विवाह नोंदणी फॉर्म नमुना ग्रामपंचायत Vivah Nondani Maharashtra

विवाह नोंदणी फॉर्म नमुना ग्रामपंचायत | विवाह नोंदणी कागदपत्रे | विवाह नोंदणी अर्ज नमुना ग्रामपंचायत | महाराष्ट्र विवाह नोंदणी अधिनियम १९९८ PDF | विवाह नोंदणी फॉर्म ग्रामपंचायत | विवाह नोंदणी फॉर्म कसा भरावा | विवाह नोंदणी अर्ज नमुना | विवाह नोंदणी प्रतिज्ञापत्र नमुना | विवाह नोंदणी फॉर्म नमुना ड | ग्रामपंचायत विवाह नोंदणी प्रमाणपत्र | विवाह नोंदणी साठी लागणारे कागदपत्रे | विवाह नोंदणी प्रमाणपत्र नमुना | Vivah Nondani Marathi | Vivah Nondani Dakhla | Vivah Nondani Fee | Vivah Nondani Kashi Karavi | Vivah Nondani Form in Marathi | Vivah Nondani Form Pdf Download Marathi | विवाह नोंदणी कशी करावी | मॅरेज सर्टिफिकेट साठी लागणारी कागदपत्रे | विवाह मंडळाची नोंदणी नियमावली | Vivah Nondani Maharashtra.

विवाह नोंदणी फॉर्म नमुना ग्रामपंचायत | विवाह नोंदणी कागदपत्रे | विवाह नोंदणी अर्ज नमुना ग्रामपंचायत | महाराष्ट्र विवाह नोंदणी अधिनियम १९९८ PDF | विवाह नोंदणी फॉर्म ग्रामपंचायत | विवाह नोंदणी फॉर्म कसा भरावा | विवाह नोंदणी अर्ज नमुना | विवाह नोंदणी प्रतिज्ञापत्र नमुना | विवाह नोंदणी फॉर्म नमुना ड | ग्रामपंचायत विवाह नोंदणी प्रमाणपत्र | विवाह नोंदणी साठी लागणारे कागदपत्रे | विवाह नोंदणी प्रमाणपत्र नमुना | Vivah Nondani Marathi | Vivah Nondani Dakhla | Vivah Nondani Fee | Vivah Nondani Kashi Karavi | Vivah Nondani Form in Marathi | Vivah Nondani Form Pdf Download Marathi | विवाह नोंदणी कशी करावी | मॅरेज सर्टिफिकेट साठी लागणारी कागदपत्रे | विवाह मंडळाची नोंदणी नियमावली | Vivah Nondani Maharashtra.

विवाहाची नोंदणी करणे बंधनकारक नसले तरीही, अनिवार्य आहे. विवाह नोंदणी हा वधू - वरासाठी कायदेशीर पुरावा असतो. विवाहाची नोंद किंवा विवाह प्रमाणपत्र या बाबी कित्यके महत्वाच्या कामात उपयोगी पडत असतात. याचा उपयोग मुलाचा ताबा मिळवणे, विमाचा दावा करणे, बँकेतील वारसदार (नॉमिनेशन), वारसा हक्क आणि अशा कित्येक बाबींसाठी फायदेशीर ठरतो. विवाहाची नोंदणीचा कायदा ग्रामपंचायत संस्थेसह, सर्वधर्मीय व्यक्तींसाठी संपूर्ण भारताभर लागू होतो.

ग्रामपंचायत अधिनियम कायद्यातील कलम ४५ मध्ये नमूद केल्याप्रमाणे ग्रामपंचायतीद्वारे जन्म, मृत्यू आणि विवाह यांची नोंद ठेवणे हे ग्रामपंचायतीच्या कर्तव्यांपैकी एक महत्वाचे कर्तव्य आहे. जन्म, मृत्यू आणि विवाह रजिस्टर मधील नोंदी निरनिराळ्या कामासाठी खात्रीशीर माहिती म्हणून उपयोगी पडते. त्यामुळे, या नोंदी आणि जीवन विषयक आकडेवारी या बाबी अतिशय महत्वाच्या आहेत. सदर लेखामध्ये ग्रामपंचायत हद्दीत विवाह नोंदणी फॉर्म नमुना कसा भरावा? तसेच, महाराष्ट्र विवाह नोंदणी अधिनियम १९९८ कायद्यातील महत्वाच्या बाबी पाहणार आहोत. (Vivah Nondani marathi).

महिला बचत गट नोंदणी अर्ज


विवाह नोंदणी अर्ज नमुना ग्रामपंचायत

वरीलप्रमाणे नमुद केल्याप्रमाणे विवाह नोंदणी करून घेणे हे ग्रामपंचायत अधिनियम कायद्यातील कलम ४५ मधील कर्तव्यापैकी एक कर्तव्य आहे. महाराष्ट्र विवाह नोंदणी अधिनियम १९९८ विवाह नोंदणी बाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत त्या पुढीलप्रमाणे.

१. ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक (सचिवाने), ग्रामपंचायतीच्या इतर कागद्पत्रांसोबतच जन्म, मृत्यू, उपजत मृत्यू आणि विवाह नोंदणीची रजिस्टरे ठेवणे बंधनकारक आहे.

२. जन्म, मृत्यू, उपजत मृत्यू आणि विवाह यांची माहिती गावातील कोतवालाने ग्रामपंचायत ग्रामसेवकाला पुरवावी लागते.

३. ग्रामसेवकाने ठेवलेल्या नोंदीच्या दोन प्रति ५ तारखेच्या आत संबंधित गट विकास अधिकारी यांच्याकडे पाठवाव्यात.

४. जन्म, मृत्यू, उपजत मृत्यू आणि विवाह यांची नोंद नाही झाली असली तरीही 'नोंद नाही' असा शेरा पाठविणे गरजेचे आहे.

विवाह नोंदणी अर्ज नमुना ग्रामपंचायत

महाराष्ट्र विवाह मंडळाचे विनियमन आणि विवाह नोंदणी अधिनियम १९९८ च्या कलम ३ च्या कलमाअंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासनाने दिनांक १ फेब्रुवारी, २००१ पासून ग्रामपंचायतीमधील ग्रामसेवकांना ग्रामपंचायत हद्दीतील विवाहांची नोंद करण्यासाठी 'विवाह निबंधक' म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यावेळी ग्रामसेवकाने  'विवाह निबंधक' म्हणून पुढील कार्यपद्धत अवलंबिणे गरजेचे असते.

 १. विवाह नोंदणी ही वर किंवा वधू ज्या ठिकाणी राहत आहेत, त्यापैकी कोणत्याही एका विवाह निबंधकाच्या कार्यालयात नोंदवायचे आहे, विवाह ठिकाणाच्या निबंधक कार्यालयात नोंदवायचे नाही. (विवाह नोंदणी अधिनियम १९९८ चे कलम (१) व नियम ५). (Vivah Nondani Form in Marathi).

२. विवाह नोंदणी अर्ज नमुना स्वतः वराने भरून द्यावयाचा असतो. तो कोणत्याही व्यक्तीमार्फत किंवा पोस्टामार्फत पाठविता येत नाही.

३. विवाह नोंदणी कायद्यातील कलम ६ (ब) प्रमाणे, विवाह नोंदणी करतेवेळी वर, वधू आणि ३ साक्षीदार हजर  राहणे आवश्यक असते.

४. विवाह नोंदणी, विवाहाच्या तारखेपासून ९० दिवसांच्या आत करणे आवश्यक असते. (विवाहाचा दिवस सोडून मोजावेत).

५. विवाह झाल्यावर ९० दिवस उलटून गेल्यास, त्यावर रु. १५/-/ फी म्हणून आकारले जातात. (नियम ५ [२]).

६. विवाह विज्ञप्ति विवाहाच्या तारखेपासून एक वर्षांपर्यंत शास्ती रु. ५०/- व रु. १५/- असे धरून रु. ६५/- आकारले जातात.

७. विवाह विज्ञप्ति विवाहाच्या तारखेपासून एक वर्षानंतर दाखल केल्यास रु. १००/- व रु. १५/- असे एकूण रु. ११५/- आकारले जातात. (कलम ६ [२] व नियम ७ [१], [२]).

विवाह नोंदणी अर्ज नमुना इथून डाऊनलोड करा (विवाह नोंदणी फॉर्म नमुना ड).

सुकन्या समृद्धी योजना

महाराष्ट्र विवाह नोंदणी अधिनियम १९९८ PDF

मुंबई विवाह नोंदणी कायदा १९५३ हा दिनांक १५/०५/१९९९ पासून रद्द करण्यात आला असून, महाराष्ट्र विवाह मंडळाचे विनियमन आणि विवाह नोंदणी अधिनियम १९९८ हा नवीन कायदा अस्तित्वात आला आहे.

भारताने १८८६ मध्ये जन्म, मृत्यू आणि विवाह नोंदणी कायदा मंजूर केला गेला. या कायद्यानुसार केंद्रीय विधान परिषदेने जुलै 2017 मध्ये सर्व धर्मांसाठी विवाह नोंदणी अनिवार्य करण्यासाठी केंद्रीय कायदा लागू करावा अशी शिफारस केली होती. त्यानुसार, महाराष्ट्र विवाह नोंदणी अधिनियम, १९९८ यानुसार विवाह  नोंदणी करण्यात येते. शहरी भागात विवाहाची नोंदणी विवाह निबंधक मार्फत तर ग्रामीण भागात ग्रामसेवकद्वारे केली जाते. (Vivah Nondani Kashi Karavi).

महाराष्ट्र विवाह नोंदणी अधिनियम १९९८ कायद्यानुसार विवाह नोंदणी करण्यासाठी नमुना ड' हा अर्ज भरून, आवश्यक कागदपत्रांसह विवाह कार्यालयात विवाह नोंदणी करावी लागते. नोंदणी करतेवेळी वर-वधू कार्यालयात उपस्थित असणे आवश्यक असते. महाराष्ट्र विवाह नोंदणी अधिनियम १९९८ हा कायदा कोणत्याही ठराविक भागापुरता लागू करण्याची तरतूद नसल्याने तो महाराष्ट्रातील सर्व भागास लागू आहे.

महाराष्ट्र विवाह नोंदणी अधिनियम १९९८ PDF इथून डाऊनलोड करा.


विवाह नोंदणीसाठी लागणारे कागदपत्रे

विवाह नोंदणी करतेवेळी 'विवाह नोंदणी नमुना ड' हा विहित नमुन्यातील अर्ज भरून सोबत खालीलप्रमाणे आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतात. (मॅरेज सर्टिफिकेट साठी लागणारी कागदपत्रे).

१. वधू-वर यांचा जन्मदाखला, शाळा सोडल्याचा दाखला, दहावी/बारावी मार्कशीट यापैकी कोणतेही एक प्रत.

२. रेशन कार्ड, वधूचा माहेरचा पुरावा, वाहन परवाना, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र यापैकी कोणतेही एक.

३. लग्नपत्रिका, लग्नपत्रिका नसल्यास स्वयंघोषणा पत्र किंवा लग्न विधी करतानाचा फोटो आवश्यक आहे.

४. वर वधू घटस्फोटित असल्यास कोर्टाच्या हुकुमाची साक्षांकित केलेली प्रत.

५. वधू-वर पैकी विधवा/विधुर असल्यास मयत पती/पत्नीचा मृत्यू दाखला.

६. 'विवाह नोंदणी नमुना ड' अर्जाच्या क्रमांक. ७ मधील रकान्यात नाव, पत्ता आणि तारखेसह स्वाक्षरी.

७. 'विवाह नोंदणी नमुना ड' अर्जाच्या पान ४ वर रु. १००/- किंमतीचा कोर्ट फी स्टॅम्प लावणे आवश्यक आहे.

८. मुस्लिम समाजाच्या विवाह कायद्यानुसार फॉर्ममध्ये क्र. ७ मध्ये काझी यांची माहिती, त्यांची तारखेसह स्वाक्षरी असावी. तसेच, निकाह नाम्याची साक्षांकित प्रत जोडावी लागते.

९. निकाहनामा उर्दू भाषेत असेल तर मराठी किंवा इंग्रजी भाषेत भाषांतर करून अर्जासोबत जोडावा.

महाराष्ट्र विवाह मंडळाचे विनियमन आणि विवाह नोंदणी अधिनियम १९९८ हा अधिनियम भारतीय ख्रिश्चन विवाह अधिनियम १८७२ किंवा पारशी आणि घटस्फोट अधिनियम, १९३६ या खाली लागलेल्या विवाहांना लागू होणार नाही.

विवाह नोंदणी अधिनियम १९९८ कलम ६ नुसार अर्जदाराने सादर केलेल्या कागदपत्रांची खातरजमा न झाल्यास विवाह निबंधक अन्य कागद्पत्रांची मागणी करू शकतात.

ग्रामपंचायत नमुने १ ते ३३

विवाह नोंदणी फॉर्म कसा भरावा

ग्रामपंचायत, नगर पंचायत, परिषद किंवा नगर पालिका ठिकाणी विवाह नोंदणी करण्यासाठीचा विहित नमुन्यातील अर्ज (ऑफलाईन अर्ज) 'विवाह नोंदणी नमुना ड' खालीलप्रमाणे भरता येईल. (विवाह नोंदणी फॉर्म नमुना ड अर्ज PDF (विवाह नोंदणी फॉर्म) डाऊनलोड करण्यासाठीची लिंक खाली दिली आहे).

१. विवाहाची दिनांक लिहा.

२. विवाह झालेल्याचे ठिकाण/पूर्ण पत्ता लिहा. 

३. कोणत्या कायद्यान्वे विवाह संपन्न झाला (हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन किंवा इतर).

४. पतीचे (वर) नाव.

५. पतीला दुसऱ्या नावाने ओळखत असल्यास ते नाव लिहा.

६. धर्म लिहा (जन्माने व दुसरा धर्म स्वीकारला असल्यास तो लिहा.

७. विवाह विधी ज्या तारखेस संपन्न झाला त्या तारखेस असलेले वय.

८. व्यवसाय व व्यवसायाचा पत्ता लिहा.

९. विवाहाच्या वेळेच्या स्थिती लिहा (अविवाहित/घटस्फोटित/विधुर).

१०. पतीचा पूर्ण पत्ता लिहा.

११. पतीची दिनांकसह सही.

( क्रमांक ४ ते ११ प्रमाणे पुढे पत्नीची माहिती भरावी).

१२. त्यानंतर, ३ साक्षीदारांची माहिती भरा जसे की, साक्षीदाराचे नाव, घरचा पत्ता, व्यवसाय व व्यवसायाचा पत्ता, विवाहित जोडप्याशी असेलेले नाते आणि साक्षीदारांची दिनांकसह स्वाक्षरी.

१३. पुरोहित/भटजी यांची माहिती जसे की, नाव, पत्ता, धर्म, वय आणि दिनांकसह सही.  

१४. अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांचा तपशील.

१५. त्यानंतर, विवाह नोंदणीसाठी निबंधकाकडे अर्ज सादर केल्याची दिनांक.

विवाह नोंदणी प्रमाणपत्र नमुना

विवाह नोंदणी प्रमाणपत्र हे संबंधित विवाह निबंधकाकडून विवाह नोंदणीची प्रक्रिया केल्यानंतर अर्जदारास दिले जाते. विवाह नोंदणी प्रमाणपत्रामध्ये पती-पत्नीस कायदेशीररित्या विवाहबद्ध झाले आहेत असे प्रमाणित करण्यात येते. प्रमाणपत्रामध्ये, पती-पत्नीच्या नावासहित, पत्ता, विवाहाची तारीख, ठिकाण आणि विवाह विधी कोणत्या कायद्याअंतर्गत संपन्न झाला याचा अनुच्छेद क्रमांक असतो. विवाह नोंदणी प्रमाणपत्र नमुना pdf स्वरूपात इथून पाहू शकता.

विवाह नोंदणी प्रमाणपत्र नमुना PDF - डाऊनलोड करा.

विवाह मंडळाची नोंदणी नियमावली

महाराष्ट्र विवाह मंडळ विनियमन व विवाह नोंदणी नियम १९९९ या कायदयानुसार नवीन विवाह मंडळ किंवा वधु-वर सूचक मंडळे स्थापन करण्यासाठी विवाह मंडळाची नोंदणी करणे बंधनकारक आहे.

विवाह मंडळ स्थापन करू इच्छिणारी व्यक्ती किंवा व्यक्तींचा समूह विवाह मंडळ नोंदणी करण्यासाठी 'नमुना अ' मध्ये विवाह निबंधकाकडे लेखी अर्ज करावा लागतो. या अर्जासोबत नोंदणी शुल्क रु. २०००/- आकारले जातात. विवाह मंडळ नोंदणी करण्यासाठी, मंडळ एखादी संस्था असल्यास त्याच्या उल्लेखाची प्रत आणि अर्जदाराची ओळखपत्र व त्याच्या निवासाच्या पुराव्याची प्रत इत्यादी कागदपत्रे आवश्यक असतात.

हे देखील वाचा: गावाचा सरपंच कसा असावा?

या पोस्ट देखील तुम्हाला आवडू शकतात

• ग्रामसभा नियम व अटी

सरपंच व उपसरपंच मानधन

सरपंच अविश्वास ठराव

ग्रामसेवक कर्तव्य व कामे

 

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या

  1. विवाह नोंदणी करण्याकरिता जे ज्ञापन असते ते आपण आपल्या वेबसाईटवर डाउनलोड करता उपलब्ध केले आहे ते आता बदललेले आहे, नविन प्रकारचे फॉर्म आता उपलब्ध झालेले आहे, नविन फॉर्म मध्ये वर,वधू व तिनही साक्षीदार ह्यांच्या फोटो तसेच स्वाक्षरी आणि अंगठ्याचा ठसा घेण्याचे कॉलम जोडण्यात आलेले आहेत। त्यामुळे कृपया आपण नविन फॉर्म ईथे अपलोड करावा व जुना काढून टाकावा। धन्यवाद, नविन मार्गदर्शक सूचना व फॉर्म आपल्याकडे उपलब्द नसेल तर कळवावे, मी पुरवून देईल।

    उत्तर द्याहटवा

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत.