पॅन कार्ड आधार कार्ड सोबत कसे लिंक करायचे? Pan card link to aadhar card in marathi

 

पॅन कार्ड आधार कार्ड सोबत कसे लिंक करायचे? Pan card link to aadhar card in marathi केंद्र शासनाच्या नवीन नियमानुसार आणि आयकर विभागाने दिलेल्या निर्देशांनुसार व आयकर कायद्याच्या कलम १३९अ च्या अंतर्गत तुमचे आधार कार्ड पॅन कार्ड लिंक e - filling aadhar link असणे आवश्यक आहे. आयकर विभागाने ३१ मार्च, २०२१ पर्यंत पॅन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक करण्याची मुदत दिली होती. मात्र कोविड - १९ च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे तसेच, शेवटच्या दिवशी अनेक लोकांनी आयकर विभागाच्या संकेतस्थळाला भेट दिल्यामुळे संकेतस्थळाचे सर्व्हर डाऊन झाले होते. त्यामुळे, पॅन कार्ड आधार लिंक करण्याची ही मुदत आणखी तीन महिन्यांसाठी म्हणजेच, ३० जून, २०२१ पर्यंत वाढविण्यात आली आहे.

पॅन कार्ड आधार कार्ड सोबत कसे लिंक करायचे ? | Pan card link to aadhar card in marathi | How to link pan card with aadhar card | Pan -Adhar Link status

पॅन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक का करावे ?

पॅन कार्ड आधार कार्ड लिंक केल्यामुळे तुमचे पॅन कार्ड आवश्यक ठिकाणी वापरता येईल. आयकर विभागाला तुमच्या आर्थिक व्यवहारावर देखरेख ठेवण्यास मदत होते. तुम्ही टॅक्स भरण्यास अपात्र असाल तरीही पॅन कार्ड आधारशी लिंक केले गेले असावे. पॅन कार्ड आणि आधार कार्ड वरील नावात स्पेल्लिंगमध्ये बदल असला तरीही पॅन जोडणीत कोणताही अडथळा येत नाही. आयकर विभागाच्या नवीन नियमानुसार पॅन कार्ड आधारशी लिंक असणं गरजेचं आहे.


पॅन कार्ड आधार कार्ड लिंक नाही केले तर काय होईल?

दिलेल्या मुदतीत जर तुमचं पॅन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक नसेल तर वित्त विधेयक २०२१ नुसार तुम्हाला रु. १००० एवढा दंड भरावा लागेल. कोणताही आर्थिक व्यवहार बाबतीत तुमचे कार्ड निष्क्रिय होईल. याशिवाय तुम्ही आयकर विवरण पत्र Income tax return भरण्यास सक्षम राहणार नाहीत.

पॅन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक आहे काय? कसे पहावे? how to check if pan is linked to aadhar

तुमचं पॅन कार्ड अगोदरच आधारशी लिंक आहे की नाही Check Pan - Adhar Link Status पुढीलप्रमाणे तपासता येईल.

• पॅन कार्ड आधार सोबत अगोदरच लिंक आहे हे तपासण्यासाठी आयकर विभागाच्या https://www.incometaxindiaefiling.gov.in वर जा.

• त्यानंतर, डाव्या बाजूला असणाऱ्या  ‘Link Aadhar’ हा या पर्यायवर क्लीक करा.

•  ‘Link Aadhar’ पर्यायच्या अगदी खाली 'Click here' to view status' वर क्लीक करा.

• त्यानंतर तुमचा पॅन कार्ड आणि आधार कार्ड क्रमांक टाकून View Link Aadhar Status वर क्लीक करा. 

• तुमचा पॅन आणि आधार लिंक असेल तर कळेल किंवा नसेल लिंक तरीही त्याची माहिती पाहता येईल.

पॅन कार्ड आधार कार्ड सोबत कसे लिंक करायचे? How to link pan card with aadhar card

आधार कार्ड पॅन कार्ड सोबत लिंक करण्यासाठी तीन पद्धती आहेत. त्यापैकी जी पद्धत तुम्हाला सोयीस्कर वाटेल  त्या पद्धतीने तुम्ही Pan - Aadhar Link करू शकता. आधार पॅन लिंक करण्यासाठी तुमचं, पॅन कार्ड, आधारकार्ड सोबत ठेवा. 

१. एसएमएस (SMS) द्वारे

२. ऑनलाईन

३. ऑफलाईन

१. एसएमएस (SMS) द्वारे

तुमच्या मोबाईल फोनद्वारे एक Text मेसेज पाठवून तुम्ही Pan - Aadhar Link करू शकता. त्यासाठी, मेसेज मध्ये जाऊन तुम्हाला टाईप करायचं आहे,  UIDPAN <SPACE> १२ अंकी आधार कार्ड क्रमांक><SPACE><१० अंकी पॅन कार्ड क्रमांक लिहून ५६७६७८ किंवा ५६१६१ या क्रमांकावर तो मेसेज  पाठवायचा आहे.

उदाहरण : UIDPAN 111122223333 AAAPR5555N


२. ऑनलाईन

•.आधार पॅन लिंक करण्यासाठी सर्वप्रथम, https://www.incometaxindiaefiling.gov.in/home या शासनाच्या संकेतस्थळावर जा.

•. त्यानंतर, डाव्या बाजूला ‘Link Aadhar’ हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.

•. यानंतर, तुमच्यासमोर नवीन पेज उघडेल. त्यामध्ये, तुमचा पॅन कार्ड क्रमांक, आधार कार्ड क्रमांक व आधार कार्ड वर असलेलं नाव भरा. 

•. तुमच्या आधार कार्डवर फक्त तुमचं जन्मवर्ष नमूद असेल तर ‘I have only year of birth in Aadhaar card’ या पर्यायाला टिक करा. (पूर्ण जन्मतारीख असेल तर टिक करू नका).

•. त्यानंतर कॅपच्या Capta टाकून,  ‘Link Aadhar’ या पर्यायवर क्लीक करा. 

त्यानंतर, एक नवीन पेज उघडेल ज्यामध्ये, 'तुमचं पॅन कार्ड आधारकार्ड सोबत यशस्वीरित्या लिंक झालं आहे' असा मेसेज येईल.

३. ऑफलाईन

आधार सोबत पॅनकार्ड लिंक करण्यासाठी एसएमएस (SMS) द्वारे आणि ऑनलाईन पद्धतीशिवाय ऑफलाईन पद्धतीने सुद्धा पॅन कार्ड लिंक करू शकता. त्यासाठी PAN सर्विस प्रोवाईडर, NSDL किंवा UTIITSL या सेंटर्स मध्ये जाऊन 'Annexure - I' हा फॉर्म भरावा लागेल. फॉर्म  सोबत आधारकार्ड ची कॉपी जोडून व इतर डॉकूमेंट्स देऊन आधार सोबत पॅनकार्ड लिंक करता येऊ शकते. हे सेंटर्स त्यांच्या नियोजित दरानुसार शुल्क आकारणी करतात.

शासनाच्या नवीन नियमांनुसार आज किंवा उद्या तुम्हाला पॅन कार्ड आधार सोबत लिंक करावंच लागेल. जर दिलेल्या मुदतीत (३० जून, २०२१) केलं तर अतिरिक्त शुल्का पासून वाचू शकता. पॅन- आधार लिंक करणे ही शासनाची विश्वसनीय प्रक्रिया आहे. त्यामुळे मुदत संपण्याअगोदर तुमचं पॅन कार्ड आधारकार्ड सोबत नक्की लिंक करा.

तुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात

शिधापत्रिका तपासणी नमुना कसा भरावा? 

ऑनलाईन सातबारा उतारा कसा काढावा?

 महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या