म्युच्युअल फंड म्हणजे काय? Mutual Fund Information in Marathi

Mutual Funds in Marathi | What is Mutual Fund? | म्युच्युअल फंड गुंतवणूक कशी करावी? | म्युच्युअल फंड म्हणजे काय? | म्युच्युअल फंड फायदे मराठी | म्युच्युअल फंडाचे प्रकार Types of Mutual Fund | म्युच्युअल फंड कसा निवडावा | म्यूचुअल फंड मराठी माहिती | Types of Mutual Funds in India Marathi | Mutual Fund meaning in Marathi

Mutual Fund Information in Marathi बऱ्याचदा तुम्हाला म्युच्युअल फंड हे नाव वारंवार ऐकायला मिळत असेल. टीव्ही, वर्तमान, सोशल मीडिया इत्यादी सारख्या माध्यमातुन म्युच्युअल फंडामध्ये कमी जोखीमसह गुंतवणूंक करा इत्यादीसारख्या जाहिरात बऱ्याचवेळा पहिल्या असतील. ज्यांना म्युच्युअल फंडबद्दल अधिक माहिती नसते त्यांना म्युच्युअल फंड म्हणजे नेमकं काय? म्युच्युअल फंड गुंतवणूक कशी करावी? म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे कोणते? इत्यादीसारखे प्रश्न नक्कीच पडले असणार. सदर लेखद्वारे म्युच्युअल फंड बद्दल जास्तीत जास्त माहिती सोप्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न करणार आहोतो.


Mutual Fund Information in Marathi  | Mutual Funds in Marathi | What is Mutual Fund? | म्युच्युअल फंड गुंतवणूक कशी करावी? | म्युच्युअल फंड म्हणजे काय? | म्युच्युअल फंड फायदे मराठी | म्युच्युअल फंडाचे प्रकार Types of Mutual Fund | म्युच्युअल फंड कसा निवडावा | म्यूचुअल फंड मराठी माहिती | Types of Mutual Funds in India Marathi | Mutual Fund meaning in Marathi

म्युच्युअल फंड म्हणजे काय? What is Mutual Fund?

' म्युच्युअल फंड ' अशी एक संस्था आहे ज्यामध्ये विविध गुंतवणूकदारांपासून पैसा एकत्रित करून विशाल आणि विविध प्रकारच्या गुंतवणुकीचा Portfolio तयार करतात . समजा, की काही लोक सामुदायिकपणे आपला पैसा गुंतवू इच्छितात आणि गुंतवणुकीची रक्कम एका जागी एकत्र करून संस्थेमधील एका व्यक्तीला सर्वसंमतीने व्यवस्थापक म्हणून निवडतात आणि त्याला अधिकार देतात की सर्व गुंतवणूकदारांचा पैसा इच्छेनुसार नफा कमावण्यासाठी गुंतवू शकते.  या प्रकारे गुंतवणूकदारांच्या या समूहाला Mutual Fund म्हटले जाते. इंग्लंडमध्ये या संस्थांना Unit Trust आणि अमेरिकेत यांना Mutual Fund म्हणतात. भारत सरकारद्वारा स्थापित Unit Trust of India याचेच एक रूप आहे. काही काळानंतर या व्यवस्थापक संस्थांद्वारा शेअर बाजाराच्या स्थितीप्रमाणे सामुदायायिक जमा रक्कम गुंतवून नफा मिळाल्यानंतर तो सर्व सदस्यांना त्यांच्या गुंतवणुकीच्या प्रमाणात वेगळा करून वितरित करण्यात येतो.

म्युच्युअल फंड म्हणजे, एक संस्था आपण असे म्हणू शकतो. इंग्रजीमध्ये त्याला ट्रस्ट असे म्हणतात. या संस्थेचे कार्य लोकांकडून पैसा जमा करायचे व वेगळ्या सिक्युरिटीमध्ये त्या पैशांची गुंतवणूक करणे हे आहे. आपल्या पाहण्यात आले असेल की, काही गुंतवणूकदार शेअरमध्ये थेट गुंतवणूक करत नाही. पण अश्याच लोकांना म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक आकर्षिले जाते त्यांना सोपे वाटते. याचे कारण म्हणजे बहुदा लोकांना शेअर बाजाराचे ज्ञान नसते. शेअर मार्केटची नीट माहीती नसते. तर शेअर बाजाराचा अभ्यास केलेला नसतो. म्हणून सामान्य लोक हे म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्यास जास्त पसंती देतात. यातसुद्धा काही म्युच्युअल फंड शेअरमध्ये गुंतवणूक करतात तर काही सरकारी रोखांमध्ये गुंतवणूक करतात. तर काहींना दोन्ही सोपे वाटते. (What is Mutual Fund in Marathi).

म्युच्युअल फंडाचे प्रकार Types of Mutual Fund

१. विशिष्ट म्यूच्युअल फंड (Special Mutual Fund) 

२. संतुलित म्यूच्युअल फंड (Balanced Mutual Fund)

३. करमुक्त म्यूच्युअल फंड (Tax Exempted Mutual Fund)

१. विशिष्ट म्यूच्युअल फंड (Special Mutual Fund) 

या प्रकारचे म्यूच्युअल फंड फक्त विशिष्ट प्रकारच्या उद्देशासाठी भांडवल गुंतवणूक करतात जसे एखाद्या विशेष देशासाठी साहाय्यता रूपाने गुंतवणूक सोने किंवा अन्य मौल्यवान धातुरूपाने गुंतवणूक केली जाते.

२. संतुलित म्यूच्युअल फंड (Balanced Mutual Fund)

या प्रकारचे म्यूच्युअल फंड इक्विटी शेअर, कर्ज वा दोन्हीमध्ये आपले भांडवल गुंतवितात ज्यामुळे यांच्या शेअरधारकांच्या ठेवी सुरक्षित राहण्या सोबतच भांडवलात वृद्धी व्हावी आणि नियमित उत्पन्न चालू राहण्याच्या दृष्टिकोनातून संतुलित म्यूच्युअल फंड (Balanced Mutual Fund) मध्ये गुंतवणूक केली जाते.

३. करमुक्त म्यूच्युअल फंड (Tax Exempted Mutual Fund)

असे म्यूच्युअल फंड त्याच समूहात गुंतवणूक केले जातात ज्यामुळे गुंतवणुकीवर करांची सूट मिळेल.

म्युच्युअल फंडाचे फायदे (Advantages of Mutual Fund)


१. सिस्टमॅटीक गुंतवणूक (Systematic Investment Plan)

या गुंतवणूकीत सुरूवातीला काही वेळेच्या अंतराने गुंतवणूक करावी लागते. म्हणून सिस्टमॅटीक योजना गुंतवणूकदारांच्या आवडती योजनापैकी एक आहे. या स्किममध्ये गुंतवणूक ही एक महिन्याची किंवा तीन महिन्याची करावी लागते. सर्वसाधारणपणे ५००० रूपये गुंतवणूक सुरूवातीला करायला लागते.

२. सोपी गुंतवणूक करा आणि सोप्या रीतीने बाहेर पडा (Easy Entry AND Exit) 

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे आणि बाहेर पडणे. हे खूप सोपे आहे. म्युच्युअल फंडात एक फॉर्म भरून देखील खरेदी केल्यास चालते आणि दुसरा फॉर्म भरूनहीसुद्धा बाहेर जाता येते. परंतु शेअर खरेदी करण्यासाठी प्रथम शेअर दलालाकडे रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे. आणि त्यासाठी डिमेट अकाउंट लागते.

३. प्रोफेशनल मॅनेजमेंट (Professional Management)

म्युच्युअल फंडामध्ये शिक्षीत व्यक्तींचा सहभाग असतो. इंजीनीअर, एम.बी.ए इत्यादी  या सर्वांना म्युच्युअल फंडाचा चांगला अनुभव असतो . ते सतत इन्टरनॅशनल आणि लोकल मार्केटवर निरीक्षण ठेवीत असतात.

म्यूच्युअल फंडातील गुंतवणुकीमुळे नुकसान

म्यूच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करणे खरे तर फायद्याचा सौदा असतो, पण यात काही नुकसानसुद्धा आहे, जे प्रामुख्याने दोन प्रकारचे असते.

१. म्यूच्युअल फंडांमध्ये भांडवल गुंतविणारे लोक साधारणपणे जास्त जोखीम येण्यास कचरतात, यामुळे कित्येक वेळा नफा मिळविण्याची संधी गमावतात. याचे एक प्रमुख कारण हे सुद्धा आहे की, फंडावर कमी काळात चांगले निकाल पाहण्याचा एवढा दबाव असतो की व्यवस्थापक दीर्घकालीन फायदे दृष्टीआड करण्यासाठी विवश असतो.

२. शेअर बाजारात अनेक वेळा अशी स्थिती येते की, जेव्हा विविधतेच्या तुलनेत एकच उद्योग वा काही कंपन्यांवरच लक्ष देणे आवश्यक होते. तरीसुद्धा नवीन गुंतवणूकदारासाठी आमचा हा सल्ला आहे की त्यांनी आपल्या गुंतवणुकीत विविधता ठेवावी.

नेट असेट व्हॅल्यू (NAV Net Asset Value)

सर्वसाधारणपणे गुंतवलेल्या पैशांवर जी ककमाई होते. त्यातील खर्च काढून उरलेल्या पैशांच्या हिशोबाने युनिटचे भाव कमी जास्त होतात. त्याला आपण नेट असेम्यूच्युअल फंडांट व्हॅल्यू म्हणतो. 

एन.ए.व्ही. नेट NAV Net Asset Value व्हॅल्यू म्हणजेच एकूण संपत्ती मूल्य. या प्रमाणावरून आपण समजू शकता की, फंडद्वारा जारी केलेले एका शेअरचे मूल्य त्या वेळी किती आहे. म्यूच्युअल फंडामध्ये खूप लोकांकडून कमी जास्त रक्कम जमा करून एकत्र करतात. ते सुद्धा शेअर बाजारामध्ये किंवा गव्हर्नमेंट सेक्युरिटीमध्ये गुंतवलेले असतात. त्यातून कमावलेल्या पैशाला म्यूच्युअल फंडसुद्धा म्हणतात.

म्यूच्युअल फंडांच्या निरनिराळ्या स्कीम (Different Schemes available Under Mutual Fund)


इन्कम फंड (Income Fund)

बारा ते पंधरा टक्के लाभ हा म्यूच्युअल फंडामध्ये गुंतवणूक केली तर मिळतो. यातून होणारे लाभतील इन्कम सामान्यपणे पहिल्या वर्षापासूनच सुरु होतात. काही म्यूच्युअल फंड तर एका वर्षात तीन चार वेळा टाइम डिव्हिडंट देतात.

इंडेक्स फंड (Index Fund)

ह्या फंडामध्ये इंडेक्सद्वारा फायदा किंवा नुकसान ठरविले जाते. फंडामध्ये जेव्हा इंडेक्स स्थिर असतो तेव्हा नफ्याचे प्रमाण एकदम कमी असते. त्याच वेळेस इंडेक्स ची मुव्हमेंट साईडवे असते. जे गुंतवणूकदार धोका पत्करू शकतात, त्यांना हा फंड उपयोगी ठरतो.

ग्रोथ फंड (Growth Fund)

ग्रोथ फंडाद्वारे शेअरच्या वाढलेल्या किमतीचा लाभ मिळतो आणि ग्रोथ फंड हा हायग्रोथ देणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवला जातो. डिव्हिडंट दिले नसेल तरीही चालते.

मनी मार्केट फंड (Money Market Fund)

धोक्याचे प्रमाण कमी असणारा फंड म्हणजे मनी मार्केट फंड होय. तसेच यात इन्कमसुद्धा कमी आहे. याचा इन्कम दर हा बँकेच्या फिक्स डिपोझिटपेक्षा थोडा जास्त असतो . 

