शरद पवार ग्रामसमृद्धी योजना मराठी | Sharad Pawar Gram Samridhi Yojana In Marathi

शरद पवार ग्रामसमृद्धी योजना 2023

शरद पवार ग्रामसमृद्धी योजना माहिती | Sharad Pawar Gram Samridhi Yojana in marathi | gram samridhi yojana | ग्राम समृद्धि योजना | Sharad Pawar Gram Samridhi Yojana

शरद पवार ग्रामसमृद्धी योजना मराठी | Sharad Pawar Samridhi Yojana In Marathi महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या संयोजनातून राज्यात शरद पवार ग्रामसमृद्धी Gram Samridhi Yojana योजना राबविण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतून घेण्यात आला होता. महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते शरद पवार यांनी १२ डिसेंम्बर, २०२० रोजी वयाची ऐंशी वर्षे पूर्ण  केली त्यानिमित्ताने राज्य शासनाने त्यांच्या नावे ही योजना सुरू करून त्यांचा गौरव केला आहे.

सन २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करून प्रत्येक ग्रामपंचायत व त्या ग्रामपंचायतीतील घटक गावे समृद्ध होतील हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ही योजना राबविण्यात आली आहे. ‘मी समृद्ध तर गाव समृद्ध आणि गाव समृद्ध तर माझा महाराष्ट्र समृद्ध’ या ध्येयासाठी  शेतकऱ्यांच्या वैयक्तिक लाभाच्या चार  योजना यात राबविण्यात आल्या आहेत. दिनांक ३ फेब्रुवारी, २०२१ पासून ही योजना राज्यभरात राबविण्यात यावी असे शासनाकडून आदेश देण्यात आले आहेत.

काय आहे 'शरद पवार ग्रामसमृद्धी योजना' ?

या योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थीला:

१. गाय व म्हैस पक्का गोठा बांधणे

२. शेळी/मेंढी पालन शेड बांधणे

३. कुक्कुटपालन शेड बांधणे 

३. भूसंजीवनी नाडेप कंपोस्टींग 

वरीलप्रमाणे चार वैयक्तिक कामांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यात येईल.

१. गाय व म्हैस पक्का गोठा 

जुन्या मातीच्या आणि पडीक झालेल्या गोठ्यात गाई आणि म्हशींची कास निकामी होऊन शरीरावर खालच्या बाजूस जखमा होतात. याठिकाणी मौल्यवान मूत्र व शेण साठवता न आल्याने वाया जाते. यासाठी या ठिकाणी चारा आणि खाद्यासाठी चांगली गव्हाण बांधणे तसेच मूत्र संचय टाके बांधण्यात येतील. एका गोठ्यासाठी ७७ हजार १८८ रुपये खर्च येईल. यासाठी ६ गुरांची पुर्वीची तरतूद रद्द करून २ गुरे ते ६ गुरे या करिता एक गोठा व त्यानंतर अधिक गुरांसाठी ६ च्या पटीत म्हणजे १२ गुरांसाठी दुप्पट आणि १८ गुरांपेक्षा जास्त गुरांसाठी ३ पट अनुदान देय राहील.


२. शेळी/मेंढी पालन शेड बांधणे:

शेळ्यांमेढ्यांकरिता चांगल्या प्रतीचे शेड बांधून दिल्यास या जनावरांचे आरोग्य देखील चांगले राहणार असून वाया जाणारे मल, मूत्र शेतीमध्ये उत्कृष्ट सेंद्रीय खत म्हणून वापरले जाऊ शकेल. शेळी ही गरीबांची गाय समजली जाते. शासनाचे अनुदान न मिळाल्यास एका भूमीहिन शेतकऱ्याला स्वत:च्या पैशातून १० शेळ्या विकत घेणेही शक्य होत नाही. १० शेळ्यांचा गट हा शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे ग्राह्य धरला जातो, पण कमी शेळ्या असतील तर शेतमजुराला त्याचा फायदा होत नाही. ही बाब लक्षात घेता किमान २ शेळ्या असलेल्या भूमीहिन मजुरांना व शेतकऱ्यांना देखील या योजनेचा लाभ घेता येईल. एका शेडसाठी ४९ हजार २८४ रुपये खर्च येतो. हे शेड सिमेंट व विटा व लोखंडी तुळ्यांच्या आधाराने बांधण्यात येईल. एका कुटुंबास जास्तीत जास्त ३० शेळ्यांकरिता ३ पट अनुदान मंजुर करण्यात येईल.

३. कुक्कुटपालन शेड बांधणे:

ग्रामीण भागात कुटुंबांना शेतीसोबतच जोडधंदा म्हणून कुक्कुटपालनामुळे शेतकऱ्यांना अधिक उत्पन्नाला हातभार लागतो. मात्र, निवारा चांगला नसल्याने कुक्कुटपक्षांचे आरोग्य नेहमीच खालावलेले असते. चांगल्या निवाऱ्यामुळे रात्रीच्यावेळी त्यांचे, पिल्लांचे आणि अंड्यांचे प्राण्यांपासून संरक्षण होते. प्रत्येक शेडला ४९ हजार ७६० रुपये खर्च अपेक्षित आहे. १०० पक्षी यशस्वीरित्या सांभाळणाऱ्या लाभार्थींनी पक्षांची संख्या १५० च्या वर नेल्यास मोठ्या शेडसाठी दुप्पट निधी उपलब्ध करून देण्यात येईल.

४. भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंग:

शेतातील कचऱ्यावर कंपोस्टिंगद्धारे प्रक्रिया केल्यास जमिनीच्या आरोग्यात सुधारणा होऊन कृषी उत्पादनात भर पडते. सेंद्रिय पदार्थात सूक्ष्म जीवांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते. त्याचा फायदा जमिनीला होतो. याकरिता शेतात एक नाडेप बांधण्यासाठी ही योजना आहे. या नाडेपमध्ये सेंद्रिय पदार्थ, कचरा, शेणमाती आणि मातीचे एकावर एक थर रचले जातात. २ ते ३ महिन्यात काळपट तपकीरी भूसभुशीत, मऊ, दुर्गंधी विरहित कंपोस्ट तयार होते. या नाडेपच्या बांधकामासाठी १० हजार ५३७ रुपये खर्च अपेक्षित आहे. तो निधी उपलब्ध केला जाईल.


स्वत:ची जमीन आणि इतर आवश्यक कागदपत्र असलेले लाभार्थी Gram Samrudhi Yojana यासाठी पात्र असतील. राज्य शासन वरील प्रकारची कामे करुन राज्यातील १०० टक्के कुटुंबाना समृध्द करणार आहे. यात कृषी व पशुसंवर्धन विभागाची विशेष मदत लागणार आहे. या विभागांनी जिल्हा व तालुका प्रशासनाला स्वत: पुढाकार घेऊन मदत करणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात प्रत्येक गावात किमान लाभार्थ्यास लखपती करुन बघणार आहेत. याचा पाठपुरावा मोबाईल ॲपच्या माध्यमातून करण्यात येईल. 

योजनेचा लाभ घेणाऱ्या इच्छुक व्यक्तींनी आपल्या ग्रामपंचायत / पंचायत समिती मधून शरद पवार ग्राम समृध्दी योजनेचा खालील अर्ज घेऊन त्यामध्ये आवश्यक ती माहिती भरून, तसेच आवश्यकत्या कागदपत्राची झेरॉक्स प्रत जोडून ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती मध्ये जमा करावा.

३ फेब्रुवारी, २०२१ च्या शासन रोजगार हमी विभागाच्या शासन निर्णयानुसार सुरु करण्यात आलेल्या शरद पवार ग्रामसमृद्धी योजना ही 'मी समृद्ध, माझे गाव समृद्ध आणि माझा महाराष्ट्र समृद्ध' या तत्वावर राबविण्यात येत आहे. ही योजना महाराष्ट्र राज्यात १२ डिसेंबर, २०२० पासून राज्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आली. शेतकऱ्यांना समृध्द बनवून ग्रामीण भागांचा विकास साधणे हा शरद पवार ग्रामसमृद्धी योजना २०२३ चा मुख्य उद्देश आहे. आता केवळ सध्या ऑफलाईन माध्यमातून महाराष्ट्र्र शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

शरद पवार ग्राम समृद्धी योजना pdf:

शरद पवार ग्राम समृध्दी योजना नमुना अर्ज pdf येथून डाऊनलोड करा - Download 

शरद पवार ग्राम समृध्दी योजनेचा शासन निर्णय pdf येथून डाऊनलोड करा- Download 

वरील लेख आवडला असेल तर तो आपल्या सर्व मित्रांना आणि शेतकरी बंधूंना सामायिक करा. माहितीसंबंधित काही प्रश्न असल्यास, खाली टिप्पणी करून नक्की कळवा.


तुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात

•  पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना संपुर्ण माहिती | लाभ घेण्यासाठी असा करा ऑनलाईन अर्ज

•  शासन पुरस्कृत योजनेसह कोकणात सुरु करा हे १० फायदेशीर व्यवसाय  । व्यवसाय मार्गदर्शन

•  ग्रामपंचायतीला एका वर्षात किती निधी मिळतो?

•  गावचा सरपंच कसा असावा? | असा असावा आदर्श सरपंच 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या