घरकुल योजना 2021 यादी महाराष्ट्र | घरकुल योजना कागदपत्रे । gharkul yadi 2021 । प्रधानमंत्री घरकुल योजना । प्रधानमंत्री घरकुल योजना लिस्ट | Pantpradhan Awas Yojana Gramin
Gharkul yadi 2021 प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गरीबांना हक्काचे छप्पर लाभावे या दृष्टिकोनातून केंद्र शासनाने सन 2022 पर्यंत सर्वांसाठी घरे हे धोरण जाहीर केले आहे. या धोरणांतर्गत देशामध्ये ग्रामीण भागामध्ये चार कोटी घरे व नागरी क्षेत्रामध्ये दोन कोटी घरे बांधण्याचा निर्धार केंद्रशासनाने केला आहे. राज्यातील ग्रामीण भागामध्ये आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक व अनुसूचित जाती जमाती मधील बेघर घटकांसाठी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण Pradhan Mantri Awas Yojana Gramin, रमाई आवास योजना Ramai Awas Yojana, राजीव गांधी निवारा योजना इत्यादी विविध विभागांच्या योजना जिल्हा परिषद जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व गट विकास अधिकारी यांच्यामार्फत राबविण्यात येत आहेत.
हे देखील वाचा: सुकन्या समृद्धी योजना
सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांचा प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी व त्याला गती मिळण्यासाठी राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण ची स्थापना करण्यात आली. ग्रामीण भागातील दुर्बल घटक रेषेखालील असलेल्या कुटुंबांना घरकुल बांधकामांसाठी अर्थसाहाय्य देणे हा या योजनेचा उद्देश आहे.
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थांना २५ स्केअर मीटरचं घर बांधता येतं. त्यासाठी १ लाख २० हजार एवढी रक्कम तीन टप्प्यात लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा केली जाते.
घरकुलासाठी पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांची यादी प्रधानमंत्री आवास योजना - ग्रामीणच्या संकेतस्थळावर उपलबध करण्यात येते. घरकुल योजना 2021 यादी महाराष्ट्र (प्रधानमंत्री घरकुल योजना लिस्ट) खालीलप्रमाणे तुमच्या मोबाईल वरूनही पाहू शकता.
१. सर्वप्रथम pmay.nic.in असं गूगल मध्ये सर्च करा त्यानंतर Pradhan Mantri Awaaz Yojana - Gramin (PMAY-G) - Rular या सर्चवर क्लीक करा.
२. किंवा थेट http://www.iay.nic.in/netiay/home.aspx या लिंकवर जा.
३. त्यानंतर, मेनू पर्यायामध्ये Awaassoft या पर्यायमध्ये जाऊन Report हा पर्यायवर क्लीक करा.
४. त्यानंतर सगळ्यात शेवटी Social Audit Reports यामध्ये Beniciary details for Verification हा पर्याय निवडा.
५. त्यानंतर राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव इत्यादिंची निवड करा.
६. २०२१ ची यादी पाहण्यासाठी २०२०- २१ हा पर्याय निवडा किंवा मागील वर्षाची यादी पाहण्यासाठी इतर निवडा.
७. त्यानंतर Pradhan Mantri Awards Yojana ग्रामीण हा पर्याय निवडा किंवा इतर गृहनिर्माण योजना निवडा (उदा. रमाई आवास योजना).
८. यानंतर, Captacha अंकाची बेरीज किंवा वजाबाकी असेल ती त्या चौकटीत टाका.
९.पुढे, Submit यावर क्लीक करून तुमच्यासमोर आवास योजना योजना 2021 यादी पाहायला मिळेल.
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण महाराष्ट्र:
प्रधानमंत्री आवास योजना (Pantpradhan Awas Yojana Gramin) केंद्र पुरस्कृत योजना असून सन 1995-96 पासून स्वतंत्रपणे राबविली जात आहे. दिनांक २० नोव्हेंबर २०१६ पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०२२ पर्यंत सर्वांसाठी घरे ही संकल्पना राबवून यास गती मिळवून दिली. ही योजना ग्रामीण आणि शहरी या विभागांमध्ये सुरु केली गेली आहे.
