पंचायत समिती कुक्कुटपालन योजना Kukut Palan Mahiti in Marathi

पंचायत समिती कुक्कुटपालन योजना Kukut Palan Mahiti in Marathi | कुक्कुट पालन योजना महाराष्ट्र मराठी

Kukut Palan Information in Marathi कुक्कुटपालन हा पूरक व्यवसाय न राहता एक स्वतंत्र आर्थिक स्रोत म्हणून पुढे येत आहे. गेल्या तीन ते चार दशकांपासून राज्यात कुक्कुटपालन व्यवसाय वेगाने वाढत आहे. राज्यात कुक्कुट विकासासाठी अजूनही बराच वाव आहे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सहकार विकास निगमच्या सहकार्याने राज्यात सहकारी तत्वावर 73 कुक्कुटपालन संस्था सुरू करण्यात आल्या आहेत. यासाठी राष्ट्रीय सहकार विकास निगमतर्फे कर्ज उपलब्ध करून दिले जाते. त्याची परतफेड 14 वर्षात करायची असते. (कुक्कुट पालन योजना महाराष्ट्र मराठी).

कुक्कुट पालनाची माहिती । कुक्कुट पालन योजना महाराष्ट्र मराठी । कुक्कुट पालनाची माहिती । कुक्कुट पालन योजना महाराष्ट्र 2023 । कुक्कुट पालन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र । kukkut palan mahiti । kukut palan mahiti in marathi


सदर लेखामध्ये आपण ग्रामपंचायत आणि पंचायत समितीच्या माध्यमातून राबविल्याजाणाऱ्या केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कुक्कुटपालन योजना याबद्दल सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत. जसे की,  तलंग वाटप योजना, कंत्राटी पद्धतीने मांसल कुक्कुटपालन, 1000 मांसल कुक्कुट पक्षी संगोपनाद्वारे कुक्कुटपालन, सधन कुक्कुट विकासगटाची स्थापना, अंडी उबवणी केंद्र इत्यादी. (पंचायत समिती कुक्कुटपालन योजना).

तलंग वाटप योजना

तलंग वाटप योजना ही योजना लाभार्थीसाठी 50 टक्के अनुदानावर निधीच्या उपलब्तेनुसार काही जिल्ह्यामध्ये राबविण्यात येते.

तलंग वाटप या योजनेत 8 ते 10 आठवडे वयाच्या तलंगाचे गट वाटप (25 माद्या आणि 3 नर) करण्यात येते. या गटाची एकूण किंमत 6000 रुपये आहे. त्यापैकी 50 टक्के खर्च लाभार्थीना पक्षीवाटप केल्यानंतर लागणाऱ्या खाद्यावरील खर्च, पाण्याची भांडी, खाद्याची भांडी इत्यादी खरेदी करण्यासाठी दिला जातो. (कुक्कुट पालन योजना महाराष्ट्र 2024).

तलंगाच्या एका गटाचा खर्चाचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

पक्षी किंमत (25 माद्या + 3 नर) - रु. 3000/-

खाद्यावरील खर्च - रु. 1400/-

वाहतूक खर्च - रु. 150/-

औषधी - रु. 50/-

रात्रीचा निवारा - रु. 1000/-

खाद्याची भांडी - रु. 400/-

एकूण - रु. 6000/-

तलंगाच्या एका गटाच्या एकूण रु. 6000/- त्यापैकी 50% अनुदानातून रु. 3000/- मर्यादेत प्रतिलाभार्थी एका तलंगाच्या गटाचा पुरवठा करण्यात येतो. उर्वरीत 50% रक्कम म्हणजेच रु. 3000/- लाभार्थ्यांने स्वतः उभारून त्यातून तलंगाच्या गटासाठी लागणारा निवारा, वाहतुकीवरील खर्च, खाद्यावरील खर्च, औषधी, खाद्याची भांडी इत्यादींवर खर्च करावा लागतो.

एकदिवसीय सुधारित कुक्कुट पक्षांच्या पिल्लांचे गट वाटप

या कार्यक्रमाअंतर्गत सर्व प्रवर्गातील लाभार्थ्यांना 50% अनुदानावर प्रति लाभार्थी एक दिवसीय सुधारित कुक्कुट पक्ष्यांच्या (आयआयआर, ब्लॅक अस्ट्रालॉर्प, गिरीराज, वनराज, कडकनाथ व इतर शासन मान्य जातींचे पक्षी) 100 पिल्लांचे गट वाटप करण्यात येतात. एका गटाची (100 एक दिवसीय पिल्लांची) एकूण किंमत रू. 14000/- एवढी आहे. एका गटाच्या खर्चाचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

एक दिवशीय 100 पिल्लांची किंमत - रु. 2000/-

प्रत्येक गटाबरोबर द्यावयाचे खाद्य 800 किलोग्रॅम - रु. 12400/-

वाहतूक खर्च - रु. 100/-

औषधी - रु. 150/-

रात्रीचा निवारा - रु. 1000/-

खाद्याची भांडी - रु. 350/-

एकूण खर्च - रु. 16000/-

एकूण खर्चापैकी 50% अनुदानातून रू. 8000/- मर्यादेत प्रतिलाभार्थी एकदिवसीय 100 पिल्ले (किंमत रू. 2000/-) आणि खाद्य (रू. 6000/- किंमतीच्या मर्यादित) पुरवठा शासनाकडून करण्यात येतो. उर्वरित 50% रक्कम म्हणजेच रू. 8000/- लाभार्थ्यांने स्वतः उभारून त्यातून एकदिवसीय 100 पिल्लांच्या गटासाठी लागणारा निवारा, वाहतुकीवरील खर्च, उर्वरित खाद्यावरील खर्च, औषधी, पाण्याची भांडी, खाद्याची भांडी इ. वरील खर्च करावा लागतो.

तलंगा गट वाटप योजना व एक दिवसीय सुधारित कुक्कृट पक्षांच्या पिल्लांचे गट वाटप योजना बाबत ठळक मुद्दे.

1. सदर योजनेचा लाभ कोणत्याही गटातील लाभार्थी घेऊ शकतील. एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस या योजनेचा लाभ मिळू शकतो.

2. योजनेचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थ्यांनी करावयाचा अर्जाचा नमुना तालुका पशुसंवर्थन कार्यालयात, जिल्हा पशुसंवर्थन कार्यालयात, जिल्हाधिकारी कार्यालयात व वेबसाईटवर मिळू शकतो.

3. लाभार्थी निवडताना 30% महिला लाभार्थी  निवडण्याबाबत प्राधान्य देण्यात येते.

4. दारिद्र रेषेखालील लाभार्थी, भुमीहीन शेतमजूर, मागासवर्गीय, अल्प व अत्यल्प भूधारक लाभार्थी यांना प्राधान्य देण्यात येते.

5. अर्ज स्वीकारण्यासाठी 30-45 दिवसाची मुदत देण्यात येते. प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करून एका

6. महिन्याच्या कालावधीत पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात येते.

कंत्राटी पद्धतीने मांसल कुक्कुटपालन

कुक्कुट मांस उत्पादनास मोठा वाव आहे. ज्या जिल्ह्यामध्ये सध्या कुक्कुटपालन, कुक्कुटमांस उत्पादन करण्याचा व्यवसाय अद्याप रुजलेला व वाढलेला नाही. तिथे कंत्राटी पद्धतीने सदरचा व्यवसाय करण्यासाठी लाभार्थीना कुक्कुट पक्षी खाद्य व पाण्याची भांडी या मूलभूत सुविधा उभारण्याकरीता 50 टक्के अनुदान देण्याचे ठरविण्यात आले आहे. त्याचप्रमाणे कंत्राटदार व्यावसायिक कंपनीला प्रत्येक युनिटमागे कंपनीच्या या अनुषंगाने आवश्यक पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी 1 लाख रुपये यानुसार अनुदान देण्यात येईल. प्रकल्प खर्चाच्या उर्वरीत खर्चापैकी 10 टक्के एवढा निधी लाभार्थीने स्वतः उभारणी करायची असून उर्वरित 40 टक्के निधी बैंकेकडून कर्जाद्धारे मंजूर करून घ्यावा लागतो. (kukut palan mahiti in marathi).

1000 मांसल कुक्कुट पक्षी संगोपनाद्वारे कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करणे

'कंत्राटी पद्धतीने मांसल कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करणे' या योजनेस या योजनेस लाभार्थ्यांकडून राज्यभरातून मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. ही बाब विचारात घेऊन 12 व्या पंचवार्षिक योजना कालावधीत 'कंत्राटी पद्धतीने मांसल कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करणे' या योजने ऐवजी कंत्राटदार कंपनीच्या सहभागाशिवाय '1000 मांसल कुक्कुट पक्षी संगोपनाद्वारे कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करणे' ही नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय योजना राबविण्याची बाब शासनाच्या विचारधिन होती. जेणेकरून राज्यातील सर्व भागातील लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येऊ शकेल.

'1000 मांसल कुक्कुट पक्षी संगोपनाद्वारे कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करणे' ही योजना 12 व्या पंचवार्षिक योजना कालावधीत सन 2012-2013 पासून राज्यात राबविण्यात आली.

1000 मांसल कुक्कुट पक्षी संगपनाद्वारे कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करणे या योजनेंतर्गत प्रति लाभार्थी 1000 मांसल कुक्कुट पक्षी संगोपन करावयाचे असून त्याचा खर्चाचा तपशील खालीलप्रमाणे आहे.


कुक्कुट पालनाची माहिती । कुक्कुट पालन योजना महाराष्ट्र मराठी । कुक्कुट पालनाची माहिती । कुक्कुट पालन योजना महाराष्ट्र 2023 । कुक्कुट पालन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र । kukkut palan mahiti । kukut palan mahiti in marathi

या योजनेअंतर्गत वर नमुद केल्याप्रमाणे पक्षी संगोपनासाठी पक्षीगृह व इतर मुलभूत सुविधा उभारणेकरीता सर्वसाधारण योजनेतून खुल्या प्रवर्गातील लाभार्थीना प्रति युनिट रू. 2,25000/- प्रकल्प खर्चाच्या 50% म्हणजेच रू. 1,12,500/- या मर्यादेत, यानुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजनेतून अनुक्रमे अनुसूचित जाती / जमातीच्या लाभार्थ्यांना प्रकल्प खर्चाच्या 75% महणजेच रु. 1,68,750/- मर्यादेपर्यंत शासकीय अनुदान अनुदान देय राहील. प्रकल्पासाठी शासकीय अनुदानाव्यरीरिक्त खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यांनी उर्वरीत 50% रक्कम म्हणजेच रु. 1,12,500/- व अनुसूचित जाती / जमातीच्या ललाभार्थ्यांने 25% रवकम म्हणजेच रु.56,250/- स्वत: अथवा / वित्तीय संस्थाकडून कर्ज उभारायाचे असते आहे. 

लाभार्थी निवडीचे निकष:

1000 मांसल कुक्कुट पक्षी संगोपन या योजनेमध्ये लाभार्था निवडीचे निकष खालील प्रमाणे असतील. सर्वसाधारण प्रवर्गातील तसेच अनुसुचित जाती व अनुसूचित जमातींच्या लाभार्थ्यांची निवड खालील प्राथान्य क्रमानुसार करण्यात येते.

1. अत्यल्प भूधारक शेतकरी (९ हेक्टर पर्यतचे भुधारक)

2. अत्य भुधारक शेतकरी (९ ते २ हेक्टर पर्यतचे भुधारक)

3. सुशिक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोद असलेले)

4. महिला बचत गटातील लाभार्थी वैयक्तिक महिला लाभार्थी.

केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत राज्यातील शासकीय कुकुट प्रक्षेत्रांना अर्थसहाय्य:

ही योजना केंद्र शासनच्या परसारतील कोंबडी पाल विकासाच्या धोरणाप्रमाणे तयार करण्यात आली आहे. देशी कुक्कुट पक्ष्याऐवजी (ARI approved bird species for Backyard poultry) यांचा अंतर्भाव करुन त्यातून ग्रामीण भागात अंडी उत्पादन वाढवण्याचा हेतू आहे. प्रकल्प अंतर्गत उबवण्याच्या अंडयाची टक्केवारी व उबवणुकीची क्षमता जास्तीत जास्त राहील. याकरिता उपाययोजना करण्याचे कामही ही समिती करते. त्याचबरोबर उत्पादितत झालेले एकदिवसीय पक्षी व तलंग तसेच पैदाशीचे नर यांची विक्री योग्य वयात, योग्य दरात, पूर्णपणे विक्री होईल याचीही काळजी घेतली जाते. यासाठी शेतकऱ्यांना आणि लाभार्थीना परसातील कोंबडीपालनाचे प्रशिक्षण देखील दिले जाते. (कुक्कुट पालन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र).

सधन कुक्कुट विकासगटाची स्थापना व बळकटीकरण:

ही योजना जिल्हा परिषदेच्या जिल्हा पशुसंवर्धन् अधिकार्यांमार्फत राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत यंत्रसामग्री, साधनसामग्री खरेदी व बांधकामावरील खर्चासाठी तरतूद आहे.

अंडी उबवणी केंद्र:

राज्यात शासनाने चार जिल्ह्यात अंडी उबवणी केंद्र स्थापन केली आहेत. पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, व नागपूर या ठिकार्णी ही उबवणी केंद्रे आहेत. या अंडी उबवणी केंद्रात निर्माण केलेली पिल्ले मागणीनुसार कुक्कुटपालकांना तसेच सरकारच्या विविध योजनांतर्गत पुरवली जातात.

ग्रामीण स्तरावर उबविण्याच्या अंड्यांची विक्री करण्यात येते. कुक्कृटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना सुधारित संकरित जातीच्या कोंबडयांची, अंड्यांची उपलब्धता व्हावी व त्यांच्या आर्थिक विकासात भर पडावी यासाठी उबवणी केंद्र कार्यरत आहेत. या केंद्राकडून त्या त्या विभागातील साधन कुक्कुटविकास गटांनादेखील पिल्लांचा पुरवठा करण्यात येतो. राज्यात कार्यान्वित असलेले कुक्कुट प्रकल्प हे वेगवेगळ्या पक्षी क्षेमतेचे असून त्या प्रकल्पांना 47 लाख ते 90 लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य करण्यात आले आहे.

या पोस्ट देखील तुम्हाला आवडू शकतात

पंचायत समिती विहीर योजना

पंचायत समिती माहिती

अल्पभूधारक शेतकरी योजना

जल जीवन मिशन योजना महाराष्ट्र


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या