शेअर मार्केट म्हणजे काय? Share Market Information in Marathi

शेअर बाजार म्हणजे काय? Share Market Information in Marathi | Share Market in Marathi | Share market information PDF | What is Share Market in Marathi | शेअर मार्केट म्हणजे काय? | शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी? | शेअर म्हणजे काय? | शेअर बाजार म्हणजे काय? | शेअर मार्केट अभ्यास | शेअर मार्केट मराठी माहिती | शेअर मार्केट मराठी पुस्तक PDF

Share Market Information in Marathi पैसा हा आपल्या दैनंदिन जीवनातील अत्यंत महत्वाचा भाग असतो हे सत्य नाकारून चालणार नाही. प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनात पैसे कमवण्यासाठी नोकरी, व्यवसाय, उद्योगधंदा, व्यवसाय तर कोणी गुंतवणूक करीत असतो. आपल्यातील बहुतेक जणांना गुंतवणूक करण्याची इच्छा आणि कुतूहलता असते. परंतु, प्रश्न पडतो की नेमकी गुंतवणूक कशी करावी? आणि कुठे करावी? गुंतवणूक ही सोने, जागा, घर, फ्लॅट इत्यादी ठिकाणी करीतच असतो, याशिवाय काही कालावधीसाठी एखाद्या कंपनीत गुंतवणूक करून चांगले पैसे देखील कमवतात येतात हे देखील तितकेच खरे! सोप्या भाषेत एखाद्या कंपनीत आपले पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवणे यालाच शेअर मार्केट म्हणतात. शेअर मार्केटबद्दलच्या अपुऱ्या ज्ञानामुळे आणि माणसाच्या लोभी वृत्तीमुळे शेअर मार्केटमध्ये प्रसंगी तोटाही सहन करावा लागतो. तर प्रश्न असा आहे की, शेअर मार्केट म्हणजे काय? आणि शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी? याशिवाय, शेअर मार्केट मधील खालील गोष्टी आपण आज समजून घेणार आहोत.

शेअर बाजार म्हणजे काय? Share Market Information in Marathi | Share Market in Marathi | Share market information PDF | What is Share Market in Marathi | शेअर मार्केट म्हणजे काय? | शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी? | शेअर म्हणजे काय? | शेअर बाजार म्हणजे काय? | शेअर मार्केट अभ्यास | शेअर मार्केट मराठी माहिती | शेअर मार्केट मराठी पुस्तक PDF । • शेअर म्हणजे काय? • शेअर्स चे प्रकार कोणते? • ट्रेडिंग म्हणजे काय? • ट्रेडिंगचे प्रकार कोणते? • इन्व्हेस्टमेन्ट म्हणजे काय? • फंडांमेंटल ॲनालिसिस म्हणजे काय? • टेक्निकल ऍनालिसिस म्हणजे काय? • डिमॅट अकाउंट म्हणजे काय? • डिमॅट अकाउंट कसे ओपन करावे? • डिमॅट खाते उघडण्यासाठी लागणारी कागदपत्रे कोणती? • पोर्टफोलिओ (Portfolio) म्हणजे काय? • निफ्टी म्हणजे काय? • सेन्सेक्स म्हणजे काय? • सेबी (SEBI) म्हणजे काय?

• शेअर म्हणजे काय?
• शेअर्स चे प्रकार कोणते?
• ट्रेडिंग म्हणजे काय?
• ट्रेडिंगचे प्रकार कोणते?
• इन्व्हेस्टमेन्ट म्हणजे काय?
• फंडांमेंटल ॲनालिसिस म्हणजे काय?
• टेक्निकल ऍनालिसिस म्हणजे काय?
• डिमॅट अकाउंट म्हणजे काय?
• डिमॅट अकाउंट कसे ओपन करावे?
• डिमॅट खाते उघडण्यासाठी लागणारी कागदपत्रे कोणती?
• पोर्टफोलिओ (Portfolio) म्हणजे काय?
• निफ्टी म्हणजे काय?
• सेन्सेक्स म्हणजे काय?
• सेबी (SEBI) म्हणजे काय?


शेअर मार्केट म्हणजे काय? What is Share Market in Marathi?

शेअर मार्केट निव्वळ जुगार किंवा पैसेवाल्यांचा खेळ असा समज करून बहुतांश सर्वसामान्य लोक यापासून दूर असतात. आपल्या नातेवाईक आणि मित्रमंडळींनी आपल्या डोक्यात आधीपासून हे भरून ठेवले आहे की शेअर मार्केट म्हणजे जुगार असतो. त्यात कित्यके लोक बरबाद झाले आहेत. हे सर्व सांगणाऱ्यांनी कधीही शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक केल्याची हिम्मत केली नसेल हे नक्की. मुळात शेअर मार्केटमध्ये योग्य अभ्यास करून, ज्ञान घेऊन, संयम ठेवून आपल्या उत्पन्नातील काही रक्कम गुंतवणूक करतो तोच शेअर मार्केटमध्ये चांगले पैसे कमवू शकतो.

सोप्या शब्दात सांगायचे झाले तर, शेअर मार्केट म्हणजे जसं आपलं नेहमीचं भाजीचं किंवा कपड्याचं मार्केट त्याचप्रमाणे हे शेअर्सचं मार्केट असतं. मात्र या मार्केट भाजी, कपडे न विकता कंपन्यांच्या शेअर्सची खरेदी विक्री होते. कमीत कमी भावात एखाद्या कंपनीचा शेअर विकत घेऊन जेव्हा भाव वाढेल तेव्हा त्याला विकणे आणि त्यातून नफा कमावणे, हा साधा सरळ हिशोब. (What is Share Market in Marathi).

शेअर म्हणजे काय? What is Share in Marathi?

शेअर म्हणजे भाग किंवा हिस्सा आणि मार्केट म्हणजे बाजार. म्हणजेच, भागीदारीचा बाजार.हा एक असा बाजार आहे जेथे विविध क्षेत्रातील कंपन्या आपल्या कंपनीचे शेअर ठराविक रकमेमध्ये गुंतवणूकदारांना विकत देते. आणि गुंतवणूकदार कंपनीच्या नफ्यातून आपला स्वतःचा नफा कमावित असतो. शेअर मार्केटमध्ये वैयक्तिक गुंतवणूकदार, म्युच्यअल फंड, विविध क्षेत्रातील कंपन्या, उद्योग समूह आणि संस्था शेअर मार्केटमध्ये व्यवहार करीत असतात. (What is Share in Marathi).

शेअर म्हणजे कंपनीच्या मालकीचा हिस्सा म्हणजेच समभाग होय. जेव्हा एखाद्या कंपनीला नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा व्यवसाय वाढीसाठी भांडवलाची गरज पडते तेव्हा त्यांच्याकडे काही पर्याय उपलब्ध असतात. बँकेकडून कर्ज घेणे किंवा कंपनीचे समभाग शेअर बाजारात विकायला आणून त्याद्वारे भांडवल उभे करणे. जेव्हा कंपनी भांडवल बाजारात म्हणजेच शेअर बाजारात आपला मालकी हक्क म्हणजेच शेअर्स काही प्रमाणत विकून भांडवल उभे करते त्या वेळी ती कंपनी पब्लिक लिमिटेड होते आणि ज्या लोकांनी त्या कंपनीचे शेअर विकत घेतलेले आहेत ते लोक त्या कंपनीचे भागधारक म्हणजेच तेवढ्या प्रमाणात मालक होतात.

शेअर्स चे प्रकार (Types of Shares in Marathi)

शेअर काय असतो हे आपण बघितलं पण हे शेअर्स कोणकोणत्या प्रकारचे असतात ते पाहुयात. शेअर मार्केटमध्ये आठ हजारांपेक्षा जास्त कंपनीचे शेअर्स आहेत. त्यात रोजच्या व्यवहारात असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया पासून ते IT शेयर मार्केट मधील महत्वाच्या कंपनी इन्फोसिस, दुचाकी गाड्यांची कंपनी बजाज, चहाची टाटा कॉफी अशा विविध प्रकारच्या कंपन्यांचे शेअर्स मार्केट मध्ये उपलब्ध आहेत. ह्या वेगवेगळ्या क्षेत्रातील कंपन्या शेअर बाजारात रजिस्टर असतात आणि त्या क्षेत्रांना आपण सेक्टर म्हणतो. उदाहरणार्थ बँकिंग सेक्टर मध्ये SBI, AXIS Bank, ICICI Bank, Bank Of Maharashtra अशा विविध बँका येतात. दुचाकी गाडी निर्मिती क्षेत्रात Bajaj. Hero Motocomp, TVS अशा कंपन्या येतात. औषधनिर्मिती क्षेत्रात Sunpharma, Cipla, Lupin अशा कंपन्यांचा समावेश होतो. FMCG (Fastly Moving Consumer Goods) अंतर्गत Asian Paints, Hindustan Unilever, ITC अशा रोजच्या वापरत लागणार्या वस्तूंची निर्मिती करणान्या कंपन्या असतात. असे विविध प्रकारचे सेक्टर शेअर मार्केट मध्ये उपलब्ध आहेत ज्यात आपण गुंतवणूक करू शकतो.

शेअर मार्केटमध्ये प्रामुख्याने २ गोष्टी केल्या जातात.

१) ट्रेडिंग Trading

२) इन्व्हेस्टमेन्ट (Long term delivery investment)


ट्रेडिंग म्हणजे काय? What is Trading?

सोप्या भाषेत सांगायचे झाले तर ट्रेडिंग म्हणजे व्यापार किंवा व्यवहार करणे. ट्रेडिंगमध्ये शेअर्सची खरेदी - विक्री होते. गुंतवणूकदार म्हणून एखाद्या कंपनीतील शेअर्स ठराविक किंमतीमध्ये विकत घेऊन ते चढ्या भावाने विकणे यालाच ट्रेडिंग असे म्हणतात. ट्रेडिंगमध्ये शेअर्स होल्डिंगचा कमी कालावधी असल्याने तुम्हाला लगेच पैसे मिळतात. ट्रेडिंग मध्ये रिस्कही जास्त असते त्यामुळे रिटर्नही जास्त मिळतात. (Trading Meaning in Marathi).

ट्रेडिंगचे प्रकार Types of Trading in Marathi

१. इंट्राडे ट्रेडिंग Intraday Trading

२. स्विंग ट्रेडिंग Swing Trading

३. पोसिशनल ट्रेडिंग Positional Trading

१. इंट्राडे ट्रेडिंग Intraday Trading

तुम्ही विकत घेतलेले शेअर्सची खरेदी आणि विक्री एकाच दिवशी करता त्याला इंट्राडे ट्रेडिंग म्हणतात. सकाळी ९. १५ ला शेअर मार्केट सुरू होते ते दुपारी ३. ३० पर्यंत सुरु असते. इंट्राडे ट्रेडिंगमध्ये मार्केट बंद होण्याच्या आत विकत घेतलेले विकायचे असतात. मग त्या विक्रीत कधी कधी नफा होतो किवा जो तोटा होतो तो आपणास सहन करावा लागतो. नवीन गुंतवणूकदारानी लगेच इंट्रा ट्रेडिंग करू नये त्यामध्ये अपुऱ्या ज्ञानामुळे नुकसान होण्याची संभावना जास्त असते.

२. स्विंग ट्रेडिंग Swing Trading

स्विंग ट्रेडिंगमध्ये तुम्ही आज घेतलेले शेअर्स एका आठवड्याच्या आत विकून नफा मिळवीत असता. स्विंग ट्रेडिंग मध्ये तुमच्याकडे वेळ असतो. पार्ट टाईम म्हणून स्विंग ट्रेडिंग खूप उपयुक्त आहे.

३. पोसिशनल ट्रेडिंग Positional Trading

पोसिशनल ट्रेडिंग मध्ये तुम्ही आज शेअर्स खरेदी करता आणि तो कमीत कमी १-३ महिन्यापर्यंत होल्ड करून ठेवता आणि चांगली संधी पाहून तीन महिन्याच्या आता विकून ठेवता. यालाच शॉर्ट टर्म ट्रेडिंग असे म्हणतात. नवीन गुंतवणूकदारांनी सुरवात नेहमी पोसिशनल ट्रेडिंग पासून करावी मग स्विंग ट्रेडिंग आणि शेवटी इंट्राडेकडे वळावे. (types of trading in marathi).

इन्व्हेस्टमेन्ट (Long Term Delivery Investment)

एक वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी शेअर्सची गुंतवणूक करण्याच्या प्रक्रियेला इन्व्हेस्टमेन्ट (Investment) असे म्हणतात. आणि जो शेअर्सची गुंतवणूक करतो त्याला इन्व्हेस्टर (Investor) असे म्हणतात. 

फंडांमेंटल ॲनालिसिस म्हणजे काय?

ज्या कंपनीत इन्व्हेस्टर दीर्घ कालावधीसाठी इन्व्हेस्टमेन्ट करतो त्या कंपनीचे शेअर्सच्या किमती पुढील ५, १०, १५ वर्षात वाढतील की कमी होतील त्याचे भाकीत करणे त्याला मार्केटच्या भाषेत फंडांमेंटल ॲनालिसिस (Fundamental Analysis) म्हणतात.

Fundamental Analysis करताना खालील गोष्टींचा प्रामुख्याने विचार केला जातो.

• ज्या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली आहे त्या कंपनीला नफा होतोय का? जर नसेल होत तर भविष्यात होऊ शकतो का?

• कंपनीची वक्री, नफा आणि turnover यामध्ये वाढ झाली आहे का?

• कंपनीच्या प्रॉडक्टला लोकांची किती पसंती आहे किंवा बाजारात इतर समान प्रोडक्ट विक्री करण्याऱ्या कंपनीची तुलना केल्यास त्याचे मार्केट भांडवल किती आहे?

• कंपनीची मालमत्ता (Asset) किती आहे?

वरीलप्रमाणे विचार Fundamental Analysis मध्ये केला जातो. आपण कधीही गुंतवणूक करताना Investment वर म्हणजेच दीर्घकालीन गुंतवणूकीवर भर दिला पाहिजे.

Technical Analysis म्हणजे काय?

Technical Analysis मध्ये आपण गुंतवणूक करण्यासाठी चांगला शेअर कसा निवडावा हे पहिले. आता तो शेअर खरेदी केव्हा करायचा आणि केव्हा विकायचा याचा अभ्यास Technical Analysis मध्ये कसा होतो हे पाहणार आहोत. एखाद्या शेअरच्या ऐतिहासिक चार्ट आणि आकडेवारीचा उपयोग करून त्या शेअरच्या किंमतींच्या भविष्यातील हालचालीचा अंदाज बांधणे म्हणजेच तांत्रिक विश्लेषण (टेक्निकल ऍनालिसिस - Technical Analysis) होय.

एखादा शेअरची किंमत काही कालावधीसाठी वाढत गेली परंतु, पुढे ही तो त्याच क्रमाने वाढत जाईल याची १००% खात्री नसते, मात्र शक्यता नाकारता येत नाही. ठराविक काळातील स्टॉक्सच्या किंमती आणि व्हॉल्यूममधील बदलांचा अभ्यास केल्याने भविष्यातील किंमतीचा अंदाज लावणे सोपे होते. Technical Analysis हे अगदी १००% अचूकतेसह सर्वोत्कृष्ट निकाल देऊ शकणारे साधन निश्चित नाही. परंतू Technical Analysis द्वारे शेअरची भविष्यातील स्थिती साधारणतः काय असू शकते याचा अंदाज लावला जातो. Technical Analysis च्या माध्यमातून Entry & Exit, Market Trend, Stop Loss आणि टार्गेट याबद्दल माहिती मिळवता येऊ शकते.

एंट्री आणि एक्सिट Entry & Exit

स्टॉक चार्ट्सचे विश्लेषण करून, गुंतवणूकदार शेअर्स खरेदी आणि विक्रीसाठीची इंट्री आणि एक्सिट पॉईंट्सचा वेळ निश्चित करू शकतात. मागणी व पुरवठा समजण्यास याची मदत होते. तसेच ट्रेंड मोडण्यात व जास्त परताव्याची वेळ योग्य रीतीने निर्धारीत करण्यास मदत होते.

स्टॉप लॉस (Stop Loss)

स्टॉप लॉस हा शेअर्स च्या खरेदी विक्री प्रक्रियेतील अत्यंत महत्वाचा पर्याय आहे. आपण खरेदी केलेल्या एखाद्या शेअरचा भाव खाली पडत असताना होणारे नुकसान मर्यादित ठेवण्याकरिता स्टॉप लॉसचा उपयोग केला जातो. स्टॉप लॉस हे शेअरचा भाव एखाद्या ठराविक किंमतीपर्यंत पोहोचताच शेअर्सची विक्री करण्यासाठी गुंतवणूकदाराने त्याच्या ब्रोकरला दिलेल्या स्वयंचलित ऑर्डरचे कार्य करते.

टारगेट (Target)

गुंतवणूकदाराला शक्य तितका जास्त नफा मिळविण्यासाठी ज्या किंमतीला त्याने व्यापारातून बाहेर पडावे म्हणजेच आपले शेअर्स विकून टाकावेत अशी किंमत ही त्याची टारगेट प्राईज असते. टारगेट म्हणजे एखाद्या शेअरच्या भावी किंमतीचे अनुमान म्हणता येयील. टारगेट हा स्टॉप लॉस च्या विपरीत असतो. म्हणजेच ज्या प्रमाणे स्टॉप-लॉस ऑर्डर हि शेअरच्या चालू भावा पेक्षा खालील किमतीवर लावली जाते. त्याचप्रमाणे टार्गेट शेअरच्या चालू भावाच्या वरील किमतीवर लावला जातो. एखाद्या शेअर ची विक्री करताना आपण टारगेट पर्यायची निवड करू शकतो. अश्या विक्री ऑर्डर ची Validity जर एक महिना ठेवली तर त्या महिन्यात जेव्हा पण त्या शेअर ची किंमत आपण सेट केलेल्या टारगेट ला टच करेल. तेव्हा तो शेअर अपोआप त्या किमतीला विकला जाईल.

मार्केट ट्रेंड (Market Trend)

मार्केट ट्रेंड हा शब्द काही ठराविक कालावधीत मार्केट मधील कोणत्या हि मालमत्तेच्या किमतींच्या हालचालीचे वर्णन करण्यासाठी वाफारण्यात येतो. तसेच मार्केट ट्रेंड हा विशिष्ट कालावधीत किंमतीच्या हालचालींची दिशा

दर्शवण्याचे काम करतो. थोडक्यात मार्केट वर जात आहे कि खाली पडत आहे याचे वर्णन करण्यासाठी मार्केट ट्रेंड (Market Trend) चा उपयोग होतो.


डिमॅट अकाउंट म्हणजे काय? Demat Account Information in Marathi

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक किंवा ट्रेडिंग करण्यासाठी डिमॅट अकाउंट (डिमॅट खाते) असणं आवश्यक असतं. डिमॅट अकाउंट म्हणजे बँक खात्याप्रमाणे एक खातं असतं जिथे तुम्ही विकत घेलेले शेअर्स इलेक्ट्रॉनिक स्वरूडिमॅट पात जतन केले जातात. तसेच शेअर्सची खरेदी-विक्री याच डिमॅट अकाउंट द्वारे केली जाते. जशी बँकेत खाते उघडण्याची प्रक्रिया आहे तशीच प्रक्रिया डिमॅट अकाउंट उघडण्याची आहे. काही मुलभूत गोष्टींची पूर्तता करून कोणीही डिमॅट अकाउंट सहजपणे उघडू शकते. भारतात एनएसडीएल (NSDL) आणि सीडीएसएल (CDSL) या दोन शासकीय संस्थाच्या माध्यमातून डिमॅट अकाउंटवर देखरेख ठेवली जाते. डिमॅट अकाउंट सोबतच ट्रेडिंग अकाउंटही उघडले जाते. ट्रेडिंग अकाउंट हे स्टॉक ब्रोकर च्या माध्यमातून उघडले जाते. जसे की, शेरे खान, एन्जल ब्रॉकिंग, मोतीलाल ओसवाल, झरोधा इत्यादी. Demat Account Information in Marathi.

डिमॅट अकाउंट कसे ओपन करावे?

डिमॅट अकाउंट उघडणे हे शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यासाठीचे पहिले पाऊल आहे. डिमॅट अकाउंट शिवाय शेअर मार्केटमध्ये कोणतेही व्यवहार करता येत नाहीत. डिमॅट अकाउंट उघडण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे.

१. सर्वप्रथम कुठल्या स्टॉक ब्रोकरकडे आपण डिमॅट अकाउंट ओपन करणार आहोत त्याची निवड करावी. (उदा. Zerodha, Angel Broking इ.).

२. यानंतर, स्टॉक ब्रोकरच्या वेबसाईटवर जाऊन, डिमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरून अर्ज करा.

३. ब्रोकरच्या वेबसाईटवर दिलेल्या निर्देशानुसार आवश्यक कागदपत्रे आणि आपला पासपोर्ट आकाराचा फोटो अपलोड करा.

४. त्यानंतर, आपल्याला नियम व अटींची प्रत दिसेल ती नीट वाचून, डिमॅट अकाउंट ओपन करण्यासाठीचे शुल्क भरा.

५. शुल्क भरल्यानंतर, २४ ते ४८ तासात तुम्हाला तुमचा डिमॅटखाते क्रमांक व पासवर्ड दिला जाईल.

वरील प्रकिया केल्यानंतर तुमचे डिमॅट अकाउंट ओपन होते आणि तुम्ही स्टॉक ब्रोकरच्या वेबसाईटवरून किवा मोबाईलच्या ऍपद्वारे शेअर्सची खरेदी विक्री करू शकता. (How to open Demat Account).

डिमॅट खाते उघडण्यासाठी लागणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे, Demat Account Documents Required.

१. पॅन कार्ड (PAN CARD)

२. आधारकार्ड

३. ६ महिन्यांचे बँक खाते स्टेटमेंट

४. कॅन्सल चेक

५. फोटो

पोर्टफोलिओ (Portfolio) म्हणजे काय?

गुंतवणूकदाराच्या मालकीच्या मालमत्तेचा संग्रह म्हणजे पोर्टफोलिओ होय. या पोर्टफोलिओमध्ये बाँड्स, स्टॉक, म्युच्युअल फंड, पेन्शन योजना, रिअल इस्टेट, सोन्यासारख्या भौतिक मालमत्ता, सिक्युरिटीज इत्यादी गुंतवणुकीचा समावेश असू शकतो. शेअर बाजारात वेगवेगळ्या कंपन्यांच्या शेअर्सच्या संग्रहाला शेअर्सचा पोर्टफोलिओ म्हणतात. त्यामध्ये आपण खरेदी केलेल्या सर्व शेअर्स ची संपूर्ण माहिती उपलब्ध असते, जसे कि आपण कोणते शेअर्स कधी आणि कितीला विकत घेतले. त्यांचा सध्याचा भाव काय चालू आहे. आपले कोणते शेअर्स फायद्यात आहेत आणि कोणते तोट्यात इत्यादी. एका आदर्श पोर्टफोलिओ मध्ये विवध क्षेत्रातील कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या प्रमाणात गुंतवणूक केलेली असते. (Portfolio Meaning in Marathi in Share Market).

निफ्टी म्हणजे काय? Nifty Information in Marathi

निफ्टी हा नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) मधील नोंदणीकृत ५० प्रमुख कंपन्यांच्या शेअर्सचा निर्देशांक आहे. म्हणजेच ज्या प्रमाणे सेन्सेक्स ठरवताना बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) मधील टॉपच्या ३० कंपन्यांचा आधार घेतला जातो, त्याचप्रमाणे निफ्टी ठरवताना नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) मधील टॉप ५० कंपन्यांच्या शेअर्सची रोजची कामगिरी पहिली जाते. निफ्टी मधील या ५० कंपन्यांच्या शेअर्स च्या किमतींच्या चढ-उतारावरून निफ्टी वाढला की घटला हे ठरते. निफ्टी मधील ह्या ५० कंपन्यांचा समावेश करताना बाँम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) प्रमाणेच नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) मधील ज्या प्रमुख ५० कंपन्या भारतीय अर्थव्यवस्थेच्या विविध औद्योगिक क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करतात त्यांना प्राधान्य दिले जाते. सेन्सेक्सप्रमाणे निफ्टीतील या कंपन्या हि हेवीवेट आहेत. निफ्टी मध्ये २२ वेगवेगळ्या उद्योगांमधून या ५० कंपन्या निवडल्या जातात. निफ्टी हा शब्द नॅशनल (National) आणि फिफ्टी (५०) या दोन शब्दांपासून तयार झालेला आहे. हा ५० कंपन्यांचा समूह असल्या मुळे त्याला निफ्टी फिफ्टी (Nifty-50) असंही म्हणतात. (Nifty Information in Marathi)

सेन्सेक्स म्हणजे काय? Sensex Information in Marathi

सेन्सेक्स एक बाँम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) चा निर्देशांक आहे. मुंबई शेअर बाजारात ५ हजारांपेक्षा अधिक कंपन्यांची नोंदणी झालेली आहे मात्र सेन्सेक्सची कामगिरी मोजण्यासाठी या ५ हजारांमधील फक्त टॉप च्या ३० कंपन्यांचा आधार घेतला जातो. या ३० कंपन्यांच्या शेअर्सची रोजची कामगिरी पाहूनच सेन्सेक्स काढला जातो, म्हणजे या ३० कंपन्याच्या शेअर्सच्या किमतींच्या चढ-उतारावरून सेन्सेक्स वाढला की घटला हे ठरते. सेन्सेक्सला बीएसई ३० किंवा बीएसई सेन्सेक्स असंही म्हणतात. सेन्सेक्सचं पूर्ण नाव सेन्सिटिविटी इंडेक्स (Sensitivity Index) असे आहे. सेन्सेक्स ची सुरवात १९७८ मध्ये झाली. (Sensex Information in Marathi).

सेबी (SEBI) म्हणजे काय? SEBI Information in Marathi

सेबी SEBI म्हणजे Securities and Exchange Board of India. SEBI ही १९९२ मध्ये गुंतवणूकदारांचे संरक्षण करण्यासाठी भारतीय सरकारने स्थापन केलेली सरकारी नियंत्रण असणारी संस्था आहे. भारतातील सर्व स्टॉक एक्सचेंजेस् आणि या एक्सचेंजेस् वर लिस्ट असलेल्या प्रत्येक कंपनीच्या व्यवहारावर सेबी (SEBI) चे नियंत्रण असते. शेअर मार्केटमध्ये कंपनी लिस्ट होण्यापुर्वी सेबी कडून त्या कंपनीचे पुर्णपणे ऑडीट (Audit) केले जाते.

कंपनीची पत पाहूनच सेबी कडून कंपनीला शेअर मार्केटमध्ये सामावून घेतले जाते. SEBI च्या नियमानुसार कंपनीला त्यांचे सगळे Audit reports, Profit Loss statement. Balance sheet. Annual report, Quarterly report इत्यादी सर्व महत्त्वाचे डॉक्युमेंट्स गोपनीय न ठेवता ते सर्वसामान्य शेअर मार्केट मधील गुंतवणूकदारांना सहज उपलब्ध व्हावेत या हेतूने जनतेसमोर सादर करावे लागतात. एक प्रकारे सेबीने कंपन्यांना एवढे कडक आणि जाचक नियमांनी बांधून ठेवले आहे कि कंपनी कंपनीचे प्रमोटर्स, डायरेक्टर किंवा मालक आपल्यासारख्या सर्वसामन्य गुंतवणूकदारांचे नुकसान होइल असा कोणताही निर्णय घेऊ शकत नाहीं. 

शेअर मार्केटमधील सर्व कंपन्यांच्या व्यवहारांवर सेबीचे नियंत्रण असते. त्यामुळे शेअर बाजारात लबाडी गैरव्यवहार होण्याची शक्यता शून्य टक्के आहे. स्टॉक एक्सचेंज वर कंपनी लिस्ट झाल्यानंतर देखिल सेबी कडून कंपन्यांचे वेळोवेळी Audit, Inquiry आणि Investigation चालूच असते. त्यामुळे कंपनीच्या डायरेक्टला काही गडबड घोटाळा किंवा टॅक्स चोरी सारखे गैरप्रकार करता येत नाहीं. जर कुठली कंपनी SEBI ला दोषी आढळली तर गुंतवणूकदारांच्या पैशांचा विचार करुन SEBI कडून संबंधित कंपनीचे सगळेच आर्थिक व्यवहार आणि अकाउंट सील केले जातात. सेबी ने शेअर मार्केटमधल्या कंपन्यांना त्यांची सर्व माहिती लोकांसाठी खुली ठेवने बंधनकारक केले असल्यामुळे या सर्व गोष्ठींची पाहनी करुन कंपनीची आर्थिक स्थिती समजावून त्या कंपनी चे शेअर्स आपण विकत घेऊ शकतो. सामान्य गुंतवणूकदारची फसवणूक होऊ नये ही SEBI ची प्राथमिक जवाबदारी असते. त्यामुळे सर्वात महत्वाची आणि लक्षात ठेवायची बाब म्हणजे, शेअर मार्केट मध्ये आपले पैसे सुरक्षित असतात. शेअर बाजारातील गुंतवणूक पैसा बुडवते हि संकल्पना चुकीची आहे. मार्केट चे अपूर्ण ज्ञान आणि त्यातून घेतलेले चुकीचे निर्णय हे गुंतवणूकदारांचे पैसे बुडवण्यास कारणीभूत ठरतात. (SEBI Information in Marathi).

वाचकमित्रहो, आशा आहे की वरीलप्रमाणे दिलेल्या माहितीमुळे थोड्या फार प्रमाणात शेअर मार्केटशी ओळख झाली असेल. शेअर मार्केट हा एक असा अथांग समुद्र आहे जिथून पैसे कमवण्याचा एक चांगला मार्ग सापडतो. मात्र, एखाद्या शेअर मध्ये गुंतवणूक किंवा ट्रेडिंग करताना आपल्या जोखीम क्षमता ओळखून काम करणे महत्वाचे आहे. अन्यथा जास्त जोखीम घेऊन ट्रेड करताना नुकसान झाल्यास काही लोक कायमस्वरूपी शेअर मार्केटमधून दूर जातात.

शेअर मार्केटमध्ये नव्याने गुंतवणूकदारांना मार्केटचा अभ्यास करण्यासाठी तसेच बाजारातील चालू घडामोडी पाहण्यासाठी काही महत्वाच्या वेबसाईटची यादी खालीलप्रमाणे -

www.bseindia.com

www.nseindia.com

www.economictimes.com

ww.screener.in

www.moneycontrol.com

www.livemint.com

www.marketsmojo.com

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या