हे घरकुल २५ वर्ग मीटर या क्षेत्रफळामध्ये बांधण्यात येत असून, घरकुलात एका स्वयंपाकघर व्यतिरिक्त, शौचालय त्यासाठी एक लाख वीस हजार इतकी रक्कम लाभार्थींच्या थेट खात्यात जमा होते. तसेच, टेकड्या/दुर्गम भागासाठी १.३० लाख इतके अनुदान देण्यात येते. याशिवाय घरात शौचालयाचे बांधकामास १२,००० इतकी जास्तीचे अनुदान देण्यात येते.
प्रधानमंत्री आवास योजना २०२१ ग्रामीण पात्रता:
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ((Pantpradhan Awas Yojana Gramin) पात्र लाभार्थ्यांची निवड ग्रामपंचायतीद्वारे ग्रामसभेत केली जाते. योजनेचा लाभ मिळवण्यासाठी संबंधित लाभार्थी दारिद्रय रेषेखालील असावा, कायम प्रतिक्षा यादीत त्याचे नाव असावे व घरकुल बांधकामासाठी स्वत:ची जागा असावी, अशा सर्वसाधारण अटी आहेत. वरील अटींची पुर्तता करणाऱ्या व कायम प्रतिक्षा यादीत समाविष्ट न झालेल्या कुटूंबांनी ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक व पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांचेशी संपर्क साधावा.
घरकुल योजना कागदपत्रे:
घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थींना खालीलप्रमाणे कागदपत्रे असणे आवश्यक असेल.
१. आधारकार्ड, पॅनकार्ड
२. मतदार ओळख पत्र
३. शिधापत्रिका, वीज बिल
४. उत्पन्न दाखला
५. रहिवासी दाखला
६. जातीचा दाखला
७. बँक पासुबुक
८. स्वतःच्या मालकीचे इतर घर नसल्याचा पुरावा
९. घरकुळासाठी स्वतःच्या नावे असलेल्या जमिनीचा पुरावा (७/१२).
ऑनलाईन घरकुल यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
हे देखील वाचा : रमाई घरकुल योजना २०२१ महाराष्ट्र (संपूर्ण माहिती)
तुम्हाला या पोस्ट आवडू शकतात
10 टिप्पण्या
Mhavirsinghrathodmukamposatpimparkhedatalukamanthagilajalna
उत्तर द्याहटवाघरकुल भेटले नाही
उत्तर द्याहटवाGharkul yojana nahi
हटवाप्रस्ताव देऊन मागे आला जागेचा ऊतारा नाही ज्या जागेवर रहतो तिची आजुन पर्यंत नोंद लागली नाही कारण आमचे मातंग समाजाचे एकच घर असल्यामुळे आमचे कोणी एकत नाही आमचे पणजोबा व त्यांच्या वडीलांपासुन आम्ही तीथ रहातो गावातील लोक नोंद लावण्यास टाळाटाळ करतात
उत्तर द्याहटवाजिल्हा अधिकाऱ्याकडे नोंद लावत नाही म्हणहून तक्रार अर्ज दया, सोबत जी असेल ती कागदपत्रे जोडा,
हटवामाझा माहितीच दाखवत नाही इथे
उत्तर द्याहटवामाजी माहिती दकवत नाही विजय गहिनीनाथ पवार
हटवादेवला तालुक्यातील गावां मधील घरकुल केव्हा येतील.
उत्तर द्याहटवा🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 खुप गरज आहे. साहेब.
Jamner talukyatil ya gavache gharkul Kadhi yenar aahet
उत्तर द्याहटवाभिवंडी तालुक्यातील गावांमधील घरकुल केव्हा येतील 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 खूप गरज आहे साहेब
उत्तर द्याहटवाआपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत.