विश्वकर्मा योजना महाराष्ट्र Vishwakarma Yojana Badal Mahiti

विश्वकर्मा योजना मराठी । पंतप्रधान विश्वकर्मा योजना । विश्वकर्मा योजना महाराष्ट्र । विश्वकर्मा योजना ऑनलाइन फॉर्म । प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2024 । विश्वकर्मा योजना काय आहे । विश्वकर्मा योजना माहिती । विश्वकर्मा योजना म्हणजे काय । विश्वकर्मा श्रम सम्मान योजना Registration Maharashtra । Vishwakarma Yojana Apply Online । Vishwakarma Yojana Benefits । विश्वकर्मा योजना Age Limit

भारतातील प्रत्येक कुटूंबाला स्वावलंबी बनवावे आणि त्यांना आर्थिक सहाय्य मिळावे या उद्देशाने पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी दिनांक १७ सप्टेंबर, २०२३ रोजी  केंद्र शासन पुरस्कृत विश्वकर्मा ही योजना भारतभर सुरू केली. समाजातील लोकांमधील विविध कौशल्यांमध्ये वाढ करण्यासाठी विश्वकर्मा योजना सुरू केली. २०२३ पासून, पुढील येणाऱ्या ५ वर्षांच्या कालावधीसाठी या योजनेकरिता १३००० कोटींचा निधी मंजूर केला आहे.

विश्वकर्मा योजना मराठी । vishwakarma yojana in marathi । पंतप्रधान विश्वकर्मा योजना । विश्वकर्मा योजना महाराष्ट्र । विश्वकर्मा योजना ऑनलाइन फॉर्म । प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2024 । विश्वकर्मा योजना काय आहे । विश्वकर्मा योजना माहिती । विश्वकर्मा योजना म्हणजे काय । विश्वकर्मा श्रम सम्मान योजना Registration maharashtra । vishwakarma yojana apply online । vishwakarma yojana benefits । विश्वकर्मा योजना age limit

भगवान विश्वकर्मा यांच्या जयंतीनिमित्त पीएम विश्वकर्मा योजनेचा शुभारंभ करण्यात आला. भारतातील छोटे असंघटीत कारागीर, व्यवसायिक आणि व्यापारी यांच्या उद्योगाला चालना मिळावी आणि त्यांचे जीवनमान उंचावणे यासाठी पीएम विश्वकर्मा योजना पीएम नरेंद्र मोदी यांच्याकडून जाहीर करण्यात आली. चला तर मग विश्वकर्मा योजना महाराष्ट्र योजनेबाबतीत सविस्तरपणे माहिती पाहुयात. जसे की, विश्वकर्मा योजना काय आहे? विश्वकर्मा योजना पात्रता निकष काय आहेत? विश्वकर्मा योजनेचे लाभ आणि फायदे कोणते? आवश्यक कागदपत्रे कोणी? आणि या योजेनचा लाभ तुम्ही कसा मिळवू शकता इत्यादी. (PM Vishwakarma Yojana in Marathi).

विश्वकर्मा योजनेंतर्गत पारंपरिक कारागीर आणि शिल्पकार यांना आर्थिक मदत केली जाते. १८ जातीतील असंघटीत व्यवसायांशी संबंधित असणाऱ्या लोकांना PM विश्वकर्मा योजनेचा फायदा होणार आहे. योजनेंतर्गत लाभार्थ्यांना आर्थिक मदत मिळणारच आहे, याशिवाय विनामूल्य प्रशिक्षण सुद्धा दिले जाणार आहे. (विश्वकर्मा योजना काय आहे).

विश्वकर्मा योजना - कोण कोण लाभ घेऊ शकतात?

पंतप्रधान विश्वकर्मा योजना ही असंघटीत १८ वर्षावरील महिला आणि पुरुष कामगारांसाठी आहे. जसे की, 

१. लाकूड व्यवसाय करणारे - सुतार, बोट बनवणारे इ.

२. लोह, धातूंवर आधारित, दगडी व्यवसायिक, आर्मर, लोहार, हॅमर, टूल किट मेकर, लॉकस्मिथ आणि शिल्पकार इ.

३. सोने-चांदीवर आधारित व्यवसायिक - सोनार, कुंभार, मोची, न्हावी, कोळी, शिंपी, माळी, गवंडी इत्यादी प्रकारच्या  असंघटीत कारागिरांना PM विश्वकर्मा योजनेचा लाभ मिळवता येतो.

पीएम विश्वकर्मा योजना महाराष्ट्र फायदे:

१. पीएम विश्वकर्मा योजनेंतर्गत संबंधित व्यवसायाचे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या कारागिरांना रु.१५०००/- रुपये किमतीचे साहित्ये केंद्र शासनाकडून देण्यात येते.

२. पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर लाभार्थ्यांना प्रमाणपत्र आणि ओळखपत्र दिले जाते.

३. पाच दिवसीय बेसिक प्रशिक्षण आणि पंधरा दिवसाचे पूर्ण प्रशिक्षण कालावधीत लाभार्थ्यांना दररोज रु. ५००/- विद्या वेतन दिले जाते.

४. पीएम विश्वकर्मा योजनेमुळे लोकांमध्ये रोजगाराचे प्रमाण वाढून बेरोजगारीचे प्रमाण कमी होईल.

५. प्रशिक्षण घेणाऱ्या लाभार्थ्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी ५% व्याजदरासह पहिल्या टप्प्यात एक लाख तर दुसऱ्या टप्प्यात दोन लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध दिले जाते. 

६. व्यवसाय वाढीसाठी लाभार्थींना मार्केटिंग करण्यासाठी देखील सरकार मदत करणार.

७. पीएम विश्वकर्मा योजनेद्वारे देशातील सर्व पारंपरिक मजुरांचा विकास व स्वयंरोजगाराला चालना मिळणार आहे.

८. लाभार्थींना योजनेअंतर्गत आर्थिक साहाय्यासोबतच पहिल्या टप्प्यात रु. १ लाख, दुसऱ्या टप्प्यात रु. २ लाख आणि तिसऱ्या टप्य्यात रु. ३ लाख एवढे कर्ज ५% व्याजदराने उपलब्ध होते.

९. लाभार्थीने डिजिटल पद्धतीने (ऑनलाईन) आर्थिक व्यवहार केल्यास, प्रत्येक व्यवहारावर (On per Transaction) रु.१ /- एवढी सूट मिळते. (Vishwakarma Yojana Benefits).

रु. १५०००/- अनुदान कधी देण्यात येते.

पीएम योजनेचा पात्र लाभार्थीने आवश्यक कागदपत्रांसह अर्ज केल्यानंतर आणि त्यांचा अर्ज मंजूर झाल्यास, लाभार्थीने आवश्यक असलेले प्रशिक्षण पूर्ण केले असल्यास केवळ अशा परिस्थितीमध्येच लाभार्थींना रु. १५०००/- अनुदान देण्यात येते. या अनुदानाने लाभार्थी व्यक्तीने टूल किट म्हणजेच, त्याच्या व्यवसाय संबंधित साहित्य, अवजारे खरेदी करावयाची असतात. वर नमूद केल्याप्रमाणे लाभार्थीला प्रशिक्षण दरम्यान रु. ५००/- एवढे दररोज (प्रशिक्षणाच्या कालावधी पर्यंत) प्रोत्साहन अनुदान म्हणून देण्यात येते. (विश्वकर्मा श्रम सम्मान योजना Registration Maharashtra).

पीएम विश्वकर्मा योजना प्रशिक्षण कुठून मिळणार?

पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत मिळणारे प्रशिक्षण (Traning) ही तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी घेण्यात येते. शासनाकडून लाभार्थीना प्रशिक्षण देण्यासाठी कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट दिले जाते. 

पंतप्रधान विश्वकर्मा योजना महाराष्ट्र 2024 पात्रता निकष:

स्वयंरोजगार करणारे सर्व असंघटीत व्यवसायिक व कामगार पीएम योजनेचा लाभ मिळविण्यासाठी पात्र असतील. लाभार्थीची पात्रता खालील प्रमाणे असावी. (विश्वकर्मा योजना Age Limit).

१. लाभार्थी भारतातील रहिवाशी असावा.

२. अर्ज करतेवेळी लाभार्थीचे किमान वय १८ वर्ष पूर्ण असावे.

३. या योजनेत विश्वकर्मा समाजाच्या अंतर्गत येणाऱ्या १४० जाती अर्ज करू शकतात.

४.भारतामधील सर्व कारागीर पीएम विश्वकर्मा योजनेसाठी नोंदणी करू शकतात.

५. अर्जदार त्याच्या व्यवसायात सक्रिय असावा.

६. पीएम विश्वकर्मा योजनेच्या लाभासाठी लाभार्थीचे बँक खाते आधार सोबत लिंक केलेले असावे.

७. कुटुंबातील एकच सदस्य अर्ज करू शकतो.

८. मागील ५ वर्षात, कोणत्याही राज्य किंवा केंद्र सरकारच्या क्रेडिट (कर्ज) आधारित योजनेचा लाभ घेणारे (जसे की, मुद्रा योजना, स्वनिधी योजना) अर्जदार या योजनेसाठी पात्र नाहीत.

९. सरकारी सेवेत असेलेले व्यक्ती या योजनेसाठी पात्र नाहीत.

विश्वकर्मा योजना महाराष्ट्र आवश्यक कागदपत्रे:

१. आधारकार्ड

२. पॅन कार्ड

३. अधिवास प्रमाणपत्र

४. जात प्रमाणपत्र

६. बँक पासबुक

७. उत्पन्न दाखला

८. मोबाईल क्रमांक

९. पासपोर्ट साईझ फोटो

विश्वकर्मा श्रम सम्मान योजना Registration maharashtra:

विश्वकर्मा योजनेचा लाभ मिळविण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) ला भेट द्यावी लागेल. किंवा तुमच्याकडे कॉमन सर्व्हिस सेंटर चा आयडी- पासवर्ड असेल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. वैयक्तिकरीत्या ,स्वतः ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून अर्ज करता येत नाही. (विश्वकर्मा योजना ऑनलाइन फॉर्म).

कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) च्या माध्यमातून विश्वकर्मा योजनेचा अर्ज करण्यासाठी खालील पायऱ्यांचा अवलंब करा.

१. सर्वप्रथम, https://pmvishwakarma.gov.in/ वेबसाइट उघडा आणि लॉगिन ड्रॉप डाउन पर्यायावर क्लिक करा.

२. यानंतर, नोंदणीसाठी 'CSC- Register Artisans' हा पर्याय निवडून, तुमचे CSC यूजर नेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा.

३. 'तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी कर्मचारी आहे का?' असा मेसेज येईल त्यामध्ये 'नाही' हा पर्याय निवडा निवडा. आणि 'तुम्ही केंद्र सरकारच्या किंवा राज्यसरकारच्या कर्ज योजनांतर्गत क्रेडिट/कर्ज सुविधेचा लाभ घेतला आहे का?'

४. 'तुम्ही केंद्र सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या क्रेडिट/कर्ज सुविधा घेतली आहे?' मध्ये 'नाही' पर्याय निवडून 'Continue' बटणवर क्लिक करा.

५. त्यानंतर, 'आधार लिंक केलेला मोबाईल नंबर आणि कारागिरांचा आधार क्रमांक टाकून, 'OTP' बटणावर क्लिक करा आणि मोबाईल क्रमांकावर मिळालेला ओटीपी टाकून व्हेरिफाय करा.

६. त्यानंतर, तुम्हाला विश्वकर्मा योजना ऑनलाइन नोंदणी फॉर्म पहायला मिळेल. त्यात योग्य ती माहिती भरा.

जसे की, 

- अर्जदाराची वैवाहिक स्थिती, श्रेणी (जनरल/एससी/एसटी/ओबीसी) निवडा.

- कारागीर दिव्यांग आहे की नाही ते निवडा. 

- जर कारागीर दिव्यांग असेल तर दिव्यांगजनाचा प्रकार निवडा.

- कारागीर त्याच राज्यात व्यवसाय करत आहे की नाही ते निवडा. 

- कारागीर अल्पसंख्याक श्रेणीतील आहे की नाही ते निवडा, जर होय तर अल्पसंख्याक श्रेणी निवडा.

७. संपर्क तपशील विभागात, मोबाइल क्रमांक आणि आधार क्रमांक आपोआप भरला जाईल. त्यानंतर, उपलब्ध असल्यास पॅन कार्ड क्रमांक टाका.

८. त्यानंतर,कौटुंबिक तपशील मध्ये जर रेशन कार्ड क्रमांक आधार क्रमांकाशी जोडला असेल तर शिधापत्रिका क्रमांक टाका. जर रेशन कार्ड उपलब्ध नसेल तर कुटुंबाची माहिती भरा.

९.  त्यानंतर, आधार पत्ता तपशील विभागामध्ये, आधार कार्ड पत्ता, राज्य, जिल्हा आणि पिन कोड आपोआपाप भरला जाईल. जर आधार कार्ड पत्ता सध्याच्या पत्त्यासारखाच असेल तर 'आधार पत्त्यासारखाच' हा पर्याय निवडा. आणि कारागीर ग्रामपंचायत अंतर्गत येतो की नाही ते निवडा. जर 'होय' असेल तर ब्लॉक आणि ग्रामपंचायत इ. निवडा.

१०. जर कारागीर शहरी भागातील असेल तर 'तुम्ही ग्रामपंचायत अंतर्गत येता का?' मध्ये नाही निवडा आणि ULB नाव निवडा.

१२. अर्जदाराचा व्यवसाय/व्यापार तपशील विभागामध्ये , कारागीराचे व्यवसाय किंवा व्यापाराचे नाव निवडा. जर व्यवसायाचा पत्ता आधार सारखा असेल तर 'आधार पत्त्यासारखाच' निवडा हा पर्याय निवडा.

१३. त्यानंतर, कारागिराच्या सेव्हिंग बँक अकाऊंट चे तपशील भरा.

१४. क्रेडिट सपोर्ट विभागामध्ये ,कारागिराला क्रेडिट (कर्ज) हवे असल्यास ते निवडा क्रेडिट सपोर्ट आवश्यक असल्यास, रु.१,००,००० पर्यंतची रक्कम रक्कम टाका. जर कारागिरांना त्याच बचत बँकमध्ये कर्ज घ्यायचे असेल, समान बचत बँक खाते म्हणून निवडा.

१५. कर्जाचा उद्देश निवडा आणि कोणत्याही चालू कर्जाची थकबाकी असल्यास त्याची माहिती भरा आणि तसेच एकूण मासिक कौटुंबिक उत्पन्न तपशील भरा.

१६. डिजिटल प्रोत्साहन विभागामध्ये कारागिराकडे कोणताही UPI आयडी असेल तर ते निवडा व UPI आयडी तपशील भरा.

१७. मार्केटिंग सपोर्ट मध्ये, उपलब्ध असलेले मार्केटिंग-संबंधित फायदे निवडा.

१८. 'Accept the Declaration and Terms and Conditions' पर्यायावर टिक करा.

१९. फॉर्म मधील आवश्यक माहिती भरल्यानंतर, सबमिट बटणावर क्लिक करा. त्यानंतर एक नोंदणी क्रमांक तयार केला जाईल तो जतन करून ठेवा.

वरील पद्धतीने तुम्ही प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा लाभ मिळविण्यासाठी ऑनलाइन नोंदणी करून अर्ज करू शकता. ग्रामीण भागात तुमच्या अर्जाची पडताळणीची जबाबदारी ग्रामविकास आणि पंचायती राज विभागाद्वारे केली जाते. शहरी भागासाठी प्रथम स्तरावरील तर अर्जाच्या पडताळणीची जबाबदारी कार्यकारी अधिकारी (ईओ) यांच्याकडे असते. (विश्वकर्मा योजना महाराष्ट्र Vishwakarma Yojana Badal Mahiti).

या पोस्ट देखील तुम्हाला आवडू शकतात

ग्रामपंचायत घराचा उतारा

ग्रामपंचायत अधिनियम १९५८ Pdf

ग्रामपंचायत नमुने १ ते ३३ (अभिलेख)

विवाह नोंदणी फॉर्म नमुना ग्रामपंचायत

सुकन्या समृद्धी योजना योजना संपूर्ण माहिती

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या