Abdul Kalam Yojana for 10th Pass Students भारतीय राज्यघटनेत विद्यार्थ्यांना अनेक शैक्षणिक अधिकार दिलेले आहेत. शालेय शिक्षणामुळे विद्यार्थी त्यांची वैयक्तीक आणि सामाजिक प्रगती करून ते एक जबादार नागरिक बनत असतात. वैदिक काळापासून ते अगदी आजही भारत देश शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे. स्वातंत्र्यापासून ते आता २१ व्या शतकापर्यंत भारताने शैक्षणिक क्षेत्रात बरीच प्रगती केली आहे.
अनेक शासकीय शिष्यवृत्ती किंवा आर्थिक सहाय्य योजनांमधून विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्वल भविष्यासाठी आर्थिक सहाय्य केले जाते. यातून भारत आपल्या नागरिकांना मूलभूत शिक्षण देण्यासाठी वचनबद्ध आहे हे सिद्ध होते. आज आपण अशाच एका विद्यार्थी शैक्षणिक अर्थसहाय्य योजनेबाबत सविस्तर माहिती पाहणार आहोत.
महाराष्ट्र राज्यातील पुणे महानगरपालिका हद्दीत राहणाऱ्या इयत्ता १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी डॉ अब्दुल कलाम शैक्षणिक अर्थसहाय्य योजनेअंतर्गत आणि इयत्ता १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शैक्षणिक अर्थसहाय्य योजनेअंतर्गत शिक्षणासाठी अर्थसहाय्य दिले जाते. एका शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांचे जास्त अर्ज आल्यास पुणे महानगरपालिकेने डॉ अब्दुल कलाम योजनेसाठी अर्जदारांना समान रक्कम किंवा जास्तीत जास्त रक्कम रु. १५,०००/- अर्थसहाय्य दिले जाईल. पात्र विद्यार्थ्यांनी नमूद योजनेचा लाभ मिळविण्यासाठी इयत्ता १० वी व इयत्ता १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी योजनेअंतर्गत खालील नियम व अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे.
अब्दुल कलाम शैक्षणिक अर्थसहाय्य योजना पात्रता व निकष:
गुणवत्ता निकष:
• इयत्ता दहावीच्या किंवा १२ वी परीक्षेत किमान ८०% गुण असणे आवश्यक आहे.
• मागासवर्गीय गटातील किंवा रात्र शाळेतील विद्यार्थ्यांना ७०% गुण असणे आवश्यक राहील.
• ४०% किंवा त्यावरील अपंगत्व असणाऱ्या विद्यार्थांना तसेच कचरावेचक व बायोगेस प्रकल्पावर काम करणाऱ्या तसेच कचऱ्याच्या संबंधित काम करणाऱ्या सर्व कष्टकरी कामगारांच्या मुलांना ६५% गुण असणे आवश्यक आहे.
इतर निकष:
• विद्यार्थीची १० वी / १२ वी उत्तीर्ण झालेली शाळा पुणे महानगर पालिकेच्या हद्दीत असावी.
• दिनांक ०१/०५/२००१ नंतर जन्मलेला कुटुंबातील अपत्यांची संख्या २ पेक्षा जास्त नसावी.
• १० वी/१२ वी नंतर शासनमान्य विद्यापीठाकडून मान्यता मिळालेल्या संस्थेत प्रवेश घेतलेल्या पुणे महानगर पालिकेच्या कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांनाच या योजनेचा लाभ मिळविण्यास पात्र ठरतील.
• योजनचा अर्ज करण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या dbt.pmc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरून केवळ विद्यार्थ्यांच्या पालकांनी हा अर्ज करणे अनिवार्य आहे.
• अर्ज केवळ ऑनलाईन पद्धतीनेच करणे आवश्यक आहे.
• सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे राष्ट्रीयकृत बँकेत ICICI Bank/HDFC/Axis/Cosmos/Saraswat याच बँकेत खाते असणे आवश्यक आहे.
अब्दुल कलाम शैक्षणिक अर्थसहाय्य योजना आवश्यक कागदपत्रे:
१. मार्कलिस्ट
२. शाळा सोडल्याचा दाखला
३. रहिवासी पुरावा
४. शाळा/कॉलेज प्रवेश फी पावती
५. जातीचा दाखला (मागासवर्गीय गटातील असल्यास)
६. अपंगत्वाचा दाखला (अपंग असल्यास)
७. आधार कार्ड व पण कार्ड
८. बँक खाते पासबुक झेरॉक्स
रेशनिंग कार्डची साक्षांकित प्रत अपत्य पडताळणीसाठी जोडणे आवश्यक आहे. रहिवासी दाखला पुरावा म्हणून कुटुंबाचे पुणे महानगरपालिका हद्दीत किमान ३ वर्षे वास्तव असल्याचा दाखला म्हणून मनपा टॅक्स पावती/लाईट बिल/टेलिफोन बिल/भाडे करारनामा इत्यादी कागदपत्रे ग्राह्य धरले जातात.
अब्दुल कलाम स्कॉलरशिप योजना ऑनलाईन अर्ज पद्धती:
१. हा अर्ज पालकांच्या नावे भरणे अनिवार्य आहे.
२. सर्वप्रथम पुणे महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर dbtpmc.gov.in नोंदणी (Registration) करा. नोंदणी करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा - https://dbt.pmc.gov.in/app/index.html#!/citizen_registration
३. संकेतस्थळावर नोंदणी केल्यावर यूजर नेम आणि पासवर्ड टाकून लॉगिन व्हा.
४. लॉगिन झाल्यानंतर, 'माझे अर्ज' या पर्यायामध्ये, 'योजनेसाठी अर्ज करा' हा पर्याय निवडा.
५. विभागामध्ये 'समाज विकास विभाग' हा पर्याय निवडा.
६. त्यानंतर समोर काही प्रश्न असतील, त्यांची योग्य पर्याय निवडा.
७. यानंतर, योजना निवडा मध्ये मागासवर्गीय गटातील अर्जदारांनी 'कल्याणकारी योजना' हा पर्याय निवडावा. तसेच, खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यांनी 'युवक कल्याणकारी योजना' हा पर्याय निवडावा.
८. त्यानंतर, हमीपत्र डाऊनलोड करून, त्याची प्रिंट काढून ते भरून ठेवा.
९. पुढे, पालकांची (अर्जदाराची) वैयक्तिक माहिती व बँकेचा तपशील भरा.
१०. आता, विचारलेली कागदपत्रे अपलोड करा आणि सादर बटणावर क्लिक करा.
याप्रकारे, तुमचा अर्ज संबंधित विभागात सादर झाला आहे. हा फॉर्म 'माझे अर्ज' या पर्यायामध्ये दिसेल.
अब्दुल कलाम अर्थसहाय्य योजना ऑनलाईन अर्ज भरताना घ्यावयाची काळजी:
• आवश्यक असलेल्या कागदपत्रांची झेरॉक्स प्रत अपलोड न करता मूळ कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावेत. झेरॉक्स प्रती अपलोड केल्यास अर्ज बाद करण्यात येतो.
• http://dbtpmc.gov.in या संकेतस्थळावर दिलेले हमीपत्र पालक आणि आणि महाविद्यालयानी भरल्यानंतरच हमीपत्र अपलोड करणे आवश्यक आहे.
• लाभार्थी विद्यार्थी जर CBSC/ICSE शाळेतून उत्तीर्ण झाला असल्यास शाळा/महाविद्यालयाकडून टक्केवारी प्रमाण पत्र जोडणे आवश्यक आहे.
• शैक्षणिक अर्थसहाय्यासाठी राष्ट्रीयकृत बँंकेचे खाते असणे आवश्यक आहे.
• अर्जदाराने केलेला अर्ज अपूर्ण किंवा अटी नियमांची पूर्तता केली नसल्यास अर्ज रद्द करण्यात येतो.
• अर्जदाराने ऑनलाईन पद्धतीने भरलेला अर्ज हा Save As Draft मध्ये ठेवला किंवा सादर (Submit) नाही केल्यास अर्जाचा ची पुढील प्रक्रिया होत नाही. त्यामुळे अर्ज भरल्यानंतर 'Submit' करावा.
अर्जदाराने अर्ज सादर (Submit) केल्यानंतर अर्जाबाबतची सद्यस्थिती वेळोवेळी तपासत राहावी.
केलेल्या अर्जासंबंधीत अधिक माहिती हवी असल्यास पुणे महानगरपालिकेच्या संबंधित क्षेत्रिय कार्यालयामध्ये असलेल्या समाज विकास विभागाकडील कर्मचार्यांकडे संपर्क साधाता येतो. उपलब्ध आर्थिक तरतूद व नियम अटींचा विचार करून अर्ज नाकारण्याचा किंवा स्वीकारण्याचा अधिकार मा. मुख्य समाज विकास अधिकारी, स.वि.वि. पुणे महानगरपालिका यांचेकडे असतो. तसेच त्यांचा योजनेबाबतचा निर्णय अंतिम असतो. अब्दुल कलाम स्कॉलरशिप योजनेबाबत संपुर्ण माहिती व अटी व शर्ती पुणे महानगरपालिकेच्या dbtpmc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
योजनेच्या अधिक माहितीसाठी संपर्क क्र. १८००१०३०२२२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.
या पोस्ट देखील तुम्हाला आवडू शकतात
१० वी/ १२ वी नंतर करण्याजोगे कोर्सेस
0 टिप्पण्या
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत.