प्रधानमंत्री सूर्योदय योजना मराठी Pradhan Mantri Suryodaya Yojana Marathi

 प्रधानमंत्री सूर्योदय योजना 2024 | PM Suryodaya Yojana | Pradhan Mantri Suryoday Yojana Online Apply | पंतप्रधान सूर्योदय योजना मराठी | Pradhan Mantri Suryodaya Yojana Marathi

अयोध्येतील श्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशभरात एका नव्या महत्वच्या योजनेची घोषणा केली आहे. योजनेअंतर्गत देशभरातील 1 कोटी घरांच्या छतावर सौरऊर्जा पॅनल लावून देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे विजेची बचत होऊन गरीब व मध्यम वर्गीय कुटुंबाला जास्तीच्या वीज बिलापासून दिलासा मिळणार आहे. ही योजना म्हणजे प्रधानमंत्री सूर्योदय योजना. योजनची घोषणा देशाच्या प्रधानमंत्रीने 22 जानेवारी, 2024 रोजी केली. 

या योजनेबद्दलची सविस्तर माहिती आणि लोकांना नेमका कसा फायदा या योजनेद्वारे मिळणार आहे हे आपण आज या लेखात पाहणार आहोत.

प्रधानमंत्री सूर्योदय योजना 2024 | PM Suryodaya Yojana | Pradhan Mantri Suryoday Yojana Online Apply | पंतप्रधान सूर्योदय योजना मराठी | Pradhan Mantri Suryodaya Yojana Marathi

प्रधानमंत्री सूर्योदय योजना नेमकी काय आहे?


प्रधानमंत्री सूर्योदय योजनेच्याअंतर्गत (What is PM Suryodaya Yojana) देशातील 1 कोटी अल्प आणि मध्यम उत्पन्न असलेल्या लोकांच्या घराच्या छतावर सौरऊर्जा पॅनल बसविले जातील. हे पॅनल सूर्याच्या प्रकशामध्ये चार्ज होतील आणि लोकांना लोकांच्या घरात वीज पुरविण्याचे काम करतील. त्यामुळे विजेचे बचत होऊन अवाढव्य वीज बिलापासून काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. 

प्रधानमंत्री सूर्योदय योजना फायदे Benifits of PM Suryodaya Yojana:

प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचे फायदे खालीलप्रमाणे:

• प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचा मुख्य फायदा म्हणजे वीज बिल बचत होऊन, जनसामान्य लोकांवर वीज बिलाचा भार कमी होणार आहे.

• आजही देशात अशी गाव आहेत, जिथं वीज पोहचली नाही, अशा लोकांना नवा आशेचा किरण मिळणार.

• देशातील वीज टंचाई कमी होईल.

• लाभार्थींना छतावर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी सरकार कडून 40 टक्के आर्थिक अनुदान मिळणार.

• देशातील उर्जा क्षेत्रात वाढ होऊन, भारत स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल करील.

प्रधानमंत्री सूर्योदय योजना खर्च/अनुदान PM Suryoday Yojana Subsidy:

घराच्या छतावर विविध क्षमतेच्या पॅनल आणि बॅटरी बसविण्यात येतात. त्यापैकी तुम्ही तुमच्या छतावर किती क्षमतेचे पॅनल आणि बॅटरी सेटअप करता यावर तुमचा एकूण खर्च अवलंबून असतो. साधारणतः एक किलोवॅट क्षमतेचा सेट अप लावण्यासाठी 50 हजार ते एक लाख एवढा खर्च येतो. तसेच, 5 किलोवॅट क्षमतेच्या सेटअपसाठी 2.25 ते 3.25 लाख रुपये एवढा खर्च येतो. सध्या केंद्र सरकार 'प्रधानमंत्री सूर्योदय योजना' अंतर्गत सोलर पॅनल सेटअपसाठी 40 टक्के सब्सिडी देत आहे. (PM Suryoday Yojana Subsidy).

प्रधानमंत्री सूर्योदय योजना पात्रता PM Suryodaya yojana Eligibility:

• योजनेचा अर्जदार भारतीय असावा.

• अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 1.5 लाखांपेक्षा जास्त नसावं.

• अर्जदार कोणत्याही शासकीय सेवेत नसावा तसेच, पेन्शन धारक नसावा.

• अर्जदाराने आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली असावी.

प्रधानमंत्री सूर्योदय योजना आवश्यक कागदपत्रे Documents Required for PM Suryodaya Yojana:

प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचा लाभ मिळविण्यासाठी तुमच्याजवळ खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

1. शिधापत्रिका (रेशनकार्ड)

2. वीजबिल

3. उत्पन्न प्रमाणपत्र

4. बँक तपशील, बँक पासबुक

5. आधारकार्ड

6. फोटो, मोबाईल क्रमांक

प्रधानमंत्री सूर्योदय योजना ऑनलाइन अर्ज PM Suryodaya Yojana Online Application:


प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचा ऑनलाइन लाभ मिळविण्यासाठी तुम्हाला योजनच्या पुढील अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी लागेल.Website- https://solarrooftop.gov.in/


प्रधानमंत्री सूर्योदय योजना 2024 | PM Suryodaya Yojana | Pradhan Mantri Suryoday Yojana Online Apply | पंतप्रधान सूर्योदय योजना मराठी | Pradhan Mantri Suryodaya Yojana Marathi


• त्यानंतर, तुम्हाला होमपेजवर डाव्या बाजूला 'Apply for Rooftop Solar' हा पर्याय निवडावा.

• राज्य आणि जिल्हा निवडा.

• यानंतर, वीज बिल क्रमांक भरा.

• त्यानंतर, विजेच्या खर्चाची माहिती, सौर पॅनल आणि इतर तुमचा वौयक्तिक तपशील भरा.

• छताचे क्षेत्रफळ टाका.

• त्यानंतर, छताच्या क्षेत्रफळाच्यानुसार तुमचा सौरऊर्जा पॅनल निवडा, 

• आवश्यक कागदपत्रे अपलोड करा, बँकेचा तपशील भरा आणि अर्ज सबमिट करा.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी - सूर्योदय योजेनबाबत ट्विट:

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर, प्रधानमंत्री सूर्योदय योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत देशातील 1 कोटी घरांच्या छतावर सोलर पॅनल लावण्यात येणार आहेत. अशी माहिती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली.

सोशल मीडियाच्या माध्यमातून ते म्हणाले,

भगवान श्री रामांच्या  प्रकाशाने संपूर्ण विश्वाला सदैव ऊर्जा प्राप्त होत असते. आज अयोध्यातील प्राण-प्रतिष्ठाच्या शुभ प्रसंगी माझे संकल्प अधिक दृढ झाले आहेत आणि याच निश्चयातून भारतवासीयांच्या घराच्या छतावर सोलर रूफ टॉस सिस्टिम असावी. ‘अयोध्येहून परतल्यानतंर माझा हा पहिला निर्णय आहे, 1 कोटी घरांवर रूफटॉप सोलर लावण्याचं आमचं लक्ष्य आहे. प्रधानमंत्री सूर्योदय योजनेच्या माध्यमातून याचा प्रारंभ होईल. यामुळे गरीब आणि मध्यमवर्गाला वीजेचं बील कमी येईल, तसंच भारत उर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर बनेल,’ असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

या पोस्ट देखील तुम्हाला आवडू शकतात

जननी सुरक्षा योजना

लेक लाडकी योजना महाराष्ट्र

अंत्योदय अन्न योजना मराठी माहिती

तलाठी कामे व कर्तव्य Duties of Talathi in Marathi

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या