विधवा पेंशन योजना महाराष्ट्र 2021 Vidhwa Pension Yojana Maharashtra

 

विधवा पेंशन योजना महाराष्ट्र 2021 Vidhwa Pension Yojana Maharashtra | विधवा पेंशन योजना कागदपत्रे | विधवा पेंशन फार्म PDF Maharashtra | इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना | विधवा महिलांसाठी योजना 2021

महाराष्ट्रातील विधवा महिलांना आर्थिक सहाय्य देण्याच्या हेतूने राज्य केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना (विधवा पेंशन योजना - Vidhava Pension Scheme) सुरू करण्यात आली. याचबरोबर, राज्यातील दुर्बल, निराधार घटकांसाठी श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना या योजना सुरु करण्यात आल्या. या सर्व योजनेच्या मार्गदर्शक सूचना दिनांक २० ऑगस्ट, २०१९ च्या शासन निर्णयात नमूद केल्या आहेत. त्यापैकी विधवा महिलांसाठी विशेष विधवा पेंशन योजना महाराष्ट्र 2021 (इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना - Indira Gandhi Vidhwa Pension Yojana) या योजनेबद्दल सविस्तर माहिती या लेखात पाहणार आहोत.

विधवा पेंशन योजना महाराष्ट्र 2021 । विधवा महिलांसाठी योजना 2021 । विधवा पेंशन योजना कागदपत्रे । विधवा पेंशन योजना ऑनलाइन फॉर्म । विधवा पेंशन योजना महाराष्ट्र Form । Vidhwa Pension Yojana Maharashtra । vidhwa pension list । vidhwa pension online । vidhwa pension form vidhwa pension list 2021 । vidhava pension scheme । indira gandhi vidhwa pension yojana । indira gandhi rashtriya vidhwa pension yojana । online vidhwa pension apply । vidhwa pension document । vidhwa pension website । vidhva sahay yojana online apply विधवा पेंशन फार्म PDF Maharashtra । widow pension scheme maharashtra

दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असलेल्या ४० ते ७९ वर्ष वयोगटातील विधवा महिला, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेतंर्गत निवृत्तीवेतन मिळण्यास पात्र आहेत. इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेमध्ये केंद्र शासनाकडून लाभार्थ्याला रुपये ३००/-  दरमहा देण्यात येतात. त्याला पूरक असलेल्या राज्य शासनाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेमधून लाभार्थ्यांस देण्यात येणाऱ्या दरमहा रुपये ३००/- अर्थसहाय्यात रुपये ४००/- इतकी वाढ करुन अर्थसहाय्याची रक्‍कम दरमहा रुपये १०००/- (केंद्र शासनाचे रुपये ३००/- व राज्य शासनाचे रुपये ७००/- ) अशी वाढ करण्यात आली.

याच लाभार्थ्यांना राज्य शासनाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेतुन अपत्य नसलेल्या, १ अपत्य असलेल्या व २ अपत्य (२ व त्यापेक्षा अधिक अपत्य) असलेल्या विधवा लाभार्थ्यांना दरमहा रु. ७००/-, रु. ८०० व रु. ९००/- असे एकूण (रु.३००/- च्या अनुदानासह) अनुक्रमे दरमहा रु. १०००/-, रु.११००/-रु. १२००/- प्रतिलाभार्थी अर्थसहाय्य मिळते.

विधवा पेन्शन योजना महाराष्ट्र 2021 ठळक वैशिष्ट्ये:

• लाभार्थ्यांना अनुज्ञेय असलेले अनुदान थेट बँक/पोस्ट खात्यात जमा करण्यात येते.

• लाभार्थ्यांची मुले २५ वर्षाची होईपर्यंत किंवा नोकरी मिळे पर्यंत लाभार्थ्यांना लाभ देण्यात येतो.

• ज्या लाभार्थ्यांना फक्त मुलीच असतील अशा लाभार्थ्यांच्या बाबतीत मुलीचे वय २५ वर्ष झाले अथवा त्यांना नोकरी लागली किंवा त्यांचे लग्न होऊन त्या सासरी गेल्या तरीसुद्धा लाभ चालू राहील.

• लाभार्थ्यांना अर्थसहाय्यचे वितरण दर महिन्याच्या १ तारखेला करण्यात येते.

• शासनाच्या अन्य कोणत्याही योजनेखाली नियमित मासिक आर्थिक लाभ घेत असलेली व्यक्ती इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन योजनेखाली लाभ घेण्यास पात्र राहणार नाही.

• लाभार्थ्यांनी सतत तीन महिने अनुदान उचलले नाही तर संबंधित बँकांनी/पोस्ट मास्तरांनी याबाबतचा तपशील तहसील दाराकडे कळविल्यास, असे पैसे तत्काळ कोषागारात पुन्हा जमा केले जातात.

विधवा पेन्शन योजना पात्रता / निकष :

१. ४० ते ७९ वर्ष वयोगटातील केवळ विधवा व्यक्तीला अर्ज करता येतो.

२. लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असावा.

३. कुटुंबाचे नांव ग्रामीण/शहरी भागाच्या दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील यादीत समाविष्ट असावे.

विधवा पेंशन योजना कागदपत्रे:

विधवा पेंशन योजना महाराष्ट्र आवश्यक कागदपत्रे Vidhwa Pension Document खालीलप्रमाणे:

१. पतीचे निधन झाल्याबद्दल संबंधित ग्रामपंचायत/नगरपरिषद/महानगरपालिकेच्या मृत्यू नोंदवहितील उतारा सादर करणे आवश्यक.

२. वयाचा दाखला म्हणून आधारकार्ड/मतदार कार्ड/शाळा सोडल्याचा दाखला.

३. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाच्या यादीमध्ये त्या व्यक्ती/कुटुंबाचा समावेश असल्याबाबत साक्षांकित उतारा (उत्पन्नाचा दाखला).

४. ग्रामसेवक/तलाठी किंवा कोणत्याही न्यायालयाने दिलेला रहिवासी दाखला.

५. पतीच्या मृत्यूचे प्रमाणपत्र.

६. बँक खात्याचा तपशील.


विधवा पेंशन योजना - लाभार्थी मरण पावल्याची सूचना :

अ) एखादा लाभार्थी मरण पावल्यास, ग्रामपंचायत क्षेत्राच्या बाबतीत ग्राम सेवकाने, नगरपालिका क्षेत्राच्या बाबतीत नगरपालिकेच्या मुख्य अधिकारी व महानगरपालिका क्षेत्राच्या बाबतीत प्रभाग अधिकारी यांनी ती बाब संबंधित तहसिलदार / नायब तहसिलदार यांना तातडीने कळवळी जाते. तहसिलदार / नायब तहसिलदार यांनी आपल्या आर्थिक सहाय्याच्या नोंदवहीमध्ये मृत्यूच्या घटनेची नोंद करतात व परिणामी लाभार्थींना आर्थिक सहाय्य देण्याचे बंद करण्यात येते.

ब) लाभार्थी मृत्यू पावलेल्या दिनांकास आर्थिक सहाय्याची काही थकबाकी निघत असल्यास मृत्यूच्या दिनांकापर्यंतचा हिशोब करुन ती योग्य प्रमाणात लाभार्थींच्या उत्तरजीवी व्यक्‍तीला, म्हणजे त्याच्या कायदेशीर वारसास देण्यात येते.

विधवा पेंशन योजना लाभार्थ्यांची तपासणी :

लाभार्थी हयात असल्याबाबतची तपासणी वर्षातून एकदा खालीलप्रमाणे करण्यात येते.

१. दरवर्षी १ जानेवारी ते ३१ मार्च, या कालावधीत एकदा संबंधित लाभार्थ्यांनी त्यांचे जेथे खाते आहे अशा बँक मॅनेजरकडे अथवा पोस्ट मास्तरकडे स्वत: हजर राहावे लागते व ते हयात असल्याची नोंद बँक मॅनेंजर / पोस्ट मास्तर यांनी घ्यावयाची असते.

२. कोणत्याही कारणामुळे लाभार्थी बँकेत हजर राहू शकला नाही तर त्या लाभार्थ्यांने नायब तहसिलदार / तहसिलदार / उप विभागीय अधिकारी ( प्रांत अधिकारी ) यांचे समोर हजर राहून हयातीबाबतचे प्रमाणपत्र संबंधित तहसिलदाराकडे सादर करावे.

३. कोणत्याही परिस्थितीत हयात प्रमाणपत्र (लाईव्ह सर्टीफिकेट) सादर केल्याशिवाय सदर लाभार्थ्यास दरवर्षी १ एप्रिल पासून आर्थिक सहाय्य / निवृत्तीवेतन देण्यात येत नाही.

विधवा पेंशन योजना अर्ज Application करण्याची पध्दत:

विधवा पेंशन योजनेचा (Vidhwa Pension Yojana Maharashtra 2021) लाभ घेण्यासाठी खाली नमूद केलेल्या मधील नमुना तीन मधील अर्जाच्या दोन प्रतीमध्ये, तो राहत असलेल्या भागातील संबंधित तलाठयाकडे अर्ज Vidhwa Pension Apply करावा लागतो.

अशा अर्जासोबत लाभार्थ्यांच्या पात्रतेच्या/अटींच्या संबंधित कागदपत्रे (Vidhwa Pension Document) व प्रमाणपत्रे जोडण्यात यावीत.

तलाठी यांनी त्यांच्याकडे प्राप्त अर्जाची तपासणी करुन अर्जासोबत जी  कागदपत्रे जोडण्यात आली आहेत, त्यांची व अर्ज कोणत्या योजनेसाठी दिलेला आहे, याची सविस्तर नोंद नोंदवहीमध्ये घ्यावी व अर्जदाराला विहित नमुन्यात पोच पावती द्यावी. तलाठी यांनी नोदवही ठेवणे व त्यामध्ये अर्जाची नोंद ठेवणे बंधनकारक राहील. 

तलाठी प्राप्त अर्जाची व त्यासोबतच्या कागदपत्राची पडताळणी करुन अर्ज संबंधित तहसिलदार / नायब तहसिलदार यांचेकडे पाठवितात.

संबधित तहसिलदार /नायब तहसिलदार यांच्याकडे आलेले अर्ज, प्राप्त तारखेनुसार लावण्यात येतात व त्यांना नोंदणी क्रमांक देऊन एका स्वतंत्र नोंदवहीमध्ये त्याची नोंद घेण्यात येते व संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीमार्फत लाभार्थ्यांची निवड केली जाते.

केंद्र शासनाच्या निकषानुसार वर्षातून दोनदा ग्रामसभेच्या स्तरावर अपात्र लाभार्थी शोध मोहीम घेण्यात येते.

टीप: विधवा पेंशन योजनेचा लाभ मिळविण्यासाठी सध्या कोणतीही ऑनलाईन  (Vidhwa Pension Online) प्रक्रिया नाही.

विधवा पेंशन योजना महाराष्ट्र लाभार्थी यादी / Vidhwa Pension List:

विधवा पेंशन योजनेअंतर्गत लाभार्थी यादीबाबती खालीलप्रमाणे सूचना शासनाकडून दिल्या आहेत.

१. लाभार्थ्यांच्या याद्या तयार करुन अशा याद्या प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये / नगरपालिकेमध्ये / महानगरपालिका प्रभाग कार्यालयात जनतेच्या माहितीसाठी लावण्यात याव्यात.

२. अशा याद्यांची एक अद्ययावत प्रत ग्रामपंचायत / नगरपरिषद / महानगरपालिका प्रभाग कार्यालयात जनतेच्या तपासणीसाठी उपलब्ध करुन देण्यात यावी.

३. जिल्हयातील सर्व योजनांच्या योजनानिहाय लाभार्थी याद्या संगणकीकृत करुन ठेवाव्यात. लाभार्थ्यांच्या याद्या लावणे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सक्तीचे आहे, याची जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट नोंद घ्यावी.

४. जिल्हाधिकारी यांनी लाभार्थ्यांच्या याद्या वेबसाईटवर टाकून त्या वेळोवेळी अद्ययावत कराव्यात.

विधवा पेंशन योजना महाराष्ट्र Form:

संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजनेखाली अर्थसहाय्यासाठी करावयाच्या अर्जाचा नमुना येथून डाऊनलोड करा.

विधवा पेंशन योजना महाराष्ट्र Form - Download Now

विधवा पेंशन योजना संकेतस्थळ महाराष्ट्र Vidhwa Pension Yojana Website: https://sjsa.maharashtra.gov.in/en/schemes-page?scheme_nature=37

तुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात

सुकन्या समृद्धी योजना

अस्मिता योजना महाराष्ट्र

दिव्यांगांसाठी योजना (अपंगासाठी योजना)

माझी कन्या भाग्यश्री योजना


टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत.