अस्मिता योजना बद्दल माहिती । अस्मिता योजना महाराष्ट्र । अस्मिता योजना कार्ड । अस्मिता योजना माहिती मराठी । asmita yojana maharashtra
Asmita Yojana Scheme in marathi ग्रामीण पातळीवर मासिक पाळीच्या वेळी सॅनिटरी नॅपकीनचा (Sanitary Napkins) वापर करणाऱ्या महिलांचे प्रमाण अत्यंत अल्प आहे. महिलांना तसेच शालेय मुलींना सॅनिटरी नॅपकीच्या अभावी आरोग्य विषयक विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. त्याचबरोबर मासिक पाळीविषयावर गावपातळीवर अनेक गैरसमज असतात. त्यामुळे याबत जनजागृती करून अल्प दरात महिलांना व मुलींना सॅनिटरी नॅपकिन विकत घेणे शक्य व्हावे या दृष्टीनेकोनातून राज्य शासनाने राज्यात अस्मिता योजना सुरू केली.
राज्यातील ग्रामीण भागातील महिलांना व जिल्हा परिषद शाळांमधील ११ ते १९ या वयोगटातील किशोरवयीन मुलींमध्ये सॅनिटरी नॅपकिन्स व वैयक्तिक स्वच्छतेसंदर्भात जाणीव जागृती करणे व त्यांना माफक दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्याकरिता राज्यात अस्मिता योजना राबवण्यास ८ मार्च, २०१८ पासून सुरुवात झाली. या योजनेअंतर्गत या मुलींना व महिलांना सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करून देण्यात येतात.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत अस्मिता योजना राबविण्यात येते. त्याबाबत ७ मार्च, २०१८ रोजी राज्यशासनाने शासननिर्णय निर्गमित केला आहे. आणि ८ मार्च, २०१८ पासून ही योजना राबविण्यास सुरवात झाली.
अस्मिता योजना उद्देश:
ग्रामीण भागातील महिला व मुलींच्या प्रजनन स्वास्थ्य व आरोग्याबाबत झालेल्या सर्वेक्षणानुसार मासिक पाळीच्या काळात योग्य ती काळजी न घेतल्याने महिला व मुलींमध्ये प्रजननाशी निगडित अनेक समस्या निर्माण झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे महिला/मुलींमध्ये वैयक्तिक स्वच्छता व आरोग्याची काळजी कशी घ्यावी याचे प्रबोधन करणे आवश्यक आहे. या सर्वेक्षणा प्रमाणे ११ ते १९ वयोगटातील किशोरवयीन मुली वयात आल्यानंतर शाळांमध्ये सर्वसाधारणपणे वर्षातील ५० ते ६० दिवस मासिक पाळीच्या काळात गैरहजर राहण्याचे प्रमाण वाढलेले दिसले. त्यामुळे महिला व किशोरवयीन मुलींनी वैयक्तिक स्वच्छता व आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबाबत सातत्याने काम करण्याची आवश्यकता आहे.
यामुळेच गाव पातळीवर आशा स्वयंसेविका यांच्या माध्यमातून राज्यातील ग्रामीण विभागातील महिला व ग्रामीण विभागातील ११ ते १९ वयोगटातील किशोरवयीन मुलींमध्ये सॅनिटरी नॅपकिन्स वैयक्तिक स्वच्छते संदर्भात जाणीव जागृती करणे व त्यांना माफक दरात सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात अस्मिता योजना सुरू केली.
राज्यातील ग्रामीण भागातील महिलांमध्ये सॅनिटरी नॅपकिन्सचा वापर वैयक्तिक स्वच्छता याबाबत जाणीव जागृती करण्याकरिता राज्यात अस्मिता योजना खालीलप्रमाणे राबविण्यास मान्यता देण्यात आली.
१. गावपातळीवर स्वयंसहाय्यता समूहाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिला तसेचे ११-१९ या वयोगटातील किशोरवयीन मुलींमध्ये वैयक्तिक स्वच्छतेबाबत जन जागृती करणे.
२. योजनेअंतर्गत सॅनिटरी नॅपकिन्सची मागणी नोंदविण्यासाठी व पुरवठा करण्यासाठी विशिष्ट Mobile App तयार करण्यास मान्यता दिली गेली असून Asmita Umed या मोबाइल ऍपद्वारे स्वयं सहायता गट सॅनिटरी नॅपकिनची मागणी नोंदवू शकतात.
अस्मिता योजनेअंतर्गत मुलींना सॅनिटरी नॅपकिन पुरवठयाची प्रक्रिया:
• या योजनेतील सहभागासाठी गावातील स्वयंआशासेविका यांची निवड करून त्यांच्यामार्फत वेळोवेळी त्या गावातील एकत्रित मागणीची नोंद घेण्यासाठी तयार केलेल्या Asmita Yojana App ऍपवर करण्यात यावी.
• ऍपवर मागणी केल्याप्रमाणे सॅनिटरी नॅपकिन्स तालुकास्तरावरील वितरकाकडे उपलब्ध करून देण्यात येते.
• गावातील आशा सेविका समूहांनी गावातील महिलांना सॅनिटरी नॅपकिन्स या पॅकेटवर छापल्या दराप्रमाणे विक्री करण्यात येते.
• गावातील आशा सेविका समूहाने जिल्हा परिषदेच्या शाळांमधील मुलींना अस्मिता योजनेअंतर्गत २४० मीमीच्या ८ पॅडचे एक पाकीट रु.५/- या सवलतीच्या दराने सॅनिटरी नॅपकिन्सची विक्री केली जाते.
• योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील महिलांना माफक दराने सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून दिले जाते. महिलांना २४० मिमीच्या ८ पॅड असलेल्या एका पाकीटची किंमत २४ रुपयांना तर २८० मीमीच्या ८ पॅडची किंमत २९ रुपये एवढी असते.
• आरोग्य व वैयक्तिक स्वच्छता IEC (Information, Education and Communication) विषयक साहित्य तयार करणे व विविध बैठकांमार्फत महिला/मुलींपर्यंत या विषयाचा प्रसार करण्यात यावा. याकरिता तसेच नुषंगिक बाबीकरीता वार्षिक एक कोटी एवढ्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे.
अस्मिता योजना कार्ड:
अस्मिता योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना अस्मिता योजना कार्ड Asmita Yojana Card वितरित करण्यात येते. या कार्डच्या माध्यमातून लाभार्थी सॅनिटरी नॅपकिन माफक दरात घेऊ शकतील तसेच आशा स्वयंसेविकेच्या माध्यमातून देखील प्राप्त करता येईल. अस्मिता योजना कार्ड च्या माध्यमातून लाभार्थींयांची नोंदणी Asmita Yojana Registration केली जाते. अस्मिता कार्ड धारक किशोरवयीन मुलींना रु.५/- प्रमाणे विक्री केलेल्या पाकिटच्या संख्येच्या प्रमाणात एका पाकीट मागे १५.२० रुपयांप्रमाणे अनुदान शासन बचत गटांना देत असते.
सदर योजनेची अंमलबजावणीकरीता उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान हे नोडल एजन्सी व अतिरिक्त संचालक, कुटुंबकल्याण, पुणे हे नोडल अधिकारी आहेत.
तुम्हाला या पोस्ट आवडू शकतात
• दिव्यांग/अपंगांसाठी सरकारी योजना
• माझी कन्या भाग्यश्री योजना २०२१
0 टिप्पण्या
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत.