ग्रामपंचायत अर्ज नमुना Grampanchayat Arj

तलाठी फेरफार अर्ज नमुना | जमीन मोजणी अर्ज नमुना | विवाह नोंदणी प्रतिज्ञापत्र नमुना | ग्रामपंचायत अर्ज नमुना | ग्रामपंचायत घर नोंदणी अर्ज नमुना | ग्रामपंचायत घर बांधकाम परवानगी अर्ज नमुना | grampanchayat arj pdf | सर्व प्रकारचे अर्ज | ग्रामपंचायत अर्ज कसा लिहावा | ग्रामपंचायत सदस्य राजीनामा नमुना अर्ज | मराठी विनंती अर्ज कसा लिहावा नमुना | gram panchayat arj namuna in marathi

ग्रामपंचायत अर्ज कसा लिहावा?

अर्जलेखन हा प्रत्येकाच्या दृष्टीने महत्वाचा भाग आहे. विविध कारणांसाठी आपल्याला अर्ज करावा लागतो. विविध कागदपत्रे, दाखले मिळवण्यासाठी अर्ज करावा लागतो. अनके कारणांसाठी अर्ज लेखन करण्याची पद्धत वेगवेगळी आहे.

सदर लेख मध्ये मराठी विनंती अर्ज कसा लिहावा? तसेच, स्थानिक स्वराज संस्था म्हणून ओळखली जाणारी ग्रामपंचायतीचे विविध अर्ज नमूने (grampanchayat arj) pdf स्वरूपात याबद्दल माहिती पाहणार आहोत.

तलाठी फेरफार अर्ज नमुना | जमीन मोजणी अर्ज नमुना | विवाह नोंदणी प्रतिज्ञापत्र नमुना | ग्रामपंचायत अर्ज नमुना | ग्रामपंचायत घर नोंदणी अर्ज नमुना | ग्रामपंचायत घर बांधकाम परवानगी अर्ज नमुना | grampanchayat arj | सर्व प्रकारचे अर्ज | ग्रामपंचायत अर्ज कसा लिहावा | ग्रामपंचायत सदस्य राजीनामा नमुना अर्ज | मराठी विनंती अर्ज कसा लिहावा नमुना | gram panchayat arj namuna in marathi

मराठी विनंती अर्ज कसा लिहावा नमुना:

अर्ज लेखनात विविध प्रकारची मागणीपत्रे, विनंतीपत्रे, यांचाही समावेश होतो. कोणत्याही कारणाने पत्राद्वारे केलेली विनंती, मागणी किंवा तक्रार म्हणजे अर्जलेखनच असते.

अर्ज लिहिणाऱ्या व्यक्तीने अर्ज स्वतःच्या हस्ताक्षरात लिहायला हवा अशी अपेक्षा असते. अर्जलेखन करताना अर्जदाराने हस्ताक्षर, शुद्धलेखन, नीटनेटकेपणा याकडे लक्ष द्यायला हवे. अर्जात खाडाखोड असू नये.

अर्जदाराने अर्जलेखनात पुढील घटक नमूद करावेत.

१. अर्जदाराचे पूर्ण नाव

२. अर्जदाराचा पूर्ण पत्ता

३. मोबाईल/फोन नं., इमेल आयडी

४. अर्जाची दिनांक

५. अर्ज ज्यांना करावयाचा आहे त्यांचा हुद्दा, नाव, पत्ता

६. अर्जाचा विषय

७. संबोधन: महोदय, महोदया इ.

८. अर्जाचा संदर्भ

९. अर्जातील उल्लेखनीय बाबी

१०. समारोप

११. समारोपाचा मायना: आपला/आपली विश्वासू

१२. सहपत्रे

ग्रामपंचायत माहितीचा अधिकार अर्ज असा करा


तलाठी फेरफार अर्ज नमुना:

फेरफार म्हणजे जमिनीच्या हक्कांमध्ये झालेले बदल होय. जेव्हा एखाद्या जमिनिच्या हक्कांमध्ये किंवा अधिकरांमध्ये बदल होतो तेव्हा त्याची नोंद गाव नमुना सहा मध्ये घेतली जाते. एखादी जमीन कशी व कोणाकडून मिळाली? हे आपल्याला जुन्या फेरफारांमुळे समजते. ७/१२ उताऱ्यावर स्वतंत्र रकान्यात फेरफार झालेले पहायला मिळतात. कोणतीही जमिनी खरेदी किंवा विक्री करण्यापूर्वी त्या जमिनीचे जुने फेरफार तपासणे अत्यंत महत्वाचे असते. जमिनीचे जुने फेरफार पाहण्यासाठी तलाठी किंवा तहसीलदार कडे अर्ज करता येतो.

जमिनीच्या फेरफाराची सविस्तर माहिती मिळविण्यासाठी कोऱ्या कागदावर हाताने किंवा टाईप करून अर्ज लिहता येतो. सर्वप्रथम, अर्जाच्या उजव्या बाजूला अर्जदाराचे नाव व पत्ता लिहावा.त्याखाली, डाव्या बाजूला प्रति मध्ये तहसीलदार कार्यालय किंवा तलाठी कार्यालय त्याचप्रमाणे, तालुका, जिल्हा नमूद करावा.  विषय मध्ये फेरफार मिळणे बाबत असे नमूद करावे. अर्जामध्ये स्वतःचे नाव, गाव लिहून, विनंतीपूर्वक फेरफार मिळणेबाबत मागणी करावी. अर्जामध्ये सातबाऱ्यावरील फेरफार क्रमांक अवश्य नमूद करावा. तसेच, रु. ५ चा स्टॅम्प जोडावा. अर्जासोबत सातबारा उतारा जोडून, तलाठी किंवा तहसीलदार कार्यालयात सादर करावा.

तलाठी फेरफार अर्ज नमुना pdf  इथून डाऊनलोड करा.

जमीन मोजणी अर्ज नमुना:

अनेक कारणांमुळे शेतजमिनीची मोजणी करणे आवश्यक असते. शेतजमीच्या मोजणीचा अर्ज भूमी अभिलेख विभागाच्या तालुका स्तरावरील उप-अधीक्षक भूमी अभिलेख किंवा नगर भूमापन अधिकारी यांच्याकडे करता येतो.

ज्या शेतजमिनीची मोजणी करायची आहे, त्या ७/१२ उतारा वरील जमीन धारकाच्या नावे अर्ज लिहावा लागेल. वहीत नमुन्यातील शेत जमीन अर्जामध्ये अर्जदाराचे संपूर्ण नाव आणि सर्वे नं., मोजणीचे कारण, लगत भूधारकांचे नाव व पत्ते, राज्य, जिल्हा, तालुका, गाव, त्यानंतर पिनकोड, मोबाईल नंबर, इमेल, आधार नंबर इत्यादी तपशील भरावा. अर्जासोबत संबंधित जमिनीचे ७/१२ उतारे, विहित मोजणीचे फी भरलेले चलन, मोजणी करावयाच्या जमिनीचा अंदाजित नकाशा इत्यादी कागदपत्रे जोडावीत. हा अर्ज  bhumiabhilekh.maharashtra.gov.in या शासकीय संकेतथळाद्वारे ऑनलाईन माध्यमातून देखील करता येतो.

जमीन मोजणी अर्ज नमुना pdf  इथून डाऊनलोड करा.

विवाह नोंदणी प्रतिज्ञापत्र नमुना:

महाराष्ट्र विवाह नोंदणी अधिनियम १९९८ या कायद्यानुसार विवाह नोंदणी करणे आवश्यक असते. विवाह नोंदणी प्रमाणपत्र हे वधू - वरासाठी विवाह संपन्न झाल्याचा कायदेशीर पुरावा असतो. विवाह प्रमाणपत्र कित्यके कायदेशीर बाबींसाठी उपयुक्त ठरत असतो. विवाह नोंदणीसाठी विहित नमुन्यातील अर्ज भरून तसेच, आवश्यक कागदपत्रे जोडून शहरी भागात विवाह निबंधक आणि ग्रामीण भागात ग्रामसेवक यांच्याकडे अर्ज करावयाचा असतो.

विवाह नोंदणी साठी नमुना अर्ज ड मध्ये, आवश्यक तपशील जसे की, विवाहाची दिनांक, ठिकाण, पती- पत्नीचे नाव, धर्म, व्यवसाय पत्ता, विवाहाच्या वेळेची वधू -वराची स्थिती (Martial Status) इत्यादी तपशील भरावा. अर्जा सॊबत पुढील कागदपत्रे जोडावीत.

१. वधू -वराचा जन्म दाखला

२. लग्नपत्रिका

३. मतदार ओळखपत्र / आधार कार्ड

४. ३ साक्षीदारांचा तपशील 

याचबरोबर, विवाह नोंदणी प्रतिज्ञापत्र आवश्यक असते. विवाह नोंदणी प्रतिज्ञापत्र नमुना pdf  इथून डाऊनलोड करा.

अधिक वाचा: विवाह नोंदणी अशी करा


ग्रामपंचायत घर नोंदणी अर्ज नमुना:

ग्रामपंचायत हद्दीतील सर्व घरांची नोंद ग्रामपंचायतीच्या दफ्तरी असणे आवश्यक असते. नवीन घर बांधताना विहित नमुन्यातील अर्ज ग्ग्रामपंचातीच्या कार्यालयात  सादर करावा लागतो. ग्रामपंचायत घर नोंदणी अर्ज (ग्रामपंचायत घर बांधकाम परवानगी अर्ज नमुना) सादर करताना अर्जातील आवश्यक माहिती भरावी लागते. जसे की, स्वतःच्या मालकीच्या जमिनीचा गट नं., मिळकत नं., घराची लांबी-रुंदी, घराची दिशा, मिळकतीचे वर्णन, दगड विटा मातीचे घर / विटा वाळु सिमेंट यांचे लोंखडी / सिमेंट पत्राचे घर इ., शौचालय इत्यादी माहितीसह विनंती अर्ज सादर करावा.

ग्रामपंचायत घर नोंदणी अर्ज स्वहस्ते कोऱ्या कागदावर लिहून किंवा टाईप करून ग्रामसेवक व सरपंच यांच्या नावे लिहून, आवश्यक कागदपत्रांसह ग्रामपंचातीमध्ये सादर करावा. अर्जा सोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत:

१. जागेचे खरेदी खत / बक्षिस पत्र

२. जागेचा 7/12 उतारा

३. आणेवारी संमती पत्र 

४. चतुरसीमा (100 रु स्टँप)

पीडीएफ स्वरूपातील ग्रामपंचायत घर नोंदणी अर्ज नमुना pdf  इथून डाऊनलोड करा. (ग्रामपंचायत घर बांधकाम परवानगी अर्ज नमुना).

नळ कनेक्शन अर्ज ग्रामपंचायत:

ग्रामपंचायत हद्दीत नवीन अर्ज करण्यासाठी विहित नमुन्यातील माहिती भरून ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समितीकडे किंवा सरपंच / ग्रामसेवकडे अर्ज करावा. अर्जामध्ये, अर्जदाराचे संपूर्ण नाव, ज्या जागेत कनेक्शन घ्यावयाचे आहे त्या जागेचा पत्ता, फोन नं. अर्जदाराचा प्रकार ( घरमालक, भाडेकरी, वहिवाटदार इ.) लिहावे. पाण्याचा कनेक्शन प्रकार, पाहिजे असलेल्या कनेक्शनची साईझ, कनेक्शन पाण्याचा वापर घरगुती की इतर इत्यादी तपशील भरावा लागतो. अर्जासोबत घरपट्टी पावतीची प्रत जोडावी. 

नळ कनेक्शन नमुना अर्ज pdf  इथून डाऊनलोड करा

ग्रामपंचायत सदस्य राजीनामा नमुना अर्ज:

अनेक कारणांमुळे ग्रामपंचायत सदस्य आपल्या सदस्य पदाचा राजीनामा स्वतःहुन देऊ शकतात. ग्रामपंचात निवडणूक मध्ये निवडून आलेले सदस्य आपल्या पदाचा राजीनामा अर्ज सरपंचला देऊ शकतो. अर्ज दिल्यावर त्याची पोचपावती अवश्य घ्यावी. राजीनामा अर्ज स्पष्ट आणि विनाशर्त असावा. अर्जामध्ये राजीनामा देण्याचे कारण नमूद करावे. तसेच, आपल्या पदाची शेवटची तारीख कोणती असेल ते नमूद करावे.

सदस्याने, दिलेला राजीनामा परत घ्यायचा झाल्यास राजीनामा अर्ज दिलेल्या दिनांक पासून एका महिन्याच्या कालावधीत परत घेता येतो. तसे, संबंधित सरपंचास कळविणे आवश्यक असते.

ग्रामपंचायत सदस्य राजीनामा नमुना pdf अर्ज इथून डाऊनलोड करा.


या पोस्ट देखील तुम्हाला आवडू शकतात

ग्रामपंचायतीच्या विविध वेबसाईट

ग्रामपंचायत गाव नमुने १ ते ३३

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या