माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजना 2021 Majhi Kanya Bhagyashree Yojana Marathi

 

माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजना 2021 Majhi Kanya Bhagyashree Yojana 2021 In Marathi महाराष्ट्र राज्यामध्ये मुलींचे शिक्षण, आरोग्य व त्यांच्या उज्वल भविष्यासाठी (Girl's Education, Health and for a bright future) तसेच, आर्थिक बाबींमध्ये मदत, मुलींचे सबलीकरण Girl Empowerment करण्याच्या दृष्टीकोनातून दिनांक 1 जानेवारी, 2014 पासून राज्य शासनाने माझी कन्या भागश्री योजना - 2021 Majhi Kanya Bhagyashree Sudharit Yojana ही संपुर्ण राज्यभरात सुरू केली. दिनांक 1 ऑगस्ट, 2017 पासून ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये 7,50,000/- (रुपये सात लाख पन्नास हजार) पर्यंत आहे अशा समाजातील सर्व घटकांसाठी लागू करण्यात आली.

माझी कन्या भाग्यश्री योजना बद्दल माहिती | माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजना | Majhi Kanya Bhagyashree Yojana Marathi | माझी कन्या भाग्यश्री योजना फॉर्म pdf

मुलींचे सक्षमीकरण करण्याच्या हेतूने केंद्र सरकारने सुरवातीस 'बेटी बचाओ बेटी पढाओ' ही योजना सुरू केली होती. सदर योजनेसाठी भारतातील शंभर जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली होती. त्यामध्ये महाराष्ट्रातील बीड, जळगाव, अहमदनगर, बुलढाणा, औरंगाबाद, वाशिम, कोल्हापूर, उस्मानाबाद, सांगली व जालना या दहा जिल्ह्यांची निवड करण्यात आली होती. या योजनेच्या पार्शभूमीवर राज्यातील मुलींचा जन्मदर वाढवणे त्यांच्या आरोग्याचा दर्जा उंचावणे त्यांना शिक्षण देणे व बालविवाह प्रतिबंध करणे या उद्देशासाठी सुकन्या योजना दिनांक 1 जानेवारी, 2014 पासून लागू करण्यात आली.


त्यानंतर सुकन्या योजनेचे फायदे कायम ठेवून 'माझी कन्या भाग्यश्री' ही योजना सुधारीत योजना दिनांक 1 ऑगस्ट, 2017 पासून सुरु करण्यात आली.

माझी कन्या भाग्यश्री योजनेची उद्दिष्टे काय आहेत?

मुलींचे सबलीकरण /सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने माझी कन्या भाग्यश्री ही योजना सुरु करण्यात आली. त्यातील महत्वाचे उद्देश पुढीलप्रमाणे:

• लिंग निवडीस प्रतिबंध करणे, बालिका भ्रूणहत्या रोखणे.

• बालविवाह रोखणे आणि मुलांइतका मुलींचा जन्मदर वाढवणे.

• मुलींच्या जीवनमानाच्या सुरक्षेबद्दल खात्री देणे. 

• मुलींचे शिक्षण व आरोग्य यामध्ये सुधारणा करणे. मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन व खात्री देणे.

• मुलींचे जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार आणणे.

• मुलींच्या उज्वल भविष्यासाठी आर्थिक तरतूद करणे.

• पंचायत राज संस्था, शहरी स्थानिक समित्या व स्थानिक स्तरावरील कर्मचारी यांना या कामामध्ये प्रशिक्षण देणे. तसेच स्थानिक समुदाय, महिला मंडळे, महिला बचत गट, व युवक मंडळ यांचा सहभाग वाढविणे. 

माझी कन्या भाग्यश्री योजनेचे लाभ व फायदे काय आहेत?

‘माझी कन्या भाग्यश्री' या योजनेअंतर्गत यापूर्वीच्या सुकन्या योजनेचे लाभ कायम ठेऊन खालीलप्रमाणे अधिक लाभ देण्यात येतील. माझी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत दोन स्वरूपांच्या लाभार्थींना लाभ मिळवता येतो. 

लाभार्थी प्रकार १ - कुटूंबातील एकुलती एक मुलगी आहे व मातेने कुटुंबनियोजन केले आहे.

लाभार्थी प्रकार २ - एक मुलगी आहे आणि मातेने दुस-या मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेली आहे. अशा परिस्थितीत दोन्ही मुलींना योजनेचा लाभ देय राहतो. मात्र एक मुलगा व एक मुलगी अशी परिस्थिती असल्यास लाभ अनुज्ञेय राहणार नाहीत.

ही योजना दिनांक 1 ऑगस्ट 2017 पासून ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये 7,50,000 पर्यंत आहे अशा समाजातील सर्व घटकांसाठी लागू करण्यात आहे सदर योजनेचे लाभार्थी निकष खालीलप्रमाणे आहेत. 


एका मुलीनंतर - 

मात्या पित्याने हे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यानंतर अनुदान रक्कम मुलीच्या नावे रुपये पन्नास हजार बँकेत ठेव योजनेत शासनाकडून  गुंतवण्यात येईल.

- रुपये पन्नास हजार सहा वर्षांसाठी अनुज्ञेय होणारे फक्त व्याज मुलीला वयाच्या सहाव्या वर्षी काढता येईल.

-  पुन्हा मुद्दल रुपये पन्नास हजार गुंतवणूक करून सहा वर्षांसाठी अनुदिनी होणारे व्याज वयाच्या बाराव्या वर्षी काढता येईल.

-  पुन्हा मुद्दल रुपये पन्नास हजार गुंतवणूक करून सहा वर्षांसाठी अनुदान होणारे व्याज आणि मुद्दल दोन्ही रक्कम वयाच्या अठराव्या वर्षी काढता येईल.

माता पिता यांनी कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केल्याचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतरच रुपये पन्नास हजार  रक्कम मुलीच्या नावावर जमा करण्यात येईल अशा प्रकारे जमा केलेल्या रकमेवर त्यावेळी मुलीचे वयानुसार देय असलेली व्याजाची रक्कम तिला अनुज्ञेय राहील.

दोन मुलीनंतर -

मातेने पित्याने कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केल्यानंतर अनु देय रक्कम पहिल्या व दुसऱ्या मुलीच्या नावे प्रत्येकी रुपये 25000/- या प्रमाणे रुपये 50,000/- रक्कम मुलीच्या नावे बँकेत मुदत ठेव योजनेत गुंतवण्यात येईल. 

-  रुपये 25000/- च्या रकमेवर सहा वर्षांसाठी अनुज्ञेय होणारे फक्त व्याज मुलीला वयाच्या सहाव्या वर्षी काढता येईल.

- पुन्हा मुद्दल रुपये 25000/- गुंतवणूक करून सहा वर्षांसाठी अनुज्ञेय होणारे व्याज वयाच्या बाराव्या वर्षी काढता येईल.

 पुन्हा मुद्दल रुपये 25000/- गुंतवणूक करून सहा वर्षांसाठी अनुज्ञेय होणारे व्याज आणि मुद्दल दोन्ही रक्कम वयाच्या अठराव्या वर्षी काढता येईल.

माता-पिता यांनी कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केल्याचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर रुपये 25000/- इतकी रक्कम मुलीच्या नावावर जमा करण्यात येईल अशा प्रकारे जमा केलेल्या रकमेवर त्यावेळी मुलीच्या  वयानुसार देय असलेली व्याजाची रक्कम तीला अनुज्ञेय राहील.

माझी कन्या भाग्यश्री योजना नियम व अटी:

• मातेने/ पित्याने कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया केल्याचा दाखला योजनेचा लाभ घेण्यापूर्वी सादर करणे आवश्यक राहील.

• माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजना चा लाभ 1 ऑगस्ट, 2017 रोजी जन्मलेल्या व त्यानंतरच्या मुलींना अनुज्ञेय राहील.

• ज्या कुटुंबांना दिनांक 1 ऑगस्ट, 2017 पूर्वी एक मुलगी आहे व दिनांक 1 ऑगस्ट, 2017 नंतर दुसऱ्या मुलीचा जन्म झाल्यास व माता-पित्याने कुटुंब नियोजनाची प्रमाणपत्र सादर केल्यानंतर फक्त दुसर्‍या मुलीला रुपये 25000/- इतका योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील.

• पहिले अपत्य मुलगा असल्यास व दुसरे अपत्य मुलगी झाल्यास किंवा पहिले अपत्य मुलगी असल्यास व दुसरे अपत्य मुलगा झाल्यास या योजनेचा लाभ अनुज्ञेय नाही.

• कुटुंबात पहिले अपत्य मुलगी आहे व दुसरे अपत्य मुलगी जन्मलास तिला हा लाभ अनुज्ञेय असेल. मात्र तिसरे अपत्य जन्मल्यास त्यास हा लाभ अनुज्ञेय नसेल.  तिसरे अपत्य झाल्यास पहिला एक/दोन  अपत्यांचे लाभ ही बंद होतील.

• लाभार्थी मुलीचे वडील महाराष्ट्र राज्याचे मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.

• योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करताना बालिकेचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.

• मुदत ठेवीत गुंतवण्यात आलेली मूळ मुद्दल रक्कम व त्यावरील अठराव्या वर्षी देय असणारे व्याज अनुज्ञे य होण्यासाठी मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण असणे व इयत्ता दहावीची परीक्षा उत्तीर्ण असणे तसेच मुलगी अविवाहित असणे आवश्यक राहील.

• दुसऱ्या प्रसुतीच्या वेळेस जर जुळ्या मुली झाल्या तर त्या मुली योजनेस पात्र असतील.


• बालगृहातील अनाथ मुलींसाठी ही योजना अनुज्ञेय राहील. दत्तक पालकांनी मुलींचे अकाउंट उघडून हा लाभ त्या अकाउंटला देण्यात येईल. मात्र, दत्तक पालकांवर योजनेच्या सर्व अटी शर्ती लागू राहतील.

• सदर योजना आधार सोबत जोडण्यात येईल.

• विहित मुदतीपूर्वी (वयाची अठरा वर्षे पूर्ण होण्यापूर्वी)  मुलीचा विवाह झाल्यास किंवा दहावी पूर्वी शाळेतून गळती झाल्यास किंवा दहावी नापास झाल्यास या योजनेचा फायदा तिच्या पालकांना होणार नसून,  मुलींच्या नावे बँक खात्यात जमा असलेली रक्कम महाराष्ट्र शासनाच्या नावे असणाऱ्या खात्यात जमा करण्यात येईल. 

• नैसर्गिक कारणाने मुलीचा मृत्यू झाल्यास मुलीच्या नावे गुंतवण्यात आलेली रक्कम ठेवीची मुदत संपल्यानंतर पूर्ण रक्कम मुलीच्या पालकांना देय राहील.

• प्रत्येक लाभार्थी मुलींसाठी स्वतंत्र खाते बँकेत उघडण्यात येईल. तसेच मुलीच्या नावे रक्कम बँकेत जमा केल्यानंतर बँकेकडून देण्यात आलेल्या मूळ गुंतवणूक प्रमाणपत्राची प्रत लाभार्थ्यास देण्यात यावी व त्याची छायांकित प्रत शासकीय कार्यालयात जमा करून ठेवण्यात यावी.

• मुद्दलावर मिळणाऱ्या व्याजाचा दर हा त्या वेळी बँकेमार्फत लागू असलेल्या दरानुसार अनुज्ञेय राहील.

• एका मुलीच्या जन्मानंतर माता-पित्याने एक वर्षाच्या आत कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करून योजनेचा लाभ मिळवण्यासाठी संबंधित बालविकास प्रकल्प अधिकारी ग्रामीण /नागरी यांच्याकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर सादर केलेल्या अर्जाचा विचार करता येणार नाही. तसेच दोन मुलीनंतर सहा महिन्याच्या आत कुटुंब नियोजन केल्याचे प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणाऱ्या कुटुंबांनाच या योजनेचा लाभ अनुज्ञेय असेल.

माझी कन्या भाग्यश्री योजनेंतर्गत लाभासाठी आवश्यक कागदपत्रे:

• वडील राज्याचे मूळ रहिवाशी असल्याचा पुरावा, (अधिवास प्रमाणपत्र). 

• जन्म नोंदणी प्रमाणपत्र.

• लाभार्थी कुटुंबाने वर नमूद प्रकार-१ चा लाभ घ्यावयाचा असल्यास पहिल्या अपत्याच्या (मुलगी) जन्मानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली असल्याबाबतचे प्रमाणपत्र. 

• दुसरे अपत्य असलेल्या मुलीसाठी अर्ज करतांना कुटुंबनियोजन शस्त्रकिया केली असल्याबाबतचे वैद्यकीय अधिका-याचे प्रमाणपत्र. 

• पालकांचे वैध ओळखपत्र व रहिवासी पत्ता पुरावा.

माझी कन्या भाग्यश्री योजनेंतर्गत अर्ज करण्याची कार्यपध्दती:

• पात्र असेलेल्या योजनेचा लाभ घेण्यासाठी, मुलीच्या पालकांनी मुलीचा जन्म झाल्यावर संबंधित ग्रामपंचायत / नगरपालिका/ महानगरपालिका या ठिकाणी मुलीच्या नांवाची नोंदणी (जन्मनोंद) करावी.

• जन्म नोंदणी केल्यानंतर त्या क्षेत्रातील अंगणवाडी सेविकेकडे प्रपत्र-‘अ’ किंवा ‘ब’ मध्ये आवश्यक कागद्पत्रांनुसार सदर अर्ज अंगणवाडी सेविका  मुख्यसेविकेकडे सादर करतील. 

• अंगणवाडी मुख्यसेविका सदर अर्जाची, कागदपत्रांची व प्रमाणात्रांची तपासणी करुन प्रत्येक महिन्याला नागरी प्रकल्पाबाबत बाल विकास प्रकल्प अधिका-यांना व ग्रामीण प्रकल्पा बाबत ग्रामीण बाल विकास प्रकल्प अधिका-यांमार्फत उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बाल कल्याण), जिल्हा परिषद, यांना एकत्रित यादी मान्यतेसाठी सादर करतील.

• अर्जदारांनी संपूर्ण तपशीलासह भरून दिलेले अर्ज कागदपत्रासह वर नमूद केलेल्या संबंधित अधिकाच्यांनी मुलीच्या जन्माच्या एका वर्षांच्या विहित मुदतीपर्यंत स्वीकारावेत. दत्तक मुलींच्या बाबतीत ६ वर्षांपर्यंतच्या विहित मुदतीपर्यंत स्वीकारावेत.


• अर्ज संपूर्ण भरलेला नसल्यास अथवा सर्व प्रमाणपत्रासह नसल्यास अर्ज मिळाल्यापासून १५ दिवसाच्या आत अर्जदारास कळवावे. अर्जदारांनी अपूर्ण भरलेले अर्ज किंवा आवश्यक ती कागदपत्रे जोडलेली नसल्यास अशा अर्जदारांना वरील मुदती व्यतिरिक्त वाढीव एक महिन्याची मुदत देण्यात येईल. मात्र कोणत्याही परिस्थितीत कोणताही अर्ज २ महिन्यांपेक्षा अधिक काळ प्रलंबित ठेवता येणार नाही.

 मुलीला मुदतठेवीचा लाभ देण्याकरिता संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बाल कल्याण) यांच्या मान्यतेनंतर मुलीचे पालक जनधन योजनेअंतर्गत बॅक बचत खाते उघडतील. 

टीप: योजनेसाठी आवश्यक असलेले सर्व अर्ज राज्यातील प्रत्येक ग्रामीण व नागरी बाल विकास प्रकल्प अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बाल कल्याण), जिल्हा परिषद, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, विभागीय उपायुक्त (महिला बाल विकास) यांचे कार्यालयात विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येतात.

प्रधानमंत्री जनधन योजना:

माझी कन्या भागश्री योजेनच्या संलग्न प्रधानमंत्री जनधन योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. या योजने अंतर्गत मुलगी व तिची आई यांच्या नावे संयुक्त बचत खाते, बँक ऑफ महाराष्ट्र या राष्ट्रीयकृत बँकेत उघडण्यात येते. त्यामुळे या योजनेअंतर्गत रुपये दोन लाख अपघात विमा व रुपये दहा हजार रुपये पर्यंत ओव्हरडाफ्टची सुविधा अनुज्ञेय लाभ घेता येईल. माझी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत अनुज्ञेय लाभार्थ्यांच्या प्रधानमंत्री जनधन योजने अंतर्गत बचत खात्यात देण्यात येईल. सदर खाते उघडण्यास अंगणवाडी सेविका /मुख्य सेविका / पर्यवेक्षकीया  अर्जदारास मदत करतात.

माझी कन्या भाग्यश्री योजना फॉर्म pdf:

१. माझी कन्या भागश्री सुधारित योजना योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी मुलीच्या वतीने तिच्या पालकांनी करावयाचा अर्जाचा नमुना.pdf- Download 

२. माझी कन्या भागश्री योजनेअंतर्गत बालगृहे/शिशुगृहे/किंवा महिला व बालविकास विभागांतर्गतच्या इतर निवासी संस्था येथील अधिक्षकाने जिल्हा बालविकास अधिकारी यांच्याकडे करावयाचा अर्जाचा नमुना.pdf - Download

३. पालकांचे हमीपत्र/स्वयंघोषणा पत्र.pdf - Download

वाचकमित्रहो, मुलींच्या उज्वल भविष्यासाठी 'माझी कन्या भाग्यश्री' ही राज्य शासनाची अतिशय महत्वपूर्ण आणि सर्वोत्तम योजना आहे. मुलींच्या भविष्यासाठी प्रत्येक पालकांनी याचा लाभ अवश्य घेतला पाहिजे. जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहचवा.

तुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात

स्वामित्व योजना मराठी

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या

  1. ज्या वेळेस माझ्या मिसेस ची डिलीव्हरी झाली नी आम्ही डाँक्टर ला बोललो की आम्हाला आँपरेशन करावयाचे आहे त्या वेळेस आम्हाला तेथील डाँक्टर म्हणाले की किमान १ वर्षापर्यंत शस्रक्रिया नाही करु शकत.मग आता आम्ही काय करायचं.याच कारणामुळे माझा अर्ज निकालात काढला आहे .तरी मला सहकार्य करावे

    उत्तर द्याहटवा
  2. माझ्या मुलीचा जन्म 2007 सालचा आहे . त्यानंतर मला अपत्य झाले नाही . तसेच माझ्या पत्नीला कर्करोग झाल्यामुळे तिची नैसर्गिक पाळी येणे बंद झाले आहे . मी या योजने अंतर्गत लाभ घेऊ शकतो का?

    उत्तर द्याहटवा

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत.