ग्रामपंचायत सदस्य राजीनामा नमुना

 

ग्रामपंचायत सदस्य राजीनामा नमुना Gram Panchayat Sadasya Rajinama Marathi ग्रामपंचायतचे सर्व सदस्य प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे प्रौढ मतदान पद्धतीने निवडले जातात. जी व्यक्ती भारताची नागरिक असेल, तीच्या वयाची १८ वर्षे पूर्ण झाली असतील आणि जिचे नाव संबंधित गावाच्या मतदार यादीत समाविष्ट झाले असेल अशा कोणत्याही व्यक्तीला ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदान करण्याचा हक्क प्राप्त होतो आणि असा कोणताही व्यक्ती ज्याचे वय २१ वर्षापेक्षा कमी नसेल तो ग्रामपंचायतीच्या सदस्यत्वासाठी पात्र ठरतो.

हे देखील वाचा: ग्रामपंचायत निवडणूक (सदस्यांची) पात्रता

ग्रामपंचायत सदस्य राजीनामा नमुना pdf | ग्रामपंचायत सदस्य पदाचा राजीनामा | Gram Panchayat Sadasya Rajinama । ग्रामपंचायत सदस्य राजीनामा मराठी । ग्रामपंचायत सदस्य राजीनामा महाराष्ट्र

ग्रामपंचायत किंवा इतर कोणत्याही शासकीय व्यवस्थेतील कर्मचाऱ्यांना/अधिकाऱ्यांना स्वतःहुन आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा हक्क असतो. याशिवाय कोणत्याही शासकीय अधिकाऱ्यांनी आपल्या कर्तव्य पार पाडण्यात कसूर केली तर त्यांना पदावरून कमी करण्याचा अधिकार शासनाला किंवा संबंधित प्रशासनाच्या संरचनेला असतो. ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम २९ मध्ये ग्रामपंचायत सदस्यांचा राजीनामा आणि राजीनाम्या संबंधातील विवाद याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत.


ग्रामपंचायत सदस्य पद कोणत्या कारणांमुळे संपुष्टात येऊ शकते?

ग्रामपंचायतीच्या निवडून आलेल्या सदस्यांचे सदस्यत्व पुढील कारणांसाठी संपुष्टात येऊ शकते:

१) ग्रामपंचायत सदस्यांनी आपल्या अधिकार पदाचा स्वतःहून राजीनामा दिल्यास.

ग्रामपंचायतीचा निवडुन आलेल्या सदस्याने स्वतःच्या सहीने सरपंचाला उद्देशून पत्र लिहून राजीनामा देऊ शकतो. असे राजीनामा पत्र मिळाल्यावर सरपंच तो ग्रामसेवकडे (सचिव) पाठवतो आणि ग्रामसेवक पंचायतीच्या लगतच्या पुढील सभेपुढे ठेवतो.

एकाद्या सदस्याच्या राजीनाम्याच्या खरेपणाबद्दल विवाद उत्पन्न झाल्यास - 

सदस्याचा राजीनामा ग्रामसेवकाने पंचायतीच्या सभेपुढे ज्या तारखेस ठेवण्यात आला असेल, त्या तारखेपासून सात दिवसांच्या आत संबंधित सदस्य त्याबद्दल  जिल्ह्याधिकारीकडे दाद मागू शकतो. 

जिल्ह्याधिकारी अशा वादात पंधरा दिवसांच्या आता निर्णय देतो. जिल्ह्याधिकाऱ्यांच्या निर्णय सदस्यास अमान्य असेल तर पुढे संबंधित सदस्याला विभागीय आयुक्ताकडे अपील करता येते. असे अपील मिळाल्यापासून पंधरा दिवसांच्या आत आयुक्त त्यावर निर्णय देतो.

ग्रामपंचायत सदस्याच्या राजीनाम्याच्या खरेपणाबद्दल कोणताही विवाद नसल्यास- 

सदस्याचा राजीनामा ज्या तारखेस पंचायतीच्या सभेपुढे ठेवण्यात आला असेल त्या तारखेपासून सात दिवस संपल्यानंतर अंमलात येतो.

ज्या बाबतीत वाद उत्पन्न झाला असेल अशा सदस्याचा राजीनामा त्याने आयुक्ताकडे अपील केले नाही तरी जिल्हाअधिकाऱ्याने निर्णय दिल्याच्या तारखेपासून सात दिवस संपल्यानंतर अंमलात येतो. 

ज्या बाबतीत आयुक्ताकडे अपील करण्यात आले असेल अशा सदस्याचा राजीनामा आयुक्ताने अपील फेटाळल्यावर तत्काळ अमलात येतो. 

२) ग्रामपंचायत सदस्याने आपले कर्तव्य पार पाडण्यात कसूर/गैरवर्तणूक केल्यास.

ग्रामपंचायतीच्या सदस्याने आपले कर्तव्य पार पाडताना गैरवर्तणूक केल्यास किंवा कोणत्याही प्रकारचे लांच्छनास्पद वर्तन केल्याबद्दल दोषी ठरल्यास किंवा आपल्या कर्तव्यात दुर्लक्ष केल्यास किंवा असमर्थ ठरला असल्यास अशा सदस्याला त्याच्या अधिकार पदावरून काढून टाकण्यात येते. 

परंतु, असे की संबंधित जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाच्या आदेशानुसार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने ग्रामपंचायतीस आणि संबंधित सदस्यास रीतसर नोटीस देऊन चौकशी करणे आणि त्यास आपले म्हणणे मांडण्याची संधी देणे आवश्यक असते. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने आपला अहवाल स्थायी समितीस सादर केल्यावरच त्या व्यक्तीला अधिकार पदावरून काढून टाकता येते.


३) ग्रामपंचायत सदस्याची गावातील अनुपस्थिती व सभेत गैरहजर राहिल्यास.

ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायतीच्या परवानगीशिवाय गावात लागोपाठ चार महिन्यांहुन अधिक कालावधीसाठी गैरहजर राहिला असल्यास किंवा ग्रामपंचायतीच्या परवानगीशिवाय ग्रामपंचायतीच्या मासिक सभेला लागोपाठ सहा महिने गैरहजर राहिल्यास. अशा सदस्याच्या बाबतीत त्याचे अधिकारपद रिकामे झाले काय याविषयीचा निर्णय संबंधित जिह्यापरिषदेचा अध्यक्ष घेतो. अध्यक्षाकडून त्या प्रश्नाचा निर्णय घेतला जाईपर्यंत त्या सदस्याला सदस्य राहण्यास असमर्थ ठरविले जात नाही.

सदस्याला जिह्यापरिषदेच्या अध्यक्षाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध संबंधित सदस्याला राज्य शासनाकडे अपील करता येते. परंतु, ग्रामपंचतीच्या सदस्याला आपले म्हणणे मांडण्याची संधी दिल्याशिवाय अध्यक्ष त्याच्या विरुद्ध कोणताही निर्णय देत नाही.

ग्रामपंचायतीचा कार्यकाल ५ वर्षांचा असतो आणि ग्रामपंचातीच्या सदस्य पदाचा कार्यकाल देखील ग्रामपंचायतीच्या कार्यकाला एवढा असतो. ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीतुन निवडून आलेल्या सदस्यांच्या अधिकारपदाचा कालावधी हा तिच्या पहिल्या सभेच्या तारखेपासून सुरू होतो. ग्रामपंचायतीचे निवडून आलेले सदस्य त्यांच्या मधील सरपंच उपसरपंच यांची निवड केली जाते. 

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम १४५  नुसार ग्रामपंचायतीचा ५ वर्षाचा कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वीच ग्रामपंचायतीचे विसर्जन झाल्यास विसर्जनाच्या आदेशात नमूद केलेल्या तारखेपासून त्या ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांना आपली पदे सोडावी लागतात. विसर्जनाच्या तारखेपासून सहा महिन्यांच्या आता त्या ग्रामपंचायतीची नव्याने निवडणूक घेणे बंधनकारक असते.

हे देखील वाचा : ग्रामपंचायतीचे विसर्जन

ग्रामपंचायत किंवा कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याने/कर्मचाऱ्याने राजीनामा अर्ज देताना घ्यावयाची काळजी (शासन निर्णयाप्रमाणे) :

१. शासकीय अधिकाऱ्याने/कर्मचाऱ्याने आपल्या पदाचा राजीनामा देताना संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याला (सदस्याने-सरपंचला) उद्देशून त्यास लेखी किंवा योग्य मार्गाने सादर करावा व तो दिल्याची पोचपावती घ्यावी.

२. राजीनामा अर्ज स्पष्ट व विनाशर्त असावा. त्यात कुठल्याही अटी, शर्तींचा समावेश नसावा.

३. राजीनामा अर्ज सादर करताना त्यात पदाची शेवटच्या दिवसाची दिनांक आणि राजीनाम्याचे स्पष्ट कारण/हेतू नमूद असावे.

४. राजीनामा दिल्यानंतर तो राजीनामा परत घ्यायचा असल्यास, त्याने राजीनामा सादर केल्याच्या दिनांकापासून एक महिन्याच्या आत तसे संबंधित अधिकाऱ्याला कळवावे.

ग्रामपंचायत सदस्य राजीनामा नमुना अर्ज pdf:

ग्रामपंचायत सदस्य राजीनामा नमुना अर्ज pdf स्वरूपात इथून डाऊनलोड करा. हा अर्ज साध्या कोऱ्या कागदवर स्वअक्षरात लिहला तरीही चालतो.

ग्रामपंचायत सदस्य राजीनामा नमुना अर्ज pdfDownload Now

माहिती आवडल्यास इतरांसोबत नक्की शेअर करा आणि खाली टिप्पणी करून आपल्या प्रतिक्रिया कळवा.

हे देखील वाचा : ग्रामपंचायत सदस्य, सरपंच व उपसरपंच अपात्रता

या पोस्ट देखील तुम्हाला आवडू शकतात

ग्रामपंचायत मासिक सभा नियम व अटी

ग्रामसभा - आमच्या गावात आम्हीच सरकार

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या