भुताच्या गावात अन बाराच्या भावात..! गावाकडची भूते...!

गावाकडची भूते...! 

गावाकडची भूते | ghosts in villages in marathi | ghost stories in marathi आज थोड्या वेगळ्या विषयाकडे वळूया, 'कोकणात भुते नाहीत' असे म्हणनारा मग तो कोकणी माणूस नव्हेच! जगात थायलंड या देशाला जसं 'पांढऱ्या हत्तींचा देश' म्हणून ओळखलं जातं. तसं कोकण म्हणजे 'भुतांच गावं' असे म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आज तुमच्यासाठी कोकणातली प्रामुख्याने आढळणारी भूते यांची माहिती एकत्र करून सादर करत आहे.

village horror story in marathi
काल्पनिक चित्र

भूते ही दोन प्रकाराची असतात.

१. ञास देणारी
२. ञास न देणारी (ही भूते जंगले ,स्मशान,रानमाळ, भरड अशा ठीकाणी वावर करतात)
प्रथम कोकणी मनातील भूते व त्यांचे प्रकार जाणून घेऊ. कोकणात १७ प्रकाराची भूते पहावयास मिळतात.


१.वेताळ
२.ब्रम्हग्रह
३.समंध
४.देवचार
५.मुंजा
६.खवीस
७.गि-हा
८.चेटकीन
९.झोटिंग
१०.वीर
११. बायंग्या
१२. म्हसोबा
१३. जखिन
१४. लावसट
१५. हडळ
१६. भानामति
१७. चकवा.

१. वेताळ: कोकणात वेताळाला भूतांचा राजा म्हणतात.
कोकणातील पिशाच्छ हे वेताळाच्या आधीन असतात.जो अंगातून भूत काढणा-याच्या देहात प्रवेश करतो. व त्याच्या कडून इतर ञास दायक भूतांना पळवून लावतो.

२. ब्रम्हग्रह: हे भूत ब्राम्हणाचे मानले जाते.जो वेदात निपून आहे.पण ज्याला त्याच्या बुध्दीचा गर्व झाला. व त्यातच त्याचा अंत झाला.

३. समंध: ज्याची इच्छा पूर्ण न होता जो मरतो तो समंध होतो. हे भूत प्रामुख्यने गावाच्या वेशीवर जूनाट झाड किंवा  तीठा अशा ठिकाणी पकडते.हे एक संतान नसलेला (र्निवंशी ) ज्याचे कोणी काही कार्य केलेले नसते.त्यापैकी असते. हे कोकणात सर्वात ताकदवान भूत मानले जाते. ह्याला जर कोणी देवथ्यानाच्या आड मार्गे केला तर देवस्थान  देखिल पुढे येत नाही.

४. देवचार: हे मागास वर्गीयांचे भूत आहे. जो लग्नांनंतर थोड्याच दिवसांत मरतो.ही भूते गावाच्या चारही बाजूला असतात.कोकणात ह्यांना डावे अंग म्हटले जाते.कोकणी माणसांच्या गा-हाण्यांत यांचा प्रामुख्यने उल्लेख होतो. ह्याची सहान भूती मिळवण्यासाठी दरवर्षी याला नारळ, साखर,कोंबडा द्यावा लागतो.

५. मुंजा: हे ब्रम्हणां पैकी भूत असते.जो ब्राम्हण मुलगा मुंज झाल्यानंतर सोड मुंज होण्याआधीच मरतो. हे त्याचे भूत असते.ह्याचे मुख्य स्थान हे पिंपळाच्या झाडावर तसेच विहीरीवर असते. हे लोकांना छळत नाही पण घाबरवण्याचे काम मात्र करते.



६. खविस: हा प्रकार मुस्लिमांन मध्ये मोडतो.हे फार ञास दायक भूत असते.ज्याला अतिशय क्रुर रीत्या मारले जाते.तो मेल्यानंतर खविस होतो असा समज आहे.

७. गिर्या / गिर्हा: जो माणूस बूडून मेला किंव्हा ज्याचा खून झाला हे त्याचे भूत आहे.हे भूत पाण्याच्या आस-याला रहाते.हे फार ञास दायक असे भूत आहे.राञीच्या प्रहरात कोणी नदीपार, खाडीपार करताना ह्याच्या तावडीत गावला (सापडला) तर ते त्याला खोल ठीकाणी घेऊन जाते. कोकणात राञीच्या वेळी जे कुर्ले (खेकडे),मासे पकडायला जातात त्यांना हमखास ह्या भूतांचा अनूभव आला असेल. कोकणात असे सांगीतले जाते की जो कोणी या भूताचा केस मिळवू शकला तर हा भूत त्याचा गुलाम बनतो.त्याला हवे ते आणून देतो.पण तो केस त्याला पुंन्हा मिळाला तर तो त्या माण सावर सर्व त-हेची संकटे आणून सोडतो.

८. चेटकीन: हे कुणबी किंवा मागासवर्गीयांचे भूत असते.याला कोकणात डाव असेही संबोधले जाते.

९. झोटिंग: हे भूत खारवी किंवा कोळी समाजातील भूतांन मध्ये गणले जाते.

१०. विर: हे भूत क्षत्रिय जातीच्या व्यक्तीचे असते. जो लग्न न होता मरण पावतो. याला निमा असेही म्हटले जाते.

११. चेडा: तस पहायला गेले तर सहसा हा प्रकार कोकणात जास्त आढळत नाही.हे लग्न न झालेल्या हरीजनाचे भूत असते.हे डोगंरावर जंगलात किंवा गावाच्या सिमेच्या बाहेर वास्तव्यात असते.ह्याचा उपयोग हा सहसा कोणाची शेती बांधायची असेल किंव्हा कोणाच्या शेतीला नूसकान द्यायाचे असेल.ह्या साठी वापरतात. ह्याला दर वर्षी कोबंडा द्यावा लागतो व वर्ष भराचा गुण घेतला जातो.

१२. म्हसोबा: हा ही भूतांचा राजा आहे जो वेताळा प्रमाणे ताकदवान आहे. सहसा हा ही प्रकार अलीकडेच कोकणात पहावयास मिळतो. याचा वापर देवदेवस्की करणारे हे इतरांची कामे करण्यासाठी करतात.ह्याचे ही वर्षाचे कोबंडे पूरवावे लागते.

१३. जखिन: जखिन नाव घेताच एक चिञ विचिञ प्रतिमा डोळ्या समोर उभी रहाते.जी स्ञी बाळंतपणा नंतर दहा दिवसात मरते किंवा विटाळात मरते. किंव्हा जिचा नवरा जिवंत आहे. पण असंख्य यातना घेऊन जी मरते तीला जखिन म्हणतात.आपल्या शञूनां ञास देण्यासाठी लोक हीचा वापर करतात.

१४. हडळ: हाडळ हे एका विधवेचे भूत असते. जी अतिशय हाल अपेस्टा सहन करून मरते ती हडळ होते असे लोकांचे म्हणणे आहे.

१५. भानामती: हा प्रकार कोकणात क्रित्येक ठीकाणी पहावयास मिळतो. हा एक श्मशानी अघोरी प्रकार आहे. एका मडक्यात श्मशानातील हाडे कोळसा रखा हे घेऊन त्यावर विधी केली जाते.व जे घरात किंवा आवारात ,जागेत गाडले जाते.ज्या मुळे घरात चोरी होणे, महत्वाची कागदपञे पैसे गायब होणे घरातील धान्य लवकर संपणे असे प्रकार होतात.

१६. चकवा: गावाच्या सिमेवरील ओसाड माळावर हा प्रकार हमखास मिळतो. ज्याला चकवा असे म्हणतात. कोकणात कित्येेकांनी ह्याचे अनूभव घेतले असतील.हा विनाकारण मानसांना ञास देतो.जी माणसे रस्त्याने चालली असतात. त्यानां रस्ता भटकववण्याचे काम हे भूत करते. जेणे करून तो फिरून फिरून तो त्याच मार्गावर येतो.तो राञभर त्या व्यक्तीला भटकवतच असतो.

१७. बायंगी: हे भूत विकत घेता येते. रत्नागिरी लांजा पट्ट्यात सुमारे १००००/- रुपये खर्च केल्यास विकत मिळते . मालकाची भरभराट करुन शत्रूना त्रास देते.
घराच्या भरभराटी साठी या भूताचा वापर करतात.कोकणात हमखास बहुतेकांच्या घरात हा भूतांचा प्रकार बघायला मिळतो.
तर अशी भुतांची पण भली मोठी यादी असते. त्यांच्यातही इतकी जातपात असते. हे वाचून नवलच वाटतं. 

असो, माझ्या गावातही अशी भुतं मात्र नक्कीच आहेत. ज्यांना बघायची असतील त्यांनी कोकणातल्या कोणत्याही गावी जाऊन शोध घेतल्यास नक्कीच सापडतील. पण मग तुम्ही पुन्हा सापडणार की नाही, याची गॅरंटी मी नाही देऊ शकत.

मी गावी असताना माझ्या बाबतीत घडलेला एक अनुभव, भुताच्या सत्य घटना bhutachya Goshti इथे तुम्हाला सांगावीशी वाटते.

भुताच्या गावात अन बाराच्या भावात.! (भाग - १)

Real Ghost Stories in Marathi  | Bhutachya Katha in Marathi मी साधारणतः ९-१० वर्षाचा असतानाची ही गोष्ट-  गावी असताना माझ्या लहानपणापासूनच भुताखेतांशी बऱ्यापैकी तोंडओळख होती. म्हणजे असे की, आम्हां लहान मुलांना संध्याकाळी इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको, 'इकडे जखिन राहते' 'तिकडे समंध राहतो' हे सांगताना त्यांचे भयानक वर्णन देखील सांगितल जात असे. त्यामुळे गावात कुठल्या ठिकाणी कुठले भूत राहते हे आम्हाला अगदी तोंडपाठ असे. त्यावेळेस गावी भल्या पहाटे जंगलात गुरं चरवण्यासाठी आमच्या वाडीपासून दूर डोंगराच्या टोकावर (माळरानावर) घेऊन जाण्याची पद्धत होती. ती वाट ही तशीच जंगलातून जाणारी खडतर दगडांची, चढ-उताराची होती. एवढ्या पहाटे गुरं चरवण्याचं कारण मला नंतर कळलं की, पहाटे गेल्यावर सूर्य डोक्यावर यायच्या अगोदर गुरं मस्त चरलेली असायची.

त्या दिवशी मी नेहमीप्रमाणे वाडीतल्या सगळयांच्याच अगोदर, अगदी पहाटेच आईने दिलेली शिदोरी कमरेला बांधून गुरे घेऊन निघालो. ह्या वेळेस माझा लहान भाऊ चंदू  (नाव बदलेले) याला ही माझ्यासोबत घेतले. पहाट अजून पूर्णपणे ओसरली नव्हती. सगळीकडे निमुळता अंधारच होता. त्यात थंडीचे दिवस असल्याकारणाने चहूकडे दाट धुके पसरले होते. अजून माळरानावर पोहचायला किमान एक तास तरी बाकी होता. कमरेला शिदोरी, एका हातात काठी आणि दुसऱ्या हातात माझी आवडती बासुरी. गुरं घेऊन जाताना बासुरी मी नेहमीच माझ्यासोबत घेऊन जात असे. गुरं हळू हळू माळरानाची वाट चढत होती. मी त्यांच्या मागून मस्त, रमत गमत चालत होतो. अर्धी वाट चालून झाल्यावर मी चंदूला पाठीवर घेतले. आता पूर्ण सकाळ झाली होती. मी आपला आपल्याच तंद्रीत चाललो होतो. कसलाही विचार, भीती मनात नव्हती. अचानक काय झालं, समोरच एक गर्द झुडपांची जाळ ( दाट झाडी) होती, ती जाळ आपोआपच गदागदा हलायला लागली. वारा तर अजिबात नव्हता. तसा मी दचकलो, थांबलो, हृदयात थोडं धस्स झालं. चंदू तसाच पाठीवर होता. ती जाळ अजून जोराने हलायला लागली.

जाळीतुन माझ्याकडे एक अंधाधुंदी आकृती पाहत असल्याचा भास मला झाला. आता मात्र मी पूर्णपणे घाबरलो. माझे हातपाय गळाले. एखादं सावट पसारवं तसं मला जाणवलं. डोळ्याचे पाते लवते न लवते तोच हातात असलेल्या बासुरीचा कोणीतरी चुरा-मुरा केला होता. पाठीवर असलेला चंदू मला अगदी लहान बाळासारखा भासला आणि तो अक्षरशः माझा गळा दाबत होता. मी जिवाच्या आकांताने ओरडत होतो. साऱ्या ताकदीनिशी मी त्या बाळाचे (चंदूचे) हात माझ्या गळ्यापासून सोडवले आणि त्याला खाली झटकलं आणि परतीच्या वाटेकडे भरधाव पळत सुटलो. पळताना धडपडत  होतो, पडत होतो, तरीही पळत होतो. गुडघा पूर्ण रक्तबंबाळ झाला होता. अर्ध्या वाटेत पोहचल्यावर माझा मोठा चुलत भाऊ त्याची गुरे घेऊन येताना दिसला. त्याला पाहताच थोडासा जीवात जीव आला. घडलेला सारा प्रकार त्याला कसातरी सांगीतला. चंदू बद्दल ही सांगितले. ते ऐकताच त्याने एकच धाव घेतली ती घडलेल्या ठिकणावर. तिकडे बिचारा चंदू एका झाडाखाली मुसमुसु रडत असताना त्याला सापडला. हे मला नंतर घरी आल्यावर कळलं. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या लहान भावाला भुताच्या स्वाधीन करून पळत सुटलो होतो हे आठवून  नकळत माझ्या स्वार्थीपणाची जाणीव मला त्यावेळेस झाली.

त्यावेळेस मी घरी आलो होतो हे खरे असले, तरी मात्र त्या भुताने काय माझा पाठलाग सोडलेला दिसत नव्हता. कारण त्या दिवसापासून माझ्या मनात प्रचंड भीतीने घर निर्माण केलं होतं. तो प्रसंग मनात आतवर रुजला होता. दिवसा काहीच नाही पण रात्र झाली की ह्या भुताने त्याचे खेळ दाखवायला सुरवात केली होती......(क्रमश:)


टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत.