जननी सुरक्षा योजना Janani Suraksha Yojana Maharashtra 2024

Janani Suraksha Yojana Maharashtra 2024 देशातील ग्रामीण व शहरी भागात राहणाऱ्या दारिद्र रेषेखालील कुटुंबामधील गर्भवती मातांना लाभ देण्यासाठी केंद्रशासनाने देशभरात जननी सुरक्षा योजना सुरु केली. केंद्रशासनाचा राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन पूर्वीचा राष्ट्रीय मातृत्व लाभ योजने ऐवजी जननी सुरक्षा योजना सन २००५-०६ महाराष्ट्र राज्यात सुरु करण्यात आली. (जननी सुरक्षा योजना 2024).

जननी सुरक्षा योजना 2024 | Janani Suraksha Yojana Maharashtra | जननी सुरक्षा योजना उद्दिष्टे २०२४ | जननी सुरक्षा योजना मराठी माहिती

जननी सुरक्षा योजना उद्दिष्टे २०२४:

राज्यातील दारिद्र रेषेखालील महिलांचे आरोग्य संस्थेमधील होणाऱ्या प्रसुतीचे प्रमाण वाढविणे आणि राज्यातील माता मृत्यू आणि अर्भकमृत्य चे प्रमाण कमी करणे. गर्भवती महिलांना आर्थिक सहाय्य करणे हे जननी सुरक्षा योजनेचे मुख्य उद्दिष्ट्य आहे.

जननी सुरक्षा योजना लाभार्थी पात्रता:

१. सदर गर्भवती महिला ग्रामीण भागातील दारिद्र रेषेखालील असली पाहिजे.

२. दारिद्र रेषखालील कुटुंबासाठी दिलेले नोंदणी पत्र किंवा शिधापत्रिका सादर करणे आवश्यक असेल.

३. सदर कागदपत्रे उपलब्ध नसल्यास संबंधित तहसीलदार, तलाठी किंवा संबंधित ग्रामपंचायतीने दिलेला पुरावा ग्राह्य धरण्यात येतो.

४. सदर महिलेचे वय प्रसूतीपूर्वी नोंदणी करताना कमीत कमी १९ वर्षे असावे.

५. सदर योजनेचा लाभ पहिल्या २ अपत्यांपर्यंत देण्यात येतो.

जननी सुरक्षा योजना लाभ


या योजनेअंतर्गत दारिद्रय रेषेखालील सर्व लाभार्थी, अनुसुचित जाती व अनुसुचित जमातीतील सर्व गर्भवती मातांना महिलांना लाभ दिला जातो. या लाभार्थी महिलेचे वय प्रसवपूर्व नोंदणी करताना कमीत कमी १९ वर्षे असावे. या योजनेचा लाभ २ जिवंत अपत्यापर्यंत राहतो.

ग्रामीण व शहरी भागातील फक्त दारिद्रय रेषेखालील लाभार्थीची प्रस्ती घरी झाल्यास आवश्यक कागदपत्राची पूर्तता केल्यास रु. ५०০/- एवढे अन्दान लाभार्थीना देय आहे. शहरी भागातील लाभार्थीची प्रसूती कोणत्याही आरोग्य संस्थेत झाल्यास रुपये ६००/- एवढे अनुदान प्रसुतीनंतर सात दिवसांचे आत देय आहे. ग्रामीण भागातील लाभार्थीची प्रसुती कोणत्याही आरोग्य संस्थेत झाल्यास रुपये ७००/- एवढे अनुदान प्रसुतीनंतर सात दिवसांचे आत देय आहे. सिझेरीयन शत्रक्रिया झाल्यास लाभार्थीस रु.१५००/ चा लाभ देय आहे.

योजनेअंतर्गत मिळणारा लाभ लाभार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात थेट जमा केला जातो. त्यासाठी जननी सुरक्षा योजनेअंतर्गत नोंदविण्यात येणाऱ्या लाभार्थींचे बँक खाते त्यांच्या आधार कार्डशी लिंक करणे आवश्यक असते.

जननी सुरक्षा योजना नियम व अटी

१. ही योजना ग्रामीण व शहरी भागातील दारिद्र रेषेखालील महिलांसाठी आहे.

२. प्रसूतीच्या १६ आठवड्यापूर्वी गर्भवती महिलेने आरोग्य केंद्रात नोंदणी करावी.

३. गर्भवती महिलेने नियमित आरोग्य तपासणी करावी. 

४. बाळंतपणानंतर ७ दिवसांच्या आत आरोग्य केंद्रात तपासणी करून घ्यावी.

५. वरील तपासण्या केल्यास ७ महिन्यानंतर बाळंतपणाच्यावेळी किंवा प्रसूतीनंतर एक रकमी रु. ५००/- रुपयांचे अनुदान देण्यात येते.

६. शहरी भागात शासकीय किंवा खाजगी संस्थेत प्रसूती झाल्यास रु. १००/- अतिरिक्त अनुदान देण्यात येते.

७. ग्रामीण भागात शासकीय किंवा खाजगी संस्थेत प्रसूती झाल्यास रु. २००/- अतिरिक्त अनुदान देण्यात येते

९. सदर महिलेच्या प्रसूती काळातील जोखीमेमुळे सिझेरियन करावे लागल्यास व त्यासाठी शासकीय तज्ञ्, वैद्यकीय अधिकारीची सेवा उपलब्ध नसल्यास खाजगी तज्ञ, वैद्यकीय अधिकाऱ्यांना सेवा देण्यासाठी रु. १५००/- एवढे  मानधन देण्यात येते.

जननी सुरक्षा योजना आवश्यक कागदपत्रे

• आधार कार्ड

• अधिवास/ रहिवासी दाखला

• रेशनकार्ड प्रत  

• बँक अकॉउंटचा तपशील

• मोबाइल नंबर

• पासपोर्ट साइज फोटो

जननी सुरक्षा योजना हेल्पलाइन नंबर

जननी सुरक्षा लाभ मिळविण्यासाठी लाभार्थीने जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आवश्यक कागदपत्रांसह भेट देऊन नोंदणी करावी. जननी सुरक्षा योजनेच्या (PMJSY Janani Suraksha Yojana in Marathi) अधिक माहितीसाठी हेल्पलाइन नंबर 104 वर डायल करू शकता.

या पोस्ट देखील तुम्हाला आवडू शकतात

• महिला सन्मान बचत पत्र योजना

• महिला बचत गट योजना

• महिला कर्ज योजना | व्यवसाय कर्ज योजना 

 • सुकन्या समृद्धि योजना माहिती

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या