घरकुल योजना 2022 यादी महाराष्ट्र । ग्रामपंचायत घरकुल यादी 2022 । घरकुल योजना कागदपत्रे 2022 । पंतप्रधान आवास योजना ग्रामीण महाराष्ट्र । प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण लिस्ट महाराष्ट्र 2022 । घरकुल यादी 2021 22 । घरकुल मंजूर यादी 2022 । Pm Gharkul yojana । Pm घरकुल योजना 2022 । Gharkul Yadi 2022 । Gharkul Yojana 2022 list । Gharkul Yojana Yadi Maharashtra 2022 | घरकुल योजना 2023 यादी महाराष्ट्र
'2022 पर्यंत सर्वांसाठी घरे' या संकल्पनेतून उदयास आलेली प्रधानमंत्री आवास योजना देशभरात सुरू करण्यात आली होती. देशातील ग्रामीण आणि शहरी भागातील प्रत्येक कुटूंबाला जलजोडणी, शौचालयाची व्यवस्था २४ तास वीज आणि पोहच रस्ता या सुविधांसह पक्के घर असायला पाहिजे हे प्रधानमंत्री आवास योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. ही योजना महाराष्ट्र राज्यात दिनांक १ ऑगस्ट, २०१६ पासून ग्रामीण पातळीवर सुरू करण्यात आली होती. (पंतप्रधान आवास योजना ग्रामीण महाराष्ट्र 2023).
सदर लेखात प्रधानमंत्री आवास योजना - ग्रामीण क्षत्रातील घरकुल यादी २०२२ ची यादी (Gharkul Yojana 2022 list) कशी पाहता येईल? तसेच, घरकुल योजना महाराष्ट्र ग्रामीण अनुदान, पात्रता आणि योजनेसाठी लागणारी कागदपत्रे याबाबत सविस्तरपणे माहिती दिली आहे.
महाराष्ट्र घरकुल योजना ठळक वैशिष्ट्ये:
• महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या दिनांक १४ ऑक्टोबर, २०१६ च्या शासन निर्णयानुसार राज्यात प्रधानमंत्री आवास योजना - ग्रामीण राबविण्यासाठी निर्देश देण्यात आले आहेत.
• यापूर्वी सुरू असलेली इंदिरा आवास योजनेचे रूपांतर प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये करण्यात आलेले आहे.
• योजनेअंतर्गत सामाजिक, आर्थिक व जात निहाय जनगणना २०११ च्या यादीमधील ग्रामसभेमधून लाभार्थ्यांची निवड करण्यात येते.
• पात्र ठरलेल्या कच्चे घर धारक, बेघर लाभार्थ्यांना पक्के घर बांधण्यासाठी एकूण चार टप्प्यात १,२०,०००/- (एक लाख वीस हजार) एवढे अनुदान देण्यात येते.
• लाभार्थ्यांना दिले जाणारे अनुदान PFMS ( Public Fund Monitoring System) च्या प्रणालीमधून थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येते.
• पंडित दिनद्याळ योजनेअंतर्गत घरकुल बांधण्यास जागा नसलेल्या लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी ५०० चौ. फुटापर्यंत जागे खरेदी करिता जागेची किंमत किंवा रु. ५०,०००/- यापैकी जे कमी असेल तेवढे अर्थसहाय्य देण्यात येते.
घरकुल योजना अनुदान:
घरकुल योजना (प्रधानमंत्री आवास योजना) अंतर्गत लाभार्थ्यास मिळणारे अनुदान खालील ४ हप्त्यामध्ये वितरण केले जाते.
१) घरकुल मंजुरी नंतर लगेच दिला जाणारा पहिला हप्ता - रु. १५०००/-
२) घरकूलाचे बांधकाम पाया पर्यंत झाल्यावर दिला जाणारा दुसरा हप्ता - रु. ४५०००/-
३) घरकुलाचे बांधकाम छता पर्यंत झाल्यावर दिला जाणारा तिसरा हप्ता - रु.४००००/-
४) घरकुलाचे बांधकाम शौचालयासह बांधकाम पूर्ण झाल्यावर दिला जाणारा चौथा हप्ता - रु. २००००/-
एकूण घरकुल अनुदान रक्कम - रु. १,२०,०००/- (एक लाख वीस हजार).
घरकुल अनुदान व्यतिरिक्त महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत ९० दिवसांच्या अकुशल मजुरीच्या स्वरूपात अर्थसहाय्य दिले जाते.
महाराष्ट्र घरकुल योजना पात्रता:
• दारिद्र्य रेषेखालील, बेघर असलेल्या व्यक्ती ज्यांच्या नावावर किंवा कुटुंबातील सदस्यांच्या नावावर देशात कुठेही घर किंवा मालमत्ता नसावी.
• सरकारी सेवेत कार्यरत नसलेले व्यक्ती.
• आयकर भरत नसलेले व्यक्ती
• अर्जदाराने यापूर्वी इतर कोणत्याही घरकुल (गृहनिर्माण) योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
महाराष्ट्र घरकुल योजना २०२२ कागदपत्रे:
महाराष्ट्र घरकुल योजना २०२२ योजनेचा (प्रधानमंत्री आवास योजना - ग्रामीण) लाभ घेण्यासाठी ग्रामसभेद्वारे निवड करण्यात आलेल्या पात्र लाभार्थ्यांनी घरकुल अर्जासॊबत खालीलप्रमाणे कागदपत्रे जोडणे आवश्यक असते.
१) जागेचा ७/१२ उतारा
२) मतदार ओळखपत्र
३) आधार कार्ड
४) चालू वर्षाची कर भरल्याची पावती (दिवाबत्ती कर, घरपट्टी, पाणी पट्टी)
५) रहिवाशी दाखला
६) उत्पन्नाचे शपथपत्र
७) पक्के घर नसल्याचे हमीपत्र
८) दिलेली माहीत खरी असल्याचे स्वयंघोषणापत्र/हमीपत्र
९) फोटो
अशी पहा घरकुल योजना 2022 यादी महाराष्ट्र:
प्रधानमंत्री आवास योजना - ग्रामीण (घरकुल यादी 2021 22) ही यादी मोबाईलद्वारेही सहजरीत्या पाहता येऊ शकते. घरकुल योजना यादी महाराष्ट्र 2022 पाहण्यासाठी,
१. सर्वप्रथम pmay.nic.in असं गूगल मध्ये सर्च करा त्यानंतर Pradhan Mantri Awaaz Yojana - Gramin (PMAY-G) - Rular या पर्यायावर क्लीक करा.
किंवा थेट जाण्यासाठी, http://www.iay.nic.in/netiay/home.aspx या लिंकवर जा.
३. मेनूमध्ये 'Awaassoft' या पर्यायमध्ये जाऊन 'Report' हा पर्याय निवडा.
४. शेवटी असलेला 'Social Audit Reports' यामध्ये 'Beneficiary details for Verification' हा पर्याय निवडा.
५. त्यानंतर तुमचा राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव इत्यादींची निवड करा.
६. वर्ष 2021-2022 ची घरकुल यादी पाहण्यासाठी 2021-2022 हे वर्ष निवडा.
७. यानंतर, लिस्ट मधून 'Pradhan Mantri Awards Yojana' ग्रामीण हा पर्याय निवडा.
८. शेवटी गणिती अंकामधील उत्तर टाकून कॅप्टचा भरून 'SUBMIT' बटणवर क्लिक करा.
अश्याप्रकारे, तुम्ही निवडलेल्या गावासाठीची घरकुल यादी (Gharkul Yadi 2023 Maharashtra) तुम्ही पाहू शकता आणि डाऊनलोड ही करू शकता. (घरकुल योजना 2023 यादी महाराष्ट्र).
या पोस्ट देखील तुम्हाला आवडू शकतात.
• महाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक २०२२
• महाराष्ट्र ग्रामपंचायत मतदार यादी
0 टिप्पण्या
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत.