प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना मराठी Matru Vandana Yojana In marathi | PMMVY

 

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना मराठी Matru Vandana Yojana Maharashtra In Marathi | PMMVY भारत देशातील अनेक गर्भवती महिलांना (Pregnant Women) गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंतच्या काळात मजुरीसाठी काम करावे लागते. तसेच, प्रसूतीनंतर (After Delivery) शारिरिक क्षमता नसतानाही मजुरीसाठी तत्काळ काम करावे लागते. यामुळे अशा गर्भवती महिला व माता कुपोषित राहून त्यांचे व त्यांच्या नवजात बालकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. यामुळे देशाच्या मातामृत्यू, बालमृत्यू Maternal Mortality, Child Mortality Rate दरात वाढ होते.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना मराठी | Matru Vandana Yojana In marathi | PMMVY | pradhan mantri matru vandana yojana | PMMVY in Marathi | प्रधानमंत्री मातृ वंदना योजना महाराष्ट्र

माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गर्भवती महिला व स्तनदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करून त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी व जन्माला येणाऱ्या नवजात बालकांचेही आरोग्य सुधारावे व मातामृत्यू व बालमृत्यू दरात घट होऊन तो नियंत्रित रहावा यासाठी, केंद्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालय विभागाने प्रधानमंत्री मातृ वंदना Pradhan Mantri Matru Vandana Yojana ही नवीन योजना संपूर्ण देशात दिनांक १२ जानेवारी, २०१७ पासून राबविण्यास  मान्यता दिली. त्यानुसार, ८ डिसेंबर २०१७ पासून महाराष्ट्र राज्यात प्रधानमंत्री मातृवंदना योजना राबविण्याची अंमलबजावणी झाली.


मातामृत्यू व बालमृत्यू दर कमी करण्याच्या दृष्टीने संपूर्ण देशात आणि महाराष्ट्र राज्यातील अमरावती व भंडारा या दोन जिल्ह्यांमध्ये महिला व बालकल्याण विभागामार्फत राबवण्यात येत असलेली इंदिरा गांधी मातृत्व सहयोग ही १०० टक्के केंद्र पुरस्कृत योजना बंद करून, सदर योजनेचे अनुदान प्रधानमंत्री मातृ वंदना या केंद्रपुरस्कृत योजनेच्या अंमलबजावणीसाठी उपयोगात आणले.

सदर योजना केंद्र व राज्य शासन यांच्या सहभागाने राबविली जात असून, या योजनेत केंद्र शासनाचा ६० टक्के तर राज्य शासनाचा ४० टक्के सहभाग असतो.

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेची ठळक वैशिष्ट्ये:

केंद्र शासनाने विहित केलेल्या मार्गदर्शक सूचना निकष कार्यपद्धती व विकसित केलेल्या संगणक प्रणालीद्वारे आयुक्त आरोग्य सेवा व अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई यांच्यामार्फत प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेची Pradhan Mantri Matru Vandana Yojana अंमलबजावणी केली जाते.

१) सदर योजना एक वेळा आर्थिक लाभाची असून पहिल्या जीवित अपत्य पुरतीच मर्यादित आहे व सदर लाभ एकदाच घेता येतो.

२) राज्यातील १ जानेवारी २०१७ किंवा त्यानंतर कुटुंबातील पहिल्या अपत्यासाठी गरोदर असण्याऱ्या सर्व गर्भवती महीला आणि स्तनदा माता या योजनेसाठी पात्र असतील.

३) नैसर्गिक गर्भपात झाल्यास किंवा मृत बालक जन्मलास त्या टप्प्यापुरातच एकदा लाभाची संधी राहील.

४) या योजनेत दारिद्रय रेषेखालील व दारिद्र्यरेषेवरील लाभार्थ्यांचा समावेश असला तरी वेतनासह मातृत्व रजा मिळणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ अनुज्ञेय नाही.

५) शासनाने अधिसूचित केलेल्या संस्थेत गर्भवती महिलांना नोंदणी करणे आवश्यक आहे.

६) लाभाची रक्कम लाभार्थी महिलेच्या आधार संलग्न बँक खात्यात किंवा पोस्ट ऑफिसमधील खात्यात तीन हप्त्यात थेट जमा केली जाते.

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेअंतर्गत अनुदान लाभ व त्यांचे वितरण:

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत (PMMVY) लाभ पात्र लाभार्थी महिलेस रुपये पाच हजार एवढी रक्कम आधार संलग्न बँक खात्यात (DTB) किंवा पोस्ट ऑफिसमधील खात्यात खालील तीन टप्प्यात जमा केली जाते.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा पहिला हप्ता 1000

मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेपासून 150 दिवसात गर्भधारणा नोंदणी केल्यानंतर प्राप्त होईल.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा दुसरा हप्ता 2000

किमान एकदा प्रसवपूर्व तपासणी केल्यास गर्भधारणेचे सहा महिने पूर्ण झाल्यानंतर दुसरा हप्ता लाभार्थीच्या खात्यात जमा केला जाईल.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा तिसरा हप्ता 2000

प्रसूती नंतर झालेल्या अपत्त्यांची जन्मनोंदणी व बालकास बीसीजी, ओपीव्ही, हिपॅटॅटीस आण लसीकरण पूर्ण झाल्यानंतर तिसरा हप्ता लाभार्थ्याच्या खात्यात जमा केला जाईल.

लाभार्थी महिलेची शासकीय रुग्णालयात प्रसुती झाल्यास त्यांना जननी सुरक्षा योजनेअंतर्गत ग्रामीण भागात रुपये 700 व रुपये 600 शहरी भागात लाभ अनुज्ञेय राहील.


प्रधानमंत्री मातृत्व वंदना मातृ वंदना योजनेसाठी संपर्क:

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा PMMVY लाभ घेण्यासाठी लाभार्थींनी खालील प्रशासकीय स्तरांच्या आरोग्य केंद्रात संपर्क करता येतो.

ग्रामीण क्षेत्र: 

एएनएम (आरोग्य केंद्र सहाय्यक) पात्र लाभार्थींना विनाशूल्य विहित नमुना प्रपत्र (Matru Vandana Yojana Form) 1 अ चा अर्ज देऊन अर्ज स्विकारतील व तो अर्ज प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत तालुका अधिकाऱ्यांकडे पाठवला जाईल. हा अर्ज भरण्याची जबाबदारी आरोग्य केंद्र सहाय्यकची असते. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी अर्जातील माहिती तपासून तो अर्ज तालुका अधिकाऱ्यांकडे जमा करतील. विहित संकेतस्थळावर तालुका अधिकाऱ्यांमार्फत लाभार्थी महिलेच्या अर्जाची माहिती भरण्यात येईल. राज्यस्तरावरुन संगणक प्रणालीद्वारे थेट लाभ अदा करण्यात येईल.

नगरपालिका क्षेत्र:

प्राथमिक आरोग्य केंद्र पात्र लाभार्थीना विनाशुल्क विहित नमुना प्रपत्र 1 अ चा अर्ज देऊन परिपूर्ण अर्ज स्विकारेल. परिपूर्ण अर्ज हेल्थ पोस्ट वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्याधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येईल. हेल्थ पोस्ट वैद्यकीय अधिकारी अर्जातील माहिती तपासून तो अर्ज मुख्याधिकाऱ्यांकडे सादर करतील. मुख्याधिकारी विहित संकेतस्थळावर लाभार्थी महिलेच्या अर्जाची माहिती भरतील.

महानगरपालिका क्षेत्र: 

मुंबई तसेच इतर महानगरपालिका क्षेत्रात आरोग्य केंद्र सहाय्यक पात्र लाभार्थीं महिलेला विनाशुल्क विहित नमुना प्रपत्र 1 अ चा अर्ज देऊन परिपूर्ण अर्ज स्वीकारतील. परिपूर्ण अर्ज वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत महानगरपालिकेने निर्धारित केलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येईल.

मातृत्व वंदना योजना लाभासाठी आवश्यक कागदपत्रे:

• लाभाच्या पहिल्या टप्प्यासाठी आणि नोंदणीसाठी प्रपत्र 1 अ माता व बाल संरक्षण प्रमाणपत्र व आधार संलग्न बँक / पोस्ट खात्याची माहिती देणे आवश्यक आहे.

• लाभाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी प्रपत्र 1 ब माता व बाल संरक्षण प्रमाणपत्रावर किमान एक प्रसुतीपूर्व तपासणी (ए.एन.सी) ची नोंद असणे अनिवार्य आहे.

• लाभाच्या तिसऱ्या टप्प्यासाठी प्रपत्र 1 क जन्म नोंदणी प्रमाणपत्राची प्रत व बाळाला लसीकरणाचा पहिला खुराक दिल्याची नोंद असलेले माता व बाल संरक्षण प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

• लाभार्थी महिलेचे बँक खाते आधार संलग्न नसल्यास ते आधार संलग्न करण्यासाठी प्रपत्र 2 अ आणि पोस्ट खाते आधार संलग्न करण्यासाठी प्रपत्र 2 ब चा वापर करावा.

• आधारसंदर्भात नोंदणी / सुधारणा करण्यासाठी लाभार्थी प्रपत्र 2 क चा वापर करेल.

• या योजनेच्या नोंदणीबाबतच्या माहितीमध्ये (पत्ता/भ्रमणध्वनी क्रमांक/बँक खाते क्रमांक/ नावात बदल / आधार क्रमांक ) सुधारणा करण्यासाठी प्रपत्र 3 चा वापर करण्यात येतो. 

• सदर प्रपत्रे अंगणवाडी सेविका / एएनएम (Auxiliary Nurse Midwifery) तसेच आरोग्य संस्थेमध्ये विनाशुल्क प्राप्त होतील. तसेच लाभार्थींकडे आधार कार्ड / बँक खाते/ पोस्ट खाते नसल्यास सदर कार्ड व खाते काढण्यासाठी अंगणवाडी सेविका/एएनएम मदत करतील.

टीप: आवश्यक प्रपत्र (फॉर्म ) व अर्ज आरोग्य केंद्रामार्फत निशुल्क देण्यात येतो.

तुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात

पीएम किसान योजना संपूर्ण माहिती

शरद पवार ग्रामसमृद्धी योजना

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या