स्वामित्व योजना महाराष्ट्र । स्वामित्व योजना मराठी Swamitva Yojana In Marathi । स्वामित्व योजना म्हणजे काय? । प्रॉपर्टी कार्ड म्हणजे काय?
स्वामित्व योजना ही केंद्र पुरस्कृत योजना आहे. दिनांक २४ एप्रिल, २०२१ रोजी पंचायती राज दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Narendra Modi यांनी स्वामित्व (प्रधानमंत्री स्वामित्व योजना) योजना सुरू केली. पंचायती राज दिनानिमित्त पंतप्रधानांनी व्हिडिओ कॉन्फरन्स कॉलवर देशातील सर्व सरपंचांशी बोलले. यावेळी स्वामित्व योजना सुरू केल्याची घोषणा त्यांनी केली. या योजनेच्या माध्यमातून खेड्यांमधील शेतकऱ्यांची प्रत्येक जमिनीचे मोजमाप ड्रोनद्वारे केले जाईल. आणि जमीनीचा मालकी हक्क असलेल्या शेतकऱ्यांना त्याचे ई-प्रॉपर्टी कार्ड E - property Card देण्यात येईल. स्वामित्व योजना म्हणजे काय? स्वामित्व योजनेचे फायदे, प्रॉपर्टी कार्ड म्हणजे काय? स्वामित्व योजनेचा उद्देश आणि कार्यपद्धती बद्दल माहिती या लेखात तुम्हाला वाचायला मिळेल.
सद्यस्थितीत स्वामित्व योजना सुरवातीस महाराष्ट्र, कर्नाटक, हरियाणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश, पंजाब आणि राजस्थान या राज्यांमध्ये चाचणी म्हणून प्रायोगिक स्तरावर लागू केली गेली आहे. यानंतर योजनेत येणाऱ्या अडचणी लक्षात घेता बदल करण्यात येतील. त्यानंतर स्वामित्व योजना देशभरात लागू केली जाईल.
स्वामित्व योजना म्हणजे काय? Swamitva Yojana In Marathi
देशातील सर्वच भागात जमिनी बाबतच्या मालकी हक्काबद्दल नेहमीच विवाद उद्भवत असतात. तसेच, गरिबांच्या जमिनीवर जबरदस्तीने कब्जा केल्याची प्रकरणे देखील पहायला मिळतात. इत्यादी सारख्या गोष्टीचा विचार करून केंद्र सरकारने देशपातळीवर स्वामित्व योजना राबविण्याचा संकल्प केला होतो. स्वामित्व योजने अंतर्गत देशातील सर्व ग्रामीण भागातील ड्रोनद्वारे जमिनीचे मोजमाप केले जाईल आणि गावातील प्रत्येक मालमत्तेचा डिजिटल नकाशा तयार केला जाईल. उपलब्ध कागदपत्रांच्या पुराव्यानुसार, संबधीत मालकाला/शेतकऱ्याला त्याच्या जमिन मालकीचे प्रमाणपत्र (ई-प्रॉपर्टी कार्ड) दिले जाईल.
ई - प्रॉपर्टी कार्ड म्हणजे काय?
देशातील ग्रामीण भागात राहणाऱ्या अनेक लोकांकडे आजही आपले घर आणि जमिनीची कोणतीही कागदपत्रे उपलब्ध नाहीत. त्यामुळे सरकारकडून ग्रामीण भागातील शेती, जमीन आणि घरांचे सर्वेक्षण ड्रोन द्वारे केले जाते. सर्वेक्षण केल्यांनतर त्यांना त्यांच्या मालकीच्या संपत्तीचे ओळखपत्र देण्यात येईल. जेणेकरून कागदपत्रे नसलेल्या लोकांनाही निवासी जमिनीच्या संपत्तीचे अधिकार मिळतील. त्या ओळखपत्राला 'ई-संपत्ती कार्ड', ''ई - प्रॉपर्टी कार्ड' किंवा 'भूमी प्रमाणपत्र' म्हणून म्हणता येऊ शकेल.
स्वामित्व योजनाचे फायदे/लाभ काय?
• स्वामित्व योजनेमुळे सरकारला नवीन आराखडा तयार करण्यातस मदत होईल.
• मालकी हक्क असणाऱ्या जमिनीच्या मालकाच्या नावे अचूक जमिनीची नोंद होण्यास तत्परता येईल.
• ग्रामपंचायत स्तरावर जमिनीची कर आकारणी सोप्प होईल.
• या योजनेद्वारे जमिनीचे मालकी प्रमाणपत्र (प्रॉपर्टी कार्ड) शेतकऱ्यांना मिळविता येईल.
• योजनेद्वारे मिळविलेले मालकी प्रमाणपत्र असल्याने बँकांकडून कर्ज घेणे शेतकऱ्यांना सोयीस्कर होईल.
• ग्रामीण भागातील जुमल्याचे वाद -विवाद जवळपास संपुष्टात येतील.
• सरकारला शेतीविषयक नव-नवीन योजना तयार करण्यास सोयीस्कर होईल.
• या योजनेचा सर्वात जास्त फायदा त्या लोकांना होईल ज्यांची मालमत्ता आहे, परंतु ब्रिटीश काळापासून त्यांचे कागदपत्रे नाहीत. अशा परिस्थितीत हे प्रमाणपत्र मिळवून ते जमिनीवर मालकी हक्क सांगण्यास सक्षम असतील.
इत्यादी सारखे स्वामित्व योजनेचे अनेक फायदे उपलब्ध होतील.
स्वामित्व योजनेचा लाभ कसा मिळवता येईल?
ई-संपत्ती कार्ड तयार करण्यासाठी किंवा स्वामित्व योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येणार नाही. राज्य सरकारच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या घरापर्यंत स्वामित्व योजनेसाठी लाभासाठी हा अर्ज पोहोचवला जाईल. हा अर्ज भरल्यानंतर गावकऱ्यांना ई-संपत्ती कार्ड मोबाईलवर उपलब्ध होईल. ज्यांच्या घरी SMS वरुन ई-संपत्ती कार्ड पोहोचणार नाही त्यांना हे कार्ड घरपोच केले जाईल. मात्र, या सर्वांचा तपशील तुम्हाला योजनेच्या संकेतस्थळावर किंवा मोबाईल ऍपवर प्राप्त करता येईल.
स्वामित्व योजनेचे संकेतस्थळ / (स्वामित्व योजना Official website):
https://svamitva.nic.in/svamitva/
स्वामित्व योजनेचे संकेतस्थळावर ई - प्रॉपर्टी कार्ड वितरित झालेले, डिजिटल नकाशे, प्रॉपर्टी कार्ड तयार केलेले, ड्रोन सर्वेक्षण, चौकशी प्रक्रिया इत्यादी माहिती राज्यनुसार पाहता येते.
या योजनेचं स्वामित्व योजना App नसले तरीही ते लवकरच सुरु करण्यात येईल.
स्वामित्व योजनेचे ई-प्रॉपर्टी कार्ड वितरण सुरु:
दिनांक २४ एप्रिल, २०२१ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय पंचायती राज दिनाच्या निमित्ताने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधताना स्वामित्व योजनेंतर्गत ई-प्रॉपर्टी कार्ड कार्डचे वितरण सुरू केले अशी माहिती दिली. यावेळी, ४ लाख पेक्षा जास्त मालमत्ता धारकांना त्यांचे ई-प्रॉपर्टी कार्ड देण्यात आली. त्यामुळे खऱ्या अर्थाने स्वामित्व योजना राबविणास सुरवात झाली असे म्हणता येईल.
तुम्हाला या पोस्ट आवडू शकतात
0 टिप्पण्या
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत.