आशा स्वयंसेविका Asha Swyamsevika In Marathi

 

आशा स्वयंसेविका Asha Swyamsevika In Marathi केंद्र शासनाने दिनांक १२ एप्रिल, २००५ रोजी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान Maharashtra (NRHM) राज्य पातळीवर राबविण्यास सुरवात केली. या अभियानाअंतर्गत विशेषतः ग्रामीण पातळीवर आरोग्या संदर्भात जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने आशा स्वयंसेविका Accredited Social Health Activist म्हणून गावातील स्थानिक महिलांची नेमणूक केली. आशा स्वयंसेविकां महत्वपूर्ण आरोग्य सामाजिक दुवा म्हणून राज्यात कार्य पार पाडत असतात. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातील The National Rural Health Mission शेवटच्या घटकापर्यंत आरोग्यसेवा पोहचविण्याची कामगिरी आशा स्वयंसेविका बजावत असतात. या लेखात आशा स्वयंसेविका विषयी माहिती, आशा स्वयंसेविका मानधन, आशा स्वयंसेविका नियुक्ती प्रक्रिया, आशा कार्यकर्ता लिस्ट इत्यादी बाबत माहिती तुम्हाला वाचायला मिळेल.

आशा स्वयंसेविका । आशा वर्कर सैलरी 2021 marathi । आशा स्वयंसेविका मानधन । आशा वर्कर मानधन । आशा स्वयंसेविका शासन निर्णय । आशा स्वयंसेविका नियुक्ती प्रक्रिया । आशा कार्यकर्ता लिस्ट । आशा स्वयंसेविका विषयी माहिती । आशा worker । asha worker salary maharashtra । asha swayamsevika । asha swayamsevika niyukti

आशा ASHA ची ठळक वैशिष्टये

• प्रत्येक गाव-खेड्यात सामाजिक कार्यकर्ता म्हणुन आरोग्य सुविधा देण्यासाठी आशा स्वयंसेविका कार्यरत असतात.

• आशा सेविकेची गावातील गावातील स्थानिक विवाहित महिलेची ग्रामसभेद्वारे निवड केली जाते.


• महाराष्ट्र राज्यात ७१ हजार आशा स्वयंसेविका कार्यरत आहेत आणि आरोग्यविषयक शासनाने नेमून दिलेल्या एकूण ७८ सेवा त्यांना लोकांना प्रदान कराव्या लागतात.

• ग्राम आरोग्य पोषण पाणीपुरवठा व स्वच्छता समितीची सदस्य सचिव अंगणवाडी सेविकेऐवजी आशा स्वयंसेविका असतात. (शासन निर्णय - साआवि- २०१७/प्र. क ३३७/आ-७).

• आशा स्वयंसेविकेच्या कार्यप्रणालीस गती येण्यासाठी तसेच त्यांच्या कामाचे मोजमाप व व्यवथापन करण्याकरिता जिल्हा पातळीवर १ जिल्हा समूह संघटक व प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर एका गट प्रवर्तकांची नेमणूक करण्यात आलेली असते.

हे देखील वाचा : शिधापत्रिका तपासणी नूमुना कसा भरावा ?

ASHA आशा स्वयंसेविका नियुक्ती प्रक्रिया | Asha Swayamsevika Niyukti

• आशा स्वयंसेविका किमान १० वी पास असावी.

• वयोमर्यादा २५ ते ४५ वर्षे व विवाहीत महिला असावी. विधवा/घटस्फोटीत/ परितक्त्या यांना प्राधान्य देण्यात येते. 

• आशाची निवड ग्रामसभेमार्फत केली जाते.

• ग्रामसभेने निवडलेल्या आशाची नियुक्ती तालुका आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत करण्यात येते.

• गावातील १५०० लोकसंख्येमागे एका आशे ची निवड केली जाते व त्यापुढील प्रत्येकी १००० लोकसंख्येच्या प्रमाणात एका आशेची निवड करण्यात येते.

• आशाच्या नियुक्तीनंतर २३ दिवसांचे प्रशिक्षण ५ टप्प्यात दिले जाते.

• आशाने केलेल्या कामाच्या स्वरूपावर त्यांना मोबदला दिला जातो.


आशा स्वयंसेविका महत्वाची कर्तव्य, कामे व जबाबदाऱ्या / आशा वर्कर ची कामे

• आरोग्य बाबतीत लोकांमध्ये मानसिक व सामाजिक परिवर्तन घडवून आणणे.

• आरोग्य सेवांचा लाभ घेण्यासाठी गावातील जनतेला प्रोत्साहीत करणे.

• गावातील आरोग्य संस्थेतील प्रसूतीमध्ये वाढ करणे.

• मलेरिया, क्षयरोग, साथीचे रोग उपचारासाठी मदत करणे.

• रुग्णास रुग्णालयात पोहचविण्यासाठी सहाय्य करणे.

• कुटुंब कल्याण प्रचार, सॅनिटरी पॅड, गर्भनिरोधकाचे वाटप मोफत/माफक दरात करणे.

•  साध्या आजारावर उदा. ताप, खोकला यावर प्राथमिक वैद्यकीय सेवा पूरविणे व औषधोपचार करणे.

• प्रसूतीपूर्ण तपासणी, लसीकरण, स्तनपान, आहार इत्यादी बाबत माता व बाल आरोग्याविषयी प्रबोधन करणे.

• गावपातळीवर आरोग्य नियोजन करण्यात सहभागी होणे व अंगणवाडी कार्यकर्ती, आरोग्य सेविका/सेविका यांच्यासह विचारविनिमय करणे.

• प्रत्येक जन्माची व उपजत मृत्यूची नोंद ठेवणे, आपण केलेल्या कामाची रजिस्टरमध्ये नोंद करून ठेवणे इत्यादी आरोग्य विषयक महत्वपूर्ण नोंद ठेवणे.

अशा प्रकारच्या आरोग्यविषयक ७८ सेवा आशा स्वयंसेविका ग्रामीण पातळीवर शेवटच्या टप्प्या पर्यंत पुरवत असतात.

हे देखील वाचा : राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना

आशा स्वयंसेविका प्रशिक्षण

आशा स्वयंसेविकेची नियुक्ती झाल्यानंतर त्यांना एकूण ५ टप्प्यात प्रशिक्षण दिले जाते. त्यांच्या प्रशिक्षणाचा कालावधी २३ दिवस एवढा असतो. आशा स्वयंसेविकेला सात दिवसांचे मूलभूत प्रशिक्षण देण्यात येते व तिला सोबत प्रशिक्षण मार्गदर्शिका पुस्तिका देण्यात येते. याचबरोबर, आवश्यक असेल तेव्हा, वेळोवेळी मासिक सभा आयोजित करून तिला प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षणाच्या वेळी तिला प्रवास भत्ता व दैनिक भत्ताही देण्यात येतो.


आरोग्य गट प्रवर्तक (Block Facilitator)

आशा स्वयंसेविकीची कार्य सुव्यवस्थिती पार पडावीत म्हणून त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन मिळावे व आशा ASHA ची  समस्या गावपातळीवर सोडविल्या जाण्यासाठी, प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात १ गट प्रवर्तक महिला (Block Facilitator) ची नियुक्ती केली आहे.

आरोग्य गट प्रवर्तकाच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या

आशा स्वयंसेविका व आरोग्य विभाग यांच्यामधील दुवा म्हणून गट प्रवर्तकाची भूमिका असते.

• आशा स्वयंसेविकांना येणाऱ्या अडचणी समजून घेणे व अडचणी सोडविणे. आशांना त्यांच्या जबाबदाऱ्यांची जाणीव दणे.

• आशा स्वयंसेविकांना त्यांच्या कामाचा मोबदला वेळेवर मिळावा म्हणून पाठपुरावा करणे.

• आशा स्वयंसेविकेला देण्यात येणाऱ्या प्रशिक्षण दरम्यान उपस्थित राहून प्रशिक्षणाची उजळणी घेणे.

• प्रत्येक आशा स्वयंसेविकेला गट प्रवर्तक महिलेने महिन्यातून दोन भेटी देणे गरजेचे आहे.

• आशा स्वयंसेविकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्र आणि तालुका सभेस उपस्थित राहणे व मार्गदर्शन करणे.

• आशा स्वयंसेविकेचा गावपातळीवर समन्वय साधण्यासाठी सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष यांना भेटून आशा स्वयंसेविकेच्या भूमीकेविषयी माहिती देणे.

आशा सेविका मोबदला आशा वर्कर मानधन

आशा वर्कर सैलरी 2021 marathi आशा ही सरकारी कर्मचारी अथवा मानधनी कर्मचारी नसून तिला केलेल्या कामानुसार मोबदला देण्यात येतो. 

