माचाळ - मिनी महाबळेश्वर - पावसाळ्यातील एक प्रेक्षनिय सहल
माचाळ - मिनी महाबळेश्वर - पावसाळ्यातील एक प्रेक्षनिय सहल Machal Village Lanja in Marathi पावसाळ्यात निसर्गाच्या सानिध्यात काही काळ व्यतीत करणे म्हणजे, वर्तमान काळातील काही अविस्मरणीय आठवणी भूतकाळात सोडून, भविष्यात त्या आठवणीत जगण्यासारखंच होय. दरवर्षी पावसाच्या सरी सुरू झाल्या की, मनाला कुठेतरी निसर्गरम्य ठिकाणी सहलीला जाण्याची ओढ लागल्याशिवाय राहत नाही. आणि पावसाळ्यात कोकण म्हणजे जणू दुसरा स्वर्गच नव्हे का?
असचं
एका सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर
वसलेलं,
निसर्गाच्या
सानिध्यातलं, लांजा तालुक्यातील Machal Village Lanja ठिकाण म्हणजे
माचाळ. Hill Station in Konkan माचाळ
हे थंड हवेचे ठिकाण म्हणून
हल्लीच नावारूपास आलेलं
कोकणातील एकमेव पर्यटन स्थळ
होय.
थोड्याच
कालावधित त्यास मिनी महाबळेश्वर
हे नाव देखील मिळालं.
महाराष्ट्र्र
पर्यटन विकास महामंडळाने या
स्थळाचा 'ब'
वर्ग
पर्यटन स्थळात समावेश केला
आहे.
या
गावाला छत्रपती शिवाजी
महाराजांचा इतिहास वारसा देखील आहे.
इतिहासातील
प्रसिद्ध विशाळगड माचाळच्या
सोमोरच मोठ्या दिमाखात उभा
आहे.
असे
असताना,
आमच्या
पालू या गावापासून काहीच
अंतरावर वसलेल्या 'मिनी महाबळेश्वरला' भेट
देण्याचा आमचा मोह कसा बरा
आवरेल?
![]() |
माचाळ येथील सह्याद्रीचे विहंगमय दृश्य |
तर सहलीचा दिवस ठरला. त्याची पूर्वतयारी २ दिवस अगोदर पासूनच सुरू झाली होती. त्यामध्ये सहलीला येणाऱ्या एकूण लोकांची यादी, प्रवासमार्ग, खर्च, चहा, नाश्ता- पाणी इ. नियोजन ठरले होते. ही एकदिवसीय सहल होती. त्यामुळे, सकाळी निघून माचाळ येथे असणाऱ्या मुचकुंद ऋषी गुहेजवळ दुपारी वनभोजनाचा कार्यक्रम आटपून संध्याकाळपर्यंत मागे परतण्याचा बेत होता. मुचकुंद ऋषी गुहेबद्दल एक पौराणिक आख्यायिका सांगितली जाते ती अशी की, फार काळापूर्वी देव-दानवाचे युद्ध झाले. दानव युद्धा मध्ये भारी होऊ लागेल असता मुचकुंद ऋषींनी देवांना युद्धात सहकार्य केले व देवांचा विजय झाला. युद्धामूळे मुचकुंद ऋषी थकले असता त्यांनी देवांकडे अज्ञात ठिकाणी वास करून विश्रांती व तपश्चयेसाठी अनुमती मागितली. देवांच्या आज्ञेप्रमाणे माचाळ येथे असलेल्या गुहेत त्यावेळी येऊन तपश्चर्या करत राहिले. त्यानंतर श्रीकृष्ण व कालियावन राक्षस यांचे युद्ध झाले. श्रीकृष्णाला माहीत होते याचे मरण मुचकुंद ऋषींच्या हाती आहे. श्रीकृष्ण हळूच मुचकुंद ऋषींच्या गुहेत शिरले. मुचकुंद ऋषी तपश्चर्या करून झोपले होते. कृष्णांनी त्यांच्या अंगावर आपला शेला पांघरला, आणि स्वतः ही गुहेत दुसऱ्या बाजूला लपून बसले. कालियावनाला वाटले झोपलेला कृष्ण आहे. त्याने त्यांना लाथ मारली, आणि म्हणाला. 'तू इथं लपून बसलास तर! मुचकुंद ऋषि रागाने लाल झाले, मुचकुंद ऋषींनी कालियावनाकडे बघताच क्षणी कालियावनाचा भस्म झाला. आता त्या ठिकाणी आता मचाळच्या ग्रामस्थ मंडळींनी सुंदर मंदिर बांधले आहे.
तसं पाहिलंत तर, माझ्या गावापासून माचाळ म्हणजे घाटमार्गाने गेलात तर पायी दिड-दोन तासाचे अंतर. पण, आमच्यासोबत लहान मुलं आणि वरिष्ठ मंडळी असल्याने आम्ही अर्ध्यापर्यंतचा प्रवास एका छोट्या टेम्पोने केला. कारण थेट माचाळला पोहचण्यासाठी अजूनही पूर्ण रस्ता तयार नाही. आम्ही एकूण २२ जण होतो. नाश्ता-पाणी आणि वनभोजनाचे साहित्य घेऊन ठरल्याप्रमाणे सकाळी नऊच्या सुमारास निघालो. पालू-केळवली-चिंचुर्टी मार्गे माचाळच्या अर्ध्या वाटेपर्यंत येऊन पोहचलो. तेथुन पुढे रस्ता नसल्याने पायवाटेने निघालो. इथून पुढे मुक्कामापर्यंत अजून एका तासाचे अंतर होते.
नागमोडी वळणं घेत आता आम्ही अगदी सहयाद्रीच्या टोकावर येऊन पोहचलो होतो. दूरवर पसरलेल्या पठारावर आभाळ ठेंगण वाटत होतं, जणू आभाळाचे छत या गावाला लाभलंय. सभोवताली सह्याद्रीच्या हिरव्यागार पर्वतरांगा, उंच कड्याकपारी मधून कोसळणारे धबधबे, चहूकडे पसरलेलं दाट धुकं आणि गार वाऱ्याची झुळूक मनाला प्रसन्न करीत होती. कडीपत्ताच्या पानांचा सुवास दरवळ होता. प्रत्येकजण निसर्गाचं जिवंत सोंदर्य डोळयात साठवत होता. तर काहीजण हे दृश्य कॅमेरात कैद करण्यात दंग होते. निसर्गाची किमया न्ह्याहळत, गर्द हिरवाइतुन वाट काढत कधी मचकुंदी ऋषी गुहेजवळ येऊन पोहचलो ते कळलेच नाही. मंदिरातील पिंडीचे दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो.
सूर्य डोक्यावर आला होता. तरीही हवेत मात्र अजून गारवा होता. मग वनभोजनाची मांडामांड सुरु झाली. माचाळ गावाच्या वस्तीपासून दूर एका विहीरी जवळ असलेल्या भल्या मोठया झाडाखाली चूल पेटवली गेली. आणि चविष्ट असं आमच्या गावाकडील प्रसिद्ध 'रेमं' शिजवण्यात आलं. 'रेमं' या पदार्थबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर सगळ्या डाळींसोबत वांग, बटाटा याचं रस्स्यासारखं एकत्रित मिश्रण. ते भातासोबत खाल्लं जाऊ शकतं. थोड्याच वेळात पंगत बसली आणि खमंग, चविष्ट अश्या 'रेम्यावर' माझ्यासहित सगळ्यांनी ताव मारली. मनोसोक्त भोजन झाल्यावर गप्पा-गोष्टी रंगल्या. थोडा वेळ विश्रांती घेऊन, गावातील वस्तीत फेरफटका मारण्यासाठी निघालो. पावसाळ्यात कायम धुके असल्याने तेथील घरांच्या चहूबाजूला झाडांच्या पानांनी पूर्णपणे शाकारणी केलेली कौलारू घरं दिसली. गावात गेल्यावर तुम्हाला काही वर्षे मागे गेल्याचा किंचित अनुभव येईल. याचं मुख्य कारण म्हणजे गावात जाण्यासाठी अजूनही पूर्ण रस्ता नसल्याने हे गाव अजून मूलभूत विकासापासून वंचित आहे असं भासेल. आजही तिथे मातीच्या भिंती, सारवलेल्या जमिनी, केम्ब्ल्यांची घरे पाहायला मिळतील. गावात प्राथमिक आरोग्य केंद्र उपलब्ध नाही. रोजगारासाठी दीड-दोन तास पायपीट करत विशाळगडावर जावे लागते. असे, असूनही, येथील गावकरांच्या कर्तबगारीला सलाम करावा लागेल. त्यांच्या अतोनात प्रयत्नांमुळे शासनाने या गावाची दखल घेतली असून, काहीच काळात थेट माचाळपर्यंत रस्ता तयार होत आहे. भविष्यात पर्यटकांची संख्या वाढली तर माचाळचा विकास दूर नाही. या गावाला निसर्गाने अशी काही देणगी दिली आहे की हे उद्या कोकणातील मुख्य पर्यटनाचा केंद्रबिंदू होऊन जगाच्या नकाश्यावर नक्कीच नाव करू शकेल. निसर्गाचं नंदनवन जे कॅमेरात नाही, डोळ्यात भरुन ठेवलंत तरीही अपुरं पडेल असं हे माचाळ. अश्या या नंदनवनच्या ढीगभर आठवणी घेऊन आम्ही सायंकाळी चारच्या सुमारास परतीची वाट धरली.
कोकणात माचाळ सारखी कित्येक निसर्गरम्य थंड हवेची ठिकाणं, हिलस्टेशन्स आहेत जेथे निसर्गमित्र ट्रेकिंग, व्हिलेज वॉक, ग्रामसंस्कृती, ग्रामीण जीवनाचा परिचय आणि निसर्ग पर्यटनाचा अविस्मरणीय अनुभव घेऊ शकतात. कधी वेळ मिळाला तर या मिनी महाबळेश्वरला नक्की भेट द्या.
तुम्हाला या पोस्ट आवडू शकतात
• कोकणातील एक टुमदार गाव - पालू
• इतिहासाची साक्ष असलेला किल्ले विशाळगड...!
0 टिप्पण्या
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत.