पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना संपुर्ण माहिती

 

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना संपुर्ण माहिती,pm kisan yojana,पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा? | How to register pm kisan samman nidhi yojana | pm kisan samman nidhi yojana list

Pm kisan samman nidhi marathi | पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना संपुर्ण माहिती | How to register pm kisan samman nidhi yojana

पीएम किसान सम्मान निधि  योजनेबद्दल सविस्तरपणे माहिती पाहण्याअगोदर शेतकरी म्हणजेच ज्याला आपण अन्नदाता, बळीराजाही म्हणतो त्याच्याबद्दल थोडसं जाणून घेऊयात. थोडक्यात जो आपल्या जमिनीत काबाडकष्ट करून शेती करतो व ज्याच्या नावे सात -बारा आहे त्याला आपण शेतकरी म्हणतो. कृषि उत्पन्नाबाबत जगात भारताचा दुसरा क्रमांक लागतो तर चीन प्रथम क्रमांकावर आहे. भारतात जवळपास ७०% लोकं शेती करतात. देशाच्या एकूण उत्पन्नात शेती हा महत्वाचा घटक आहे. देशाची एकूण अर्थव्यवस्था शेती किंवा शेतीसमान उद्योगधंद्यावर अवलंबून आहे. त्यामुळेच भारताला कृषिप्रधान देश संबोधले जाते. 

कृषीप्रधान देशात शेतकऱ्याला निदान त्याच्या शेतमालाचा प्रामाणिक मोबदला तरी मिळायला हवा. मात्र देशात उलट चित्र दिसते. बाजारपेठेत शेतमालाच्या भावाची पंचाईत तर होतेच, शिवाय अतिवृष्टी, दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीठ यामुळे झालेलं नुकसान आणि पुन्हा ते नुकसान भरून काढण्यासाठी घेतलेलं कर्ज इत्यादीमध्ये होरपळून गेलेल्या शेतकऱ्याला आत्महत्ये शिवाय दुसरा पर्यायच दिसू नये? शेतकऱ्यांच्या मूळ समस्यांकडे दुर्लक्ष करून त्यांच्या हितासाठी कितीही योजना सुरू केल्या तरीही त्या व्यर्थच. अर्थातच हे माझं वैयक्तिक मत. असो ! पाहूयात पंतप्रधान किसान सम्मान निधी (Pm-Kisan) योजनेबद्दल सविस्तर माहिती.

पीएम किसान सम्मान निधि योजना काय आहे?

केंद्रशासनाने छोट्या व अल्पभूधारक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी व आर्थिक सहाय्य करण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना १ डिसेंबर, २०१८ पासून महाराष्ट्र राज्यात राबवण्यास सुरुवात केली. या योजनेअंतर्गत एकूण ६०००/- रुपयांचे आर्थक सहाय्य शेतकऱ्यांना देण्यात येते. ही रक्कम २०००/- रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये, वर्षाच्या प्रत्येक चार महिन्यानंतर थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होते.  सुरवातीला फक्त २ हेक्टर एवढी शेती असणाऱ्या कुटुंबाला वार्षिक ६०००/-  अर्थसहाय्य दिले जात होते, त्यानंतर त्यात बदल करून सरसकट सर्वच शेतकऱ्यांना योजनेचा लाभ देण्याचे निर्णय केंद्राकडून घेण्यात आला. योजनेचे निकष शिथिल केल्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांच्या संख्येत कमालीची वाढ होऊन, देशातील सर्वच शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरले. शेतकऱ्यांना चांगले जीवनमान उपलब्ध करुन देणे, स्वावलंबी व सक्षम बनविणे हे या योजनेमागील मुख्य उद्दिष्ट होय.

पीएम किसान योजनेचा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना घेता येणार नाही?

• शेतकरी केंद्र किंवा राज्यसनाचा अधिकारी, कर्मचारी किंवा इतर शासकीय सेवेत नसावा. 

 सेवानिवृत्त झालेल्यांची मासिक पेन्शन रुपये १०,०००/-  किंवा त्याच्या वर नसावी.

 आयकर (Income Tax) भरणारा शेतकरी पात्र नसेल.

 डॉक्टर, वकील, इंजिनिअर, चार्ट्ड अकाउंटंट, आर्किटेक इत्यादींना या योजनेचा लाभ घेता येत नाही.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अर्ज नोंदणी आवश्यक कागदपत्रे

 अर्जदाराच्या नावे शेतजमिनीचा सातबारा

 आधार कार्ड

 पॅन कार्ड

 मतदार ओळखपत्र

 मोबाईल नंबर (आधारकार्डशी लिंक केलेला असावा)

 बँक खाते पासबुक

 पासपोर्ट साईझ फोटो

पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा?

या योजनेसाठी लाभ घेण्यासाठी संबंधित ग्रामपंचायत, तहसीलदार कार्यालय किंवा CSC (कॉमन सर्व्हिस सेंटर)  मध्ये आवश्यक कागदपत्रांसह अर्ज दाखल करता येतो. किंवा ऑनलाईन पद्धतीने देखील अर्ज करता येतो. 

पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी असा करा ऑनलाईन अर्ज:

१. सर्वप्रथम www.pmkisan.gov.in या वेबसाईटवर लॉगिन करा. सर्वात वरच्या बाजूला 'मराठी' भाषेचा पर्याय निवडू शकता. 

२. त्यानंतर उजव्या बाजूला 'Formers Corner' हा पर्याय दिसेल. त्यामध्ये 'New farmer Registration' हा पर्याय निवडा.

३. त्यानंतर 'New Farmer Registration Form' म्हणून एक नवीन पेज उघडेल त्यात तुमचा आधार कार्ड नंबर आणि 'Capta Text' टाकुन 'Search' बटणवर क्लीक करा.

pm kisan beneficiary list maharashtra 2021

४. त्यांनतर तुम्हाला 'Record not found with given details ' असा मेसेज स्क्रीनवर येईल. म्हणजेच तुमच्या आधार क्रमांकाची या योजनेसाठी यापूर्वी नोंदणी झालेली नाही. त्यानंतर खाली असलेल्या 'Ok' या पर्यायावर क्लिक करा.

५. त्यानंतर पुन्हा तुम्हाला 'Record not found with given details. Do you want to register on PM-Kisan Portal?' असा मेसेज दिसेल. म्हणजेच तुम्ही नोंदवलेल्या आधार क्रमांकाचा कोणताही रेकॉर्ड आमच्याकडे जमा नाही, तुम्हाला PM-Kisan योजनेसाठी नाव नोंदवायचं आहे का? असा होतो. त्याखाली असलेल्या 'YES' या पर्यायावर क्लीक करा. 

६. त्यानंतर एक रेजिस्ट्रेशन फॉर्म तुमच्यासमोर उघडेल. यामध्ये शेतकऱ्याची वैयक्तिक माहिती भरून, राज्य ,जिल्हा, तालुका आणि गाव निवडायचं आहे. मग तुम्ही कोणत्या प्रवर्गात मोडता (जनरल, एससी, एसटी की इतर) ते निवडायचं आहे. इथे एक गोष्ट लक्षात घ्या. तुमच्या आधारकार्ड प्रेमाणेच जुळणारे नाव फॉर्म मध्ये  टाका. नावात एक जरी स्पेलिंग चुकलं तर तुमचा अर्ज नाकारला जाऊ शकतो. 

७. त्यानंतर 'Farmer Type' मध्ये शेतकऱ्याचा प्रकार निवडायचा आहे. म्हणजेच तुमच्याकडे 1 ते 2 हेक्टरदरम्यान शेती असेल तर तुम्हाला पहिल्या पर्यायावर क्लिक करायचं आहे, जास्त असेल तर 'Other' या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

८. पुढे तुम्हाला तुमच्या बँक खात्याची माहिती भरायची आहे. यामध्ये बँकेचा IFSC कोड टाकायचा आहे. हा कोड तुमच्या पासबुकवर दिलेला असतो. त्यानंतर बँकेचं नाव टाकून, खाते क्रमांक टाकायचा आहे.

९. त्यानंतर तुमचा पूर्ण पत्ता टाकून, 'Submit for Aadhar authentication' या पर्यायावर क्लिक करायचं आहे. या पर्यायावर क्लिक केलं, की 'Yes, Aadhar Authenticated Succesfully' असा लाल अक्षरात मेजेस तिथं येतो. याचा अर्थ तुमचं आधार वेरिफिकेशन यशस्वीरित्या पूर्ण झालं. 

१०. यानंतर 'Farmers other details' मध्ये शेतकऱ्याविषयीची इतर माहिती म्हणजे तुमचा  मोबाईल क्रमांक, जन्मतारीख आणि आई किंवा वडिलांचं नाव इ. लिहायचं आहे.


११. त्यानंतर 'Land Holding' मध्ये जमिनीच्या मालकीचा प्रकार सांगायचा आहे. यात स्वत: एकट्याच्या मालकीची जमीन असेल, तर 'Single' या पर्यायावर क्लिक करायचं आहे. आणि सामूहिक शेतजमीन असेल तर 'Joint' हा पर्याय निवडायचा आहे. 

१२. त्यानंतर 'Add' या पर्यायावर क्लिक करून शेतजमिनीची माहिती सांगायची आहे.यात तुम्हाला सर्व्हे किंवा खाता नंबरमध्ये सातबाऱ्यावरील आठ-अ चा जो खाते क्रमांक आहे, तो टाकायचा आहे. त्यानंतर खासरा किंवा डॅगमध्ये सातबाऱ्यावरील गट क्रमांक टाकायचा आहे आणि सगळ्यात शेवटी तुमच्याकडे किती शेतजमीन आहे, ते हेक्टरमध्ये लिहायचं आहे. सातबाऱ्यावर जितकी जमीन नोंदवलेली आहे, तो आकडा इथं टाकायचा आहे. हे टाकून 'Add'  बटन दाबलं की तुमच्या माहितीची तिथं नोंद केली जाते.

१३. ही सगळी माहिती भरून झाल्यानंतर ".... certify that all the given details are correct" याचा अर्थ मी दिलेली सगळी माहिती खरी आहे, या पर्यायासमोर टिक करायचं आहे

१४. त्यानंतर तुम्ही 'Self -Declaration Form' वर क्लिक करून तिथं दिलेली माहिती वाचू शकता. आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही सरकारी कर्मचारी, लोकप्रतिनिधी, कर भरणारे शेतकरी नाही याबद्दलची माहिती त्यात दिलेली असते. त्यानंतर शेवटी 'Save' या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

१५. त्यानंतर स्क्रीनवर एक मेसेज येईल. त्यावर लिहिलेलं असेल की, 'xxxxxxxx  हा तुमचा Identity Proof Number आहे आणि तुम्ही यशस्वीरित्या नोंदणी केली आहे'. पुढील मंजूरीसाठी ही माहिती राज्य सरकारकडे पाठवली जाईल. ही माहिती समाधानकारक असेल, तर योजनेसाठी तुमचा विचार केला जाईल, अन्यथा तुमचा अर्ज नाकारला जाईल.

एकदा फॉर्म भरून झाला की काही दिवसांच्या अंतरानं तुम्ही तुमच्या फॉर्मचं स्टेटस पाहू शकता. त्यासाठी वेबसाईटच्या मुख्य पेजवर फार्मर कॉर्नर मधील 'Status of self registered or csc farmer' या पर्यायावर क्लिक करून आधार क्रमांक आणि 'Captcha Text' टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्या फॉर्मचं स्टेटस चेक करू शकता. 

PM किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थी  यादी कशी पहावी?

१. लाभार्थी म्हणून ऑनलाईन नाव तपासण्यासाठी pm kisan samman nidhi yojana list https://pmkisan.gov.in या वेबसाईटवर जाऊन 'Beneficiary Status' हा पर्याय निवडा किंवा थेट जाण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा.

https://pmkisan.gov.in/Rpt_BeneficiaryStatus_pub.aspx

२. नवीन पेज उघडल्यावर आपले राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव निवडा.

३. एवढे केल्यानंतर 'Get Report' या पर्यायावर क्लीक करा. त्यानंतर तुमच्या गावातील या योजनेअंतर्गत संपूर्ण लाभार्थीची यादी पाहायला मिळेल ज्यात तुमचं नाव तपासा. 

मागील हप्त्याच्या यादीत तुमचं नाव होतं पण आताच्या यादीत तुमचं नाव नसेल तर किंवा इतर प्रधानमंत्री किसान सन्मान योजने संबंधित काही प्रश्न असतील तर खालील माध्यमातून तक्रार करू शकता.

पंतप्रधान किसान सन्मान निधी हेल्पलाईन नंबर:

शेतकरी कल्याण विभाग:

फोन: 91-11-23382401, 011-23381092 (थेट हेल्पलाईन)

ईमेल: pmkisan-hqrs@gov.in, pmkisan-ict@gov.in 

वरील लेखात आपण प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची संपूर्ण माहिती पाहिली. याव्यतिरिक्त तुमचे काही अधिक प्रश्न असतील तर संपर्क फॉर्म भरुन 'माझा गाव' ला संपर्क करा किंवा टिप्पणी करून कळवा आणि हा लेख आपणास आवडला तर इतरांसोबत नक्की शेअर करा.

तुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात

•  पीएम किसान योजनेचे नवीन नियम

•  महाराष्ट्र शासन शरद पवार ग्रामसमृद्धी योजना

•  ग्रामपंचायत - महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम - १९५८

•  गावचा सरपंच कसा असावा? | असा असावा आदर्श सरपंच

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या