पीएम किसान सन्मान निधी योजना 2021 Pm Kisan 8th Installment date Marathi

 

पीएम किसान सन्मान निधी योजना 2021 Pm Kisan 8th Installment date Marathi

PM Kisan Samman Nidhi 8th installment पीएम किसान सन्मान निधी योजना 2021 तुम्ही जर लाभार्थी असाल तर या योजनेचा आठवा हप्ता pm kisan 8th Installment date (pm kisan next installment date 2021) 2 मे, 2021 तारखेपर्यंत तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे.

पीएम किसान सन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता PM Kisan Samman Nidhi 8th installment एप्रिल महिना अर्ध्यापेक्षा जास्त उलटून गेला तरीही अद्याप  शेतकऱ्यांना प्राप्त झाला नाही आहे. देशातील 11 करोड 74 लाख शेतकरी आठव्या हप्ताच्या प्रतिक्षेत आहेत. शेतकऱ्यांची ही प्रतिक्षा एप्रिल महिन्याच्या शेवटी ते 2 मे, 2021 पर्यंत संपेल असे दिसत नाही. कारण राज्य शासनाने एप्रिल-जुलै च्या हप्ताला अजून मान्यता दिली नाही आहे.

Pm Kisan 8th Installment date | 8th installment of pm kisan date | पीएम किसान सन्मान निधी योजना | पीएम किसान बेनिफिट स्टेटस चेक

तुम्ही तुमच्या मोबाईलने देखील पीएम किसान सन्मान निधी योजनेचा आठव्या हप्ताचा स्टेटस पाहू शकता. त्यासाठी तुम्हाला पीएम किसान च्या वेबसाईटवर पहावं लागेल. जर तिथे Waiting for approval by state असा स्टेटस असेल तर त्याचा अर्थ राज्य शासनाने अद्याप हा हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा होण्यास मान्यता दिली नाही आहे. आणि जर तिथे Rft Signed by State Government असं स्टेटस दिसत असेल तर याचा अर्थ तुमची सर्व माहिती आणि यॆजनेचे निकष निकष पूर्ण आहेत आणि लवकरच तुमच्या बँक खात्यात हप्त्याचे पैसे जमा केले जातील. FTO म्हणजेच, Fund Transfer Order. याचा अर्थ शासनाने तुमची लाभार्थी पात्रता पडताळणी करून, तुमच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यासाठी आदेश दिले आहेत.


पीएम किसान सम्मान निधि 8th installment of pm kisan हप्त्यास उशीर का?

पीएम किसान सम्मान निधि योजनेच्या लाभार्थी यादी मध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचे आढळून आले. त्यामुळे राज्य सरकार ही योजना पात्र असलेल्या लाभार्थीला मिळत आहे काय याची खात्री करूनच संबधीत शेतकऱ्यांचा बँक खात्यात जमा करणार आहे. पीएम किसान सम्मान निधि योजनेच्या लाभार्थीयांची पडताळणी राज्य शासनाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक राज्यांनी RFT साइन केली नसल्याने, पीएम किसान सम्मान निधि आठवा 8th installment of pm kisan प्राप्त होण्यासाठी हप्त्यास उशीर होत आहे.

अशा प्रकारे पैसे ट्रान्सफर होतात खात्यात

पीएम किसान सम्मान निधि योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना ऑनलाईन किंवा ग्रामपंचायतीमध्ये अर्ज करावा लागतो, त्यानंतर ते अर्ज राज्य सरकार संबंधित शेतकऱ्यांची महसुलाची नोंद, आधार क्रमांक आणि बँक खाते क्रमांक पडताळणी केला जातो. राज्य सरकार आपल्या खात्याची पडताळणी करेपर्यंत पैसे येत नाहीत. राज्य सरकार पडताळणी करताच एफटीओ तयार होते, त्यानंतर केंद्र शासन ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करते.

Pm Kisan 8th Installment निधि रक्कम कधी जमापर्यंत होईल?

अद्यापही महाराष्ट्रसह अनेक राज्यांनी RFT साइन केली नाही आहे. RFT साइन केल्यानंतर केंद्र शासन FTO जनरेट करते. त्यानंतर, रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाते. FTO जनरेट झाल्यानंतर रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत राहील.


पीएम किसान सम्मान निधि योजनेचे 2021 नवीन नियम कोणते?

पीएम किसान सम्मान निधि योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आता नवीन शेतकर्‍यांना नोंदणी करतांना त्यांच्या जागेचा भूखंड क्रमांक अर्जात भरावा लागेल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या कुटुंबांचे नावे संयक्त जमीन आहे अशा कुटुंबांना त्यांच्या नावावर काही भाग जमीन घ्यावी लागेल.  तरच त्यांना लाभ घेता येईल. जर शेतकर्‍यांनी कोणतीही जमीन विकत घेतली असेल तर त्यांना कोणतीही अडचण येणार नाही.

हे देखील वाचा : पीएम किसान सम्मान निधि योजनेचे नवीन नियम

पीएम किसान बेनिफिट स्टेटस चेक:

१. पीएम किसान बेनिफिट स्टेटस चेक तपासणीसाठी pm kisan.nic.in या वेबसाईटवर जाऊन 'Beneficiary Status' निवडा किंवा वेबसाईटवर थेट जाण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा.

https://pmkisan.gov.in/BeneficiaryStatus.aspx

२. आधार कार्ड क्रमांक, खाते क्रमांक किंवा नोंदणी असेलेला तुमचा मोबाईल क्रमांक टाकायचा आहे.

३. त्यानंतर 'Get Data' या पर्यायावर क्लीक करा. तुमच्या एकूण हप्त्यांचे विवरण तुमच्या समोर दिसेल. 

सध्या देशात कोविड - १९ च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांना हा पीएम किसान सन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता Pm Kisan 8th Installment आर्थिक लाभासाठी दिलासादायक ठरेल एवढे मात्र नक्की. 

हे देखील वाचा : पीएम किसान सन्मान निधी योजना 2021 संपूर्ण माहिती

या पोस्ट तुम्हाला आवडू शकतात

ग्रामपंचायतीचे विसर्जन 

ग्रामपंचायतीचे नमुने १ ते ३३ (अभिलेख)

ग्रामपंचायत मासिक सभा नियम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या