तलाठी कामे व कर्तव्य Duties of Talathi in Marathi

 

तलाठी कामे व कर्तव्य duties of talathi in marathi | talathi kartavya in marathi महाराष्ट्र राज्याच्या प्रशासनाच्या कणा असेलेल्या महसूल विभागाचे तलाठी Village Accountant हे ग्रामस्तरावरील महत्वाचे अधिकारी आहेत. महसूल प्रशासनातील Revenue Administration सर्व योजना व कार्यक्रम यशस्वी करणारा शेवटचा घटक म्हणजे 'तलाठी' होय. तलाठयांना महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ कलम व त्याखालील विविध नियमांनुसार वेगवेगळी कार्ये Talathi Kame करावी लागतात.

तलाठी कामे व कर्तव्य Duties of Talathi in Marathi

तलाठ्यांना महसुली अभिलेखे ठेवणे व शासकीय वसुली करणे इत्यादी प्राथमिक कामे talathi kartavya असतात. याशिवाय, गावपातळीवर तो महसूल विभागाचा कर्मचारी असल्यामुळे महसूल विभागामार्फत केली जाणारी विविध कामे तालांठ्यांमार्फत पार पाडली जातात. जसे, निवडणुकीच्या वेळी मतदार नोंदणीची कामे, मतदार याद्या तयार करणे, शिधापत्रिकांची कामे, कृषी गणना करणे अशी निरनिराळी कामे करावी लागतात.


तलाठ्याच्या कार्यक्षेत्रास सज्जा किंवा साझा असे म्हणतात. सामान्यतः १ ते ४ गावांचा मिळून तलाठी साझा झालेला असतो. म्हणजेच, एका तलाठी साझासाठी १ किंवा जास्तीत जास्त ४ गावांसाठी एक तलाठी कर्मचाऱ्याची नेमणुक तहसीलदार यांचेमार्फत केलेली असते. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ खंड चार मध्ये तलाठ्यांची कार्य व कर्तव्य याबद्दल माहिती दिली आहे. तलाठयांचे कामकाजाचे महसुली वर्ष १ ऑगस्ट ते ३१ जुलै असे असते.

तलाठ्याची कार्य व कर्तव्ये/कामे/जबादारी:

महाराष्ट्र जमीन महसूल १९६६ नुसार जमीन महसूलाचे गावपातळीवर जमिनीसंबधी गाव नमूने १ ते २१ अभिलेख जतन करणे व ते अद्यावत updated ठेवणे. तसेच जमीन महसुलाची थकबाकी व इतर रकमांची वसुली करणे हे तलाठ्याचे दुसरे महत्वाचे कर्तव्य आहे. तलाठी जमीन महसूल व जमीन महसुलाची थकबाकी म्हणून वसूल करण्यायोग्य सर्व रकमा गोळा करण्यासाठी जबाबदार असतो.

तलाठ्यांचे कार्य व कर्तव्ये सामान्यपणे पुढीलप्रमाणे आहेत. 

• महसुली वर्ष संपल्यानंतर त्या वर्षातील महसुली हिशोब तपासून बंद करणे. 

• थकबाकी असणाऱ्या खातेदारांची यादी करून पुढील वर्षाकरिता थकबाकी मागणी निश्चित करणे.

• दरवर्षी ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात झालेले जमिनींचे फेरफाऱ्याचे व्यवहार विचारात घेऊन गाव नमुना नं. ७/१२ व गाव नमुना नं. ८ (अ) अद्यावत करणे.

• वसूल केलेल्या आणि सरकारी खजिन्यात भरणा केलेल्या रकमेचा हिशोब नियमानुसार अद्यावत ठेवणे.

• वर्षाच्या शेवटी गावपातळीवर हिशेबाचा तालुका पातळीवरील हिशोबाशी मेळ घालणे. 

• पीक पाहणी बिनचूक आणि वेळेवर करणे व त्यानुसार सविस्तर अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना विना विलंब सादर करणे.

• १ ऑगस्ट रोजी नवीन महसूल वर्षाला सुरवात होते, त्यावेळेस तलाठ्याने सर्व नोंदव्यावहार पूर्ण व शिक्का करून त्या सर्व नोंदवह्या तहसीलदाराकडे कमीत कमी १५ दिवस आधी पाठविने व १ ऑगस्ट पूर्वी तहसीलदाराकडून स्वाक्षकांकित करून घेणे.

• तलाठ्याने हंगामात होणारे बदल व पिकांची स्थिती यांचा अहवाल तहसीलदाराकडे पाठवून त्याची एक प्रत मंडल निरीक्षकाकडे पाठवणे आवश्यक असते. नैसर्गिक आपत्ती येण्याचा संभव असलयास तिच्या संबधी अहवाल तयार ठेवणे.

• खरीप पिकांची कुळवहिवाट, सीमा, व भूमापन चिन्हे यांची तपासणी करुन १५ ऑक्टोबर पर्यंत पूर्ण करावे.

• त्यांनतर तलाठ्याने रब्बी पिकांची कुळवहिवाट, सीमा, व भूमापन चिन्हे यांच्या तपासणीला प्रारंभ करुन ३१ डिसेंम्बर पर्यंत ते पूर्ण करावे.

• जमीन महसूल अधिनियमाच्या कलम १४९ खाली अधिकार संपादनाबद्दलचे तोंडी किंवा लेखी अहवाल मिळाल्याबद्दल तलाठ्याने संबंधित व्यक्तीला ताबडतोब लेखी पोच द्यावी. त्याला मिळालेल्या प्रत्येक अहवालाची  फेरफार नोंदवहीमध्ये ताबडतोब नोंद करावी.

• तलाठ्याने आपल्या ताब्यातील सर्व शासकीय मालमत्तांची नोंदवही ठेवावी, आणि तपासणी व सहीसाठी ती निरीक्षण अधिकाऱ्याला सादर करावी.

तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या कोणत्याही वरिष्ठ महसूल किंवा पोलीस अधिकाऱ्याने जेव्हा जेव्हा तसे करण्यास सांगितले असेल तेव्हा तेव्हा नोटिशी, चौकशी फौजदारी प्रकरणातील जबानी व तपासणी यासारखी गावाच्या कामासंबधी जी कागदपत्रे केंद्र सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या किंवा लोकांच्या उपयोगासाठी आवश्यक असतील अशी सर्व कागदपत्रे तयार करणे देखील तलाठ्याचे कर्तव्य असते.


तलाठी कामे/कर्तव्य नियमावली:

• तलाठ्याने आपल्या सझ्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी किंवा जिल्हाधिकारी ठरवून देईल अश्या कोणत्याही ठिकाणी राहावे. इतरस्त्र कोठेही राहू नये.

• तालाठयाने त्याच्याकडे प्रसिद्धीस आलेल्या सर्व नोटिसा किंवा आदेश गावाच्या चावडीवर योग्य त्या पद्धतीने प्रसिद्ध करणे आवश्यक आहे.

• जमीन महसूल १९६६ कलम ७७ नुसार, शासनाच्या वतीने त्याला मिळालेल्या सर्व पैशाबद्दल तलाठ्यांने पावती दिली पाहिजे. पावती देण्यात तलाठ्याने कसूर केल्यास, मिळालेल्या रक्कमेच्या दुप्पटीपेक्षा अधिक नसेल इतक्या दंडास तो पात्र राहील.

• तलाठीने रोकडवही (कॅश बुक) ठेवले पाहिजे व त्याच्याकडे त्याच्याकडे जमा झालेले सर्व पैसे आणि १५ दिवसांच्या आत कोषागारात जमा केलेले पैसे याची वाहिमध्ये नोंद केली असावी. कोणत्याही परिस्थितीत स्वतःजवळ १ हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम शिल्लक म्हणून ठेवता कामा नये.

• तलाठीने वसूल केलेल्या जमीन महसूल ज्या चालनाखाली शासकीय कोषागारात जमा केला असेल त्या चालनामध्येच त्याचे जमीन महसुलाच्या वसुलीच्या प्रगतीचा अहवाल तहसीलदाराला दिला पाहिजे.

• ज्यावेळीस तलाठ्याला कळविले जाईल त्या वेळेस त्याला मिळालेल्या नोटिसा किंवा आदेश गावामध्ये दवंडी पेटवून जाहीर केल्या पाहिजेत.

• तलाठीने त्याच्या सजातील गावांमध्ये घडणाऱ्या पूर, आग, धुके, गारपीट, टोळधाड, भूकंप, माणसांचे किंवा गुरांचे साथीचे रोग, पिके बुडणे इत्यादी सारख्या नैसर्गिक आपत्तींचा अहवाल मंडल निरीकक्षकाकडे आणि तहसिलदाराकडे पाठविला पाहिजे.

• ज्यावेळेस जिल्हाधिकारी आदेश देईल तेव्हा तलाठीने गावतील शिधापत्रिकांची यादी तयार करावी लागते व जिल्हाधिकारी आदेशानुसार गावकऱ्यांना शिधापत्रिका देणे आवश्यक असते. 

• जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत व सार्वत्रिक निवडणुकासाठी मतदारांची यादी तयार केली पाहिजे. निवडणूकीच्या कामामध्ये तलाठयाने निवडणूक अधिकाऱ्यास सहाय्य करणे अपेक्षित असते.

• सर्व भूमापन कामे चालू असताना तलाठ्याने भुमापन अधिकाऱ्यांना आवश्यक ते साहाय्य करणे गरजेचे असते.

• त्या वर्षामध्ये वसुलीसाठी नियत असलेला सर्व जमीन महसूल त्या वर्षाच्या ३१ जुलैपूर्वी वसुल करणे आवश्यक असते.

वाचकमित्रहो, वर नमूद केल्यप्रमाणे तलाठ्यांचे कामकाज हे महाराष्ट्र जमीन जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कायद्यानुसार चालते. अधिनियमाखाली खंड चार मध्ये तलाठी कर्तव्य (Talathi Kame) यांची माहिती विस्तृतपणे दिली आहे. जमीन महसूल अधिनियम १९६६ चा खंड चार पीडीएफ (महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ कलम pdf ) स्वरूपातून इथून डाऊनलोड करू शकता. 

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ कलम pdf (खंड चार)- Download.

या पोस्ट देखील तुम्हाला आवडू शकतात

आशा स्वयंसेविका कर्तव्य व कामे

माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजना

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

  1. माझा एक प्रश्न आहे माझा दोस्ताने शेती विकत घेतली पण फेरफार टाकला असता अधिकारी ने आक्षेप घेतला की अनधिकृत ले आऊट टाकुनी विकी केली पण तसं शेतात काही नाही . योग्य मार्गदर्शन करा.वाटसप न.7507502509

    उत्तर द्याहटवा

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत.