नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना 2021 Nanaji Deshmukh Krishi Sanjivani Yojana 2021


नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना 2021 | नानाजी देशमुख कृषी सिंचन योजना | नानाजी देशमुख ट्रॅक्टर योजना | नानाजी देशमुख विहीर योजना | नानाजी देशमुख फळबाग योजना | नानाजी देशमुख कृषी अवजारे | ग्राम कृषी संजीवनी समिती प्रशिक्षण | पोखरा योजना Online Form | नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना यादी | नानाजी देशमुख कृषी संजीवनी PDF

Nanaji Deshmukh Krishi Sanjivani Yojana 2021 विदर्भ व मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त असलेल्या सुमारे 900 गावांमध्ये पुढील सहा वर्षाच्या कालावधीत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबवण्यात यावा त्यासाठी मान्यता मिळाली. ही योजना महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राबवली जाते.

कै. चांडिंकादास अमृतराव देशमुख उर्फ नानाजी देशमुख, समाजसेवक, यांनी भारतातील विविध राज्यातील दुर्गम पहाडी गावातील शेतकऱ्यांना विविध प्रकल्पांच्या माध्यमातून आत्मनिर्भर, उद्योगाशील बनवण्यामध्ये आपले जीवन समर्पित केले. त्यांनी ग्रामविकास व लोक शिक्षण गोवंश संवर्धन, पारंपारिक कृषी पद्धतींचा विकास व प्रसार, कृषी सिंचन तसेच जलसंधारणाच्या माध्यमातून कृषी सिंचन क्षेत्रात वाढ करणे इत्यादी विविध समाजोपयोगी कार्यात भरीव योगदान दिलेले आहे. श्री. नानाजी देशमुख यांनी केलेली निस्वार्थ समाजसेवा व त्यांचे कृषी क्षेत्रातील योगदान योगदान लक्षात घेऊन जागतिक बँके सहाय्यीत हवामान अनुकूल कृषी विकास प्रकल्प श्री. नानाजी देशमुख यांच्या नावे राज्यातील विदर्भ व मराठवाड्यातील १५ अतिसंवेदनशील दुष्काळ भागात सुरू करण्यात आला. या प्रकल्पास पूर्वी हवामान कृषी प्रकल्प (POCRA) असे संबोधण्यात येत होते.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना 2021 | नानाजी देशमुख कृषी सिंचन योजना | नानाजी देशमुख ट्रॅक्टर योजना | नानाजी देशमुख विहीर योजना | नानाजी देशमुख फळबाग योजना | नानाजी देशमुख कृषी अवजारे | ग्राम कृषी संजीवनी समिती प्रशिक्षण | पोखरा योजना Online Form | नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना यादी | नानाजी देशमुख कृषी संजीवनी PDF

नानाजी देशमुख पोकरा योजना:

जागतिक बँक सहाय्यित हवामान अनुकूल कृषी प्रकल्पास (POCRA-पोकरा) यापुढे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प म्हणून संबोधण्यात यावे म्हणून १७ जानेवारी, २०१७ रोजी शासननिर्णय निर्गमित करून योजनेचे नाव बदलण्यात आले. त्यानुसार महाराष्ट्र शासनांतर्गत या प्रकल्पाशी निगडित सर्व कार्यालयीन कामकाजासाठी यापुढे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प या नवीन नावाचा वापर सुरु झाला.

ग्राम कृषी संजीवनी समिती प्रशिक्षण:

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत राबविल्या जाणाऱ्या विविध योजना आणि त्याबाबत गावपातळीवर सर्व योजनांचे योग्य नियोजन करून प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने प्रकल्पामध्ये निवड झालेल्या गावांच्या ग्रामपंचायतीमध्ये ग्राम कृषी संजीवनी समिती स्थापन करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे संबंधित जिल्हा स्तरावरून प्रकल्पाचे नियंत्रण व समन्वय साधण्यासाठी स्वतंत्र समिती गठीत करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर, मुंबई येथे प्रकल्प व्यवस्थापन कक्ष Project Management Unit याची स्थापना करण्यात आली आहे. ग्राम कृषी संजीवनी समिती मध्ये प्रशिक्षणाचेही व्यवस्थापन करण्यात आले.

नानाजी देशमुख कृषी सिंचन योजना:

हवामानात होणाऱ्या सततच्या बदलामुळे विदर्भ आणि मराठवाडामधील शेतकऱ्यांना दुष्काळाला सामोरे जावे लागत असते. त्यामुळे भूभागातील पाणीसाठ्यावर व जमिनीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. परिणामी पिकांच्या उत्पादकेमध्ये कमालीची घट होत असते. त्यामुळे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत सूक्ष्म सिंचन योजना (ठिबक व तुषार सिंचन) राबविण्यासाठी मान्यता मिळाली आहे. 

आधुनिक तंत्रज्ञाचा वापर करून सिंचाखालील क्षेत्रात वाढ करणे, कृषि व फलोउत्पादन पिकांमध्ये सिंचन पद्धतीचा वापर करणे, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात आणि उत्पादनात वाढ करणे आणि जलवापर कार्यक्षमतेत वाढ करणे इत्यादी नानाजी देशमुख कृषी सिंचन योजनेचे मुख्य उद्दिष्टे होय.

नानाजी देशमुख कृषी सिंचन योजना लाभार्थी निवड निकष / पात्रता:

१. नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत सूक्ष्म सिंचन या योजनेसाठी अत्यल्प व अल्प भूधारकांची अनुक्रमे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला, दिव्यांग शेतकरी व सर्वसाधारण या प्राधान्यक्रमानुसार लाभार्थी निवड करण्यात येते. 

२. शेतकऱ्याकडे सिंचनाची सुविधा उपलबध असावी, सामूहिक सिंचनाची सुविधा उपलबध असल्यास संबंधितांचे करारपत्र आवश्यक.

३. उपलबध सिंचन स्रोतातील पाण्याचा विचार करून तेवढ्या क्षेत्रासाठी सूक्ष्म सिंचनाचा लाभ देय आहे.

४. विद्युत पंपाकरिता कायमस्वरूपी जोडणी आवश्यक.

५. ज्या पिकाकरिता संच बसविण्यात येणार आहे त्या पिकांची नोंद ७/१२ च्या उताऱ्यावर क्षेत्रासह असावी. ७/१२ उताऱ्यावर पिकाची नोंद नसल्यास कृषि पर्यवेक्षक यांनी पिक लागवडीचे प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे.

ठिबक सिंचन अनुदान योजना 2021:

नानाजी देशमुख कृषी सिंचन योजनेमध्ये ठिबक सिंचन ( इनलाईन, आउटलाइन, सबसरफेस, मायक्रोजेट) आणि तुषार संच ( सूक्ष्म तुषार सिंचन, मिनी तुषार सिंचन, हलविता येणारे तुषार सिंचन, मिस्टर, रेनगन, सेमि परमनंट इरिगेशन सिस्टीम) इत्यादी बाबी समाविष्ट आहेत.

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक लाभार्थीना शासनाने निर्धारित केलेल्या आर्थिक मापदंडानुसार ५५% अनुदान देय आहे.

नानाजी देशमुख कृषी सिंचन योजना आवश्यक कागदपत्रे:

१. शेतकऱ्याने केलेला अर्ज व हमीपत्राची प्रत

२. पूर्वसंमती पत्र

३. ७/१२ उतरा 

४. ८- अ उतारा 

५. पाणी व मृदू तपासणी अहवाल

६. जातीचा/दिव्यांग असल्याचा दाखला

७. सूक्ष्म सिंचन आराखडा

८. भौगोलिक स्थानांकन पद्धतीने शेतकरी व तपासणी अधिकारी समवेत संचाने अक्षांश/ रेखांकसह फोटोची प्रत.

नानाजी देशमुख कृषी सिंचन योजनेचा लाभ घेण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या Maha DBT संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करता येतो तसेच संबंधित कृषी अधिकारी किंवा नानाजी देशमुख कृषी संजीवनी समितीला थेट अर्ज करता येतो. (नमुना अर्ज खाली पीडीएफ स्वरूपात दिला आहे).


नानाजी देशमुख ट्रॅक्टर योजना:

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत कृषी यांत्रिकीकरण करण्याच्या उद्देशाने पात्र शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान व शेती अवजारे अनुदानमध्ये पुरवली जातात. यामध्ये ट्रॅक्टर व बीबीएफ यंत्र, पॉवर टीलर, रिपर कम बाइन्डर, पॉवर वीडर, रिपर, ब्रश कटर, थ्रेशर, पलटी नांगर, शुगरकेन थ्रेश कटर, रोटाव्हेटर, कॉटन श्रेडर, स्ट्रॉ रिपर, मिनी दाल मिल, ऑईल मिल फ़िल्टर प्रेस सहित इत्यादींचा समावेश आहे.

ट्रॅक्टर सबसिडी Nanaji Deshmukh Tractor Subsidy:

नानाजी देशमुख ट्रॅक्टर योजनेअंतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व महिला यांना २ हेक्टर पर्यंत जमीन धारणा असणारे शेतकरी यांना जास्तीत जास्त १,२५०००/- इतकी ट्रॅक्टर सबसिडी (nanaji deshmukh tractor subsidy) अनुदान म्हणून देण्यात येते.

नानाजी देशमुख ट्रॅक्टर योजना पात्रता:

१. इच्छुक लाभार्थी शेतकऱ्यांकडे किमान १ हेक्टर जमीन धारणा असणे आवश्यक.  

२. ट्रॅक्टर खरेदी साठी एका कुटुंबातील फक्त एका सदस्यास अर्ज करता येईल. 

३. गावातील प्रति २०० हेक्टर निव्वळ पेरणी क्षेत्राकरिता एक ट्रॅक्टर याप्रमाणे प्रति गाव कमाल १० ट्रॅक्टर देण्यात येतील.

४. अर्जदारास ट्रॅक्टरसोबत बीबीएफ यंत्रासाठी देखील अर्ज करणे आवश्यक आहे.

५. अर्ज करणाऱ्या कुटुंबातील व्यक्तीच्या नावे ट्रॅक्टर असल्यास अर्ज करता येणार नाही. (उदा. आई, वडील व त्यांच्यावर अवलंबून असलेली अविवाहित अपत्य).

नानाजी देशमुख ट्रॅक्टर योजना आवश्यक कागदपत्रे:

१. आधारकार्ड

२. ७/१२ उतारा

३. ८ अ दाखला

४. खरेदी करावयाच्या अवजाराचे कोटेशन व केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेला तपासणी अहवाल

५. जातीचा दाखला (अनुसूचित जाती व जमातींसाठी)

६. स्वयं घोषणापत्र 

७. पूर्व संमतीपत्र

नानाजी देशमुख ट्रॅक्टर योजनेचा लाभ घेण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या Maha DBT संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करता येतो तसेच संबंधित कृषी अधिकारी किंवा नानाजी देशमुख कृषी संजीवनी समितीला थेट अर्ज करता येतो. (नमुना अर्ज खाली पीडीएफ स्वरूपात दिला आहे).

नानाजी देशमुख विहीर योजना:

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाअंतर्गत नवीन पाणी साठवण सरंचना निर्मितीसाठी नवीन विहीर हा घटक समाविष्ट करण्यात आला आहे. या घटकासाठी १०० % अनुदान दिले जाते.

नानाजी देशमुख विहीर योजना पात्रता:

ग्राम कृषि संजीवनी समितीने मान्यता दिलेले अत्यल्प व अल्प भूधारक शेतकऱ्यांना, अनुसूचित जाती/जमाती , महिला दिव्यांग व इतर शेतकरी या प्राधान्यक्रमाने निवड करून लाभ देण्यात येईल.

१. नवीन विहीर घेण्यासाठी एकूण क्षेत्र ०.४० हेक्टर पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.

२. ज्या शेतकऱ्यांकडे संरक्षित सिंचनाची सोय नाही, अशा शेतकऱ्यांना लाभ देण्यात यावा.

३. संरक्षित सिंचनाची सोय उपलब्ध असलेले तसेच या घटकाचा इतर कोणत्याही योजनेतून यापूर्वी लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना लाभ देय नाही.

४. लाभार्थी निवड करताना प्रस्तावित नविन विहीर व पिण्याच्या पाण्याचा सार्वत्रिक स्रोत यातील अंतर किमान ५०० मीटर पेक्षा जास्त असल्याची खात्री करावी.

नानाजी देशमुख विहीर योजना लाभ/अर्थसहाय्य:

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत  राबविण्यात येणाऱ्या नविन विहीर या घटकासाठी १०० टक्के अनुदान दोन टप्प्यात देण्यात येते.

१. पहिला टप्पा - विहिरीचे खोदकाम पूर्ण झाल्यावर अंदाजपत्रकानुसार एकूण खोदकामावरील खर्च.

२. दुसरा टप्पा - विहिरीचे खोदकाम व बांधकाम पूर्ण झाल्यावर अंदाजपत्रकानुसार देय रक्कम. 

एकूण अर्थसहाय्य - २,५०,०००/- (रु. दोन लाख, पन्नास हजार).

नानाजी देशमुख विहीर योजनेचा लाभ घेण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या Maha DBT संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करता येतो तसेच संबंधित कृषी अधिकारी किंवा नानाजी देशमुख कृषी संजीवनी समितीला थेट अर्ज करता येतो. (नमुना अर्ज खाली पीडीएफ स्वरूपात दिला आहे).

नानाजी देशमुख फळबाग योजना:

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत फळबाग लागवड हा घटक राबविण्यास मान्यता दिली आहे. फळपिकांच्या लागवडीसाठी भाऊसाहेब फुंडरकर फळबाग लागवड योजना नुसार अर्थसहाय्य अनुज्ञेय राहील. संबंधित प्रकल्प गावाच्या ग्राम कृषि संजीवनी समितीकडे प्राप्त झालेल्या मागणी अर्जाची छाननी संबंधित कृषी सहाय्यक यांनी करून पात्र व अपात्र अशा शेतकऱ्यांची यादी समितीसमोर लाभार्थी निवडीसाठी सादर करावी लागते.

फळांच्या लागवडीसाठी ३ वर्ष कालावधीत प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षी अनुक्रमे ५०%, ३०% व २०% या प्रमाणात अर्थसहाय्य अनुज्ञेय राहील. फळपिकांमध्ये आंबा, डाळिंब, पेरू, सीताफळ, आवळा, कागदी लिंबू, संत्रा व मोसंबी इत्यादी पिकांचा समावेश आहे.

नानाजी देशमुख फळबाग योजना लाभार्थी पात्रता/निकष:

१. प्रकल्पांतर्गत वैयक्तिक शेतकऱ्यांनाच लाभ देण्यात येतो.

२. शेतकऱ्याच्या स्वतःच्या नावे ७/१२ असणे आवश्यक आहे.

३. लागवड करावयाच्या फळपिकासाठी लाभार्थाकडे पाणी पुरवठ्याचा स्रोत व आवश्यक सुविधा असावी.

४. लाभ घेण्यासाठी लाभार्थाच्या मालकीची किमान २० गुंठे शेत जमीन असणे बंधनकारक आहे.

५. लाभार्थ्याने फळबाग लागवडीकरिता कलमची निवड स्वतः करावयाची असते तसेच विद्यापीठातील रोपवाटिकेतून खरेदी परवान्यावर अथवा स्वखर्चाने करावयाची असते.

नानाजी देशमुख फळबाग लागवड 2021 योजनेचा लाभ घेण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या Maha DBT संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करता येतो तसेच संबंधित कृषी अधिकारी किंवा नानाजी देशमुख कृषी संजीवनी समितीला थेट अर्ज करता येतो. (नमुना अर्ज खाली पीडीएफ स्वरूपात दिला आहे).


नानाजी देशमुख कृषी अवजारे:

जमिनीची कमी होत असेलेली उत्पादकता, ग्रामीण भागामध्ये दिवसेंदिवस शेती कामांमध्ये मजुरांची कमी होणारी संख्या, मजुरांवरील वाढता खर्च या समस्येमुळे शेतामध्ये यांत्रिकरण वाढवणे आवश्यक आहे. शेतीमध्ये कामांसाठी वापरली जाणारी सर्व अवजारे खरेदी करणे सर्वच शेतकऱ्यांना शक्य होत नसते. ही बाब विचारात घेऊन, शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी अनेक अवजारे गजरेनुसार भाडे तत्त्वावर देण्याच्या उद्देशाने  नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत कृषी अवजारे सेवा केंद्राची निर्मिती करणे यासाठी मान्यता देण्यात आली आहे.

भाडे तत्वावर कृषी अवजारे सेवांसाठी फार्म मशिनरी बँका स्थापन करणे, कृषी अवजारे सेवा केंद्रांची निर्मिती करणे, शेतीमध्ये यांत्रिकीकरणात वाढ करणे, उत्पादनामध्ये सुधारित उपकरणे / अवजारे यांच्या वापरास प्रोत्साहन देणे इत्यादी नानाजी देशमुख कृषी अवजारे भाडे तत्वावर देण्याचा मुख्य उद्देश आहे.

नानाजी देशमुख कृषी अवजारे योजना पात्रता/निकष:

१. जिल्ह्यातील शेतकरी, उत्पादक कंपन्या व शेतकरी उत्पादक संघाना सदर योजनेचा लाभ मिळवता येऊ शकतो.

२. शेतकरी उत्पादक कंपनी/संघ व नोंदणीकृत शेतकरी / बचत गट यांच्या मार्फत शेतकऱ्यांना भाडेतत्वावर वाजवी दरात कृषी अवजारे उपलब्ध करून देता येते.

३. शेतकरी उत्पादक कंपनी/संघ व नोंदणीकृत शेतकरी / बचत गटांना कृषी अवजारे सेवा केंद्र उभारणीसाठी नोंदणीकृत बँक/वित्तीय संस्था यांचेकडून कर्ज मंजूर होणे आवश्यक आहे. तसेच, कर्जाची रक्कम ही मंजूर अनुदानाच्या किमान दीडपट असणे आवश्यक आहे.

४. शेतकरी उत्पादक कंपनी /संघ व नोंदणीकृत शेतकरी /बचत गटाने नोंदणीकृत बँक / वित्तीय संस्था व प्रकल्प व्यवस्थापन यांच्याशी विहित नमुन्याप्रमाणे करार केलेला असावा.

नानाजी देशमुख कृषी अवजारे योजना अर्थसहाय्य / लाभ:

१. कृषी अवजारे सेवा केंद्र साठी आवश्यक कृषी अवजारे उपकरणे व संयंत्रे आणि आवश्यकतेनुसार शेड बांधकाम यांना एकूण खर्चाच्या 50 टक्के अनुदान देय राहील. अनुदानाची कमाल मर्यादा रुपये 50 लाख राहील.

२. अनुदानासाठी कृषी अवजारे सेवा केंद्राच्या प्रकल्प अहवालामध्ये असलेल्या जमिनीच्या किमतीचा/ भाडेपट्टाच्या रकमेचा समावेश असणार नाही.

३. या योजनेअंतर्गत अनुदान क्रेडिट लिंकड बँक ऐंडेड सबसिडी (Matching Grants) या तत्वानुसार बँकेने मंजूर केलेल्या सर्व बाबी पूर्ण केल्यानंतर व कृषी अवजारे सेवा केंद्र कार्यान्वित झाल्यानंतर देण्यात येईल.

४.  शेतकरी उत्पादक कंपनी / संघ व नोंदणीकृत शेतकरी बचत गटांच्या क्षेत्रातील वाव विचारात घेऊन स्वतः कृषी अवजारे उपकरणे व संयंत्रे निवडण्याची मुभा आहे.

नानाजी देशमुख कृषी अवजारे व उपकरणे भाडे तत्वावर मिळवण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या Maha DBT संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करता येतो तसेच संबंधित कृषी अधिकारी किंवा नानाजी देशमुख कृषी संजीवनी समितीला थेट अर्ज करता येतो. (नमुना अर्ज खाली पीडीएफ स्वरूपात खाली पहा).

पोखरा योजना Online Form:

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना 2021 (पोखरा योजना Online Form) अंतर्गत सर्व योजना ऑनलाईन अर्ज पुढील प्रमाणे करता येईल.

आवश्यक त्या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सर्वप्रथम नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना 2021 च्या संकेतस्थळावर भेट देऊन, शेतकरी योजना या पर्यायामध्ये शेतकरी नोंदणी करावी.

शेतकरी नोंदणी करण्यासाठी https://mahadbtmahait.gov.in/Farmer/RegistrationLogin/RegistrationLogin इथे भेट द्या. 

नोंदणी करण्यासाठी आवश्यक असलेली माहिती टाका ( उदा. नाव, गाव, जिल्हा, जमिनीचा तपशील आणि कागदपत्रे)  शेतकरी नोंदणी पूर्ण झाल्यावर, आपला वर्तमान मोबाइल नंबर आपल्या आधार क्रमांकाशी जोडलेला आहे याची खात्री करा. आपले नोंदणीकृत वापरकर्तानाव प्रविष्ट करा व अर्जदार लॉगिन करा. 

१. अर्जदार लॉगिन केल्यांनतर, नोंदणी केलेला तपशील पहायला मिळेल. 

२. त्यानंतर, डाव्या बाजूस नवीन योजनेसाठी अर्ज करा या पर्यायाची निवड करा.

३. यानंतर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या सर्व योजनांची यादी पहायला मिळेल.

४. आवश्यक असेलेल्या योजनेची निवड करून त्यातील उपघटक निवडा.

५. त्यानंतर तुम्ही निवडलेल्या योजनेची माहिती व इतर अनुदान, लाभाचा तपशील पहायला मिळेल.

६. त्यानंतर वरील बाजूस नोंदणी पुढे चालू हा पर्याय निवडा.

७. पुढे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्जचा (पोखरा योजना Online Form) ऑनलाईन फॉर्म दिलेल्या सुचनेप्रमाणे भरा आणि SUBMIT या बटणवर क्लिक करा.

अशा प्रकारे नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेसाठी (nanaji deshmukh krushi sanjivani prakalp online form) ऑनलाईन अर्ज करू शकता.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना यादी:

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत खालील योजनांचे घटक राबविण्यास मान्यता मिळालेली आहे. यामध्ये मराठवाडा आणि विदर्भातील एकूण १५ जिल्हांचा समावेश आहे. त्या जिल्हांमध्ये - हिंगोली, जळगाव, लातूर, उस्मानाबाद, यवतमाळ, वाशीम, जालना, औरंगाबाद, बीड, नांदेड, परभणी, अकोला, अमरावती, बुलडाणा, वर्धा इत्यादी जिल्हे निडवले गेले आहेत. या प्रकल्पांतर्गत खालील योजना राबविल्या जातात.

पोखरा योजना यादी (नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना यादी) Pocra Scheme List:

१. फळबाग लागवड

२. सेंद्रिय शेती

३. विहीर पुनर्भरण

४. सामुदायिक शेततळे

५. मधुमक्षिका पालन

६. रेशीम उद्योग मार्गदर्शक

७. ठिबक व तुषार सिंचन

८. विहीर पुनर्भरण

९. शेततळे / सामुदायिक शेततळे

१०. रेशीम उद्योग

११. ठिबक व तुषार सिंचन

१२. वानिकी आधारित शेतीपद्धती -वृक्ष लागवड

१३. हवामान अनुकूल तंत्रज्ञान शेतीशाळा

१४. संरक्षित शेती मार्गदर्शक सूचना

१५. पाणी उपसा साधने व पाईप

१६. जमीन आरोग्य सुधारणे अंतर्गत गांडूळ खत व नाडेप पद्धतीने सेंद्रिय निविष्ठा उत्पादन आणि सेंद्रीय खत निर्मिती

१७. नवीन पाणी साठवण संरचनांची निर्मिती -नवीन विहिरी

१८. बंदिस्त शेळीपालन व परसातील कुक्कुट पालन मार्गदर्शक

१९. हवामान अनुकूल वाणांचे पायाभूत आणि प्रमाणित बियाण्यांचे बिजोत्पादन तयार करणे

२०. आर्थिक संस्था / व्यावसायिक बँकांचे मूल्यांकन केलेल्या व्यावसायिक प्रस्तावांना सहाय्य करणे: शेतकरी गट / शेतकरी उत्पादक संस्था / शेतकरी उत्पादक कंपनी). 

२१. शुद्धिकरण रेशीम उद्योग

२२. शुद्धिकरण संरक्षित शेती

२३. भाडे तत्वावर कृषी अवजारे सेवा केंद्राची निर्मिती करणे.

वरील नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनांची 2021 (पोखरा योजना) सर्व माहिती एकत्रित पाहण्यासाठी इथे भेट द्या

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना लाभार्थी यादी २०२१:

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना लाभार्थी यादी २०२१ (nanaji deshmukh krishi sanjivani beneficiary list 2021) पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा, यात जिल्हा, तालुका आणि गावाची निवड करून योजेनच्या लाभार्थीयांची गाव निहाय यादी पाहू शकता.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना लाभार्थी यादी २०२१ इथे क्लिक करा.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी PDF:

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत सर्व योजनांची माहिती pdf स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी इथे भेट द्या.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनांची 2021 अर्ज नमुना pdf - डाउनलोड करा.

हे देखील वाचा : मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2021

तुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात

घरकुल योजना २०२१ यादी महाराष्ट्र

अस्मिता योजना महाराष्ट्र

बालसंगोपन योजना माहिती

स्वामित्व योजना महाराष्ट्र

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या

  1. आम्ही २-३ वर्षे झालेत विहीरीची फाईल ग्रां.पं.च्या रोजगार सेवकाकडे दिली. पण अजुनपर्यंत त्यांचा काही काहीच प्रतिसाद मिळाला नाही.

    उत्तर द्याहटवा

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत.