कोकणातील रमणीय माचाळ गाव | Hill Station Machal in Kokan




Machal mini mahabaleshwar in lanja taluka ratnagiri

माचाळ गाव । कोकणातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ 

Mini Mahabaleshwar in Maharashtra | Hill Station Machal in Konkan कोकणातील रमणीय माचाळ गाव | कोकणातील पालू या गावाच्या अगदी उंच डोंगराच्या टोकावर माचाळ हे सुंदर,टुमदार गाव वसलेलं आहे. या पर्यटन स्थळाला मिनी महाबळेश्वर असे देखील संबोधले जाते. रत्नागिरी जिल्हा, लांजा तालुक्यातील हे गाव कोकणातलं मिनी महाबळेश्वर Machal Knowns As Mini Mahabaleshwar In Kokan म्हणून अल्पलावधीत नावारूपास आलेलं रमणीय गाव आहे. हिरवीगार झाडी, नागमोडी वळणाचा रस्ता, परिसरात पूर्णपणे धुके, थंड वातावरण, कोसळणारे धबधबे अशा सर्व गोष्टीनी वेढलेले माचाळ हे गाव पर्यटकांना खुणावते आहे. हे गाव महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने कोकणातील थंड हवेचे ठिकाण पर्यटनस्थळ म्हणून घोषित केले असून या स्थळाचा 'ब' वर्ग पर्यटन स्थळात समावेश केला आहे. अनेक पर्यटक या सर्वांचा आनंद लुटतानाही दिसत आहेत. 4 हजार फूट उंचीच्या या पठारावर मुचकुंदी ऋषींच्या पवित्र गुहेला भेट देण्यासाठी दरवर्षी भाविक गर्दी करतात.

प्रभानवल्ली गावातून जी नदी वाहते त्या नदीचे नाव 'मुचकुंद' नदी असे आहे. या नदीचा उगम मूळ माचाळ जिथे मुचकुंद ऋषींची गुहा आहे तेथून झाला आहे. त्या ठिकाणी आता मचाळच्या ग्रामस्थ मंडळींनी सुंदर मंदिर बांधले आहे. दर महाशिरात्रीला तेथे मोठी जत्रा भरते. कोकण रेल्वेच्या विलवडे व आडवली स्थानकापासून २० किलोमीटर अंतरावर लांजा व साखरपा बसस्थानकापासून ३० किलोमीटर अंतरावर उंच डोंगरावर वसलेले माचाळ हे गाव थंड हवेचे ठिकाण आहे. येथील वातावरण थंड, अल्हाददायक असे आहे. ३०० ते ४०० लोकवस्तीचे हे गाव आहे. येथील घरे कौलारु, डोंगर उताराची व मातीची आहेत. पावसाळ्यात येथे कायम धुके असते. त्यामुळे घरांच्या चहूबाजूला झाडांच्या पानांनी पूर्णपणे शाकारणी करावी लागते. गावाकडे जाण्यासाठी चिंचुर्टी गावापर्यंत रस्ता आहे. त्यापुढे नागमोडी वळणाच्या पायवाटा आहेत. पावसाळ्यात या वाटांनी चालताना सुखद अनुभव येतो. गडद धुके, खळाळणारे पाणी, हिरवीगार झाडी अशा वातावरणाचा आनंद घेताना थकवा जाणवत नाही. डोंगरमाथ्यावर गेल्यावर समोर खोल दरी, चहुबाजूनी धुक्याचा आनंद घेता येतो.अनेक पर्यटक व संस्थाही पावसाळ्यात सहलींचा आनंद घेताना दिसत आहेत. सुंदर निसर्ग, खळाळणारे पाणी, दाट धुके, नागमोडी वाटा, अतिशय नयनरम्य परिसर पाहण्याजोगा आहे.



machal village in kokan

एका डोंगरावर वसलेले माचाळ घनदाट जंगलानी समृद्ध तर आहेच पण इथल्या जंगलाचं वैशिष्ट्ये हे की या जंगलांमध्ये औषधी वनस्पती मोठय़ा प्रमाणात आढळतात. याचबरोबर माचाळची दुसरी खासियत म्हणजे इथून विशाळगडावर एक ते दीड तासांत पोहचता येते. माचाळचे ग्रामस्थही विशाळगडावर पाणी, दूध पुरवणे किंवा इतर कामांसाठी सतत येऊन जाऊन असतात. माचाळला पोहचण्यासाठी प्रथम संगमेश्वरहून शिपोशी गावाला जाणाऱ्या गाड्या आहेत. यानंतर शिपोशीहून व्हाया कोचरी गाडी धनगरवाडय़ापर्यंत पोचते. धनगरवाडय़ाहून वर मात्र चालतच जावं लागतं. आता थेट माचाळला पोहचण्यासाठी रस्ता तयार होत आहे. त्यामुळे भविष्यात थंड हवेचे ठिकाण म्हणून माचाळ निसर्गप्रेमींना नक्कीच खुणावेल. मचाळच्या पायथ्याला पालू गाव, बाजूला प्रभानवल्ली, पूर्वेला विशाळगड तर उत्तरेला मुचकुंद मंदिर आहे. तुम्ही ही एकदा येथे पावसाळ्यात भेट देऊन कोकणातल्या निसर्गसोंदर्याचा आगळा वेगळा आंनद नक्कीच घेऊन पहा.!


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या