महिला बचत गट नोंदणी अर्ज Mahila Bachat Gat

महिला बचत गट योजना | महिला बचत गट नोंदणी अर्ज | महिला बचत गटाचे फायदे | महिला बचत गट कर्ज योजना 2021 | उमेद अभियान महिला बचत गट | महिला बचत गट नावे | बचत गट नाव लिस्ट इन मराठी | महिला बचत गटाचे महत्व | बचत गट व्यवसाय माहिती | महिला बचत गट प्रस्तावना | महिला बचत गट संख्या | महिला बचत गट माहिती मराठी | महिला बचत गटाचा इतिहास | स्वयंसहाय्यता बचत गट pdf | बचत गट नाव लिस्ट इन मराठी | महिला बचत गटाची स्थापना कोणी केली? | महिला बचत गटाची स्थापना कधी झाली? | स्वयंसहाय्यता बचत गट | Mahila Bachat Gat Information in Marathi | महिला बचत गट कर्ज योजना 2022 | Swayam Sahayata Bachat Gat | Mahila Bachat Gat Yojana 2020

महिला बचत गट योजना | महिला बचत गट नोंदणी अर्ज | महिला बचत गटाचे फायदे | महिला बचत गट कर्ज योजना 2021 | उमेद अभियान महिला बचत गट | महिला बचत गट नावे | बचत गट नाव लिस्ट इन मराठी | महिला बचत गटाचे महत्व | बचत गट व्यवसाय माहिती | महिला बचत गट प्रस्तावना | महिला बचत गट संख्या | महिला बचत गट माहिती मराठी | महिला बचत गटाचा इतिहास | स्वयंसहाय्यता बचत गट pdf | बचत गट नाव लिस्ट इन मराठी | महिला बचत गटाची स्थापना कोणी केली? | महिला बचत गटाची स्थापना कधी झाली? | स्वयंसहाय्यता बचत गट | Mahila Bachat Gat Information in Marathi | महिला बचत गट कर्ज योजना 2022 | Swayam Sahayata Bachat Gat

महिला बचत गट प्रस्तावना

भारतीय स्वतंत्रनंतरच्या काळात महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी देशभरात अनेक योजना राबविल्या जात आहेत. पूर्वी पासूनच चालत आलेल्या चालीरीती, रूढी, परंपरामुळे महिलांना आर्थिक, सामाजिक आणि आरोग्य बाबतच्या अनेक संकटांना सामोरे जावे लागत असते. परंतु, गेल्या काही वर्षांपासून महिला सबलीकरण, सक्षमीकरणावर भर देऊन स्त्री व पुरुष यांच्यात सर्व बाबतीत समानता प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने महिला स्वयंसहायता समूह चळवळ देशपातळीवर जोमाने सुरू आहे.


महिला आर्थिकदृष्ट्या एकत्रित येऊन स्वावलंबी होतील तेव्हाच त्या सर्व क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने आत्मविश्वासाने वावरू शकतील, व्यवसाय उद्योगधंदे करतील. चूल आणि मूल ही संज्ञा समूळ नष्ट करून खऱ्या अर्थाने त्यांचे सबलीकरण होईल. स्वतःचे कुटूंब, समाजाला पुढे नेऊन पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्वतःची सक्षमता सिद्ध करू शकतील. महिलांच्या सबलीकरणाची व आर्थिक सक्षमीकरणाची चळवळ बचत गटामुळे (Mahila Bachat Gat) यशस्वी होत आहे.

महिला कर्ज योजना

महिला बचत गटाचा इतिहास

महिला बचत गटाची संकल्पना सर्वप्रथम बांगलादेशात रुजली गेली. डॉ. महमंद युनूस यांनी १९८३ साली बांगलादेशातील चितगाव येथे महिला बचत गटाची (Bachat Gat) मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर, १९९१ मध्ये भारतात बचत गट सुरू होऊ लागले. पहिल्या वर्षात ५०० बचत गट स्थापनेचे उद्दिष्टे ठेवले होते. परंतु हा आकडा २५० वर स्थिरावला गेला. पुढे, १९९८ पासून मात्र या चळवळेने वेग घेतला. सावकारी कर्ज आणि त्याच्या अवाढव्य व्यजातून मुक्त होण्यासाठी बचत गट हा महिलांसाठी एकमेव पर्याय होता. सद्यस्थितीत अनेक बँका आणि स्वयंसेवी संस्था बचत गटाला बळकटसाठी कार्यरत झाल्या आहेत.

आजच्या स्थितीत आंध्रप्रदेशात सर्वाधिक बचत गट कार्यरत आहेत. त्याखालोखाल तामिळनाडू, महाराष्ट्र राज्यात बचत गट मोठया प्रमाणात कार्यरत आहेत.

महिला बचत गट माहिती मराठी

ग्रामीण भागातील दुर्लब गरीब महिलांना, जनतेला त्यांच्या वैयक्तिक मूलभूत गरजा भागविण्यासाठी तसेच व्यवसाय उद्योगधंदे उभे राहावे आणि त्यांची सावकाराच्या पाशातून मुक्तता होऊन अल्प दरात कर्ज उपलब्ध व्हावे हे उद्दिष्ट ठेवून नाबार्डने (राष्ट्रीय कृषी व ग्रामीण  बँक) १९९२ साली स्वयं सहाय्यता गट बँक जोडणीचा उपक्रम भारतात सुरु केला. गेल्या पंधरा वर्षाच्या कालावधीमध्ये या उपक्रमाने जगभर सर्वात मोठा सूक्ष्म पत कार्यक्रम म्हणून प्रसिद्धी मिळाली आहे.

महिला बचत गटामध्ये समविचारी महिलांनी एकत्रित येऊन दैनंदिन/मासिक स्वरूपात काही बचत करायची असते आणि त्या बचत गटाच्या माध्यमातून बँकेतून किंवा स्वयंसेवी संस्थेमधून कर्ज घ्यायचे असते. (Mahila Bachat Gat Information in Marathi).


मोफत शिलाई मशीन योजना

स्वयंसहाय्यता बचत गट म्हणजे काय?

स्वयं सहाय्यता म्हणजेच, स्वत:ची मदत स्वतःच करणे. इतर कोणाच्या मदतीवर अवलंबुन न राहणे, कुटुंब चालवत असताना होणाऱ्या यातना किंवा होणारे कष्ट दुर करणे. स्वयंसहायता बचत गटांची स्थापना करण्यासाठी साधारणपणे १५ ते २० लोकाचा किंवा महिलांचा समविचारी, समान आर्थिक गरज असेलेल्या एकाच गाव, पाड्यातील समुह एकत्र येणे आवश्यक असते. तो समुह एक विशिष्ट स्वरुपाचे उदिष्ट घेऊन स्वच्छेने एकत्र आला तर त्यास 'स्वयं सहाय्यता बचत गट' किंवा 'बचत गट' असे म्हणता येईल. या बचत गटातील प्रत्येक सभासद एकसमान रक्‍कम ठरावीक कालावधीत बचत म्हणून एकत्रित करीत असतात. त्याचा उपयोग सभासदांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी किंवा व्यवसाय उभा करण्यासाठी कर्ज पुरवितात त्याला 'बचत गट' (Bachat Gat) असे म्हणतात.

महिला बचत गटाचे फायदे

समाजातील वाईट चाली-रूढी -परंपरा मोडून काढत महिलांच्या विकासाला हातभार लावण्याचे कार्य एकाप्रकारे महिला बचत गटामार्फत होत आहे. स्वयं सहाय्यता बचत गटामुळे अनेक फायदे महिलांना तसेच समाजाला होत असतात.

१. बचत गटामुळे महिलांचे किंवा पुरुषांचे संघटन होऊन त्यांना काटकसरीची सवय लागते.

२. बचत गटांमुळे अडीअडचणीच्या वेळी वैयक्तीक आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी सावकाराकडून कर्ज घ्यावे लागत नाही.

३. बँकेतील व्यवहाराचे ज्ञान होते.

४. बचत गटामुळे सुलभरित्या कर्जाचा पुरवठा होतो. (Bachat Gat Loan).

५. सावकारी पाशातून मुक्तता होऊन, कमी व्याज दरामध्ये आर्थिक सहाय्य उपलब्ध होते.

६. बचत गटामुळे गटातील सदस्यांमध्ये सहकार्यची भावना आणि विश्वास निर्माण होतो.

७. बचत गटांमुळे महिलांना 'चूल व मूल' या संकल्पनेतून बाहेर पडून नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळते.

८. महिलांना स्वावलंबी, आत्मनिर्भर बनण्यास मदत होते.

९. बचत गटातील सभासदांना अंतर्गत अल्प दराने कर्ज पुरवठा होतो.

१०. बचत गटामुळे विविध शासकीय योजनांची माहिती होते.

११. एका वर्षानंतर गटातील प्रती सभासद जास्तीत जास्त २५०० पर्यंत व्यवसायासाठी खेळते भांडवल पुरवले जाते. (महिला बचत गटाचे महत्व).

बचत गटाचे फायदे, बचतगट प्रस्तावना आणि बचतगटाचा इतिहास पाहिल्यानंतर बचत गटाचे उद्देश पाहुयात.

विधवा पेन्शन योजना


महिला बचत गटाचे उद्देश

गरीब, दारिद्रय रेषेखालील महिलांची पिळवणुक थांबावी आणि त्यांना समाजात ताठ मानाने जगता यावे हे बचत गटांचे मुख्य उद्दिष्ट दिसून येते.

1. सावकारांच्या पाशात अडकावे लागु नये तसेच, प्रत्येकाला बचतीची सवय लागावी.

2. बचत गटातील सदस्यांनी दैनंदिन/मासिक स्वरुपात काही बचत करायची आणि अडीअडचणींना या एकत्रीत बचतीतून कर्ज द्यायचे.

3. दारिद्रय रेषेखालील गरिब महिलांच्या विकासासाठी १० किंवा जास्तीतजास्त २० महिला एकत्र येऊन बचत गट स्थापन करुन बचतीला प्रोत्साहन देणे आणि अडीअडचणींना गरजू महिलांना छोटे कर्ज मिळवुन देणे.

महिला बचत गटाची वैशिष्ट्ये

स्वयं सहाय्यता बचत गटाच्या माध्यमातून ज्या महिला मागासवर्गीय, आदिवासी महिलांच्या आर्थिक, सामाजिक, सास्कृतिक, शैक्षिणक विकासासाठी स्थापन केलेल्या बचत गटाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे मांडता येतील.

1. बचत गटाच्या दरमहा मासिक बैठकीमध्ये जमा खर्चाचा आढावा ठेवला जातो.

2. गटातील सर्व सभासदांना विश्वासात घेऊन बचत गटाची सर्व निर्णय आणि कार्यवाही केली जाते.

3. बचत गटातील सदस्य ऐच्छिक असतात. सदस्य होण्यासाठी कोणावरही बळजबरी केली जात नाही.

4. स्वयं सहाय्यता बचत गटाचा सर्व व्यवहार सर्वासमोर  पारदर्शक रितीने पार पाडला जातो.

5. शासकीय बँका, वित्तीय संस्था इत्यादींच्या सहकार्याने स्वयं सहाय्यता बचत गटाचा कारभार व व्यवहार चालवला जातो.

6. बचत गटामार्फत जे आर्थिक व्यवहार केले जातात. त्याच्या सर्व लेखी नोंदी ठेवल्या जातात.

महिला बचत गटाची स्थापना

महिला बचत गटाची ऐतिहासिक स्थापना पहिली तर, डॉ. महमंद युनूस यांनी १९८३ सालामध्ये बांगलादेशातील चितगाव येथे केली होती. १९९१ पासून भारतात बचत गट सुरु होऊ लागले.

बचत गटाचे सभासद केवळ महिला, केवळ पुरुष अथवा मिश्र म्हणजेच महिला व पुरुष असेही असू शकतात. बचत गटांची संख्या कमीत कमीत १० किंवा जास्तीत जास्त २० ही बचत गट सभासदांची संख्येची मर्यादा आहे. अपंग व्यक्तींनी मिळून बचत गट काढला तर, अशा बचत गटाची संख्या कमीत कमी ५ किंवा जास्तीत जास्त २० एवढी असू शकते.

1. बचत गट स्थापन करण्यासाठी सर्वप्रथम कार्यक्षेत्राची निवड आणि सर्वेक्षण केले जाते.

2. समविचारी, गरीब, गरजू, दारिदयरेषेखालील महिलांचा शोध घेऊन त्यांना बचत गटाच्या संकल्पने विषयी माहिती देणे.

3. सर्वांच्या मताने पदाधिकारी यांची निवड करणे जसे की, गट प्रमुख, अध्यक्ष, खजिनदार.

4. एकत्रितपणे बचत गटाचे नियम ठरवणे तसेच, प्रशिक्षण आयोजन करणे.

5. गटाचे कामकाज दरमहा बैठकीत करणे.

महिला बचत गट नावे

एकदा बचत गट स्थापन करावयाचा ठराव सर्वानुमते मंजूर झाला की, त्या बचत गटाला नाव देणे गरजेचे असते. त्याच नावाने बचत गट सर्वत्र ओळखला जातो. बँकेत बचत गटाच्या नावानेच खाते उघडावे. बचत गटाला सर्वांच्या मताने नाव द्यावे. उदा. आदर्श महिला बचत गट, साई महिला ग्रामीण बचत गट, शारदा महिला बचत गट, ऐश्वर्या महिला बचत गट, धनलक्ष्मी महिला बचत गट इत्यादी. ग्रामीण आणि शहरी बचत गट, महिला बचत गट, पुरुष बचत गट आणि दारिद्ररेषेखालील व दारिद्र रेषेवरील बचत गट असे बचत गटाचे प्रकार असतात. (Bachat Gat Name List in Marathi).

यशस्वी महिला बचत गटाची वैशिष्ट्ये

यशस्वी बचत तेव्हाच गणला जातो, जेव्हा-जेव्हा गटाचे योग्य नियोजन आणि नियमावली तयार केली जाते.

• दरवर्षी गटातील गटप्रमुख बदलण्यात यावा.

• पासबुकात सभासदाने खाडाखोड करु नये.

• स्वतः पासबुक लिहु नये.

• गटातील सर्वाची बचत समान असावी.

• बचत गटाच्या नावाने बँकेत बचत खाते उघडण्यात यावे. दरमहा भरलेले जमा-खर्च व इतर रेकॉर्ड तपासून पहावे.

• सुरवातीचे ६ महिने कोणतीही कर्ज देण्यात येऊ नये.

• सभा दरमहा होणे आवश्यक.

• खर्च, पासबुक एन्ट्री आवश्यक.

• सभेत जे निर्णय होतात इतिवृत्त लिहणं आवश्यक.

• सभेपूर्वी इतिवृत्त वाचणे.

• बचत गटाच्या अंतर्गत महिलांना केवळ २% ते ३% व्याजदर आकारले जाते.

कर्जाच्या मागणीनुसार/गरजेनुसार त्याची क्रमवारी करणे आवश्यक त्यानुसार निर्णय घेऊन बचत गटामार्फत कर्ज दिले गेले पाहिजे.

बचत गटाची स्थापना केल्यानंतर गटातील सदस्यांना अडचणीच्या वेळी केलेल्या बचतीमधून कर्ज दिली जाते. हे कर्ज वितरण करताना त्याचे योग्य व्यवस्थापन केले गेले पाहिजे.

1. कर्ज गटाबाहेरील व्यक्तीस देऊ नयेत.

2. सर्व रक्‍कम एकाच सदस्यास देता येत नाही.

3. कर्जाच्या रक्कमेची गरज किती हे बघून कर्ज वितरित करण्यात यावे.

4. गटातील सर्व सदस्यांना समान कर्ज दिले जाऊ नये ते गरजेनुसार दिले जावे.

महिला बचत गट नोंदणी अर्ज

बचत गटाची कोणत्याही ठिकाणी नोंदणी करणे आवश्यक नाही. नाबार्डच्या परिपत्रकाप्रमाणे केवळ बचत गटाच्या सदस्यांच्या ठरावाने त्या बचत गटाचे बँकेत खाते काढता येऊ शकते. बँकेत बचत गटाने रीतसर खाते सुरु केले की बचत गट (Mahila Bachat Gat) सुरु होते. त्यासाठी वेगळ्या नोंदणीची गरज नसते. सुरवातीच्या काळात नोंदणी, हिशोब, लेखापरीक्षण किंवा इतर कागदपत्रांची पूर्तता करणे लोकांना जमत नाही म्हणून नोंदणी न करण्याची सवलत बचत गटांना शासनाने दिली आहे. तरीही, बचत गटांची नोंदणी करावयाची झाल्यास धर्मादाय आयुक्तांकडे बचत गटाचा पूर्ण प्रस्ताव देऊन नोंदणी करता येते. एका महिन्याच्या आत बचत गट/ संस्था नोंदणीकृत केली जाते. जर, एका महिन्याच्या आत नोंदणी प्रक्रिया पूर्ण होत नसेल तर, धर्मादाय आयुक्तांमार्फत प्रस्ताव मान्य झाला असे समजावे व काम सुरु करावे.

काही ठिकाणी बँकेतील कमर्चारी बँकेमध्ये बचत गट खाते उघडण्यासाठी संबंधित बचत गट नोंदणीकृत असायला पाहिजे असा निरर्थक वाद घालत असतात. (महिला बचत गट नोंदणी - Bachat Gat Registration Process in Maharashtra).

महिला बचत गटाची पहिली सभा

बचत गट स्थापन करण्याचा निर्णय झाल्यावर गटाची पहिली सभा होणे आवश्यक असते. या सभेमध्ये बचत गटाचा उद्देश काय आहे? गटाचे नाव काय? दरमहा वर्गणी किंवा किती रक्कम प्रत्येकांनी जमा करावी? पदाधिकारी कोण असावेत? जसे कि अध्यक्ष, सेक्रेटरी, खजिनदार यांची नेमणूक  करावी . कोणत्या बँकेत संयुक्त खाते उघडावे इत्यादी सारख्या प्राथमिक चर्चा होणे आवश्यक आहे.

महिला बचत गट कर्ज योजना 2022

बचत गटाचा समूह किंवा बचत गटातील सभासदाला उद्योग व्यवसाय करण्यासाठी बँकेतून कर्ज घ्यावयाचे असेल तर उद्योगाचा प्रकल्प अहवाल सादर करणे आवश्यक. त्यानंतर बँकेचे अधिकारी अहवालाची पडताळणी केली जाते. ७ वर्ष उत्तम कामगिरी केली तर बिनव्याजी कर्ज देखील उपलब्ध होते.

महिला बचत गट शासकीय योजना

महिला बचत गटाच्या शासकीय योजना आणि अनुदान पुढीलप्रमाणे (Mahila Bachat Gat Yojana 2020/2021/2022).

1. ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील बचत गटाला ग्रामविकास विभागाच्या ग्राम स्वरोजगार योजनेत पंचायत समितीकडून स्वयंरोजगारासाठी रु. १०,०००/- अनुदान दिले जाते व त्यावर बँकेकडून रु. १५०००/- कर्ज असे एकूण रु. २५०००/- व्यवसाय-लघुउद्योग करण्यासाठी खेळते भांडवल दिले जाते.

2. शहरी भागातील व्यक्तींच्या बचत गटास महानगरपालिका, नगरपालिका यांचेकडून स्वयंरोजगारासाठी रु.१.२५ लाख (५०%) अनुदान दिले जाते व उर्वरित ५०% रक्‍कम रु. १.२५ लाख राष्ट्रीयकृत बँकेमार्फत कर्जरूपाने बचत गटास मिळते.

3. शहरी भागातील दारिद्रय रेषेखालील बचत गटास महानगरपालिका, नगरपालिका यांचेकडून स्वयंरोजगारासाठी १५% परंतु कमाल रु. ७५००/- इतके अनुदान शासनाकडून दिले जाते. हे अनुदान राष्ट्रीयकृत बँकेकडील जास्तीत जास्त कर्ज रु. ५०,०००/- वर दिले जाते. 

4. राष्ट्रीयकृत बँका गटाच्या बचतीच्या प्रमाणावर १:२ ते १:४ या प्रमाणात टप्प्याटप्प्याने गटास कर्ज देतात.

5. सहकारी बँका बचत गटाच्या बचतीच्या प्रमाणात म्हणजेच १:१ ते १:४ या प्रमाणात व्यवसायासाठी कर्ज देतात.

6. स्टेट बँक ऑफ इंडिया बचत गटातील सदस्याला घरबांधणीसाठी रु. ५०,०००/- व भुखंड खरेदीसाठी रु. २५०००/- कर्ज ७.७५ % या व्याजदराने देते. (Mahila Bachat Gat Government Schemes).

बचत गटाबाबत वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न

1. बचत गटाची नोंदणी करणे आवश्यक असते का?

बचत गटाची नोंदणी करणे बंधनकारक नाही. परंतु, जर बचत गटाच्या माध्यमातून काही शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी बचत गटाची नोंदणी करावी लागते.

2. बचत गटाची नोंदणी कोणत्या संस्थेमार्फत करावी?

गटाची नोंदणी करावयाची झाल्यास शहरी भागात नगरपालिकेत आणि ग्रामीण भागात ग्रामपंचायत/पंचायत समिती कार्यालयात केली जाते. याशिवाय बँका, नाबार्ड, माविम इ. संस्था देखील बचत गटाची नोंदणी करू शकतात.

2. पुरुष व महिलांचा मिश्र गट बनवावा का?

मिश्र बचत गटात सर्वसाधारण पुरुषांचे वर्चस्व राहते. म्हणून, बचत गट मिश्र नसावा. तो पुरुषांचा किंवा महिलांचा असाच असावा.

3. बचत गटामध्ये कोणती पदे आवश्यक असतात?

बचत गटामध्ये सर्वसाधारण अध्यक्ष, सचिव, खजिनदार इत्यादी पदे आवश्यक असतात. गरजेप्रमाणे अधिकही पदे बनवली जाऊ शकतात.

4. बँकेतील खाते कोणाच्या नावावर असावे?

बचत गटाच्या बँकेतील खाते केवळ बचत गटाच्या नावावर असावे.

5. बचत गटात दरमहा किती व्याजदर आकारावा?

बचत गटात दरमहा २ टक्के इतके व्याज सामान्यतः आकारले जाते.

6. बचत गट का बनवावा?

केवळ शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी बचत गट बनवू नये. बचत गटाच्या माध्यमातून स्वयं रोजगार उभे राहवेत असे उद्दिष्ट असावे.

7. बँक कर्जासाठी बचत गटास कोणती कागदपत्रे देणे आवश्यक आहे?

- गटाचा बँक कर्जासाठीचा ठराव

- कर्ज मागणी अर्ज

- गटातील सभासदांचा परस्पर सहमती करार

- बँकेसोबत कर्जासाठी केलेले करारपत्र.

8. बचत गटास कर्ज मिळविण्यासाठी तारण ठेवण्याची आवश्यकता आहे का?

बचत गटास १० लाख पर्यंतच्या कर्ज रकमेसाठी कोणत्याही  तारणाची आवश्यकता नाही.

हे देखील वाचा: सुकन्या समृद्धी योजना

या पोस्ट देखील तुम्हाला आवडू शकतात

• प्रधानमंत्री सूर्योदय योजना मराठी

• राष्ट्रीय वयोश्री योजना मराठी

• जननी सुरक्षा योजना

• लेक लाडकी योजना महाराष्ट्र

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या