गिल्ट फंड (Guilt fund)

रिस्क न घेता केली जाणारी गुंतवणूक म्हणजे गिल्ट फंड आणि गुंतवणूकदाराला त्यासाठी पैसे या फंडात गुंतवता येतात कारण हा फंड सरकारी सिक्युरीटीसमध्ये पैशांची गुंतवणूक केली जाते.

इक्वीटी लिंक सेवींग स्किम (Equity link saving scheme)

ज्या व्यक्तींचे इन्कम जास्त आहे, त्यांच्यासाठी ही  योजना आहे. याचा लॉकींग कालावधी तीन वर्षांचा असतो. जर गुंतवणूकदाराने काही कारणांमुळे त्याचा युनिट्सची विक्री लवकर केली तर त्यांना इन्कम टॅक्सचा फायदा अजिबात मिळत नाही. जर गुंतवणूक जास्त मुदतीसाठी ठेवायची असेल तर ती ठेवता येऊ शकते.

म्युच्युअल फंड कसा निवडावा?

म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम म्युच्युअल फंड मिळविण्यासाठी प्रत्येकजण भरपूर संशोधन करीत असतो. कारण कोणतीही चुकीची निवड आर्थिक नुकसान करू शकते. केवळ म्युच्युअल फंडची रँकिंग घटक सर्वोत्तम म्युच्युअल फंड मिळविण्यासाठी पुरेसा नाही. रँकिंगसह फंडाची मागील कामगिरी कशी आहे हे देखील पाहणे गरजेचे आहे. याशिवायम्युच्युअल फंड रेटिंग, एक्सिट / एन्ट्री भार, फंड वय, मागील अस्थिरता इत्यादींचा अभ्यास करणे गरजेचे ठरते. ज्यामुळे जोखीम कमी होईल आणि परतावा वाढेल. रिलायन्स म्युच्युअल फंड, एसबीआय म्युच्युअल फंड, युटीआय म्युच्युअल फंड यांसारखे फंड भूतकाळात चांगले परिणाम देत आहेत. How to Choose Mutual Funds.

म्युच्युअल फंड गुंतवणूक कशी करावी?

म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणे आता खूपच सोपे झालेले आहे. जास्त कागदपत्रे न देता सुद्धा आपण अनेक फंडमध्ये गुंतवणूक करू शकता. म्युच्युअल फंडमध्ये पहिल्यांदा गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूक दाराची केव्हायसी पूर्ण केलेली असावी. आपण ऑनलाइन ई-केव्हायसी पूर्ण करू शकता. एकदा केव्हायसी पूर्ण केल्यावर आपण कुठल्याही फंडमध्ये गुंतवणूक गुंतवणूक करण्यासाठी तयार असता तेव्हा आपण म्युच्युअल फंड वितरक, नोंदणी केलेले गुंतवणूक सल्लागार, स्टॉक मार्केटमधील ब्रोकर, बँक किंवा इतर आर्थिक मध्यस्थाच्या मदतीने गुंतवणूक करण्याचा निर्णय घेऊ शकता. पण जर आपल्याला स्वतः गुंतवणूक करण्याची इच्छा असेल, तर आपण एखाद्या फंड हाउसच्या ऑफिसमध्ये जाऊ म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करू शकता. फंड हाउसच्या ऑफिसमध्ये जाण्याच्या पूर्वी तुमच्याकडे खालील कागदपत्रांची एक प्रत असल्याची खात्री करा –

1. पत्ता पुरावा

2. ओळखपत्र 

3. कॅन्सलड चेक

4. पासपोर्ट आकाराचे छायाचित्र

फंड हाऊस तुम्हाला एक अर्ज देईल, जो तुम्ही पूर्ण करून आवश्यक कागदपत्रांसह सबमिट केल्यानंतर म्युच्युअल फंड गुंतवणूक करणे सुरू करू शकता. याव्यतिरिक्त, तुम्ही ब्रोकरद्वारे, वेबसाइटद्वारे किंवा मोबाईल अँपद्वारे म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करता येते. (How to Invest in Mutual Funds).

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या