लेक लाडकी योजना 2023 मराठी | लेक लाडकी योजना 2023 फॉर्म | लेक लाडकी योजना कागदपत्रे | लेक लाडकी योजना माहिती | लेक लाडकी योजना नियम | लेक लाडकी योजना पात्रता | लेक लाडकी योजना अर्ज कुठे करायच | लेक लाडकी योजना महाराष्ट्र | लेक लाडकी योजना फॉर्म Online | लेक लाडकी योजना फॉर्म pdf | Lek Ladaki Yojana Maharashtra
महिला आणि मुलींचे सक्षमीकरण, शिक्षण, स्वावलंबीकरण होण्यासाठी, राज्यसरकार आणि केंद्रसरकार राज्यात अनेक योजना राबविल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाकडून वर्ष २०२३ मध्ये लेक लाडकी ही योजना सुरु करण्यात आली. महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विधानसभेत आगामी वर्षासाठीचा (Maharashtra Budget 2023-24) अर्थसंकल्प मांडण्यात आला. यावेळी त्यांनी मुलींच्या सक्षमीकरणासाठी महत्वपूर्ण योजनांची घोषणा केली. त्यामध्ये लेक लाडकी ही योजना लक्षवेधी ठरली. सदर लेखमध्ये या योजनेबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. (लेक लाडकी योजना माहिती).
लेक लाडकी योजनेचा उद्देश
लेक लाडकी योजना २०२३ ही महाराष्ट्र शासनाद्वारे मुलींसाठी राबविण्यात आलेली एक महत्वकांक्षी योजना आहे. मुलीच्या जन्माबाबत सकारात्मक दृष्टिकोन समाजात निर्माण होऊन मुलीचे उज्वल भविष्य अमलात यावे. यासाठी लेक लाडकी योजना सुरु करण्यासाठी राज्य शासनाकडून महत्वाचं पाऊल टाकण्यात आलं. लेक लाडकी योजना २०२३ या योजनेअंतर्गत देशातील गरीब कुटुंबातील मुलींना जन्मापासून ते शिक्षणापर्यंत किंवा विवाहापर्यंत आर्थिक मदत केली जाते. (लेक लाडकी योजना महाराष्ट्र).
• मुलींचा आर्थिक विकास व्हावा.
• मुली शिक्षणापासून वंचित राहू नयेत.
• समाजातील होत असलेल्या गर्भपाताला आळा घालता यावा, मुलींची सक्षमीकरण व्हावे.
• मुलांच्या संख्येच्या तुलनेत मुलींची संख्या समान व्हावी.
इत्यादी प्रमुख उद्देशाने लेक लाडकी योजना २०२३ सुरु करण्यात आली.
लेक लाडकी योजना पात्रता
लेक लाडकी योजना २०२३ योजनेमधून पिवळ्या आणि केशरी रेशनकार्ड कुटुंबातील मुलींना लाभ देण्यात येतो. योजनेची पात्रता खालीलप्रमाणे:
१. लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
२. महाराष्ट्र राज्यातील केवळ मुली या योजेनचा लाभ घेऊ शकतात.
३. मुलीच्या नावे बँकेत खाते असणे आवश्यक आहे.
४. मुलगी १८ वर्षांपर्यंत होईपर्यंत योजनेचा लाभ मिळवता येऊ शकतो.
५. पिवळे आणि केशरी रेशन कार्डधारक कुटंबातील मुली लेक लाडकी योजनेसाठी पात्र असतील.
लेक लाडकी योजना लाभ
महाराष्ट्र लेक लाडकी योजना फायदे काय आहेत. याची माहिती घेऊ.
• मुलीच्या जन्मानंतर, मुलीच्या आईच्या नावे रु. ५००० तिच्या बँक खात्यात जमा केले जाईल.
• मुलगी चौथीत गेल्यानंतर मुलीच्या नावाने ४००० रुपये बँक खात्यात जमा केले जातात.
• मुलगी सहावीत गेल्यानंतर ६००० रुपये मुलीच्या बँक खात्यात जमा केले जातील.
• मुलगी अकरावीत गेल्यानंतर मुलीच्या बँक खात्यात ८००० रुपये जमा करण्यात येतील.
• लाभार्थी मुलीचे वय १८ वर्षे झाल्यानंतर मुलीच्या शिक्षणासाठी किंवा विवाहासाठी ७५ हजार रुपये देण्यात येतील.
लेक लाडकी योजना कागदपत्रे
लेक लाडकी योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत. ती खालीलप्रमाणे नमूद केली आहेत. परंतु, अजून अधीकृतपणे कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत याची माहिती अजून समोर आली नाही. तरीही, सुकन्या समृद्धी योजनेसाठी लागणारी आवश्यक कागपत्रांच्या नियमानुसार खालील कागदपत्रे लागू शकतात. (लेक लाडकी योजना कागदपत्रे).
• लाभार्थी मुलीचा आधारकार्ड
• लाभार्थी मुलीच्या आई वडिलांचा आधारकार्ड
• मुलीचा जन्मदाखला
• रहिवासी दाखला
• पासपोर्ट आकाराचे फोटो
• मोबाईल क्रमांक
लेक लाडकी योजना अर्ज कुठे करायचा?
राज्य सरकारने लेक लाडकी योजना २०२३ च्या अर्थसंकल्पात घोषित केली आहे. मात्र, ही योजना अद्याप राज्यात अधिकृतपणे लागू करण्यात आली नाही. तसेच, लेक लाडकी योजना अर्ज कुठे करायचा?, ऑनलाईन अर्ज नोंदणी कशी व कुठे करायची? इत्यादी माहिती उपलब्ध करण्यात आलेली नाही. जेव्हा लेक लाडकी योजनेचे रेजिस्ट्रेशन सुरु होईल तेव्हा माझा गाव या संकेतस्थळावर तुम्हाला संपूर्ण माहिती वाचायला मिळेल. (लेक लाडकी योजना महाराष्ट्र Lek Ladaki Yojana Maharashtra in Marathi).
या पोस्ट देखील तुम्हाला आवडू शकतात
0 टिप्पण्या
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत.