बी फार्मसी म्हणजे काय? B Pharmacy Course Information in Marathi

B Pharmacy Course Information in Marathi अन्न वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत त्यामध्ये 'आरोग्य' ही आणखी एक महत्त्वपूर्ण गरज आहे. आरोग्याशी संदर्भात सेवांमध्ये औषधनिर्मिती आणि औषधपुरवठा या खूप महत्वपूर्ण असतात आणि या सेवा पुरवण्याचे काम फार्मासिस्ट करतो. आत्तापर्यंत तुमचा कधी न कधीतरी फार्मासिस्टशी संबंध आला असेलच अगदी डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे खरेदी करण्यापासून ते शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या गरजांपर्यंत.

B Pharmacy Course Information in Marathi | बी फार्मसी विषयी माहिती | बी फार्मसी नंतर काय करावे | बी फार्मसी म्हणजे काय | b pharmacy admission | b pharmacy eligibility | b pharmacy course fees | b pharmacy course details marathi | b pharmacy course duration

डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधयोजनेनुसार (प्रिस्क्रिप्शननुसार) औषध वितरित (डिस्पेन्स) करणं एवढीच काय ती लोकांना फार्मासिस्टची ओळख असते. दुसऱ्या शब्दात 'एक औषधवाला' अशीच प्रतिमा लोकांच्या मनात निर्माण होते. त्याच्या पलीकडेही फार्मासिस्टची अनेक कर्तव्ये, पैलू असतात. फार्मासिस्टच्या अशा अनेक पैलूंबाबत आपल्या समाजामध्ये जागरूकता नाही ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे.

चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे फार्मासिस्ट. बी फार्मासी हा कोर्स करण्यासाठी पात्रता, अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया, करियर संधी इत्यादी माहिती सदर लेखामध्ये आपण पाहणार आहोत. (B Pharmacy Course Details Marathi).

बी फार्मसी म्हणजे काय?


फार्मसीला मराठीमध्ये औषधनिर्माण शास्त्र असे म्हणतात. B Pharm 'Bachelor of Pharmacy' ही ४ वर्षाची (B Pharmacy Course Duration)  डिग्री आहे. म्हणजेच, बी फार्मसी हा Under Graduate कोर्स आहे. जो १२ वी विज्ञान शाखेनंतर करता येऊ शकतो. या कोर्समध्ये औषध उत्पादन आणि कोणत्या आजारावर कोणते औषध द्यावे हे शिकवले जाते. बी फार्मसी हा कोर्स केल्यानंतर स्वतःचा मेडिकल स्टोअर काढता येऊ शकतो. एखाद्या नामांकित फार्मा कंपनीत काम करता येऊ शकते. बी फार्मसी हा कोर्स केल्यानंतर तुम्ही वैद्यकीय क्षेत्रात सहज करिअर करू शकता. (What is B Pharmacy Course).

B Pharmacy बी फार्मसी पात्रता (B Pharmacy Eligibility):

• बी फार्मसी कोर्स करण्यासाठी सायन्स शाखेमधून १२ वी पूर्ण केलंल असणं गरजेचं आहे.

• १२ वी मध्ये PCB (Physics, Chemistry, Biology) आणि PCM (Physics, Chemistry, Mathematics) यापैकी कोणताही ग्रुप असेल तरीही चालेल. मात्र Biology विषय असणं अधिक चांगले.

• १२ वी मध्ये विद्यार्थ्यांना किमान ५०% टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे.

• जे विद्यार्थी डिप्लोमा इन फार्मसी म्हणजेच डी फार्मसी (D Pharmacy) केलेले आहे ते विद्यार्थी देखील हा कोर्स करण्यास पात्र असतात.

• राखीव प्रवर्गांच्या बाबतीत (SC/ST/OBC) किमान गुणांच्या आवश्यकतेमध्ये 5% पर्यंत सूट दिली जाते. (B Pharmacy Eligibility).

बी फार्मसी आणि डी फार्मसी यामधील फरक?

बी फार्मसी आणि डी फार्मसी या दोन्ही कोर्समध्ये मोठा फरक आहे. बी फार्मसी हा डिग्री कोर्स आहे. यामध्ये आठ सेमिस्टर असतात. तर डी (D  Pharmacy) फार्मसी हा दोन वर्षाचा डिग्री कोर्स आहे. 

बी फार्मसी प्रवेश प्रक्रिया-

तर प्रत्येक विद्यार्थी मित्राला हा प्रश्न पडलेला असतो की बी फार्मसी ला ऍडमिशन कशी मिळवायची? बी फार्मसी ला ऍडमिशन मिळवायची असेल तर महाराष्ट्र सेल मार्फत परीक्षा घेतली जाते ती म्हणजे Entrance Based Admission महाराष्ट्र सीईटी (MHCET) ही परीक्षा उत्तीर्ण होणं गरजेचं असतं. विद्यार्थ्यांना प्रवेश बारावीच्या गुणावरून मिळतो. (B Pharmacy Admission).

बी फार्मसी कोर्स फी -


बी फार्मसी हा कोर्स करण्यासाठीची फी विविध घटकांवर अवलंबून असते. सर्वसाधारणपणे बी फार्म हा कोर्सची फी ५०,०००/- ते २,००,०००० प्रतिवर्षी एवढी असते. याची फी तुम्ही कोणत्या कॉलेजमध्ये प्रवेश घेत यांवर देखील अवलंबून असते. विद्यार्थ्यांना वसतिगृह, ग्रंथालय, प्रयोगशाळा इत्यादी सारख्या विविध सुविधांसाठी अधिक शुल्क देखील भरावे लागू शकते. (B Pharmacy Course Fees).

बी फार्मसी नोकरीची संधी-

बी फार्मसी हा कोर्स केल्यानंतर स्वतःचा मेडिकल स्टोअर सुरु करता येऊ शकतो एखाद्या नामांकित फार्मा कंपनीत नोकरी करता येऊ शकते. याशिवाय कोणत्याही कॉलेज मध्ये शिक्षण म्हणून काम करू शकता. बी फार्मसी हा कोर्स केल्यानंतर फार्मासिस्ट, फार्मास्युटिकल सायंटिस्ट, रेग्युलेटरी अफेयर्स प्रोफेशनल, वैद्यकीय लेखक इत्यादी पदावर कार्यरत होऊ शकता.

बी फार्मसी कोर्स अभ्यासक्रम B Pharma Course Syllabus

बी फार्मा हा कोर्स चार वर्षांचा आहे. आणि हा कोर्स 8 सेमिस्टरमध्ये विभागलेला आहे. म्हणूनच तुम्हाला 8 सेमिस्टरची परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल. बी फार्मा कोर्सचा अभ्यासक्रम खालीलप्रमाणे- 

B Pharma Syllabus 1st Year

• Human Anatomy And Physiology

• Pharmaceutical Inorganic Chemistry

• Pharmaceutical Organic Chemistry

• Computer Applications In Pharmacy

• Pharmacy

• Remedial Maths

• Biochemistry

• Pathophysiology

• Environmental Science

• Pharmaceutical Analysis

• Therapeutic Biology


B Pharma Syllabus 2nd Year

• Pharmacology

• Physical Medicine

• Medicinal Chemistry

• Pharmaceutical Microbiology

• Pharmaceutical Engineering

• Pharmaceutical Organic Chemistry

• Pharmacognosy And Phytochemistry


B Pharma Syllabus 3rd Year

• Pharmacology

• Medicinal Chemistry

• Industrial Pharmacy

• Medicinal Chemistry

• Herbals Drug Technology

• Pharmaceutical Jurisprudence

• Pharmaceutical Biotechnology


B Pharma Syllabus 4th Year

• Quality Control And Standardization Of Herbs

• Cosmetic Experimental Pharmacology

• Dietary Supplements And Nutraceuticals

• Industrial Pharmacy

• Novel Drug Delivery Systems

• Instrumental Methods Of Analysis

• Pharmacy Practice

• Computer Aided Drug Design

• Pharmacovigilance

• Practical Training

• Project Work

• Cell And Molecular Biology

• Advanced Instrumentation Techniques

• Pharmaceutical Regulatory Science

• Social And Preventive Pharmacy

• Biostatistics And Research Methodology

बी फार्मसी पगार-

फार्मसी कोर्स पूर्ण केल्यानंतर मिळणारा पगार हा तुम्ही कोणत्या सेक्टर मध्ये काम करणार आहात यावर अवलंबून असतो. जसे की, कोअर फार्मा सेक्टर, आयटी सेक्टर, अकॅडमिक सेक्टर इत्यादी. याचबरोबर कंपनी, इंडस्ट्री कोणती आहे यावर देखील पगार अवलंबून असतो. सुरवातीला कोणत्याही कंपनी मध्ये अनुभव नसल्याने पगार कमी मिळतो. मात्र, जसा जसा अनुभव वाढत जातो तशी पगारामध्ये देखील वाढ होत असते. 

बी फार्मसी नंतर काय करावे?

१२ वी विज्ञान शाखेनंतर ज्या व्यक्तीने औषधनिर्माणशास्त्र (फार्मसी) मध्ये पदविका (डिप्लोमा D Pharm) किंवा पदवी (Bachelor of Pharmacy) पूर्ण केले आहे ती व्यक्ती फार्मासिस्ट असते. १२ वी नंतर डिप्लोमा २ वर्षांचा तर डिग्री ४ वर्षांची असते. पदवीनंतर M. Pharm , MBA , PhD अशा उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध आहेत. याशिवाय १२ वी नंतर Pharm D डॉक्टरेट ऑफ फार्मसी हा ६ वर्षांचा अभ्यासक्रम असतो. (B Pharmacy Course Information in Marathi).

या पोस्ट देखील तुम्हाला आवडू शकतात

डीएमएलटी (DMLT) कोर्स माहिती मराठी 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या