पीएम किसान योजनेचे बदलले नियम ! | New rules for pm kisan yojana marathiPM किसान सन्मान निधी योजना

पीएम किसान योजनेचे बदलले नियम ! | New rules for pm kisan yojana in marathi केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर (Narendra Singh Tomar) यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्यांसाठी नवीन नियम लागू केले आहेत. या योजनेंतर्गत आतापर्यंत अनेक प्रकारच्या चुका समोर आल्या असून, योजनेसाठी अपात्र असलेले शेतकरी मोठया प्रमाणात या योजनेचा लाभ घेत आहेत. या कारणामुळे, यापुढे या योजनेचा लाभ घेण्यासाठी नियम अधिक कठोर करण्यात आले आहेत. अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना सुमारे २,३२६.८८ कोटी रुपये वितरित केले गेले आहेत. त्यामुळे सरकारची फसवणूक होत असल्याचे समोर आलं आहे. माध्यमातुन समोर आलेल्या वृत्तानुसार ही रक्कम शेतकऱ्यांकडून वसूल केली जाणार आहे. सरकार यापुढे लाभार्थीची अचूक पात्राता तपासूनच या (PM Kisan Samman Nidhi) योजनेअंतर्गत लाभ देण्यात येणार आहे. मात्र या नवीन नियमाचा परिणाम योजनेशी संबंधित जुन्या लाभार्थ्यांवर होणार नाही, असेही सरकारने म्हटले आहे.

पीएम किसान योजनेची अपात्र लाभार्थ्यांची आकडेवारी

सरकारी आकडेवारीनुसार १८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांपैकी तामिळनाडूने ३२१.३१ कोटीपैकी सर्वाधिक रक्कम १५८.५७ कोटी वसूल केली. त्यापाठोपाठ महाराष्ट्र २९९ कोटी पैकी ५७ कोटी रुपये वसूल झाले. आणि गुजरात २०१ कोटीपैकी ६.३० कोटी रुपये वसूल झाले अशी सरकारी आकडेवारी दर्शवते. अद्याप कोणतीही वसुली झाली नसलेल्या राज्यांपैकी सर्वाधिक १७१.४७ कोटी उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ ओडीसा ४.६८ कोटी वसूल करणे बाकी आहे. आतापर्यंत फक्त १०% रक्कम अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांच्या रक्कमेतुन वसूल झाली आहे असे नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितले.

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेसाठी कोणता नवीन बदल झाला आहे?

पंतप्रधान किसान सन्मान निधी (पीएम किसान सन्मान निधी योजना) याचा लाभ घेण्यासाठी आता नवीन शेतकर्‍यांना नोंदणी करतांना त्यांच्या जागेचा भूखंड क्रमांक अर्जात भरावा लागेल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या कुटुंबांचे नावे संयक्त (एकत्रित) जमीन आहे अशा कुटुंबांना त्यांच्या नावावर काही भाग जमीन घ्यावी लागेल.  तरच त्यांना लाभ घेता येईल. जर शेतकर्‍यांनी कोणतीही जमीन विकत घेतली असेल तर त्यांना कोणतीही अडचण येणार नाही.


प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही?

सरकारच्या या योजनेचा (पीएम किसान सन्मान निधी) नातेवाईकाच्या नावावर वडील आणि आजोबा जमीन जोपासणार्‍या शेतकर्‍यांना फायदा होणार नाही. म्हणजे जमीन शेतकर्‍याच्या नावे असावी. जर एखाद्या शेतकर्‍याने दुसर्‍या शेतकर्‍याची जमीन घेतली तर त्यालाही या योजनेचा लाभ मिळणार नाही. पंतप्रधान किसान सन्मान निधीचा लाभ घेण्यासाठी जमीन मालकीची असणे अत्यंत आवश्यक आहे. जर एखादा शेतकरी शासकीय पदावर असेल आणि त्याच्या नावे जमीन असेल आणि त्याने शेती केली तर त्यालाही या योजनेचा लाभ मिळणार नाही. जर एखादा शेतकरी या योजनेचा लाभ घेत असेल आणि त्या शेतकर्‍याचा मृत्यू झाला असेल तर या योजनेचा लाभ त्या शेतकर्‍याच्या पत्नी व मुलांना मिळेल.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना काय आहे?

पंतप्रधान किसान सन्मान निधी (pm-kisan) मोदी सरकारच्या महत्वाकांक्षी योजनांपैकी एक आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या बळकट व त्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट आहे. त्याअंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपये पुरवते. एका वर्षामध्ये तीन हप्त्यात हे सहा हजार रुपये देण्यात येतात. एक हप्ता ४ महिन्यांत येतो. प्रत्येक हप्त्यात २ हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतात.


पंतप्रधान किसान सन्मान निधीचा लाभ कोणाला मिळू शकेल?

पंतप्रधान किसान सन्मान निधी (पीएम-किसान योजना) याचा लाभ घेण्यासाठी योग्य लाभार्थ्याने ऑनलाईन अर्ज करावा लागेल. किंवा संबंधित ग्रामपंयातमध्ये अर्ज दाखल करता येतो. यावर आधारित राज्य सरकार महसूल नोंदी, आधार क्रमांक आणि बँक खाते क्रमांक पडताळणी करते. राज्य सरकार आपल्या खात्याची पडताळणी करेपर्यंत पैसे येत नाहीत. राज्य सरकार पडताळणी करताच फंड ट्रान्सफर ऑर्डर (एफटीओ) तयार होते, त्यानंतर केंद्र सरकार ही रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात जमा करते.

हे देखील वाचा: पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी असा करा ऑनलाईन अर्ज

किसान सन्मान योजनेअंतर्गत आतापर्यंत किती रक्कम वितरित झाली आहे?

नुकताच पंतप्रधान किसान सन्मान निधीचा सातवा हप्ता जाहीर करण्यात आला. केंद्र शासनाने या योजनेअंतर्गत  २५ डिसेंम्बर, २०२० पर्यंत देशात ९ कोटी शेतकऱ्यांना १८,००० कोटी रुपये थेट बँक खात्यामध्ये वितरीत करण्यात आले आहेत. 

किसान सन्मान निधी योजनेचा हेल्पलाइन नंबर काय आहे?

जर आपण या योजनेंतर्गत (पीएम किसान सन्मान निधी) नोंदणीकृत असाल आणि आपल्या खात्यात २००० रुपयांचा हप्ता येत नसेल तर आपण टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवू शकता. केंद्रीय कृषी मंत्रालयाने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक जाहीर केला आहे. शेतकरी पंतप्रधान-किसान हेल्पलाईनवर १५५२६१ (पीएम किसान हेल्पलाईन नंबर) किंवा टोल फ्री १८००-११५-५२६  नंबरवर कॉल करू शकतात. आपण ०११-२३३८१०९२ वर कृषी मंत्रालयाशी संपर्क साधू शकता.

माहिती संबंधित काही प्रश्न असल्यास खाली टिप्पणी करून कळवा किंवा 'संपर्क फॉर्म' भरुन 'माझा गाव' ला संपर्क करा.

तुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात

महाराष्ट्र शासन शरद पवार ग्रामसमृद्धी योजना 

• पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना संपुर्ण माहिती

• दिव्यांगांसाठीचा कायदा व योजना 


टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

  1. शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामपंचायत येणे बाकी दाखला कल्याणकारक असतो का त्या संदर्भात असलेले शासन निर्णयाच्या प्रती मिळाव्यात

    उत्तर द्याहटवा

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत.