PM यशस्वी योजना मराठी माहिती Yashasvi Yojana Information in Marathi

PM यशस्वी योजना 2023 | PM यशस्वी योजना मराठी माहिती | Yashasvi Yojana Official Website | पीएम यशस्वी योजना मराठी  | Yashasvi Yojana Information in Marathi

प्रधानमंत्री यशस्वी योजना 2023

आपल्या भारत देशामध्ये आजही अनेक लोकांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे, कित्यके विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात. गरीब परिस्थितीमुळे त्यांचे पालक मुलांचा शिक्षण करत असताना लागणारा खर्च पुरवू शकत नाहीत. भारतीयाच्या तरुण पीढीसाठी चांगली बाब नाही. या सर्व गोष्टी विचारात घेऊन, भारत सरकारने गरीब मुलांच्या शिक्षणाकरिता पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजनेची सुरुवात केली गेली. या योजनेअंतर्गत पात्र असलेल्या विद्यार्थ्यांसाठी उच्च क्षेत्रातील शालेय शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपच्या माध्यमातून शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळते. (यशस्वी योजना 2023).

PM यशस्वी योजना 2023 | PM यशस्वी योजना मराठी माहिती | Yashasvi Yojana Official Website | पीएम यशस्वी योजना मराठी  | Yashasvi Yojana Information in Marathi

पीएम यशस्वी २०२३ ही एक भारत सरकारची स्कॉलरशिप (शिष्यवृत्ती) योजना आहे. पीएम यशस्वी योजनेअंतर्गत लाभार्थी विद्यार्थांना रुपये ७५,००० ते १,२५,००० पर्यंत प्रतिवर्षी आर्थिक मदत केली जाते. या पोस्टमध्ये पीएम यशस्वी योजनेबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.  जसे कि,

• पीएम यशस्वी योजना काय आहे?

• पीएम यशस्वी योजनेची पात्रता काय आहे?

• पीएम यशस्वी योजना निवड प्रक्रिया?

• पीएम यशस्वी योजनेचा लाभ मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे?

• पीएम यशस्वी योजना अर्ज प्रक्रिया?

• पीएम यशस्वी योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख?


पीएम यशस्वी योजना 2023 काय आहे?


पीएम यशस्वी योजनेचा फुल फॉर्म PM Young achievers Scholarship Award Scheme for Vibrant India (YASASVI) असा आहे. भारत सरकारच्या नॅशनल टेस्टिंग एजेंसी या स्वतंत्र संस्थेच्या वतीने पीएम यशस्वी योजना २०२३ अंतर्गत शिष्यवृत्ती प्रवेश परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत विशिष्ट प्रवर्गातील १५००० लाभार्थी विद्यार्थांना रुपये ७५,००० ते १,२५,००० प्रतिवर्षी पर्यंत उच्च क्षेत्रातील शालेय शिक्षणासाठी शिष्यवृत्ती (स्कॉलरशिप) दिली जाते. ही शिष्यवृत्ती अनुदानित आणि विनाअनुदानित खासगी शाळेंमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थांना देखील दिली जाते. इयत्ता ९ वी ते १२ वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही पीएम यशस्वी योजना केंद्रशासनाकडून राबवली जात आहे. (Yashasvi Yojana Information in Marathi).

पीएम यशस्वी योजनेची पात्रता काय आहे?

पीएम यशस्वी योजनेचा लाभ मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांची आवश्यक पात्रता खालीलप्रमाणे: (PM Yashasvi Yojana Eligibility).

१. लाभार्थी विद्यार्थी हा इतर मागासवर्गीय (OBC), आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग (EBC), भटक्या आणि अर्ध-भटक्या जमाती (DNT/NT/SNT) या प्रवर्गातील असावा.

२. पीएम यशस्वी योजनेचा लाभ मिळविण्यासाठी विद्यार्थांच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न २.५० लाखपेक्षा कमी असावे.

३. इयत्ता ९ वी ते १२ वी मध्ये उच्च श्रेणीच्या शाळेत प्रवेश घेतलेले विद्यार्थी पीएम यशस्वी योजनेचा लाभ मिळवू शकतात.

उच्च श्रेणीच्या शाळांची यादी इथून ऑनलाईन इथून तपासू शकता - https://yet.nta.ac.in/frontend/web/schoollists/index

पीएम यशस्वी योजना निवड प्रक्रिया?

वरीलप्रमाणे नमूद पीएम यशस्वी योजनेचे परीक्षेचे नियोजन भारत सरकारच्या NTA - नॅशनल टेस्टिंग एजेंसी या संस्थेमार्फ़त केले जाते. नॅशनल टेस्टिंग एजेंसीमार्फत एक प्रवेश प्रक्रिया आयोजित केली जाते. त्या प्रवेश परीक्षेच्या (Entrance Exam) गुणवत्तेच्या आधारे पीएम यशस्वी योजनेची निवड प्रक्रिया केली जाते. ही परीक्षा पात्र असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वपूर्ण असते. यामध्ये विज्ञान (20 प्रश्न, एकूण 80 गुण), गणित (30 प्रश्न, एकूण 120 गुण), सामान्य ज्ञान (25 प्रश्न, एकूण 100 गुण), सामाजिक शास्त्र (25 प्रश्न, एकूण गुण - 100 गुण) इत्यादी विषय असतात. ही परीक्षा मराठी आणि हिंदी भाषांमध्ये होणार आहे. तसेच परीक्षेच्या वेळ 2 तास 30 मिनिट असणार आहे. या शिष्यवृत्तसाठी आणि परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या वियार्थ्यांना कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही. या शिष्यवृत्तसाठी आणि परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करणे अनिवार्य आहे.

पीएम यशस्वी योजनेचा लाभ मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे?


पीएम यशस्वी योजनेचा लाभ मिळविण्यासाठी खालीलप्रमाणे कागदपत्रांची आवश्यकता असते. (https yet nta ac in Registration Documents).

१. बँक खाते तपशील

२. आधार कार्ड

३. उत्पन्न प्रमाणपत्र

४. जातीचा दाखला

५. शैक्षणिक प्रमाणपत्रे

६. फोटो

पीएम यशस्वी योजना अर्ज प्रक्रिया?

१. PM यशस्वी शिष्यवृत्ती योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम एनटीए च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या: https://yet.nta.ac.in (https //yet.nta.ac.in Registration).

२. वेबसाइटवर स्वतःची माहिती भरून नोंदणी करा आणि युजरनेम आणि पासवर्ड वापरून पोर्टलवर लॉग इन करा.

३. २०२३ च्या यशस्वी शिष्यवृत्ती प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी करा.

४. दिलेल्या अर्जात आवश्यक माहिती भरा.

५. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. आणि विहित मुदतीपूर्वी अर्ज पत्र सादर करा.

पीएम यशस्वी योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख?

थेट अर्ज करण्यासाठी क्लिक करा  – https://yet.nta.ac.in/frontend/web/registration/index

पी एम यशस्वी स्कॉलरशिप योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट, 2023 होती परंतु यामध्ये मुदतवाढ करून आता 17 ऑगस्ट, 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख म्हणून घोषित करण्यात आली आहे. (Pm  Yashasvi Scholarship Yojana Last Date).

पीएम यशस्वी संपर्क:

• इमेल आयडी - [email protected]

• संपर्क क्रमांक - 011-40759000, 011-69227700

• वेबसाइट - https://yet.nta.ac.in/

या पोस्ट देखील तुम्हाला आवडू शकतात




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या