देशातील आशा सेविकांना ४ ते १० हजारांचा मोबदला मिळतो मात्र, महाराष्ट्र राज्यात आशा सेविकांना रु.१५००/-  दरमहा एवढा मोबदला मिळत होता. आशा सेवकांची जबाबदारी आणि महत्वाची भूमिका विचारात घेता महाराष्ट्र शासन, सार्वजनिक आरोग्य विभाग दिनांक १७ जुलै, २०२० च्या शासन निर्णयानुसार राष्ट्रीय आरोग्य अभियानांअंतर्गत कार्यरत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात वाढ करण्यात आली. या अभियानात आशा सेविकांना केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना नुसार नेमून दिलेल्या ७८ सेवा केल्यास त्या सेवेस केंद्र शासनाने निर्धारित केल्याप्रमाणे मोबदला दिला जातो.


आशा सेविकांना एकूण ७८ सेवांपैकी नियमित ४ कामांसाठी प्राप्त होणाऱ्या मोबदल्याच्या समप्रमाणात कमाल रु. २०००/- पर्यंत दरमहा तसेच, गटप्रवर्तकांना रु. ३०००/- दरमहा इतका राज्य शासनाच्या निधीतून वाढीव मोबदला देण्यास शासनाने नुकतीच मान्यता दिली आहे.

केंद्र सरकारच्या ७८ सेवांपैकी आशा सेवकांची नियमित ४ कामे व दरमहा मोबदला पुढीलप्रमाणे: 

१. आशाला नेमून दिलेल्या भागातील सर्व लाभार्थ्यांची यादी करणे, दिलेल्या सेवांची माहिती व अहवालाचे अचूक संकलन आणि वरिष्ठांना सादर करणे. - रु.१५००/- 

२. ग्राम आरोग्य पोषण दिवस अंमलबजावणी - या दिवशी सेवा देण्यासाठी आवश्यक असणारे बालके, माता, कुटूंब कल्याण लाभार्थी इत्यादींना सेवा घेण्यासाठी प्रवृत्त करणे. -  रु.२००/-

३. ग्राम आरोग्य, पोषण आणि स्वच्छता समितीची मासिक सभा समितीच्या सचिव या नात्याने बोलावणे, सभेचे इतिवृत्त तयार करणे, त्यास मान्यता घेणे आणि सभेतील निर्णयांच्या अंमलबाजावणीची समितीस माहिती देणे. - रु. १५०/-

४. प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील मासिक बैठकीत हजर राहून महिन्यातील केलेल्या कामाचा आढावा देणे. - रु.१५०/-

राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या निर्धारती निकष दरानुसार इतर निर्धारित ७४ सेवां बाबतीत आशा सेविकांना दिल्या जाणाऱ्या मोबदल्यात वाढ करण्यात आली नाही.

आशा कार्यकर्ता लिस्ट । आशा स्वयंसेविका महाराष्ट्र ऑनलाईन यादी

आशा कार्यकर्ता लिस्ट महाराष्ट्र ऑनलाईन यादी पाहण्यासाठी, तसेच, गावातील ग्रामसेवक, आरोग्य सेविका आणि इतर कर्मचाऱ्यांची यादी पाहण्यासाठी खाली दिलेल्या शासनाच्या अधिकृत संकेतस्थळाच्या लिंकवर जा.

आशा स्वयंसेविका महाराष्ट्र ऑनलाईन यादी

त्यानंतर महाराष्ट्र राज्य, जिल्हा, तालुका आणि गावाचं नाव निवडून गावातील शासकीय अधिकारी आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची यादी ऑनलाईन पाहता येईल.

वाचकमित्रहो, आशा स्वयंसेविका Asha Swayamsevika सोबतच आरोग्य सेविका, अंगणवाडी कार्यकर्ती यांचे मार्फत आरोग्य व पोषण सेवा गावपातळीवर देत असतात. सध्याच्या कोविड- १९ च्या लढाईत रात्रं-दिवस स्वतःला झोकून देऊन या कार्यकर्त्या जवाबदारी व कुशलतेने त्यांचे काम करीत असतात. त्यामुळे प्रत्येक गाव-खेड्यासाठी आशा आणि इतर आरोग्य सेविका एक आशेचा किरणच म्हणावा लागले.

तुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात

सरपंच कर्तव्य व अधिकार 

ग्रामसेवक कर्तव्य व कामे

ग्रामसभा - आमच्या गावात आम्हीच सरकार

टिप्पणी पोस्ट करा

3 टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत.