ग्रामपंचायत घराचा उतारा Gharcha utara online

ग्रामपंचायत घरठाण उतारा | ग्रामपंचायत घराचा उतारा | ग्रामपंचायत घराचा उतारा online | ग्रामपंचायत घराचा उतारा pdf  Download | Gharacha Utara Online | Gram Panchayat Gharacha Utara | ग्रामपंचायत घराचा उतारा ओंलीने | ग्रामपंचायत असेसमेंट उतारा | नमुना नं. ८ उतारा  | ग्रामपंचायत मिळकत उतारा | ग्रामपंचायत नमुना क्रमांक ८ दाखला

ग्रामपंचायत हद्दीमधील असेलेल्या इमारती किंवा घरे यांची यादी आणि कर आकारणी ग्रामपंचायत दफ्तरी नमुना ८ मध्ये केली जाते. यामध्ये इमारत/घराचे क्षेत्रफळ, लांबी रुंदी, कर आकारणी आणि इतर तपशील असतो. यालाच ग्रामपंचायत घरठाण उतारा किंवा ग्रामपंचायत घराचा उतारा म्हटले जाते.

ग्रामपंचायत घरठाण उतारा | ग्रामपंचायत घराचा उतारा | ग्रामपंचायत घराचा उतारा online | ग्रामपंचायत घराचा उतारा pdf  Download | Gharacha Utara Online | Gram Panchayat Gharacha Utara | ग्रामपंचायत घराचा उतारा ओंलीने | ग्रामपंचायत असेसमेंट उतारा | नमुना नं. ८ उतारा  | ग्रामपंचायत मिळकत उतारा | ग्रामपंचायत नमुना क्रमांक ८ दाखला

ग्रामपंचायत घराचा उतारा किंवा घरठाण उतारा विविध कारणासाठी वापरता येतो. जसे की, मिळकत प्रमाणपत्र मिळविण्यासाठी, कर्ज घेण्यासाठी किंवा अन्य शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी ग्रामपंचायत घराचा उतारा उपयोगी पडतो.

ग्रामपंचायत नमुना ८ घरठाण उतारा कसा वाचावा?

नमुना ८ च्या (ग्रामपंचायत घराचा उतारा) शीर्षक स्थानी 'नमुना ८ नियम ३२ (१) कर आकारणी घरठाण नोंदवही' असा उल्लेख असतो. ग्रामपंचायतीचे नाव, तालुका, जिल्हा याचबरोबर सदर उतारा कोणत्या सालाचा आहे किंवा कोणत्या वर्षासाठी कर आकारणी केली आहे त्याचे वर्ष नमूद असते.

१) अ. क्र.: पहिल्या रकान्यात अनुक्रमांक नमूद असतो.

२) रस्त्याचे नाव: ज्या जागेमध्ये घर आहे त्या रस्त्याचे नाव असते.

३) मिळकत नं/सिटी सर्वे नंबर: गावाचा सिटी सर्वे झाल्या असल्यास त्याचा सर्वे क्रमांक तसेच मिळकत क्रमांक म्हणजेच मालमत्ता क्रमांक या रकान्यात नमूद असतो.

४) मालकाचे नाव: ज्याच्या नावे मालमत्ता आहे किंवा घरठाण/खुली जागा/ जमीन आहे त्या व्यक्तीचे नाव यात नमूद असते.

५) भोगवटादाराचे नाव व पत्ता: जी व्यक्ती सदर जागेत राहत आहे त्या व्यक्तीचे नाव व पत्ता नमूद असते. जर स्वतः मालक राहत असेल तर 'खुद्द' असे नमूद असते.

६) मालमत्तेचे वर्णन: यामध्ये मालमत्तेचे वर्णन (दगड,विटा, वाळू, सिमेंट/आर सी सी, माती कौलारू  इ.) आणि (लांबीxरुंदी, फूट/मीटर) नमूद असते.

७) मालमत्ता बांधकामाचे वर्ष: या रकान्यात बांधकाम होऊन एकूण किती वर्ष झाले ते नमूद असते.

८) क्षेत्रफळ: या रकान्यात चौरस मीटर मध्ये एकूण क्षेत्रफळ नमूद असते.

९) रेडीरेकनेरचे दर: या रकान्यामध्ये जमिनीचा, इमारतीचा आणि जमिनीचा दर चौरस मीटर मध्ये नमूद असतो.

१०) घसारा आणि इमारत भारांक: यामध्ये इमारत/घरचा घसारा दर आणि भारांक नमूद असतो.

११) भांडवली मूल्य: या रकान्यात इमारत/घराचे भांडवली मूल्य नमूद असते.

१२) कराचा दर: इमारत/घराच्या कर आकारणी करण्यासाठीचा कराचा दर नमूद असतो.

१३) कराची रक्कम: या रकान्यात कराची रक्कम नमूद केलेली असते. (उदा. घरपट्टी, दिवाबत्ती कर, आरोग्य कर, पाणी पट्टी इत्यादी).

१४) अपिलाचे निकाल आणि त्यानंतर केलेले फेरफार: कर आकारणीत बदल दर्शविण्यासाठी अपील केली असल्यास, त्याचा निकाल या नमुन्यात नमूद केला जातो.

१५) शेरा: यामध्ये इमारतीवर काही बोजा /कर्ज असेल तर या रकान्यात नमूद केला जातो.

ग्रामपंचायत घराचा उतारा कसा काढावा?

ग्रामपंचायत हद्दीतील तुमच्या घराचा उतारा किंवा घरठाण उतारा मिळविण्यासाठी ऑनलाईन (Gharacha Utara Online) आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येतो. ऑफलाईन अर्ज करण्यासाठी सरपंच/ ग्रामसेवकाला उद्देशून लेखी अर्ज करावा लागतो. अर्जामध्ये स्वतःच्या मालकीचे सर्व्ह/गट नं, मिळकत नं.,  नवीन घर/घर दुरुस्ती/ घरकुल बांधकाम कोणत्या वर्षी झाला त्याचा उल्लेख करावा. याचबरोबर, घराची दिशा, घराची लांबी, मिळकत वर्णन (दगड,विटा, वाळू, सिमेंट/आर सी सी इ. वर्णन) अर्जामध्ये करावे. अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडावीत लागतात.

१) घराचा जागेचा ७/१२ उतारा

२) खरेदी पत्र/बक्षीस पत्र

३) चतुसिमा (रु. १०० च्या बॉंड पेपरवर)

४) आणेवारी संमती पत्र.

ग्रामपंचायत घराचा उतारा pdf नमुना अर्ज Download


ग्रामपंचायत घराचा/घरठाण उतारा ऑनलाईन काढण्यासाठी (ग्रामपंचायत घराचा उतारा online),

- आपले सरकार https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ या महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर भेट द्या.

- आपले सरकार पोर्टलवर रेजिस्ट्रेशन करून घ्या. आणि पोर्टलवर लॉगिन करा.

- भाषा निवडा.

- त्यानंतर, डाव्या बाजूस असलेला 'ग्रामपंचायत व पंचायत राज विभाग' हा पर्याय निवडा.

- त्यानंतर ग्रामपंचायत नमुना ८ चा उतारा ऑनलाईन काढण्यासाठी  'नमुना नं. ८ चा उतारा' हा पर्याय निवडून, 'पुढे जा' हा पर्याय निवडा.

- यानंतर, 'Assessment Certificate' हा पर्याय निवडा.

- फॉर्म मधील संपूर्ण माहिती ८ अ उताऱ्यानुसार भरा.

- 'Apply' बटनवर क्लिक करून 'Application Id' जतन करा आणि विहित शुल्क भरा.

अशाप्रकारे ऑनलाईन अर्ज केल्यानंतर ७ दिवसांमध्ये आपले सरकार मध्ये लॉगिन करून, ग्रामपंचायत नमुना ८ डाऊनलोड करू शकता. (ग्रामपंचायत घराचा उतारा online, ग्रामपंचायत असेसमेंट उतारा).

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या