पंचायत समिती विहीर योजना Vihir Anudan Yojana Maharashtra

मागेल त्याला विहीर अनुदान योजना 2024 | पंचायत समिती विहीर योजना | vihir anudan yojana maharashtra 2022 | विहीर सिंचन योजना | nrega maharashtra

महाराष्ट्र राज्याला रोजगार हमीचा जनक मानले जाते. महात्मा गांधी रोजगार हमी योजना याच संकल्पनेवर आधारित आहे. काळानुसार महात्मा गांधी रोजगार हमी योजनेमध्ये बदल करून वैयक्तीक लाभावर भर देण्यात आला. मनरेगा केवळ रोजगार देणारी योजना नव्हे तर व्यक्तींच्या विकासात भर देणारी योजना आहे.

anudanit vihir yojana maharashtra । mgnrega vihir yojana apply online । sinchan vihir yojana online form । vihir anudan yojana maharashtra 2022 । मागेल त्याला विहीर योजना । विहीर सिंचन योजना । विहीर योजना 2023 । nrega maharashtra । magel tyala vihir । मागेल त्याला विहीर अनुदान योजना 2024 । नवीन अनुदानीत विहीर योजना  । नवीन विहीर अनुदान योजना 2024 । vihir anudan yojana maharashtra 2022

मनरेगाच्या योग्य नियोजातून मागील काही काळापासून राज्यातील अनेक कुटुंबे आर्थिक सक्षमतेकडे वाटचाल करीत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या भूजल सर्वेक्षणानुसार राज्यात अजून ३,८७,५०० नवीन विहिरी खोदणे शक्य आहे. मनरेगा अंतर्गत या विहिरी लवकरात लवकर खोदून त्यास ठिबक सिंचन लावून पाण्याचा योग्य वापर केल्यास अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावेल असा शासनाचा मानस आहे. त्यानुसार, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या पार्श्वभूमीवर दिनांक २८ ऑगस्ट, २०२० च्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात नवीन सिंचन विहरीची कामे मंजूर करण्याचे निर्देश देण्यात आले. नवीन विहीरीसाठी पात्र लाभार्थींना रु. ४ लाख एवढे अनुदान दिले जाते. (Anudanit Vihir Yojana Maharashtra).

सदर लेखामध्ये नवीन विहीर अनुदान योजना काय आहे? योजनेचे लाभ, पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज कुठे आणि कसा करणार इत्यादी माहिती पाहणार आहोत.

सूचना- पंचायत समिती विहीर योजना, मागेल त्याला विहीर योजना, विहीर सिंचन योजना किंवा नवीन अनुदानीत विहीर योजना या सगळ्या एकच योजना आहेत याची नोंद घ्यावी.

विहिरीची कामे घेण्यास दिनांक १० मार्च, २०११ च्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे, प्रत्येक जिल्ह्याची भोगोलिक स्थिती वेगवेगळी असल्यामुळे विहिरीचे मापदंड करण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली.

नवीन अनुदानीत विहीर योजनेसाठी निवड कशी केली जाते?


महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियमाच्या परिशिष्ट-१ कलम १ (४) मधील तरतुदीनुसार खालील प्रवर्गातील लाभार्थ्यांना सिंचन सुविधा म्हणून विहिरीची कामे अनुज्ञेय आहेत.

• अनुसूचित जाती

• अनुसूचित जमाती

• दारिद्रिय रेषेखालील लाभार्थी

• भटक्या जमाती

• दारिद्र रेषेखालील लाभार्थी

• स्त्री कर्ता असलेली कुटुंबे

• इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी

• कृषि कर्जमाफी योजना २००८ नुसार अल्प भुधारक सिमांत शेतकरी (२.५ एकर पर्यंत भूधारणा)

• अनुसूचित जमातीचे व अन्य परंपरागत वन निवासी

पंचायत समिती/ग्रामपंचायत विहीर योजना लाभधारकाची पात्रता

• अल्पभूधारक (पाच एकर पर्यंत भूधारणा)

• लाभधारकाकडे किमान ०.६० हेक्टर क्षेत्र सलग असावे.

• प्रस्तावित विहीर पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या विहीरीपासुन ५०० फुटापेक्षा जास्त अंतरावर असावे.

• प्रस्तावित विहीरीपासून ५ पोलच्या आतमध्ये विद्युत पुरवठा उपलब्ध असावा.

• लाभधारकाच्या ७/१२ वर विहीरीची कोणतीही नोंद असू नये.

• लाभधारकाकडे तलाठी यांच्या स्वाक्षरीचा एकूण क्षेत्राचा दाखला असावा.

• एकापेक्षा अधिक लाभधारक संयूक्त विहीर घेऊ शकतील मात्र त्यांचे एकण जमीनीचे क्षत्र ०.६० हेक्टर पेक्षा जास्त व सलग असावे.

• ज्या लाभाथ्य्योंना विहीरीचा लाभ देण्यात येणार आहे तो जॉब कॉर्डधारक असला पाहिजे. तसेच त्याने मजूर म्हणून काम करून मजुरी घेणे आवश्यक आहे.

• भुजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकड्न पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र वरिष्ठ, भू-वैज्ञानिक सर्वक्षण यंत्रणा यांचेकडून घेणे आवश्यक आहे.

पंचायत समिती/ग्रामपंचायत विहीर योजना विहीरीसाठी अर्ज व त्यावरील कार्यपद्धती:

• पुढील आर्थिक वर्षात वैयक्तिक सिंचन विहीर मंजूरीसाठी अर्जदाराने १५ ऑगस्टपूर्वी विहीरी करीता विहीत नमून्यात ग्रामपंचायतीकडे अर्ज करावा लागतो. (नमूना अर्जाची प्रत खाली दिली आहे).

• लाभार्थीने ग्रामपंचायकडून अशा अर्जाची तात्काळ पोच पावती घ्यावी.

• विहीरीच्या मागणीसाठी प्राप्त झालेले अर्ज ग्रामसभेसमोर माहितीसाठी सादर करण्यात येणे आवश्यक असते.

• प्राप्त अर्जातून पुढील वर्षाच्या नियोजनामध्ये समाविष्ट करावयाची लाभधारकाची यादी ग्रामसभेने प्राधान्यक्रमानुसार मंजुर करावी लागते.

• लाभधारकाची निवड करतांना केंद्र शासनाने विहीत केल्याप्रमाणे लाभार्थी संवर्गनिहाय मंजुरी प्राधान्याने करावी व अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीपैकी दारिद्र रेषेखालील अर्जदारांना प्राथान्य द्यावयाचे असते. (Sinchan Vihir Yojana Online Form).

ग्रामपंचायतनिहाय विहीरीची कामे मंजूर करतांना विचारात घ्यावयाच्या बाबी:

• पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीना विहिरींच्या कामांसोबत इतर कामे घेणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत ग्राम पंचायतीमध्ये फक्त विहिरीची कामे घेण्यात येवू नयेत.

• विहिरीसाठी लाभधारक निवड करताना गावपातळीवर एका आर्थिक वर्षात मजुरी व साहित्याचे प्रमाण ६०:४० राखण्यात यावे.

• भूजल सर्वेक्षण यंत्रणा यांनी निश्चित केलेल्या मापदंडाप्रमाणेच लाभाथ्यांची निवड करण्यात यावी.

• ग्रामपंचायतीतील जून्या विहिरी कार्यान्वीत असतांना नवीन विहिरी मंजूर करु नयेत व अपूर्ण कार्मांना पूर्ण करण्यास प्रथम प्राधान्य द्यावे.

सिंचन सूविधा म्हणून विहिरींना मंजुर करण्याबाबतच्या अटी

केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या दिनांक २४ ऑगस्ट, २०१२  च्या सुधारित मार्गदर्शक तत्वानुसार बोरवेल, ट्युबवेल अनुज्ञेय नाही. तथापी शासन परिपत्रक क्रमांक मग्रारो २०११/प्रक्र -११३/रोहयो -१० अ दिनांक १७ ऑक्टोबर, २०११ अन्वये विंधन विहिर (In Well Bore) अनुज्ञेय राहील.

• भूजल सर्वेक्षण यंत्रणा GSDA च्या व्याख्येप्रमाणे सेमीक्रिटिल, क्रिटिकल, ओव्हर एक्स्प्लायटेड क्षेत्रामध्ये वैयक्तिक लाभाच्या सिंचन विहिरी घेवू नयेत. मात्र या भागात समूह विहिरी हाती घेता येवू शकतात. असा

• समूह तयार करतांना किमान ३ शेतककऱ्यांचा समूह असावा. समूहातील शेतकऱ्यांनी करारनामा करुन  उपलब्ध होणारे पाणी प्रमाणात वापरतील असे प्रमाणित करावे. असे प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर ग्राममपंचायतीमार्फत अशी कामे हाती घेण्यात यावीत.

• समूह विहिरींची नोंद महसूली अभिलेख्यात घेण्यात यावी.

• सुरक्षित क्षेत्रात (Safe Zone) वैयक्तिक लाभाची सिंचन विहिरिची कामे हाती घेता येवू शकतात तथापी त्यासाठी संबंधित भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेने विहिरीची मापे निश्चित करावीत. असे करताना कठीण खडकातील भागासाठी विहिरीचा व्यास ८ मिटर पेक्षा तसेच मउ खडक आणि मातीच्या भागासाठी ६ मिटर पेक्षा जास्त असू नये. (Vihir Anudan Yojana Maharashtra 2022).

विहिरीचे अंदाजपत्रक आणि संकल्पचित्र तयार करतांना विचारात घ्यावयाचे मुद्दे:

संकल्पचित्र आणि अंदाजपत्रक तयार करताना जिल्हा कार्यालयाकडुन विभागीय आयुक्त यांचे समितीकडे संकल्प चित्र सादर करताना तसेच तांत्रिक अधिकारी यांनी प्रत्यक्ष अंदाजपत्रक तयार करतांना खालील बाबींची दक्षता घेण्यात यावी.

• विहिरीच्या कामाचे भुजल सर्वक्षण विकास यंत्रणेच्या मापाप्रमाणे जिल्हानिहाय कठीण व इतर भूभागासाठी क्षेत्र, नमुना अंदाजपत्रक तयार करण्यात यावी.

• अंदाजपत्रकात बाबनिहाय कुशल आणि अकूशल भाग यांचा खर्च स्वतंत्रपणे नमूद करण्यात यावा. साहित्याची खरेदी उदा. सिमेंट, वाळू इत्यादी ग्रामपंचायतीने करणे अनिवार्य राहील.

• अंदाजपत्रक तयार करताना ज्याबाबींसाठी रोहयोचे दर उपलब्ध आहेत ते दर वापरावेत. उर्वरीत बाबींसाठी सिंचन विभागाचे किंवा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची दरसूची वापरण्यात यावी. (मागेल त्याला विहीर योजना).

मागेल त्याला विहीर अनुदान योजना  2024 ठळक मुद्दे: 

1. विहिरीच्या कामासाठी प्रशासन मान्यता मिळाल्यानंतर सलग दोन वर्षात काम पूर्ण होणे अनिवार्य आहे.

2. मजुरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काम करताना त्यांना हेल्मेट देण्यात यावीत. याबाबतचा खर्च 6% खर्च प्रशासकीय निधीतून भागवावा.

नवीन अनुदानीत विहीर योजना अटींची पूर्तता:

• शेतकऱ्यांकडे पूर्वी कोणतीही विहीर असू नये.

• अर्जदार आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणे आवश्यक आहे.

• अर्जदाराकडे किमान ०.४० हेक्टर म्हणजे १ एकर जमीन असणे आवश्यक आहे.

• ज्या ठिकाणी नवीन विहिरी बांधकाम करणार त्याच्या आसपास ५०० मिटीर पर्यंत कोणतीही विहीर असता कामा नये.

पाणलोट क्षेत्रामध्ये विहिरीचे स्थळ निश्चिती करण्याबाबत ठळक मुद्दे:

सर्वप्रथम तालुक्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या संबंधित तांत्रिक सहाय्यकांनी विहीर स्थळ निश्चितीचे प्रमाणपत्र द्यावे. यासाठी सदर प्रमाणपत्राव्यतिरिक्त इतर प्रमाणपत्राची आवश्यकता राहणार नाही.

विहिर कोठे खोदावी-

• दोन नाल्यांच्या मधिल क्षेत्रात व नाल्यांचे संगमाजवळ जेथे मातीचा किमान ३० से.मी.चा थर व किमान ५ मीटर खोलीपर्यंत मऊ (झिजलेला खडक) आढळतो तेथे विहीर खोदावी.

• नदी व नाल्या जवळील उथळ गाळाच्या प्रदेशात.

• जमिनीच्या सखल भागात जेथे किमान ३० से.मी. पर्यंत मातीचा थर व किमान ५ मीटर खोली पर्यंत मुरुम (झिजलेला खडक) आढळतो.

• नाल्याच्या तिरावर जेथे उंचवटा आहे तेथे, परंतु सदर उंचावर चोपण किंवा चिकण माती नसावी.

• घनदाट व गर्द पानांच्या झाडांच्या प्रदेशात विहीर खोदली जाऊ शकते.

• नदी व नाल्याचे जुने प्रवाह पात्र जेथे आता नदी पात्र नसताना देखील वाळु, रेती व गारगोटया थर दिसून येते तेथे विहीर खोदावी.

• जेथे नदीचे / नाल्याचे गोलाकार वळणाच्या आतील भूभाग थेट विहिरीचे खोदकाम करावे.

• अचानक दमट वाटणार्या अथवा असणार्या जागेत.

विहीर कोठे खोदू नये -

• भूपृष्ठावर कडक खडक दिसणाया जागेत विहीर खोदू नये.

• डोंगराचा कडा व आसपासचे १५० मीटरचे अंतरात. विहिरी  खोदली जाऊ नये.

• मातीचा थर ३० से.मी. पेक्षा कमी असणाऱ्या भूभागात विहिरी खोदू नये.

• मुरमाची (झिजलेला खडक) खोली ५ मीटर पेक्षा कमी असणार्या भूभागात विहिरी खोदू नये. (मागेल त्याला विहीर अनुदान योजना 2024).

नवीन अनुदानीत विहीर योजना आवश्यक कागदपत्रे:

• आधार कार्ड प्रत

• बँक तपशील

• एक वर्षाचा उत्पन्न दाखला

• जातीचा दाखला

• अपंगत्वाचे प्रमाण पत्र (अपंग असल्यास)

• ७/१२ चा ऑनलाईन उतारा

• ८ अ ऑनलाईन उतारा

• जॉब कार्डची प्रत

• सामुदायिक विहीर असल्यास सर्व लाभार्थी मिळून ०.४० हेक्टर पेक्षा अधिक सलग जमीन असल्याचा पंचनामा

• सामुदायिक विहीर असल्यास सामोपचाराने पाणी वापरा बाबत सर्व लाभार्थ्यांचे करारपत्र.

पंचायत समिती विहीर योजना/नविन विहीर अनुदान योजना/ मागेल त्याला विहीर अनुदान योजना अर्ज नोंदणी अर्ज प्रक्रिया



पात्र शेतकऱ्यांनी नविन विहीर योजनेसाठी ४ लाख अनुदान मिळविण्यासाठी ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो.

ऑफलाईन अर्ज पद्धत:

अर्जदारने ग्रामपंचायत कार्यालयात भेट देऊन आवश्यक पत्रांसह अर्ज द्यावा. हा अर्ज ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती कार्यलयात देखील उपलब्ध असेल. अर्ज दिल्यानंतर अर्जाची पोचपावती घ्यावी. ग्रामपंचायत डाटा एंट्री ऑपरेटर किंवा ग्रामसेवक यांच्या मदतीने अर्जाची पडताळणी करून मनरेगाच्या आवश्यक बाबी ऑनलाईन भरल्या जातील ही जबाबदारी ग्रामपंचायतची असते. (Vihir Anudan Yojana Maharashtra 2022).

ऑनलाईन अर्ज पद्धत:

• मागेल त्याला विहीर किंवा नवीन विहीर अनुदान योजना २०२४ साठी ऑनलाईन अर्ज महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत मोबाईलॲपद्वारे सहजपणे करता येतो.

• त्यासाठी, सर्वप्रथम तुमच्या मोबाईलच्या Play Store मध्ये जा.

• त्यानंतर, सर्च बॉक्स मध्ये 'Maha -Egs Horticulture Well App' शोधा आणि तुमच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करून घ्या.

मागेल त्याला विहीर अनुदान योजना 2024 | पंचायत समिती विहीर योजना | vihir anudan yojana maharashtra 2022 | विहीर सिंचन योजना | nrega maharashtra

• App डाऊनलोड झाल्यावर समोर दोन पर्याय दिसतील १. लाभार्थी लॉगिन आणि विभाग लॉगिन. त्यापैकी लाभार्थी लॉगिन हा पर्याय निवडा.

• त्यानंतर, तुमच्यासमोर ३ पर्याय दिसतील. १. बागायती लागवड अर्ज २. विहीर अर्ज ३. अर्जाची स्थिती. त्यापैकी 'विहीर अर्ज' हा पर्याय निवडा.

• यानंतर, तुमच्यासमोर विहीर अनुदान योजनेचा ऑनलाईन फॉर्म उघडेल.

• फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती भरा, जसे की तूमचे नाव, मोबाईल नंबर, जिल्हा, तालुका, गाव इ.

मागेल त्याला विहीर अनुदान योजना 2024 | पंचायत समिती विहीर योजना | vihir anudan yojana maharashtra 2022 | विहीर सिंचन योजना | nrega maharashtra


• त्याखाली तुमचा मनरेगा जॉब कार्ड चा क्रमांक टाका आणि कार्डचा फोटो अपलोड करा.

- जात व प्रवर्ग निवडा.

- 8 अ नुसार जेवढं क्षेत्र असेल ते हेक्टर मध्ये टाका.

- तुमचा गट क्रमांक टाका.

- गटामध्ये किती क्षेत्र आहे ते निवडा.

• त्यानंतर, अर्जदाराचा 7/12 व 8 अ अपलोड करा.

• त्यानंतर, सिंचन विहरीचे बांधकामासाठी प्रस्तावित मंजुरांचा जॉब कार्ड नंबर असेल तर तो टाका आणि त्याचा फोटो अपलोड करा. जर नसेल तर 'नाही' हा पर्याय निवडा.

• त्यानंतर, 'पुढे जा' या पर्यायावर वर क्लिक करा.

• फॉर्म मध्ये भरलेली माहिती पुन्हा एकदा तपासा व 'पुढे जा' या यावर क्लिक करा.

• त्यानंतर, तुमच्या समोर संमतीपत्र उघडेल ते वाचून 'अर्ज जमा करा' हा पर्याय निवडा.

• दिलेल्या मोबाईल नंबर वर 6 अंकी OTP येईल तो OTP टाकून त्याला Verify करा.

OTP Verify केल्यावर तुमच्या समोर धन्यवाद असा संदेश येईल म्हणजे तुमचा नवीन विहीर अनुदान योजना २०२४ चा ऑनलाईन अर्ज यशस्वीरीत्या सादर झाला आहे.

तुम्ही केलेला ऑनलाईन अर्ज प्रथम तुमच्या ग्रामपंचायतकडे त्यानंतर पुढे संबंधित विभागांकडे ग्रामपंचातीद्वारे पाठवला जातो. अर्जा संबंधित अपडेट तुमच्या मोबाईल वर मिळत राहतात. (पंचायत समिती विहीर योजना Vihir Anudan Yojana Maharashtra).

या पोस्ट देखील तुम्हाला आवडू शकतात




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या