Chandrayaan 3 Information in Marathi चंद्रयान ३ ही भारताची तिसरी चंद्रशोध मोहीम आहे. ही मोहीम इस्रो (ISRO-Indian Space Research Organisation) म्हणजेच, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने सुरु केली. यापूर्वी चंद्रयान २ मोहिम अयशस्वी झाली तेव्हा इस्रोने चंद्रयान ३ मोहिम सुरु केली. चंद्रयान ३ चे प्रक्षेपण १४ जुलै, २०२३ रोजी चेन्नई पासून अंदाजे ८० किमी अंतरावर श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून दुपारी २.३५ मिनिटांनी करण्यात आले होते. हे चंद्रयान २३ ऑगस्ट, २०२३ रोजी संध्याकाळी ठीक ६:०४ मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले आणि भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे सॉफ्ट लँडिंग करणारा पहिला देश बनला. (Chandrayaan Nibandh Marathi).
चंद्रयान ३ मोहिमेमध्ये ऑर्बिटर, लँडर आणि रोव्हर यांचा समावेश आहे. चंद्रयान ३ च्या लँडरचे नाव 'विक्रम' आणि रोव्हरचे नाव 'प्रज्ञान' आहे. या प्रकल्पाची किंमत अंदाजे ६१५ कोटी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्या स्थानावर चंद्रयान ३ चे मून लँडर उतरले त्या पॉइंटला शिवशक्ती हे नाव दिले.
चांद्रयान - ३ ची सविस्तर माहिती पाहण्यापूर्वी आपण चंद्रयान १ आणि चंद्रयान २ मोहिमेची थोडक्यात माहिती पाहुयात. (Chandrayaan all Information in Marathi).
चंद्रयान 1 माहिती मराठी (2008)
चंद्रयान १ भारताची पहिली चंद्र शोधमोहीम होती जी इस्रो कडून २२, ऑक्टोबर २००८ मध्ये लॉन्च केली गेली होती. या अंतराळयानाध्ये एकूण ११ तांत्रिक उपकरणे होती. ज्यामध्ये 'एम्पक्ट प्रोब' नावाचे उपकरण होते जे चंद्राच्या पृष्ठभागाचे दूरस्थ संवेदन (Remote Sensing) म्हणजेच हालचाली टिपणायचे काम करते. चंद्रयान १ द्वारे चंद्राच्या पृष्ठभागावर पाण्याच्या अणूंचे पुरावे मिळाले. दुर्दैवाने चंद्रयान १ चा ऑगस्ट २००९ मध्ये संपर्क तुटला. त्यानंतर ही मोहीम सप्टेंबर २००९ मध्ये संपुष्टात आली म्हणून घोषित करण्यात आली. (Chandrayaan-1 Launch Date).
चंद्रयान 2 माहिती मराठी (2019)
दिनांक २२ जुलै, २०१९ मध्ये लॉन्च केलेले चंद्रयान - २ भारताची दुसरी चंद्रमोहीम होती. चंद्रयान -१ मुख्यतः एक ऑर्बिटर होता. परंतु, चंद्रयान २ ला तीन घटकांनी बनविण्यात आले होते. ते तीन घटक म्हणजे ऑर्बिटर, लँडर 'विक्रम' आणि रोव्हर 'प्रज्ञान'. चंद्राच्या दक्षिण ध्रुव क्षेत्रामध्ये अभ्यास आणि तेथील खनिज विज्ञानावर संशोधन करणे हे चंद्रयान २ चे मुख्य लक्ष्य होते.
चंद्रयान २ मध्ये, विक्रम लँडरला लँड होताना अनेक तांत्रिक गोष्टींना सामोरे जावे लागले आणि त्याचा संपर्क तुटला. परंतु, ऑर्बिटर ने मात्र मूल्यवान डेटा पाठवणे सुरु ठेवले होते. परिणामी रोव्हर प्रज्ञानच्या योजनेनुसार त्याला चंद्राच्या पृष्ठभागावर स्थापित करता आले नाही.
चंद्रयान २ मोहिमेत, विक्रम लँडर जेव्हा चंद्रापासून केवळ २.१ किलोमीटर दूर होता. त्यावेळी पृथ्वीपासून त्याचा संपर्क तुटला आणि आपल्या मोहिमेच्या शेवटच्या टप्प्यावर अयशस्वी झाला. परंतु, या मोहमेच्या निष्फळतेचा अर्थ हा होत नाही की, भारत चंद्रावर यान उतरविण्यासाठी निष्फळ झाला म्हणून यापुढील सर्व मार्ग बंद झाले. उलटपक्षी या अयशस्वी मोहिमेमुळे आपल्या वैज्ञानिकांना ही गोष्ट कळली की कोण-कोणत्या तांत्रिक गोष्टींमध्ये बदल करायला पाहिजेत. चंद्रयान २ च्या हा मोहिमेचा उपयोग चंद्रयान ३ मध्ये कसा उपयोग झाला ते आपण पुढे पाहुयात. (Essay on Chandrayaan 3 in Marathi).
चंद्रयान 3 माहिती मराठी (2023)
चंद्रयान-३ मिशन अत्यंत महत्वाचे आहे. यामुळे, वैज्ञानिकांना पृथ्वी-चंद्र आणि सौरमंडळ यांची निर्मिती कशी झाली? पृथ्वीचा इतिहास काय आहे? आणि भविष्यातील त्यांची भूमिका काय असेल? चंद्राची गतिशीलता इत्यादी गोष्टी समजण्यास मदत होईल. भविष्यात आपणास चंद्रावर जाणे झाल्यास तेथील जीवन कसे असेल? जसे की पाणी, हेलियम-3 आणि दुर्लभ मातीचे तत्व यामुळे पृथ्वीला नसर्गिक आणि आर्थिक फायदा देखील होईल.
१४ जुलै, २०२३ ला लॉन्च केलेला चंद्रयान ३ भारताची तीसरी चंद्रयान मोहीम होती. या मोहिमेला सतीश धवन अंतरिक्ष केंद्र, श्रीहरिकोटा, आंध्रप्रदेश येथून प्रक्षेपित केले होते. या मोहिमेमध्ये विक्रम नावाचा लँडर आणि प्रज्ञान नावाचा एक रोव्हर समाविष्ट होता. जो २०१९ मध्ये लॉन्च केलेल्या चंद्रयान २ मध्ये लॉन्च केलेल्या उपकरणांप्रमाणे समान आहे. चंद्रयानाने चंद्राच्या कक्षेत ५ ऑगस्ट, २०२३ रोजी प्रवेश केला आणि विक्रम लँडरने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या जवळ २३ ऑगस्ट, २०२३ रोजी संध्याकाळी ६.०४ वा. लँड केले. विक्रम लँडरच्या सुरक्षित लँडिंग नंतर 'प्रज्ञान' रोव्हर ने चंद्राच्या पृष्ठभागावर 'विक्रम' पासून १०० मीटरपेक्षा जास्त दूर राहून आपले कार्य पूर्ण केले. (Chandrayaan 3 Landing Date).
चंद्रयान ३ पूर्णपणे भारतामध्ये विकसित केले गेले आहे. त्यामुळे आपल्या भारतीय वैज्ञानिकांनी संपादन केलेले यश हे असाधारण आहे. चंद्रयान ३ मोहिमेचे यश निश्चितपणे भारताने एक प्रगतशील राष्ट्राच्या रूपामध्ये उचलले गौरवपूर्ण पाऊल आहे. चंद्रयान ३ ने चंद्राच्या च्या यशस्वी लँडिंगच्या आठवणी म्हणून दर वर्षी २३ ऑगस्टला राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून साजरा केला जाईल. (Chandrayaan 3 Information in Marathi)
प्रज्ञान रोव्हर ने चंद्रच्या पृष्ठभागावर काय मिळवलं?
चंद्रयान-३ च्या रोव्हर 'प्रज्ञान' ने आपल्या पहिल्या चंद्र दिवसात चंद्रच्या भूभागावर लँडर 'विक्रम' पासून १०० मीटर पेक्षा अधिक दूर राहून परीक्षण केले। भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो - ISRO) नुसार, रोव्हर प्रज्ञान वरील स्पेक्ट्रोस्कोपी उपकरणाने चंद्रावर एल्यूमीनियम, सल्फर, कॅल्शियम, लोखंड, क्रोमियम, टाइटेनियम, मॅगनीज, सिलिकॉन आणि ऑक्सीजन चा शोध लावला आहे. परंतु, चंद्रयान-३ चा मोठं ध्येय म्हणजे चंद्रावर पाण्याचा शोध लावणे. आपल्या वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की कहना दक्षिण धृवावर मोठे मोठे खड्डे आहेत. ज्यामध्ये बर्फ असण्याचे संकेत आहेत. ज्यामुळे भविष्यात चंद्रावर मानववस्तीसाठी अनुकूल वातावरण तयार होऊ शकते. 'प्रज्ञान' रोव्हरच्या वेगवेगळ्या अभ्यासा नुसार चंद्रावरील भूकंप, ऊष्माचा प्रवाह, प्लाज्मा वातावरण आणि चंद्र आणि पृथ्वीच्या मधील गुरुत्वाकर्षण समजण्यास मदत झाली.
चंद्रयान मोहिमेत महिलांचे योगदान (नारी शक्ति)
महिला वैज्ञानिक इंजीनियर इस्रोच्या प्रत्येक कार्यक्रमध्ये आपले महत्त्वाचे योगदान देत आहेत. देश की नारी शक्तिने - १०० हुन अधिक महिला कर्मचारिने चंद्रयान-३ चे डिजाइन, परीक्षण आणि संकल्पना देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
चंद्रयान 3 चे मुख्य उद्देश:
चंद्रयान ३ मोहिमेचा मुख्य उद्देश म्हणजे चंद्राच्या दक्षिण ध्रुवाविषयी महत्वाची माहिती गोळा करणे हा आहे.
१. चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित (सॉफ्ट) लँडिंग करणे.
२. रोवरच्या फिरण्याच्या क्षमतेवर लक्ष ठेवणे.
३. चंद्रावरील वैज्ञानिक पुरावे देणे.
चंद्रयान 3 मध्ये वापरली जाणारी उपकरणे:
चंद्रयान-३ मध्ये एकूण सात वैज्ञानिक उपकरण आहेत. त्यापैकी लँडरमध्ये खालील चार उपकरण आहेत,
१. इल्सा (ILSA) एक सिस्मोमीटर उपकरण आहे.
३. रंभा-एलपी (RAMBHA -LP) हा लैंगमुइर प्रोब आहे.
३. चेस्ट (ChaSTE) हा थर्मोफिजिकल एक्सपिरिमेन्ट करण्यासाठी वापरण्यात यणारे उपकरण आहे.
४. LRA हा एक लेजर रिट्रोरिफ्लेकर आहे.
रोव्हर मध्ये दोन उपकरणे आहेत,
१. एपक्स (APXS) हा एक एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर आहे.
२. लिब्स (LIBS)- एक लेजर आधारित स्पेक्ट्रोस्कोप आहे.
३. शेप (SHAPE) हा एक स्पेक्ट्रोपोलर मीटर आहे.
लँडर: चंद्र मोहिमेत 'विक्रम' नावाचे मुख्य उपकरण आहे. या उपकरणामध्ये रिट्रोरेफलेक्टर समाविष्ट आहे जो पृथ्वी ते चंद्रा दरम्यान रेंजिगचे काम अविरतपणे सुरू ठेवतो. सिसमोग्राफमुळे चंद्राच्या भूभागावरील प्रक्रिया समजण्यास मदत होते. सरफेस थर्मोफिजिकल परीक्षणामुळे रिगोलीथ तापीय परिचालकता मोजली जाते.
रोव्हर: प्रज्ञान नावाचे हे रोव्हर विक्रम लँडरच्या आत ठेवले गेले. चंद्रयानाची यशस्वीपणे लँडिंग झाल्यानंतर प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या भूभागावर उतरवले गेले. रोव्हरमध्ये अल्फा पार्टिकल एक्साईट स्पेक्टरोमिटर एपीइएस आणि लेजर इंड्यूसड ब्रेकडाऊन स्पेक्टरोस्कोपी या नावाची दोन उपकरणे होती. ज्यामुळे चंद्राच्या भूभागावरील खनिजे व इतर सामग्रीबाबत माहिती मिळेल.
चंद्रयान (Chandrayaan) महत्वाचे मुद्दे:-
• चंद्रयान मिशन खर्च:-
- चंद्रयान १ - ३८६ कोटी
- चंद्रयान २ - ९७८ कोटी
- चंद्रयान ३ - ६१५ कोटी (चंद्रयान-3 खर्च)
• चंद्रयान ३ निर्देशक (Director):-
- मिशन निर्देशक - एस मोहन कुमार
- असोसिएट मिशन निर्देशक - जी नारायणन
- योजना निर्देशक - पी वीरमुथूवेल
- वाहन निर्देशक - बिजू सी थॉमस
• चंद्रयान लाँच तारीख Launch Date:-
- पहिले चंद्रयान - २२ ऑक्टोबर, २००८
- दुसरे चंद्रयान - २२ जुलै, २०१९
- तिसरे चंद्रयान - १२ जुलै, २०२३
• इस्रो Indian Space Research Organisation (ISRO)
- स्थापना - २५ ऑगस्ट १९६९
- मुख्यालय - बैंगलोर
- अध्यक्ष - एस सोमनाथ
- प्रथम अध्यक्ष - विक्रम साराभाई
भारताच्या या चंद्रशोध मोहीमेच्या यशाने नवी आशा, आकांक्षा आणि राष्ट्रीय गौरव दिला आहे. भारताने आपल्या वैज्ञानिक ज्ञान आणि संशोधनामध्ये वर्चस्व निर्माण केले आहे. याचा प्रत्येकाला भारतीय असल्याचा अभिमान वाटत आहे. चंद्रयान-३ मोहिमेच्या यशाने चंद्राची संरचना अधिक चांगल्या पद्धतीने समजण्यासाठी आणि भविष्यातील त्याची शक्यता जाणून घेण्यासाठी चंद्राच्या पृष्ठभागावर उपलब्ध असलेल्या सामग्रीवर प्रयोग केले जातील. (Chandrayaan 3 Marathi Information).
चंद्रयान ३ प्रश्नोत्तरे:
१. चंद्रयान ३ मोहीम कधी लॉन्च करण्यात आले होते?
उत्तर- चंद्रयान ३ मोहीम १४ जुलै, २०२३ रोजी लॉन्च केले गेले होते.
२. चंद्रयान ३ ने चंद्राच्या भूभागावर केव्हा लँड केले?
उत्तर- चंद्रयान ३ ने चंद्राच्या भूभागावर २३ ऑगस्ट, २०२३ रोजी लँड केले.
३. चंद्रयान ३ कुठून लॉन्च केले गेले?
उत्तर- चंद्रयान ३ सतीश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरीकोटा येथून लॉन्च केले गेले.
४. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरविणारा भारत जगातील कितवा देश आहे?
उत्तर- चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरविणारा भारत जगातील पहिला देश आहे.
५. चंद्रयान ३ चंद्रावर कोठे उतरविण्यात आले?
उत्तर - चंद्रयान ३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरविण्यात आले.
६. चंद्रयान ३ कोणत्या रॉकेटद्वारे लॉन्च करण्यात आले?
उत्तर- चंद्रयान ३ LVM 3 - M4 (Launch Vehicle Mark 3) या रॉकेटद्वारे लॉन्च करण्यात आले.
७. चंद्रयान ३ लॉन्च करण्यासाठी किती खर्च आला?
उत्तर- चंद्रयान ३ लॉन्च करण्यासाठी जवळपास ६१५ कोटी खर्च झाला.
८. चंद्रयान ३ चे नेतृत्व कोणी केले?
उत्तर - चंद्रयान ३ चे नेतृत्व सी. रितू करीधल हिने केले.
९. चंद्रयान ३ चे निर्देशक (Director) कोण आहेत?
उत्तर- चंद्रयान ३ चे निर्देशक मोहन कुमार आहेत.
१०. चंद्रयान ३ च्या लँडरचे नाव काय होते?
उत्तर- मिशन चंद्रयान ३ च्या लँडरचे नाव विक्रम होते.
११. चंद्रयान ३ च्या रोव्हरचे नाव काय होते?
उत्तर- चंद्रयान ३ च्या रोव्हरचे प्रज्ञान होते.
१२. चंद्रयान ३ मिशनमध्ये वापरल्या जाणारे रॉकेट (LVM ३ ) चे वजन किती होते?
उत्तर - चंद्रयान ३ मिशनमध्ये वापरल्या जाणारे रॉकेट (LVM ३ ) चे वजन ३९०० किलो होते.
१३. चंद्रयान ३ च्या मुख्य रॉकेट इंजिनचे नाव काय होते?
उत्तर - चंद्रयान ३ च्या मुख्य रॉकेट इंजिनचे नाव CE २० क्रायोजेनिक इंजिन असे होते.
या पोस्ट देखील तुम्हाला आवडू शकतात
0 टिप्पण्या
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत.