  पीक माहिती तपशील:

सर्वेक्षण क्रमांक - अर्जदाराने पिकांची माहिती प्रविष्ट करण्यासाठी सर्वेक्षण क्रमांक निवडावा. जमीन तपशील अंतर्गत ७/१२ मध्ये दिलेल्या माहितीच्या अनुषंगाने सर्वेक्षण क्रमांक ड्रॉपडाउन सूचीमध्ये प्रदर्शित होईल. एकूण क्षेत्र (हेक्टर आणि आर) - या रकान्यात माहिती जमीन माहितीच्या स्क्रीन वरील तपशिलानुसार गणली जाऊन हेक्‍टर आणि आर मध्ये प्रदर्शित होईल.

लागवडीखालील क्षेत्र (हेक्‍टर आणि आर) सर्वेक्षण क्रमांकाशी संबंधित एकूण क्षेत्रापैकी, शेतीसाठी एकूण लागवडीखालील क्षेत्र स्वयंचलितरित्या दाखवले जाईल. हंगाम प्रकार या रकान्यात हंगामानुसार प्रकार ड्रॉपडाउन सूचीमध्ये दाखविल्या जातील.

आंतरपीक:

अर्जदारांना या फॉर्ममधील सर्व फील्ड भरणे अनिवार्य आहे. 

पीक १ तपशील:

- पीक: ड्रॉपडाउन सूचीमधून पीक तपशील निवडा.

- पीक पंक्तींची संख्या - वापरकर्त्याने पिकासाठी पंक्तींची संख्या जोडावी.

- हेक्‍टर - पीक घेण्यासाठी शेतामध्ये उपलब्ध असलेले क्षेत्र हेक्‍टर मध्ये टाकावे.

- आर - पीक घेण्यासाठी शेतामध्ये उपलब्ध असलेले क्षेत्र गुंठ्या मध्ये अंकित करावे.

पीक २ तपशील:

- पीक: ड्रॉपडाउन सूचीमधून पीक तपशील निवडा.

- पीक पंक्तींची संख्या - वापरकर्त्याने पिकासाठी पंक्तींची संख्या जोडावी.

- हेक्‍टर - पीक घेण्यासाठी शेतामध्ये उपलब्ध असलेले क्षेत्र हेक्‍टर मध्ये अंकित करावे.

- आर - पीक घेण्यासाठी शेतामध्ये उपलब्ध असलेले क्षेत्र गुंठ्या मध्ये अंकित करावे.

• भरलेला डेटा जतन करण्यासाठी वापरकर्त्याने Add More Crops बटण वर क्लिक करावे.

• जतन केलेले तपशील काढून टाकण्यासाठी, वापरकर्त्याने Remove Crops बटन वर क्लिक करावे.

एकल पीक:

- अर्जदारांना या फॉर्ममधील सर्व फील्ड भरणे अनिवार्य आहे.

- पीक - ड्रॉपडाउन सूचीमधून पीक तपशील निवडा.

- हेक्‍टर - पीक घेण्यासाठी शेतामध्ये उपलब्ध असलेले क्षेत्र हेक्‍टर मध्ये अंकित करावे. 

- आर - पीक घेण्यासाठी शेतामध्ये उपलब्ध असलेले क्षेत्र गुंठ्या मध्ये अंकित करावे.

बारमाही पीक:

- अर्जदारांना या फॉर्ममधील सर्व फील्ड भरणे अनिवार्य आहे.

- पीक - ड्रॉपडाउन सूचीमधून पीक तपशील निवडा.

- हेक्‍टर - पीक घेण्यासाठी शेतामध्ये उपलब्ध असलेले क्षेत्र हेक्‍टर मध्ये अंकित करावे.

- आर - पीक घेण्यासाठी शेतामध्ये उपलब्ध असलेले क्षेत्र गुंठ्या मध्ये अंकित करावे.

नापिक क्षेत्र:

- अर्जदारांना या फॉर्ममधील सर्व फील्ड भरणे अनिवार्य आहे.

- हेक्‍टर - शेतामध्ये असलेले नापीक क्षेत्र हेक्‍टर मध्ये अंकित करावे. 

- आर - शेतामध्ये असलेले नापीक क्षेत्र गुंठ्या मध्ये अंकित करावे.

इतर शेती/जमीनविषयक माहिती:

- अर्जदाराने इतर शेतीविषयक आणि जमिनीविषयक माहिती भरावी.

- तपशील - अर्जदाराने ड्रॉपडाऊन सूचीमधून आवश्यक पर्याय निवडावा.

- यंत्रसामुग्री / उपकरणे - अर्जदाराने वरील पर्याशी निगडित उपविभाग निवडावा.

- यंत्रसामुग्री प्रकार: अर्जदाराने निवडलेल्या यंत्रसामुग्री / उपकरणाशी संबंधित उपविभाग निवडावा.

- संख्या- अर्जदाराने दिलेल्या मजकूर रकान्यात संख्या भरावी आणि Add बटणवर क्लिक करावे. अर्जदार एकापेक्षा अधिक नोंदी जोडू शकतात.

सिंचन स्रोत:

- अर्जदाराने सिंचन स्त्रोताशी संबंधित इतर माहिती भरावी.

- सिंचन स्त्रोत- अर्जदाराने ड्रॉपडाउन सूचीमधून पर्याय निवडावा.

- सिंचन सुविधा आणि उपकरणे - अर्जदार सिंचन स्रोताशी संबंधित एकापेक्षा अधिक पर्याय निवडू शकतात.

- आपल्याकडे विद्युत जोडणी आहे का? अर्जदार रेडिओ बटन च्या साहाय्याने होय किंवा नाही पर्याय निवडू शकतात. Add बटण वर क्लिक करून वापरकर्ता एकापेक्षा अधिक नोंदी जोडू शकतो.

शेतीशी निगडित मालमत्ता:

- अर्जदाराने शेतीशी निगडित इतर मालमत्तेची माहिती भरावी.

- शेती निगडित मालमत्ता - अर्जदाराने दिलेल्या ड्रॉपडाउन सूचीमधून पर्याय निवडावा.

- युनिट - मोजण्याचे एकक ड्रॉप डाऊनमध्ये प्रदर्शित केले जाईल आणि दिलेल्या फील्डवर प्रदर्शित होईल.

प्रमाण / क्षमता - अर्जदाराने मजकूर रकान्यात प्रमाण / क्षमता प्रविष्ट करून आणि ADD बटन वर क्लिक करावे. अर्जदार एकापेक्षा अधिक र्नोदी जोडू शकतात.

प्राणी:

- अर्जदाराने शेत पशुसंवर्धन संबंधित इतर माहिती भरावी.

- अर्जदाराने ड्रॉपडाउन सूचीमध्ये दिलेल्या प्राण्यांच्या यादीमधून पर्याय निवडावा, अर्जदार एकापेक्षा अधिक नोंदी जोडू शकतात. 

संख्या - अर्जदाराने मजकूर बॉक्समध्ये प्राण्यांची संख्या प्रविष्ट करून Add बटन वर क्लिक करावे.

फळबाग:

- अर्जदाराने फळबागेशी संबंधित इतर माहिती भरावी. फळाचे नाव अर्जदाराने दिलेल्या ड्रॉपडाउन सूचीमधून फळाची निवड करावी. अर्जदार एकापेक्षा अधिक नोंदी जोडू शकतात. 

- संख्या - अर्जदाराने मजकूर रकान्यात फळांची संख्या प्रमाण प्रविष्ट करून Add बटन वर क्लिक करावे.

इतर माहितीपर्यंत तपशिल भरल्यानंतर, अर्जदाराने सर्व टॅब आणि माहिती अंकित केल्यामुळे प्रोफाइल पूर्णता बारची स्थिती १०० % दर्शविली जाईल.

MahaDBT farmer Registration महाडीबीटी ऑनलाईन पोर्टल रजिस्ट्रेशन बाबत अधिक माहितीसाठीं https://mahadbtmahait.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या. किंवा हेल्पलाईन क्रमांक : 022-49150800 यावर संपर्क करा.

तुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात

महाडीबीटी शेतकरी योजना - असा करा ऑनलाईन अर्ज

शेळी पालन ऑनलाईन अर्ज

कुसुम सोलर पंप योजना

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

  1. महाराष्ट्र सरकारने Mahadbt योजनेचे अंतर्गत शेतकरी पंजीकरण प्रक्रिया देखील सरल केली आहे. शेतकरी या योजनेच्या लाभांच्या मागण्यासाठी ऑनलाइन पंजीकरण करू शकतात आणि अर्ज पाठविल्यानंतर उत्तरपत्रक देणे गरजेचे नाहीत.

    या लेखामध्ये उल्लेखित आणि उपलब्ध करण्यात आलेल्या माहितींनुसार, या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना विविध लाभ देणे आहे. यात संबंधित शेतकरी उत्पादक संस्था नेमणुकीसाठी सुविधा मिळते आणि शेतकरींना विविध स्कीम उपलब्ध होतात जेणेकरुन शेतकरी अधिक लाभाने परवानगी घ्यावे.

    Mahadbt Farmar योजनेचा हा अंतर्गत शेतकरी पंजीकरण सर्वांगीण आणि सरल असून, शेतकरी या योजनेच्या लाभांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. त्यामुळे शेतकरींना संपूर्ण माहिती अशी पूर्णपणे उपलब्ध होणार आहे आणि अधिक माहिती मिळविण्यासाठी आपण या लेखाचा संदर्भ घेऊ शकता.

    उत्तर द्याहटवा

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत.