मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2021 mukhyamantri saur krushi pump yojana maharashtra


मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2021 | Mukhyamantri solar pump yojana maharashtra Mukhyamantri saur krushi pump yojana 2021 मुख्यमंत्री सोलर पंप योजना मप ऑनलाइन मुख्यमंत्री कृषी पंप अनुदान योजना

राज्यात अटल सौर कृषीपंप योजना राबविण्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयासोबतच राज्य शासनाद्वारे राज्यात १ लाख सौर कृषीपंप स्थापन करण्यासाठी अनुसूचित जाती / जमाती लाभार्थ्यांकरीता इतर विशेष योजना व उपयोजनांतर्गत निधीचा वापर करुन, नवीन सौर कृषीपंप योजना तयार करण्यास दिलेल्या मान्यतेनुसार शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्‍य व्हावे व राज्य शासनाची पारंपारिक पध्दतीने कृषीपंप जोडणीसाठी लागणाऱ्या खर्चाच्या बचतीचे / अनुदान बचतीचे उद्दिष्ट साध्य व्हावे, याकरीता राज्यातील शेतकऱ्यांना कृषी वापरासाठी १ लाख सौर कृषीपंप तीन टप्प्यात उपलब्ध करुन देण्याच्या प्रस्तावास दिनांक १६ ऑक्टोबर, २०१८ च्या मंत्रीमंडळ बैठकीत मंत्रीमंडळाने मान्यता दिली. त्यानुसार दिनांक १५ नोव्हेंबर, २०१८ च्या शासन निर्णयान्वये राज्यात 'मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना' Mukhyamantri solar pump yojana maharashtra लागू करण्यात आली. “मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना टप्पा-२ व ३” ही पूर्णत: राज्यपृस्कृत योजना आहे.

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2021 | Mukhyamantri solar pump yojana maharashtra | Mukhyamantri saur krushi pump yojana 2021 | मुख्यमंत्री सोलर पंप योजना मप ऑनलाइन | मुख्यमंत्री कृषी पंप अनुदान योजना | मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना mukhyamantri saur krushi pump yojana maharashtra | सौर ऊर्जा पंप किंमत महाराष्ट्र | मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना PDF | सौर ऊर्जा पंप माहिती | मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2021 लाभ/फायदे | Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana Eligibility | मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अर्ज 2021 | मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना ऑनलाइन फॉर्म | मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना PDF

सौर ऊर्जा पंप माहिती:

शेतकऱ्याला दिवसा सिंचन करणे शक्य व्हावे व राज्य शासनाची पारंपारिक पध्दतीने कृषीपंप जोडणीसाठी लागणाऱ्या खर्चात व राज्य शासनाव्दारे सबसीडीपोटी देण्यात येणाऱ्या अनुदानात बचतीचे उद्दिष्ट साध्य व्हावे हे मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेचे मुख्य उद्दिष्ट होय. याकरीता राज्यातील शेतकऱ्यांना कृषी वापरासाठी सुरु करण्यात आलेल्या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात २५००० नग, दुसऱ्या टप्प्यात, दुसऱ्या टप्प्यात ५०००० नग व तिसऱ्या टप्प्यात २५००० नग सौर कृषीपंप आस्थापित करण्याचे धोरण आहे. “मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना टप्पा-२ व ३ योजनेच्या अंमलबजावणीस व एकूण रुपये १५३१.०७०५ कोटी रकमेच्या प्रकल्प खर्चास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली आहे.

शेतकऱ्यांची आवश्यकता विचारात घेऊन, मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2021 अंतर्गत ३ अश्वशक्ती डी.सी व ५ अश्वशक्ती डी.सी क्षमतेच्या सौर कृषी पंपाबरोबरच ७.५ अश्वशक्ती डी.सी चे सौर कृषी पंप (एकूण संख्येच्या १०%) शेतकऱ्यांना देण्यास मान्यता मिळाली आहे.

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2021 लाभ/फायदे:

१. लाभार्थी शेतकऱ्यांना दिवसा शेतीपंपास वीजेची उपलब्धता मिळवणे शक्य.

२. दिवसा सौर कृषीपंपकरिता अखंडित वीज पुरवठा.

३. सौर कृषीपंपच्या वीज बिलापासून कायमची मुक्तता. 

४. डिझेल पंपाच्या तुलनेत शून्य खर्च. 

५. शेती सिंचनाचा भाग वीज सबसिडीपासून वेगळा करणे.

सौर ऊर्जा पंप किंमत महाराष्ट्र:

मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना 2021 अंतर्गत सर्वसाधारण गटाच्या अर्जदारांकडून पंपांच्या एकूण किमतीच्या १०% आणि अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांसाठी ५ % एवढी रक्कम लाभार्थ्यास भरावी लागते.

सौर कृषीपंप सर्वसाधारण प्रवर्गासाठी:

• ३ एचपी लाभार्थी हिस्सा १० % - रु. १६,५६०/-

• ५ एचपी लाभार्थी हिस्सा ५% - रु. २४,७१०/-

• ७.५ एचपी लाभार्थी हिस्सा ५% - रु. ३३,४५५/-

अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती प्रवर्गासाठी:

• ३ एचपी लाभार्थी हिस्सा १०% - रु. ८,२८०/-

• ५ एचपी लाभार्थी हिस्सा ५% - रु. १२,३५५/-

• ७.५ एचपी लाभार्थी हिस्सा ५% - रु. १६,७२८/-

उदाहरण:

७.५ अश्वशक्ती सौर कृषी पंपांची आधारभूत किंमत रु. ३, ३४, ५५०/- (जीएसटी सह) असून, सर्वसाधारण प्रवर्गासाठी लाभार्थी हिस्सा म्हणून १०% म्हणजेच केवळ रु. ३३,४५५/- तर अनुसूचित जाती व अनुसुचित जमाती प्रवर्गासाठी लाभार्थीना ५ % म्हणून केवळ १६,७२८/- एवढी रक्कम भरावी लागेल.

मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना 2021 लाभार्थी निवडीचे निकष/पात्रता:

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजेनचे लाभार्थी निवडीचे निकष/पात्रता Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana Eligibility खालीलप्रमाणे:

१) सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या शेतकऱ्यांकडे जलस्रोत उपलब्ध आहे, असे सर्व शेतकरी पात्र राहतील. मात्र अशा शेतकऱ्यांकडे पारंपारिक पध्दतीने विद्युत जोडणी झालेली नसणे आवश्‍यक आहे.

२) ५ एकरापर्यंत शेतजमीन धारक शेतकऱ्यास ३ अश्वशक्‍ती क्षमते पर्यंतचे सौर कृषी पंप व ५ एकरापेक्षा जास्त शेतजमीन धारक शेतकऱ्यास ५ अश्वशक्‍ती क्षमतेचा सौर कृषी पंप देय राहील. ५ एकर क्षेत्रापेक्षा जास्त शेतजमीन असणाऱ्या लाभार्थ्यांना भौगोलिक परिस्थीतीनुसार पंपासाठी मागणी विचारात घेऊन ७.५ अश्वशक्ती क्षमतेचा सौर कृषीपंप देय राहील.

३) राज्यातील पारंपरिक ऊर्जेद्वारे विद्युतीकरण न झालेले शेतकरी, विद्युतीकरणासाठी वन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसलेले शेतकरी, महावितरण कंपनीकडे विद्युत जोडणीसाठी पैसे भरूनही प्रलंबित असणाऱ्या ग्राहकांपैकी/शेतकऱ्यांपैकी, ज्यांना नजीकच्या काळात विद्युत जोडणी मिळणे ठाक्‍य नाही असे शेतकरी, अतिदुर्गम भागातील शेतकरी, महाराष्ट्र शासनाच्या धडक सिंचन योजने अंतर्गत लाभ घेतलेले शेतकरी यांना सदर योजने अंतर्गत प्राधान्य राहील.

४) वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे, विहिर, बोअरवेल, बारमाही वाहणारी नदी/नाले यांच्या शेजारील शेतजमीनधारक शेतकरी सुध्दा या योजनेसाठी पात्र राहतील.

६. शेतकऱ्यांकडील बोअरवेल, विहिर व नदी इ. ठिकाणी शाश्वत पाण्याचा स्रोत उपलब्ध आहे, याची खात्री महावितरण कंपनीद्वारा निश्चित केलेल्या सक्षम प्राधिकाऱ्याकडून करण्यात येईल.

७. सदर योजनेंतर्गत सौर कृषी पंप संच किंमतीच्या सर्वसाधारण गटाच्या लाभार्थ्याने १० टक्के व अनुसूचित जातीच्या व अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांने ५ टक्के लाभार्थी हिस्सा म्हणून भरणे आवश्‍यक राहील.

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अर्ज 2021:

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अर्ज 2021 किंवा ऑनलाइन सोलर पंप रजिस्ट्रेशन (मुख्यमंत्री सोलर पंप योजना मप ऑनलाइन Maharashtra) करण्यासाठी https://www.mahadiscom.in (Mahadiscom Solar) या संकेतस्थळावर जाऊन अर्ज दाखल करता येतो. 

ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी अर्ज करण्यासाठीचे तीन प्रकार आहेत.

• नवीन ग्राहक (३.५ अश्वशक्ती क्षमेतचा सोलर पंप). 

• नवीन ग्राहक (७.५ अश्वशक्ती क्षमेतचा सोलर पंप). 

• प्रलंबित ग्राहक.


मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना ऑनलाइन फॉर्म:

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना २०२१ अंतर्गत ऑनलाईन www.mahadiscom.in marathi च्या संकेतस्थळावर जाऊन (ऑनलाइन सोलर पंप रजिस्ट्रेशन Maharashtra) अर्ज करू शकता. 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

संकेतस्थळावर गेल्यावर भाषा निवडा. त्यानंतर लाभार्थी सुविधा या पर्यायामध्ये, ऑनलाईन अर्ज हा पर्याय निवडा. व तुमच्या आवश्यकतेनुसार सौर कृषी पंप निवडा किंवा प्रलंबित ग्राहक असाल तर तसे निवडा व खाली दिलेल्या सुचनेप्रमाणे ऑनलाईन अर्ज करा.

१. अर्जदाराने अगोदरच शेतीकरिता वीजपुरवठा मिळवण्यासाठी पैसे भरेल असतील आणि वीज जोडणी अद्यापही झालेली नसेल तर त्याची माहिती माहिती भरावी. (आवश्यक असल्यास ). 

२. त्यानंतर अर्जदाराचा आणि जागेचा तपशील भरावा. (उदा. अर्जदाराचा प्रकार,पूर्ण नाव (आधारकार्ड प्रमाणे). 

३. फॉर्म अ मध्ये,  शेतजमीनीमध्ये सौर कृषी बसवायचा आहे त्या जागेचा पत्ता आणि सात बारा वरील माहिती  भरा ( उदा. सातबारा सर्वे क्रमांक, तालुका, गाव, शेतीचा प्रकार, क्षेत्रफळ इत्यादी).

४. अ -।। मध्ये, सौर कृषी पंप बसविण्याच्या जागेच्या जवळचा महावितरण ग्राहक क्रमांक ( इतर कोणताही संदर्भसाठी).

५. ब मध्ये, अर्जदाराचा रहिवासी पत्ता व ठिकाण भरा. (आधारकार्ड प्रमाणे). 

६. क मध्ये, जलस्रोत निवडा (उदा. विहीर, नदी).

७. त्यानंतर, तुमच्या घरील महावितरण वीज जोडणीचा ग्राहक क्रमांक टाका.

८. ड मध्ये, घोषणापत्र सविस्तर वाचून त्यामध्ये टिक करा.

९. त्यानंतर खाली नमूद केलेली कागदपत्रे पीडीएफ फॉरमॅट मध्ये अपलोड करा व अर्ज सादर करा या पर्यायावर क्लिक करा व लाभार्थी क्रमांक अर्जाचा मागोवा घेण्यासाठी जतन करून ठेवा. 

Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana Maharashtra Online Form अर्ज संबंधित अधिकाऱ्यांना झाल्यापासून 10 दिवसांच्या आत, सर्वेक्षण केल्यानंतर फील्ड ऑफिसमधून डिमांड नोट जारी केले जाईल. जर फॉर्म अर्जामध्ये काही त्रुटी आढळली तर त्यानुसार अर्जदाराला एसएमएसद्वारे कळविले जाईल.

टीप: मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आपले सरकार कॉमन सर्व्हिस सेंटर (Aaple Sarkar Common Service Center) इथेही भेट देऊ शकता.

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2021 आवश्यक कागदपत्रे:

ऑनलाईन अर्ज सादर करताना खालील कागदपत्रे पीडीएफ स्वरूपात आवश्यक आहेत. 

१. ७/१२ उतारा (सातबाऱ्यावर निवडलेल्या जलस्रोतची नोंद असणे आवश्यक आहे). 

२. सातबाऱ्यावर सामायिक जमिनीचे सामायिक क्षेत्र असल्यास २०० रु. च्या मुद्रांक कागदावर असेलेले ना हरकत प्रमाणपत्र.

३. आधार कार्ड प्रत.

Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana Application (अर्ज) Status:

Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana Status केलेला ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर अर्जाची सद्यस्थिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा. यामध्ये तुमचा अर्जाच्या वेळी मिळालेला लाभार्थी क्रमांक टाकून अर्जाचा स्टेटस पाहू शकता.

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना PDF:

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना २०२१ राज्यात सुरळीतपणे राबविण्यात यावी म्हणून महाराष्ट्र शासन उद्योग, ऊर्जा व कामगार विभागमार्फत वेळोवेळी शासन निर्णय व परिपत्रके निर्गमित केली जातात त्यातील काही शासन निर्णय (मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना) PDF मध्ये पुढीलप्रमाणे:

१. मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना pdf : डाउनलोड करा (Download)

२. कृषी पंप वीज जोडणी धोरण pdf : डाउनलोड करा (Download)

३. मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना टप्पा २ व ३ pdf : डाउनलोड करा (Download)

४. विदर्भ व मराठवाडा विभागातील कृषीपंपाना वीज जोडणी देण्याबाबत विशेष योजना pdf : डाउनलोड करा (Download)

५. अनुसूचित जाती उपयोजने अंतर्गत अनुसूचीत जातीच्या कृषीपंप धारकांच्या कृषिपंपाना उच्चदाब वितरण प्रणालीद्वारे वीज जोडणी देण्याकरिता महावितरण कंपनीस अनुदान उपलब्ध करून देण्याबाबत pdf : डाउनलोड करा (Download).

तुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना 2021 (संपूर्ण माहिती)


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या