बांधकाम कामगार योजना 2021 Bandhkam kamgar yojana 2021


बांधकाम कामगार योजना 2021 । बांधकाम कामगार नोंदणी online । बांधकाम कामगारांना अर्थसहाय्य 2021 । बांधकाम कामगार आरोग्य योजना । बांधकाम कामगार आवास योजना । बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ । Bandhkam kamgar kalyan mandal | mbocww yojana in marathi

Bandhkam kamgar yojana in marathi राज्यातील बांधकाम कामगारांना आरोग्यविषयक, शैक्षणिक, सामाजिक सुविधा उपलब्ध करून देणे तसेच त्यांना अर्थसहाय्य करण्याच्या दृष्टिकोनातून राज्यातील बांधकाम कामगारांच्या हितासाठी कार्यरत असणारे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ Bandhkam kamgar kalyan mandal स्थापन करून राज्य शासनाने बांधकाम कामगार कल्याणकारी योजना 2021 राज्यात राबविण्यास सुरवात केली.

Bandhkam kamgar kalyankari yojana 2021 बांधकाम कामगार योजना 2021 । बांधकाम कामगार नोंदणी online । बांधकाम कामगारांना अर्थसहाय्य 2021 । बांधकाम कामगार आरोग्य योजना । बांधकाम कामगार आवास योजना । बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ । Bandhkam kamgar kalyan mandal

बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ माहिती:

महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार (रोजगार नियमन व सेवाशर्ती) नियम २००७ आणि इमारत व इतर बांधकाम कामगार अधिनियम १९६६ (रोजगार नियमन व सेवाशर्ती) कायद्यांच्या तरतुदीनुसार महाराष्ट्र शासनाने दिनांक १ मे, २०११ रोजी राज्यातील कामगारांचे सर्वांगीण हित साधण्याच्या दृष्टीने 'बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ' Bandhkam kamgar kalyan mandal या मंडळाची स्थापना केली. राज्यात असेलेल्या इमारत व बांधकाम आस्थापनेकडून बांधकाम खर्चाच्या १% दराने उपकर वसूल करून बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे जमा केला जातो. जमा झालेल्या उपकराच्या निधीतून बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी विविध  'बांधकाम कामगार कल्याणकारी योजना' राबविल्या जातात.

बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची उद्दीष्टे:

राज्यातील नोंदणी असलेल्या सर्व बांधकाम कामगारांच्या विशेष हिताच्या विविध योजना राबविणे हे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे (Bandhkam kamgar kalyan mandal) मुख्य उद्दिष्ट्य होय.

१. नवीन बांधकाम कामगार ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुलभ करणे.

२. बांधकाम कामगारांपर्यंत पोहोचणे आणि त्यांच्याकडून विविध माहिती गोळा करणे.

३. योजनेच्या लाभासाठीचा अर्ज दाखल करण्याच्या पद्धतींत अधिक सुलभपणा आणणे.

४. कल्याणकारी योजनांच्या लाभ देण्याच्या पद्धतींत सुटसुटीतपणा आणणे.

५. योजनेच्या लाभाची रक्कम थेट बँक खात्यात जमा करणे.

६. बांधकाम कामगार नोंदणी वाढविण्यासाठी त्यांच्या कामाच्या जागेवर जाऊन नोंदणी करणे.

७. प्रत्येक बांधकाम कामगाराला नोंदणी क्रमांक देणे.

८. नोंदणीच्या मान्यतेसाठी मान्यताप्राप्त अधिकाऱ्याकडून नोंदणीची ऑनलाइन प्रक्रिया.

बांधकाम कामगार योजना 2021 लिस्ट:

बांधकाम कामगार योजना 2021 योजनेअंतर्गत खालील ४ घटकांमध्ये योजनेचा लाभ दिला जातो.

१. बांधकाम कामगार सामाजिक सुरक्षा योजना

२. बांधकाम कामगार शैक्षणिक योजना

३. बांधकाम कामगार आरोग्य योजना

४. बांधकाम कामगार आर्थिक सहाय्य योजना


१. बांधकाम कामगार सामाजिक सुरक्षा योजना

- पहिल्या विवाहाच्या खर्चासाठी रुपये ३०,०००/- एवढे अनुदान मिळते.

- माध्यन्ह भोजन योजना

- प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना

- आवश्यक हत्यारे व अवजारे खरेदीसाठी रुपये ५०००/-

- प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना

- प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना

- पूर्व शिक्षण ओळख प्रशिक्षण योजना

- सुरक्षा संच पुरविणे

- अत्यावश्यक संच पुरविणे

२. बांधकाम कामगार शैक्षणिक योजना

- इयत्ता १ ली ते ७ वी विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्षी रुपये २,५००/- अनुदान.

- इयत्ता ८ वी १० वी विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्षी रुपये ५,०००/- (९९९६७५% किंवा अधिक गुण आवश्यक).

- इयत्ता ११ वी ते १२ वी च्या शिक्षणासाठी प्रति शैक्षणिक वर्षी रुपये १०,०००/-.

- पदवीच्या अभ्यास कामाकरिता प्रतिवर्षी रुपये २०,०००/- (नोंदणीकृत कामगारांच्या पत्नीसह लागू).

- वैद्यकीय पदवीकरिता रुपये १ लाख व अभियांत्रिकी पदवीकरिता रुपये ६०,०००/- (नोंदणीकृत कामगारांच्या पत्नीसह लागू).

- पदविकेमध्ये प्रतिवर्ष रुपये २०,०००/- व पदव्युत्तर पदविकेमध्ये प्रतिवर्ष रुपये २५,०००/- (फक्त सामान्य अभ्यासक्रमाकरिता).

- MSCIT शिक्षणाच्या शुल्काची पूर्तता.

टीप: बांधकाम कामगार शैक्षणिक सुविधा या योजनेअंतर्गत सर्व लाभ फक्त नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पहिल्या दोन मुलांसाठी लागू आहेत.

३. बांधकाम कामगार आरोग्य योजना

- नैसर्गिक प्रसूतीसाठी रुपये १५,०००/- व शस्रक्रिया प्रसूतीसाठी रुपये २०,०००/- (दोन जिवंत अपत्यांसाठी).

- गंभीर आजाराच्या उपचारार्थ रुपये १ लाख (लाभार्थी कामगार त्याच्या/तिच्या कुटुंबियांना).

- एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे १८ वर्षापर्यंत रुपये १ लाख मुदत ठेव.

- ७५% किंवा कायमचे अपंगत्व आल्यास रुपये २ लाख अनुदान.

- महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत लाभ

- साधारण आरोग्य तपासणी

४. बांधकाम कामगारांना अर्थसहाय्य

- कामगाराचा कामावर मृत्य झाल्यास रुपये ५ लाख (कायदेशीर वारसास).

- कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास रुपये २ लाख (कायदेशीर वारसास).

- अटल कामगार आवास योजना (शहरी) अर्थसहाय्य रुपये २ लाख.

- अटल कामगार आवास योजना (ग्रामीण) अर्थसहाय्य रुपये २ लाख.

- कामगाराचा मृत्यू झाल्यास अंत्यविधीकरिता रुपये १०,०००/-.

- कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या विधवा पत्नीस किंवा स्त्री कामगाराच्या विधुर पतीस रुपये २४,०००/- (५ वर्षांकरिता).

- घर खरेदी किंवा घर बांधणीसाठी बँकेकडून घातलेल्या गृहकर्जावरील व्याजाची रक्कम ६ लाख अथवा २ लाख अनुदान.

बांधकाम कामगार कल्याणकारी योजनेअंतर्गत विविध घटकांचे लाभ मिळवण्यासाठी प्रत्येक घटकासाठी व वेगवेगळी पात्रता व निकष आवश्यक असते त्या घटकांच्या योजनेची पात्रात पाहण्यासाठी बांधकाम कामगार कल्याणकारी योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या. मात्र योजनतेतील प्रत्येक घटकांचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम बांधकाम कामगारांची नोंदणी असणं आवश्यक असतं. बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यासाठी आवश्यक पात्रता व निकष खालीलप्रमाणे:

बांधकाम कामगारांच्या नोंदणीसाठी पात्रता/निकष:

१. लाभार्थी महाराष्टाचा मूळ रहिवासी असावा.

२. १८ ते ६० वर्षे वयोगटातील बांधकाम कामगार असावा.

३. मागील बारा महिन्यांमध्ये ९० दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले असावा.

बांधकाम कामगारांच्या नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे:

बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणी करण्याकरीता फॉर्म – V भरुन खालीलप्रमाणे कगपत्रांसह bandhkam kamgar documents अर्ज सादर करणे आवश्यक असते.

१. वयाचा पुरावा

२. ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र

३. रहिवासी पुरावा (रेशकार्ड, वीजबील)

४. ओळखपत्र पुरावा (आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदार ओळखपत्र)

५. बँक पासबुक प्रत

६. पासपोर्ट आकाराचे 3 फोटो

७. ग्रामपंचायत/नगरपालिका /महानगरपालिका यांच्याकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र

नोंदणी करतेवेळी नोंदणी फी रूपये २५/- व ५ वर्षासाठी वार्षिक वर्गणी रूपये ६०/- एवढी असते.

बांधकाम कामगारांना प्रत्येकी पाच हजारांची मदत:

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदीत पात्र बांधकाम कामगारांस बांधकामासाठी उपयुक्त व आवश्‍यक असलेली अवजारे खरेदी करण्याकरीता रु. ५०००/- अर्थसहाय्य (बांधकाम कामगारांना अर्थसहाय्य) हे बांधकाम कामगारांच्या नोंदणी नंतर लगेच देण्यात येते. पुढील तीन वर्षानंतर लाभ घेण्यासाठी अशा बांधकाम कामगारांची मंडळाकडे सलग तीन वर्षे नोंदणी असणे अनिवार्य आहे" म्हणजेच, जर बांधकाम कामगारांची नोंदणी तीन वर्षे कायम असेल तर पुढील तीन वर्षानंतरही रु. ५०००/- रुपयांची मदत मिळते.

बांधकाम कामगार आवास योजना:

देशातील प्रत्येक कुटुंबाला हक्काचे घर उपलब्ध करुन देण्याच्या अनुषंगाने केंद्र सरकारने जून, २०१५ मध्ये सर्वांसाठी धरे या संकल्पनेवर आधारीत प्रधानमंत्री आवास योजना सुरु केली. सदर योजनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने राज्य मंत्रिमंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. याशिवाय या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने 'राज्यस्तरीय मंजुरी व संनियंत्रण समिती' गठीत करण्यात आली.

बांधकाम क्षेत्र हे देशातील जनतेला मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करुन देणारे क्षेत्र आहे. याशिवाय, या क्षेत्रातील कामगार हे विखुरलेले व असंघटीत आहेत. सदर कामगारांना राहण्यासाठी तसेच अन्य पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे अशा पक्के घर नसलेल्या व महाराष्ट्र इमारत व इतर बांघकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी केलेल्या कामगारांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्र बांधकाम कामगार आवास योजनेद्वारे पाणी, रस्ते, वीज, शौचालये इत्यादी पायाभूत सुविधा असलेली घरकुले उपलब्ध करुन देण्यासाठी बांधकाम कामगार आवास योजना (बांधकाम कामगार घरकुल योजना) राज्यात ३८२ शहरांमध्ये राबविण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदीत (सक्रीय) बांधकाम कामगारांनी अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) चा लाभ घेऊन घराचे बांधकाम पूर्ण करुन घरबांधणीच्या पूर्णत्वाचा दाखला सादर केला आहे, असे बांधकाम कामगार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून अर्थसहाय्य मिळण्यास पात्र राहतील.

अटल बांधकाम कामगार आवास योजनेचा (ग्रामीण) लाभ घेऊन घराचे बांधकाम पूर्ण करुन घर बांधणीच्या पूर्णत्वाचा दाखला देऊन अर्ज केलेला आहे अशा लाभार्थ्यास जमीन खरेदी व घरंबांधणीच्या अनुषंगीक बाबीसाठी केलेल्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून रुपये दोन लाख पर्यंतचे अर्थसहाय्य मंजूर करण्यात येत आहे. हे मंजूर अर्थसहाय्य थेट लाभार्थ्यांच्या बॅक बचत खात्यात जमा करण्यात येईल.

बांधकाम कामगार कल्याणकारी आवास योजना लाभ/फायदे:

बांधकाम कामगार योजनेचे लाभ प्रधानमंत्री आवास योजनेतील पात्रतेचे निकष पूर्ण करणाऱ्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना तसेच अशा कामगारांच्या पात्र गृहप्रकल्पांना देण्यात येतात.

नोंदणीकृत कामगारांच्या पात्रता निश्चिती संदर्भातील कार्यवाही करण्याची जबाबदारी संबंधित मंडळ व कामगार विभागाची असते. कामगार विभागाकडून निश्चित करण्यात आलेल्या पात्र लाभार्थ्यांना व गृहप्रकल्पांना वेळोवेळी प्रधानमंत्री आवास योजनेकरीता लागू केलेल्या सवलती देण्यात येतात, त्याशिवाय पात्र लाभार्थ्यांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडून प्रती लाभार्थी रु. २ लक्ष इतके अतिरिक्त अनुदान देण्यात कामगार विभागाकडून देण्यात येते. तसेच म्हाडास अनुज्ञेय असलेला २.५ चटई क्षेत्रफळ निर्देशांक (FSI) महाराष्ट्र बांधकाम कामगार आवास योजनेअंतर्गत पात्र गृहप्रकल्पांना अनुज्ञेय करण्यात येतो. सदरचा चटईक्षेत्र निर्देशांक केवळ १००% आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीच्या घरकुलांच्या प्रकल्पांना व प्रधानमंत्री आवास योजनेच्या विहित कालावधीकरीता असतो.

बांधकाम कामगार आवास योजना निकष/पात्रता:

१. महाराष्ट्र बांधकाम कामगार आवास योजनेंतर्गत लाभास पात्र असणारा गृहनिर्माण प्रकल्प, महारेरा अधिनियम २०१६ अंतर्गत नोंदणीकृत असावा.

२. लाभार्थी कामगार हा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत व योजनेंतर्गत पात्र असावा.

३. नोंदणीकृत लाभार्थी कामगार कोणत्याही प्रकल्पातील घरकुल योजनेत सहभागी झाल्यास महाराष्ट्र बांधकाम कामगार आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्र इमारत व इमारत बांधकाम कल्याणकारी मंडळाकडून देय प्रती लाभार्थी रु. २ लाख एवढ्या अनुदानास पात्र राहील.

बहुतेक बांधकाम संस्थांमध्ये कार्यरत बांधकाम कामगार हे ग्रामीण भागातून रोजगार मिळविण्यासाठी शहराकडे येतात. अशा बांधकाम कामगारांजवळ दैनंदिन वापराच्या अत्यावश्यक वस्तुंची कमतरता असते. अशा गोष्टींचा विचार करून अत्यावश्‍यक वस्तू संच (Essential Kit) कामगारांना पुरविणे तसेच, योजनेच्या माध्यमातून दैनंदिन वापराच्या वस्तुंची कमतरता भरुन काढण्यासाठी ही योजना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने दिनांक २२.९.२०१७ रोजीच्या बैठकीतील ठराव करून सुरु करण्यास मान्यता दिली.

बांधकाम कामगार नुतनीकरण:

मा. मुख्यमंत्री यांनी राज्यातील बाधकाम कामगारांची नोंदणी व नूतनीकरण करण्याची कार्यवाही, बांधकाम आस्थापनाकडून उपकराची वसूली व बांधकाम आस्थापनांची नोंदणी १०० टक्के पूर्ण होईल याकडे विशेष लक्ष केंद्रित केले. तसेच, आतापर्यंत विभाग प्रमुखांनी वर्षनिहाय जमा केलेल्या उपकराची रक्‍कम, बांधकाम व्यवस्थापनांनी केलेली नोंदणी व एकूण नोंदणीकृत केलेले बांधकाम कामगार व कामगारांना नोंदणी/ नूतनीकरणकरिता देण्यात आलेले ९० दिवसांचे प्रमाणपत्र इत्यादी बाबतच्या माहितीचा आढावा दिनांक २३ जून, २०१६ च्या बैठकीमध्ये घेण्यात आला होता. सदर बैठकीच्या इतिवृत्तामध्ये “महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांची नोंदणी संख्या वाढण्यासाठी व त्यांना कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा दिभाग, म्हाडा, सिडको, एम.आय.डी. सी. तसेच बांधकाम क्षेत्राशी त्यांच्या क्षेत्रीय स्तरावरील अधिका यामार्फत बांधकाम आस्थापनांची नोंदणी करण्यासाठी व बांधकाम कामगारास आवश्यक प्रमाणपत्र देण्यासाठी, संबंधीतांना संबंधितांना आदेश निर्गमित केले आहेत.

महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांची नोंदणी संख्या वाढवण्यासाठी व त्यांना कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी खालीलप्रमाणे कार्यवाही करण्याचे निर्देश आहेत.

१) शासन निर्णय - उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, क्र. बीसीए २००९/प्र.क्र.१०८/कामगार ७-अ, दि. १७ जुन, २०१० मध्ये नमुद कार्यपध्दतीचे पालन करावे.

२) केंद्र शासनाच्या इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण उपकर नियम १९९८ च्या नियम ३ नुसार निर्गमित केलेल्या दिनांक २६.९.१९९६ च्या अधिसुचनेनुसार १ टक्का उपकराची रक्‍कम इमारत व बांधकाम कामगार कल्याण मंडळात न चुकता जमा करावी.

३) बांधकाम आस्थापनांची नोंदणी करण्यासाठी व बांधकाम कामगारास आवश्यक प्रमाणपत्र देण्यासाठी, संबंधीत नियोक्त्यास (Employer) निदेश देण्याबाबत आदेश निर्गमित केले जावेत.

४) बांधकाम कामगारांची नोंदणी व नुतनीकरण करण्याची कार्यवाही, बांधकाम आस्थापनाकडून उपकराची वसुली व बांधकाम आस्थापनांची नोंदणी १०० टक्के पूर्ण होईल याची दक्षता घेण्यात यावी.

५) विभाग प्रमुखांनी वर्षनिहाय जमा केलेल्या उपकराची रक्कम, बांधकाम व्यवस्थापनानी केलेली नोंदणी व एकुण नोंदणीकृत केलेले बांधकाम कामगार व कामगारांना नोंदणी/नुतणीकरणकरिता देण्यात आलेले ९० दिवसांचे प्रमाणपत्र, इत्यादी माहिती शासनास सादर करावी.


बांधकाम कामगार आरोग्य योजना:

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने नोंदणी असलेल्या बांधकाम कामगारांना आरोग्य व अपघात विमा योजना प्रायोगिक तत्वावर लागू करण्याचा निर्णय घेतलेला होता. त्यानुषंगाने कामगार आयुक्‍त व अध्यक्ष, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने आरोग्य व वैयक्‍तीक अपघात विमा योजना बांघकाम कामगारांना लागु करण्यासाठी लाईफ अँन्ड जनरल इन्शुरन्स ब्रोकर्स प्रा.लि. यांची ब्रोकर म्हणून नियुक्ती केली.

लाईफ अँन्ड जनरल इन्शुरन्स ज्रोकर्स प्रा.लि यांनी कामगार आयुक्‍त यांच्यावत्तीने ४ इंशुरन्स कंपन्यांकडून आरोग्य व वैयक्‍तीक अपघात विमा योजनेबाबत कोटेशन मागवून ४ कंपन्यांकडून प्राप्त झालेले कोटेशन्स कामगार आयुक्‍त यांना सादर केले. सदर कोटेशन्सनुसार कामगार आयुक्‍त यांनी न्यु इंडिया अश्योरन्स कंपनीच्या रु. ३६४५/- + सेवाकर १२. ३६% + रु. ५५/- असे एकंदर रु. ४१५०/- प्रति कामगार एवढया रकमेची प्रिमियम असलेली आरोग्य व वैयक्‍तीक अपघात विमा योजना दिनांक २३ जुलै, २०१३ च्या पत्रान्वये मंजूर केली.

महाराष्ट्र शासनामार्फत एक लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबास लागू करण्यात आलेल्या राजीव गांधी जीवनदायी योजनेचा लाभ बांधकाम कामगार घेऊ शकतात. याशिवाय सदर योजनेसाठी दारिद्रय रेषेखालील कुटुंबे पात्र ठरतात, त्यामुळे मंडळाकडील सर्वच नोंदीत असलेल्या बांधकाम कामगारांना राजीव गांधी जीवनदायी योजनेचा सरसकट लाभ मिळत नाही. तसेच, जनश्री विमा योजना व राष्ट्रीय स्वास्थ विमा योजना इत्यादी योजनांचा लाभही मर्यादित कुटुंबानाच मिळतो. त्यामुळे मंडळाकडील नोंदीत बांधकाम कामगारांच्या भविष्याचा विचार करुन मंडळाने राज्य व राष्ट्रीय स्तरावरील विविध पर्याय विचारात घेतले.

राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबवावयाच्या महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत उपलब्ध होणाऱ्या रुग्णालयांची अधिकची संख्या आणि मिळणाऱ्या आरोग्य सुविधांचा दर्जा हा निश्चितच चांगला असल्यामुळे महाराष्ट्र इमारत व इतर बाधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदीत (ज्यांची नोंदणी जीवीत आहे असे) बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबियांना राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फेत राबवावयाच्या महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्याच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला.

बांधकाम कामगार आरोग्य योजना पात्रता/निकष:

१. लाभ घेतेवेळी नोंदीत बांधकाम कामगारांची नोंदणी जीवीत असणे अनिवार्य आहे.

२. कुटुंबियांसाठी लाभ घेण्याकरिता मंडळाच्या ओळखपत्रामध्ये कुटुंबियांचा तपशील नमूद असणे अनिवार्य आहे.

३. लाभार्थ्यांची ओळख ही महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत देण्यात येणार्‍या नोंदणी पावती व मंडळाच्या ओळखपत्रावरुन करता येईल कुटुंबाचा पुरावा म्हणून लाभार्थ्यांचे रेशनकार्ड ग्राह्य धरले जाईल ज्यात नोंदीत बांधकाम कामगार (नोंदणी जिवीत असलेले यांच्यासह लाभ घेणाऱ्या कुटुंबातील सदस्यांचे नांव समाविष्ट असणे अनिवार्य असेल).

४. लाभ घेतेवेळी नोंदीत बांघकाम कामगाराच्या कुटुंबियाने केंद्र/राज्य शासनाने वितरित केलेले कोणतेही एक ओळखपत्र छायाचित्रासह (उदा आधारकार्ड, मतदान कार्ड, वाहनचालक परवाना इ. सादर करणे अनिवार्य असेल.

५. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील पात्र लाभार्थ्यांसाठी महात्मा ज्योतीबा फुले जग आरोग्य योजना या योजनेअंतर्गत शासनाने निश्चित केलेली देय चिमा हप्त्याची ( प्रिमीयम रक्कम मंडळाने सदर योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या राज्य आरोग्य हमी सोसायटीस दर तीन महिन्यांनी (त्रैमासिक) बांधकामास 'कामगारांच्या जीवीत नोंदणीचा आढावा घेऊन अदा करते.

बांधकाम कामगार घरकुल योजना (अटी शिथिल):

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत महाराष्ट्र बांधकाम कामगार आवास योजना (शहरी) व अटल बांधकाम आवास योजना (ग्रामीण), या दोन्ही योजनांबाबतच्या अनुक्रमे दिनांक २९.१०.२०१८ व दिनांक १४.०१ २०१९ रोजीच्या शासन निर्णयात बांधकाम कामगारांच्या पात्रतेबाबत, योजनेचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगार हा नोंदणीकृत (सक्रिय) असावा. तथापि, अर्ज करतांना तो महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे सलग एक वर्षापेक्षा अधिक, बांधकाम कामगार म्हणून नोंदीत असावा,” अशी अट नमूद केलेली आहे. या दोन्ही शासन निर्णयातील सदर अट खालीलप्रमाणे सुधारित करण्यात आलेली आहे.

“प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत महाराष्ट्र बांधकाम कामगार आवास योजना (शहरी) व अटल बांधकाम आवास योजना (ग्रामीण) या दोन्ही योजनांचा लाभ घेण्यासाठी सर्व नोंदित (नोंदणीकृत) सक्रिय (जिवीत) बांधकाम कामगार पात्र राहतील."

बांधकाम कामगार शैक्षणिक योजना:

कामगारांच्या पाल्यानां त्यांच्या आजुबाजूच्या परिस्थितीची जाणीव हाणे, सामान्य ज्ञानात भर पडणे, दर्जेदार विक्षण मिळणे, तसेच शिकक्षणातुन पाल्यांचा शैक्षणिक तसेच बौद्धिक , शारिरीक विकास व उच्च शिक्षणासाठी त्यांच्या आत्मविश्वासमध्ये वाढ होण्यासाठी दैनंदिन पाठयपुस्तकांतील अभ्यासासोबतच अन्य पुस्तकांचीही अभ्यासासाठी गरज असते. त्यामुळे विद्यार्थ्याचे सर्वागीण ज्ञानात भर पडावी इत्यादी गोष्टींचा विचार करून नोंदीत बांधकाम कामगारांच्या पाल्यांना रु.१०००/- पर्यन्तच्या किंमतीचा शैक्षणिक उपयोगाच्या पुस्तकांचा संच भेट देण्याचा, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या दि.३० ०७.२०१४ च्या बैठकीमध्ये ठराव झालेला आहे.

बांधकाम कामगार गृहपयोगी वस्तू देणेबाबत:

इमारत व इतर बांधकाम या व्यवसायात काम करणाऱ्या बांधकाम कामगारांना संबंधित आस्थापनेचे काम पूर्णत्वास आल्यावर रोजगारासाठी नविन बांधकाम जेथे सुरु होते तेथे स्थलांतरीत व्हावे लागते. अशा स्थलांतराच्या ठिकाणी त्यांना नव्याने निवास, पाल्यांचे शिक्षण, आरोग्यविषयक समस्या व भोजन याबाबत जुळवुन घ्यावे लागते. त्यांना दैनंदिन भोजन तयार करण्यास सहाय्य व्हावे म्हणून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई यांनी दिनांक २७ ऑक्टोबर, २०२० रोजीच्या बैठकीत राज्यातील मंडळाच्या १० लाख नोंदीत सक्रिय (जिवीत) बाधकाम कामगारांना गृहपयोगी वस्तू संच वितरण करण्याबाबतचा ठराव खालील अटी व शर्ती ठेवून मंजूर झाला.

१. महाराष्ट्र इभारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत नोंदणीकृत असलेला बांधकाम कामगार (ज्याची नोंदणी सक्रिय आहे) या योजनेचा लाभार्थी राहील.

२. नोंदीत इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी (ज्याची नोंदणी सक्रिय आहे) यांनी विहीत नमुन्यातील मागणी अर्ज प्राधिकृत सहाय्यक कामगार आयुक्त अधिकारी यांचेकडे भरून दिल्यानंतर गृहपयोगी वस्तु संच पुरविण्यात येतील.

गृहपयोगी वस्तू संचामध्ये खालील वस्तूंचा समावेश आहे.

• ताट - ४ नग

• वाट्या - ८ नग

• पाण्याचे ग्लास - ४ नग

• पातेले झाकणासह - ३ नग

• मोठा चमचा (भात वाटपाकरिता) - १ नग

• मोठा चमचा (वरण वाटपाकरिता)- १ नग

• पाण्याचा जग (२ लिटर) - १ नग

• डब्बा - ४ नग

• परात - १ नग

• प्रेशर कुकर ( ०५ लिटर) - १ नग

• कढई (स्टील) - १ नग

• स्टील टाकी (मोठी झाकणासह) - १ नग

त्याचबरोबर अत्यावश्यक वस्तुसंच (Essential Kit) मध्ये प्लास्टिक चटई, मच्छरदानी, सोलर टॉर्च, जेवणाचा डबा, पाण्याची बाटली, खांद्यावरील बॅग, पत्र्याची पेटी इत्यादी वस्तूंचा समावेश आहे.

बांधकाम कामगार गृहपयोगी वस्तू व अत्यावश्यक वस्तूंबाबत मार्गदर्शक सूचना:

• गृहपयोगी/ अत्यावश्यक वस्तू संचाची निविदा स्विकृत करण्यापूवी वस्तू संचामधील वस्तृंच्या दर्जाची शासन मान्य प्रयोगशाळेकडून तपासणी करुन घ्यावी.

• गृहपयोगी/अत्यावश्यक वस्तू संच वितरीत करताना नोंदीत इमारत व इतर बांधकाम कामगार लामार्थी (ज्याची नोंदणी सक्रिय आहे) यांचे छायाचित्र काढणे व बायोगॅट्रीक पध्दतीने बोटांचे ठसे घेणे अनिवार्य राहील.

• गृहपयोगी/अत्यावश्यक वस्तू संच वितरणाकरीता जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधून संच वितरणाचे शिबीरआयोजित करण्यात येतील.

• गृहपयोगी/अत्यावश्यक  वस्तू संच पुरवठा करण्याची कार्यवाही मंडळाने विहित केलेल्या कालावधीत पूर्ण करावी पुरवठय़ाचा कालावधी वाढविण्यास मान्यता देण्याचे अधिकार मंडळास राहतील.

• गृहपयोगी/अत्यावश्यक वस्तू संच वितरण योजगेसाठी येणारा खर्च मंडळाकडील जमा उपकर निधीमधून भागविण्यात यावा.

बांधकाम कामगार नोंदणी online:

बांधकाम कामगार नोंदणी अर्ज online तसेच ऑफलाईन नोंदणी करता येते. ऑफलाईन नोंदणी करण्यासाठी जिल्हा/तालुका स्तरावर असलेल्या बांधकाम कामगार कार्यालयात जाऊन थेट अर्ज करता येतो. तसेच ऑनलाईन बांधकाम कामगार नोंदणी अर्ज करण्यासाठी खालीलप्रमाणे करता येतो.

१. पात्र बांधकाम कामगारांनी बांधकाम कामगार कल्याणकारी योजनेअंतर्गत ऑनलाईन नोंदणी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर (mahabocw.in marathi) भेट द्या.

२. त्यानंतर तुम्हाला जिल्हा (ठिकाण), आधारकार्ड क्रमांक व मोबाईल क्रमांक टाकून OTP मिळवा व तो Verify करा.

३. त्यानंतर तुमच्यासमोर असलेल्या अर्जामध्ये तुमची वैयक्तिक माहिती भरा. (जसे की, नाव, पत्ता, जन्मतारीख इत्यादी. - PF, UAN, ECIC क्रमांक असेल तर).

४. त्यानंतर तुमच्या कुटंबातील व्यक्तींची नावे व इतर माहिती भरा.

५. यानंतर बँकेची माहिती व तुम्ही काम करत असेलेल्या आस्थापनची माहिती.

६. आवश्यक असेलेले कागदपत्रे अपलोड करा व सबमिट बटनावर क्लीक करा.

अशाप्रकारे बांधकाम कामगार नोंदणी online साठीअर्ज करता येतो. अर्ज केल्यानंतर तुम्हाला OTP क्रमांक मिळेल तो क्रमांक तुमच्या जवळच्या बांधकाम कामगार केंद्रात जाऊन द्या. (mbocww yojana in marathi).

बांधकाम कामगार नोंदणी online नोंदणीचा व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

बांधकाम कामगार योजना नवीन शासनाचे निर्णय:

महाराष्ट्र शासनाच्या उद्योग व कामगार विभागामार्फत बांधकाम कामगार कल्याण योजनेबाबत निर्गमित केलेले काही महत्वाचे शासननिर्णय खालीलप्रमाणे: 

• बांधकाम कामगार नोंदणी फॉर्म pdf : डाउनलोड करा (Download)

• महाराष्ट्र बांधकाम कामगार आवास योजना pdf : डाउनलोड करा (Download)

• महाराष्ट्र बांधकाम कामगार आवास योजना (सुधारित अटी) pdf  : डाउनलोड करा (Download)

• बांधकाम कामगारांना सुरक्षा संच पुरविण्याबाबत pdf  : डाउनलोड करा (Download)

• बांधकाम कामगारांना अवजारे खरेदी करण्यासाठी अर्थसाहाय्य pdf : डाउनलोड करा (Download)

• बांधकाम कामगारांना अत्यावश्यक वस्तूसंच देणेबाबत pdf : डाउनलोड करा (Download)

• बांधकाम कामगारांना गृहपयोगी वस्तूसंच देणेबाबत : pdf डाउनलोड करा (Download)

• बांधकाम कामगार महात्मा फुले जन आरोग्य योजना pdf : pdf डाउनलोड करा (Download).

तुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना २०२१

• नानाजी देशमुख कृषी संजीवनी देशमुख योजना २०२१

• घरकुल योजना यादी २०२१ महाराष्ट्र

• गावाचा सरपंच कसा असावा?

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत.