ग्रामपंचायत निवडणूक 2022 Gram Panchayat Election 2022

ग्रामपंचायत निवडणूक | ग्रामपंचायत निवडणूक 2022 | Gram Panchayat Election 2022 Maharashtra List | Gram Panchayat Election Maharashtra | Gram Panchayat Election 2022 | Upcoming Gram Panchayat Election in Maharashtra | Gram Panchayat Nivadnuk | Gram Panchayat Election | Gram Panchayat Election Date 2022 Maharashtra | Gram Panchayat Election Time Table 2022 Maharashtra

ग्रामपंचायत निवडणूक | ग्रामपंचायत निवडणूक 2022 | Gram Panchayat Election 2022 Maharashtra List | Gram Panchayat Election Maharashtra | Gram Panchayat Election 2022 | Upcoming Gram Panchayat Election in Maharashtra | Gram Panchayat Nivadnuk | Gram Panchayat Election | Gram Panchayat Election Date 2022 Maharashtra | Gram Panchayat Election Time Table 2022 Maharashtra

महाराष्ट्र राज्यातील जानेवारी 2021 ते मे 2022 या कालावधीत मुदत संपलेल्या आणि जून 2022 ते सप्टेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नवीन ग्रामपंचायत स्थापित अशा एकूण 62 तालुक्यातील 271 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकेचा कार्यक्रम राबविण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम मधील कलम 10 अ पोटकलम (4) मधील तरतुदींनुसार राज्यातील 271 ग्रामपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रम महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. ४ ऑगस्ट, २०२२ रोजी मतदान आणि ५ ऑगस्ट, २०२२ रोजी मतमोजणी व निकाल जाहीर होणार आहे. तर ५ जुलै पासून आचासंहिता लागू करण्याची घोषणा निवडणूक आयुक्तांनी केली आहे. त्यानुसार संबंधित जिल्ह्यातील तहसीलदारांकडून ५ जुलै, २०२२ रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करण्यात येईल. (Gram Panchayat Election Date 2022 Maharashtra).


महाराष्ट्र निवडणूक आयोगाने दिलेल्या दिनांक २८ जून, २०२२ च्या आदेशामधील नमूद परिशिष्ट १ मध्ये दर्शविलेल्या वेळापत्रकानुसार (परिशिष्ट खाली नमूद केले आहे) राज्यातील 62 तालुक्यातील 271 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. (Gram Panchayat Election 2022).

ग्रामपंचायत निवडणूक 2022 आचारसहिंता:

महाराष्ट्र निवडणूक आयोगाच्या आचारसंहिता बाबतच्या पत्रानुसार, निवडणुका असलेल्या ग्रामपंचातीमध्ये निवडणूक कार्यक्रम झाल्यापासून निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू राहील. या ग्रामपंचायतीमधील क्षेत्रातील मतदारांवर विपरीत प्रभाव टाकणारी कोणतीही कृती किंवा घोषणा मंत्री, खासदार, आमदार व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकाऱ्यांना आचारसंहिता कालावधीत कुठेही करता येणार नाही.

• महाराष्ट्र ग्रामपंचायत मतदार यादीत तुमचे नाव तपासा.

ग्रामपंचायत निवडणूक 2022 ग्रामपंचायत नामनिर्देशन:

या निवडणुकांसाठी नामनिर्देशनाची प्रक्रिया संगणक प्रणालीद्वारे राबविण्यात येणार आहे.

दिनांक 6 डिसेंबर, 2021 रोजी राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार सार्वत्रिक किंवा पोटनिवडणुक कार्यक्रमांसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा शेवटची तारीख ही 31 डिसेंबर, 2022 किंवा त्यापूर्वीचा असेल. नामनिर्देशनपत्रासोबत वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी पडताळणी समितीकडे सादर केलेल्या अर्जाची सत्यपत्र किंवा पडताळणी समितीकडे अर्ज केला असल्याबाबतचा अन्य कोणताही पुरावा आणि निवडून आल्याच्या दिनांकापासून 12 महिन्यांच्या आत पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र सादर करील, असे हमीपत्र सादर करण्याची मुभा उमेदवारांना दिली आहे.

महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत निवडणूक 2022 आदेश:

• मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० अशी असेल.

• निवडणूक कार्यक्रम सुरू झाल्यानंतर काही कारणास्तव एखाद्या ग्रामपंचायातींच्या निवडणूकी संदर्भात मा. न्यायालयाचे स्थगिती आदेश प्राप्त झाल्यास, संबंधीत जिल्ह्याधिकाऱ्यांना त्यांच्या स्तरावर स्थगितीची कार्यवाही करता येईल.

• ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शी पद्धतीने पार पाडण्याच्या दृष्टीने आयोगाकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. (Gram Panchayat Election Date 2022 Maharashtra).


ग्रामपंचायत निवडणूक 2022 वेळापत्रक:

महाराष्ट्र निवडणूक आयोग क्र. रानिआ/ग्रापंनि/२०२०/प्र. क्र.०४/का.०८ आणि २८/०६/२०२२ च्या आदेशा सोबतचे पत्रनुसार (परिशिष्ट १) (Gram Panchayat Election Time Table 2022 Maharashtra):

१. तहसिलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करण्याचा दिनांक: दिनांक ०५/०७/२०२२.

२. नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा कालावधी: दिनांक १२/०७/२०२२ ते १९/०७/२०२२ वेळ- स.११.०० ते दु. ३.००.

३. नामनिर्देशनपत्रे छाननी करण्याचा दिनांक: दिनांक २०/०७/२०२२ वेळ: स. ११.०० वा पासून छाननी संपेपर्यंत.

४. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक: दि. २२/०७/२०२२ दु. ३.०० वाजेपर्यंत.

५. निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक व वेळ:  दिनांक २२/०७/२०२२ दुपारी ३.०० वा. नंतर

६. मतदान करण्याचा दिनांक: दिनांक ०४/०७/२०२२ (गुरुवार), वेळ - सकाळी ७.३० वा. ते सायं ५.३० वा. पर्यंत.

७. मतमोजणी व निकाल घोषित करण्याचा दिनांक: दिनांक ०५/०८/२०२२ शुक्रवार.

जिल्हानिहाय ग्रामपंचायत निवडणूक यादी 2022:

राज्यातील १५ जिल्ह्यातील, ६२ तालुक्यात एकूण २७१ ग्रामपंचायतीची वर्गवारी खालीलप्रमाणे: 

नाशिक- ४०, धुळे-५२, जळगाव-२४, अहमदनगर -१५, पुणे- १९, सोलापूर - २५, सातारा - १०, सांगली- १, औरंगाबाद-१६, जालना-२८, बीड-१३, लातूर -९, उस्मानाबाद-११, परभणी-३, बुलढणा-५ 

एकूण-२७१

ग्रामपंचायत निवडणूक 2022 महाराष्ट्र यादी

ग्रामपंचायत निवडणूक 2022

gram panchayat election 2022 maharashtra list gram panchayat election maharashtra gram panchayat election 2022 Maharashtra election date 2022 Upcoming gram Panchayat election in maharashtra gram panchayat nivadnuk gram panchayat election gram panchayat election 2021 maharashtra Gram Panchayat election time table 2022 Maharashtra ग्रामपंचायत निवडणूक 2022 ग्रामपंचायत निवडणूक

जिल्हा, तालुकानिहाय यादी - पीडीएफ (PDF) डाउनलोड करा. (Gram Panchayat Election 2022 Maharashtra List).

या पोस्ट देखील तुम्हाला आवडू शकतात.

ग्रामपंचायत निवडणूक पात्रता, कागदपत्रे, प्रक्रिया

ग्रामपंचायत निवडणूक नियम व अटी

ग्रामपंचायत सरपंच अपात्र नियम

ग्रामपंचायत सरकारी योजना

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या