ग्रामपंचायत निवडणूक पात्रता व आवश्यक कागदपत्रे | ऑनलाइन अर्ज प्रक्रिया Documents Required for Gram Panchayat Election सरपंच हा ग्रामपंचायतीचा प्रमुख असतो. सरपंच ग्रामपंचायतीचा अध्यक्ष किंवा सभापती म्हणून गावाचा कारभार पाहत असतो. त्याच्या मदतीला ग्रामसेवक, सदस्य व शिपाई असतात. गावाच्या शासकीय कारभाराचा प्रमुख म्हणून त्याची निवडणुकीद्वारे नेमणूक होते. या लेखात आपण सरपंच पदाची निवडणूक लढवण्यासाठीची पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि उमेदवारीची ऑनलाईन नोंदणी कशी करता येईल याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.
ग्रामपंचात निवडणुका राज्य निर्वाचन आयोगामार्फत घेण्यात येते. जिल्हाधिकारी राज्य निर्वाचन आयोगाचा प्रतिनिधी म्हणून जिल्ह्यातील ग्रामपंचातींच्या निवडणुका घेत असतो. त्यानुसार तो जिल्ह्यातील निवडणूकांवर देखरेख करीत असतो.
ग्रामपंचायत निवडणूक पात्रता:
१. ती व्यक्ती भारतीय असावी.
२. व्यक्तीचे वय २१ वर्षे पूर्ण झालेले असावे.
३. ग्रामपंचायत क्षेत्रात मतदार म्हणून त्याचे नाव नोंदवलेले असावे.
४. त्या व्यक्तीकडे संबंधित ग्रामपंचायत, जिल्हा परिषदेचा कोणतीही कर थकबाकी नसावी.
५. शासकीय कर्मचारी असू नये.
६. ती व्यक्ती गुन्हेगार असू नये.
७. दोन पेक्षा जास्त अपत्य असू नयेत.
८. किमान सातवी उत्तीर्ण असावा.
सरपंच उमेदवारी अर्जसाठी आवश्यक कागदपत्रे:
१. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या समोरील शपथ पत्र
२. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या समोरील घोषणा पत्र
३. ओळखपत्र - आधारकार्ड, पॅनकार्ड, आणि मतदान कार्ड इत्यादी
४. ग्रामपंचातकडून थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र
५. राखीव जागेसाठी आरक्षण असेल तर जातीचे प्रमाण पत्र
६. आरक्षित असेल तर जात वैधता प्रमाण पत्र
७. रहिवासी दाखला
८. उमेदवार इतर वार्डमधून उमेदवारी अर्ज भरत असेल तर मतदार यादी जोडा
९. वयाचा दाखला
१०. घरी शौचालय असल्याचा दाखला
११. कौटुंबिक माहिती आणि मुलांच्या जन्म तारखा
१२. नवीन बँक पासबुक राष्ट्रीयकृत बँक
ग्रामपंचायत निवडणूक ऑनलाइन अर्ज प्रक्रिया:
सरपंच निवडणुकीसाठी Gram panchayat election विहित पात्रता असेल तर पुढील संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन नोंदणी करता येते. https://panchayatelection.maharashtra.gov.in/ सर्वप्रथम वेबसाइटवर आवश्यक माहिती भरुन 'युजर नेम' आणि 'पासवर्ड' मिळवावा. त्यानंतर लॉगिन करून नामनिर्देशनपत्राचा नमुना उपलब्ध असेल त्याप्रमाणे अर्ज करावा.
१. संकेतस्थळाच्या सूचनेनुसार वैयक्तिक माहिती, विभाग नाव, जिल्हा, तालुका निवडा व त्यानुसार ग्रामपंचायत निवडून इतर माहिती निवडून नोंदणी करावी.
२. नोंदणी झाल्यावर वेबसाइटवर दिलेल्या नामनिर्देशनपत्राचा नमुना भरून त्याचे प्रिंट आउट घेऊन त्यावर स्वाक्षरी करावी.
३. स्वाक्षरी केलेली प्रिंट आउट निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे विहित वेळेत आवश्यक कागदपत्रासह दाखल करावी.
या लेखात आपण ग्रामपंचायत सरपंच निवडणूक पात्रता व आवश्यक कागदपत्रे आणि निवडणूक ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पाहिली. लेख आवडला तर इतरांसोबत सामायाईक करा. संबंधित काही प्रश्न असतील तर टिप्पणी करून नक्की कळवा.
1 टिप्पण्या
कोनत्या ही ग्रामपंचायत क्षेत्रात नाव असेल तर चालेल का? उदाहरणार्थ चाळीस गांव ग्रामपंचायत मतदार क्षेत्रात नाव असेल तर मला दुसऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उभे राहता येत का
उत्तर द्याहटवाआपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत.