ग्रामपंचायत निवडणूक नियम Maharashtra Grampanchayat Election

ग्रामपंचायत निवडणूक नियम व अटी । ग्रामपंचायत निवडणूक कायदा । ग्रामपंचायत निवडणूक नियमावली । ग्रामपंचायत निवडणूक अपत्य नियम । Gram Panchayat Nivadnuk Maharashtra। ग्रामपंचायत निवडणूक आरक्षण नियम । ग्रामपंचायत निवडणूक अपत्य नियम 2020 । ग्रामपंचायत निवडणूक आरक्षण नियम । ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहिता नियम । ग्रामपंचायत निवडणूक 2021 । सरपंच निवडणूक नियम 2021 pdf । ग्रामपंचायत निवडणूक नियम । ग्रामपंचायत निवडणूक नियम 2020 । ग्रामपंचायत निवडणूक अधिनियम । Panchayat Election Maharashtra 2022 । Maharashtra Grampanchayat Election 2021.

१९९२ भारतीय राज्यघटनेत स्थानिक स्वराज्य ओळखल्या जाणाऱ्या ग्रामपंचायती, जिल्हा परिषदा/पंचायत समित्या, नगर परिषदा/नगरपंचायती व महानगरपालिका यांच्या निवडणूका मुक्तपणे आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी देशातील प्रत्येक राज्यात एक राज्य निवडणूक आयोगाच्या स्थापना करण्यात आली. ग्रामपंचायत निवडणूकीचा कार्यक्रम महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कायदा १९५८ व मुंबई ग्रामपंचायत निवडणूक नियम, १९५९ या कायद्यानुसार राबविण्यात येतो.

ग्रामपंचायत निवडणूक नियम व अटी । ग्रामपंचायत निवडणूक कायदा । ग्रामपंचायत निवडणूक नियमावली । ग्रामपंचायत निवडणूक अपत्य नियम । Gram Panchayat Nivadnuk Maharashtra। ग्रामपंचायत निवडणूक आरक्षण नियम । ग्रामपंचायत निवडणूक अपत्य नियम 2020 । ग्रामपंचायत निवडणूक आरक्षण नियम । ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहिता नियम । ग्रामपंचायत निवडणूक 2021 । सरपंच निवडणूक नियम 2021 pdf । ग्रामपंचायत निवडणूक नियम । ग्रामपंचायत निवडणूक नियम 2020 । ग्रामपंचायत निवडणूक अधिनियम । Panchayat Election Maharashtra 2022 । Maharashtra Grampanchayat Election 2021.

नामनिर्देशनपत्र दाखल करणे, छाननी, उमेदवारी मागे घेणे, चिन्ह वाटप, निवडणूक उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे, मतदान आणि मतमोजणी हे निवडणूक कार्यक्रमातील महत्वाचे टप्पे आहेत.


महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग:

महाराष्ट्र राज्यात राज्य निवडणूक आयोगाची स्थापना २६, एप्रिल १९९४ साली करण्यात आली. राज्य निवडणूक आयोग हा भारत निवडणूक आयोगाच्या भिन्न असून ही एक राज्यस्तरावरील स्वतंत्र घटनात्मक संस्था आहे. (State Election Commission, Maharashtra).

राज्य निवडणूक आयोगाचे प्रमुख राज्य निवडणूक आयुक्त असतात. या आयोगाचे कामकाज विभागीय पातळीवर विभागीय आयुक्त, जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी, महानगरपालिका पातळीवर महापालिका आयुक्त यांचे मार्फत पार पाडले जाते. मतदार याद्या तयार करणे, निवडणूकांचे आयोजन, संचालन आणि नियंत्रण या बाबी राज्य निवडणूक आयोग हाताळत असते.

ग्रामपंचायत निवडणूक सदस्य संख्या:

ग्रामपंचायत सदस्यांची त्या त्या ग्रामपंचायत क्षेत्रातील लोकसंख्येनुसार ठरविण्यात येते. ग्रामपंचायत  लोकसंख्यानिहाय सदस्यांची संख्या खालीलप्रमाणे:

ग्रामपंचायत लोकसंख्या / निवडून द्यावयाची सदस्य संख्या:

• १५०० व त्यापेक्षा कमी- ७ सदस्य

• १५०१ ते ३००० - ९ सदस्य

• ३००१ ते ४५०० - ११ सदस्य

• ४५०१ ते ६००० - १३ सदस्य

• ६००१ ते ७५०० - १५ सदस्य

• ७५०१ व अधिक - १७ सदस्य

निवडणुकीद्वारे भरावयाच्या जागांच्या एकूण संख्येच्या एक-तृतीयांश जागा स्त्रियांसाठी राखून ठेवल्या जातात. (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व मागासवर्गीय जागांसह). (Gram Panchayat Nivadnuk Maharashtra).

ग्रामपंचायत निवडणूक नियम व अटी:

• ग्रामपंचायत सदस्यांची निवडणूक किंवा कोणतेही रिक्त पद भरण्यासाठी घ्यावयाची निवडणूक राज्य निवडणूक आयोग नेमून देण्यात येईल त्या दिनाकांस घेण्यात येते.

• संबंधित जिल्हाधिकारी हे ग्रामपंचायत निवडणूकीसाठी मतदार याद्या तयार करण्यासाठी तसेच प्रभाग (वार्ड) विभागणीचे संपूर्ण कामकाज पाहत असतात.

• ग्रामपंचायत निवडणुकी करिता स्वतंत्र अशी मतदार यादी बनविण्यात येत नसून, संबंधित महाराष्ट्र विधानसभेची यादी वापरण्यात येते.

• प्रभागाप्रमाणे विभागणी केलेली मतदार यादी राज्य निवडणूक आयोग निर्देशित करेल त्या तारखेला तहसीलदार मार्फत प्रसिद्ध केली जाते.

• मतदार यादीत नाव असलेल्या आणि १८ वर्षे पूर्ण असलेल्या व्यक्तीस मतदानाचा हक्क बजावता येतो.


• एखाद्या मतदाराचे एकापेक्षा जास्त वेळा एकाच किंवा वेगवेगळ्या प्रभागाच्या मतदार यादीत नाव असल्यास त्याला एका पेक्षा जास्त वेळा मतदान करता येत नाही. 

• एकापेक्षा जास्त ठिकाणी मतदार म्हणून नाव नोंदविल्यास  जास्तीत जास्त एका वर्षापर्यंत शिक्षा करण्याची तरतूद आहे.

• ग्रामपंचतीचा व सदस्यांचा कालावधी ५ वर्षे इतका असतो आणि तो ग्रामपंचायतीच्या पहिल्या सभेपासून गणला जातो.

• ग्रामपंचायत निवडणूकांसाठी एक किंवा अनेक ग्रामपंचायतीसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची नेमणूक  तहसिलदार करतात. तसेच मतदान केंद्राध्यक्षाची नेमणूक निवडणूक अधिकारी तथा तहसिलदार करतात.

• उमेदवाराला मागणीप्रमाणे नामनिर्देनपत्र पुरविण्याची जबाबदारी संबधित ग्रामपंचायतीच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांची असते.

• ग्रामपंचतीचा निवडणूक कार्यक्रम तहसिल, ग्रामपंचायत कार्यालयाच्या नोटीसबोर्डवर सूचना देऊन, गावातील चावडीच्या ठिकाणी सूचना देऊन व दवंडी देऊन इ. पद्धतीने प्रसिध्द केला जातो.

ग्रामपंचायत निवडणूक अपत्य नियम:

मुंबई ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम १९९५ नुसार प्रारंभाच्या दिनांकास म्हणजेच १३ सप्टेंबर २००० रोजी असलेल्या अपत्यांची संख्या दोनपेक्षा अधिक असेलतरी अशी व्यक्ती ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यास अपात्र ठरणार नाही. तसेच, अधिनियमाच्या प्रारंभाच्या दिनांकापासून एक वर्षाच्या कालावधीत म्हणजेच १३ सप्टेंबर २००० ते १२ सप्टेंबर २००१ या कालावधीत एकाच प्रसुतीमध्ये जन्माला आलेले एक किंवा एकापेक्षा अधिक अपत्ये ही अपात्रतेसाठी विचारात घेतली जात नाहीत. मात्र, १२ सप्टेंबर २००१ नंतर झालेल्या अपत्यामुळे एकूण अपत्यांच्या संख्येत भर पडत असल्यास अशा व्यक्ती निवडणूक लढविण्यास अपात्र ठरतात. (ग्रामपंचायत निवडणूक अपत्य नियम).

ग्रामपंचायत निवडणूक आरक्षण नियम:

ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व महिला (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसह) या प्रवर्गांना आरक्षण लागू होते. (Gram Panchayat Election Reservation).

ग्रामपंचात निवडणुकीमध्ये खालील निकषांवर आरक्षण ठरविले जाते:

१) सदस्य संख्येच्या ५०% जागा महिलांसाठी राखीव असतात.

२) अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीकरिता लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार जागा उतरत्या क्रमाने आरक्षित करण्यात येतात.

३) नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरिता एकूण जागांच्या २७% जागा सोडत पद्धतीने आरक्षित करण्यात येतात. मात्र अनुसूचित क्षेत्रासाठी अनुसूचित जाती व जमातीच्या जागा वगळून उर्वरित जांगांपैकी २७% जागा नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव असतात.

४) प्रत्येक आरक्षण गटात (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, व नागरिकांचा मागास प्रवर्ग) ५०% जागा महिलांसाठी तसेच तीन जागांच्या प्रभागात जास्तीत जास्त दोन आणि दोन जागांच्या प्रभागात जास्तीत जास्त एक जागा महिलांसाठी राखीव असतात. (ग्रामपंचायत निवडणूक आरक्षण नियम).

संदर्भ: राज्य निवडणूक आयोगाचा आदेश - रा.नि.आ./ग्रापनि-२०११/प्र. क्र. २/का. ८ दिनांक १३.५ .२०११).

ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहिता नियम:

ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये आचार संहितेची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी यासाठी भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २४३ व २४३ झेड ए तसेच महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १० ए (४) नुसार ग्रामपंचायत निवडणुका पारदर्शक, भयमुक्त वातावरणात व्हाव्यात यासाठी आचारसंहितेची अंमलबजावणी करण्याबाबत आवश्यक ते अधिकार देण्याचे अधिकार राज्य निवडणूक आयोगाला असतात.

उमेदवाराला हा निवडणूक प्रचार दरम्यान मतभेद, परस्पर द्वेष निर्माण होईल किंवा विविध जाती व समाज यांच्यामध्ये धार्मिक किंवा भाषिक तणाव निर्माण होईल अशा कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होता येत नाही. तसेच त्यांना मंदिर, मशिद, चर्च, गुरुद्वारा यासारखी धार्मिक ठिकाणे किंवा पूजे अर्चेचा इतर ठिकाणी निवडणुक प्रचारासाठी चर्चापीठ म्हणून वापरता येत नाही. तसेच, मते मिळविण्यासाठी जात किंवा समुदायाच्या भावनांना आवाहन करता येत नाही. (ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहिता नियम).


ग्रामपंचायत निवडणूक उमेदवारी मागे घेणे:

ग्रामपंचायत उमेदवारी मागे मागे घेण्याची नोटीस उमेदराने विहित नमुन्यात स्वतः किंवा त्याने लिखित प्राधिकृत केलेल्या व्यक्तिद्वारे निवडणूक निर्णय अधिकारी (तहसिलदार) यांच्या कार्यालयात सादर करणे आवश्यक असते. उमेदवारी मागे मागे घेण्याचा अंतिम दिवस व वेळ राज्य निवडणूक आयोगाकडून निश्चित करण्यात येते. (Gram Panchayat Nivadnuk Maharashtra).

उमेदवाराने त्याची उमेदवारी मागे घेण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबी खालीलप्रमाणे:

१) उमेदवारी मागे घेण्याची सूचना लेखी स्वरूपात सादर करणे आवश्यक आहे.

२) उमेदवारी मागे घेण्याच्या सूचनेवर त्याची स्वाक्षरी/अंगठा असणे आवश्यक आहे.

३) उमेदवारी मागे घेण्याची सूचना उमेदवाराने स्वतः किंवा त्याने लेखी प्राधिकृत केलेल्या व्यक्तिद्वारे निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे सादर करणे आवश्यक आहे.

४) उमेदवारी मागे घेण्याची सूचना निवडणूक आयोगाने विहित करण्यात आलेल्या अंतिम दिनाकांस ३ वा. पूर्वी निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे सादर करणे आवश्यक आहे.

संदर्भ: महाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक नियम १९५९ चे नियम १३.

ग्रामपंचायत निवडणूक चिन्ह वाटप:

निवडणुक चिन्हांचे आरक्षित चिन्हे व मुक्‍त चिन्हे असे दोन प्रकार आहेत. मान्यताप्राप्त राष्ट्रीय व राज्यस्तरीय राजकीय आरक्षित चिन्हांचे तक्ते जिल्हा निवडणुक अधिकारी, निवडणुक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात तसेच राज्य निवडणुक आयोगाच्या संकतस्थळावर पहावयास मिळतात. राज्य निवडणूक आयोग मुक्‍त चिन्हांची यादी तयार करुन प्रसिद्ध करतात. 

निवडणुक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांना निवडणुक चिन्हांचे वाटप निवडणुक निणय अधिकारी हे करतात. निवडणुक लढविणाऱ्या उमेदवारांना निवडणुक चिन्हांचे वाटप हे राज्य निवडणुक आयोगाने निश्‍चित करुन दिलेल्या कार्यक्रमानुसार निवडणुक निर्णय अधिकारी यांच्या कार्यलयामध्ये केले जाते. त्याबाबत उमेदवारांना लेखी पूर्व सूचना दिली जाते. 

उमेदवारांना चिन्ह वाटपाची कार्यपध्दती खालीलप्रमाणे आहे.

१) कोणत्याही प्रभागात कोणतेही निवडणुक चिन्ह एकापेक्षा अधिक उमेदवारांना वाटप करण्यात येत नाही. 

२) निवडणूक चिन्ह वाटप करतांना राज्य निवडणुक आयोगाकडील अधिकृत अद्यावत चिन्हांच्या तक्त्यातील मुक्‍त चिन्हांपैकी चिन्हे उमेदवारांना नेमुन देण्यात येतात.

३) चिन्हे नेमून देताना उमेदवाराला कोणत्याही प्रकारे चिन्हांकरिता प्राधन्यक्रम देण्याच्या अथवा ठरावीक चिन्ह मागण्याचा अधिकार नसतो. निवडणुक लढविणाऱ्या उमेदवाराच्या यादीतील एका उमेदवारास एक या प्रमाणे मुक्‍त चिन्हांच्या तक्त्यानुसार चिन्ह नेमुन देण्यात येतात.

४) अशा प्रकारे एका ग्रामपंचायतीमध्ये सर्व प्रभागातील निवडणुक लढविणाऱ्या सर्व उमंदवारांना एका उमेदवारास एक या प्रमाणे चिन्ह वाटप करतांना मुक्‍त चिन्हांच्या तक्त्यातील सर्व चिन्हे संपुष्टात आल्यास पुढील उमेदवारास तक्त्यातील पहिल्या क्रमांकावरील चिन्हापासुन चिन्हाचे वाटप करण्यात येते.

संदर्भ: महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम १० (अ) च्या तरतुदीनुसार व राज्य निवडणुक अयोगाचे आदेश दि. १३.११.२००७.


ग्रामपंचायत निवडणूक नामनिर्देशन प्रक्रिया:

एखादी व्यक्ती एकापेक्षा जास्त प्रभागातून/मतदार संघातून निवडणूक लढवू शकते. ग्रामपंचायत निवडणूकीसाठी एका प्रभागामध्ये/मतदारसंघामध्ये एका उमेदवारास जास्तीतजास्त चार नामनिर्देशन पत्र भरता येतील ( राज्य निवडणूक आयोग पत्र दि. ०९.१०.१९९७).

ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी नामनिर्देशनपत्राचा नमुना उपलब्ध करून देण्यात येतो आणि त्यासाठी त्यावेळी अस्तित्वात असलेल्या सूचनेनुसार शुल्क आकारले जाते. उमेदवाराने विहित नमुन्यातील नामनिर्देशनपत्रासह खालील  शपथपत्रे/कागदपत्रे सादर करावयाची असतात.

१) राज्य निवडणूक आयोगाने दिनांक १५ मार्च, २००४ रोजीच्या आदेशानुसार विहित केलेले मालमत्ता, दायित्व आणि गुन्हेगारी संदर्भातील परिशिष्ट एक मधील घोषणापत्र.

२) राज्य निवडणूक आयोगाने दिनांक ३१ मार्च, २००९ रोजीच्या पत्रानुसार विहित केलेले अपत्यासंदर्भातील घोषणापत्र.

३) शौचालय असल्याबाबतचे प्रमाणपत्र.

४) मतदारयादीची प्रामाणित प्रत (उमेदवार अन्य प्रभागातील असेल तर).

५) उमेदवार राखीव जागेवरून निवडणूक लढवित असेल तर, सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जातीचे प्रमाणपत्र आणि पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र यांची सत्यप्रत.

उमेदवाराने वरिलप्रमाणे कागदपत्रे दिलेल्या मुदतीमध्ये सादर न केल्यास उमेदवाराचे नामनिर्देशनपत्र नामंजूर करण्यात येते.

नामनिर्देशन सोबतच उमेदराला रोखीने अनामत रक्कम ठेवणे आवश्यक असते. ही रक्कम सर्वसाधारण जागेकरिता रु. ५०० व राखीव जागेसाठी रु. १०० इतकी असते. ही अनामत रक्कम उमेदवार पराभूत झाल्यास व त्यास एकूण वैध मतांच्या १/८ पेक्षा अधिक मते मिळाली तर रक्कम जप्त होते.

ग्रामपंचायत नामनिर्देशनपत्रांची छाननी:

नामनिर्देशनपत्रांची छाननी ही करण्यात येणारी चौकशी ही संक्षिप्त चौकशी या प्रकारची असते. त्यामध्ये खालील बाबींची पडताळणी केली जाते.

१) चालू मतदारयादीच्या संबंधित भागाची प्रत किंवा उमेदवार याचे नाव असलेल्या मतदार यादीतील नोंदणीची प्रमाणित प्रत.

२) वयासंबंधी समाधानकारक पुरावा.

३) अनामत रक्‍कम भरल्याची पावती किंवा चलनाची प्रत.

४) नामनिर्देशन पत्राची पोच आणि छाननीची सुचना.

५) अपराधसिद्धीच्या तपशिलासंबंधात आणि अपत्यासंबंधात विहित नमुन्यामध्ये दाखल केलेल्या घोषणापत्राची प्रत.

६) नामनिर्देशनसंदर्भात जो आक्षेप घेण्यात येईल अशा आक्षेपाचे खंडन करण्यासाठी आवश्यक असेल असा इतर कोणताही पुरावा किंवा साहित्य.

७) राखीव जागेवर निवडणूक लढविणाऱ्याउमेदवाराने जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्राच्या मूळ प्रती.

ग्रामपंचायत नामनिर्देशनपत्र वैध व अवैध ठरविण्याचे निकष:

नामनिर्देशनपत्र फेटाळण्याची सर्वसाधारण कारणे खालाल प्रमाणे आहेत.

१) सदस्य होण्यास निकषांनुसार पात्र/अहर्ता नसणे,

२) सदस्य होण्यास कायद्यानुसार अपात्र/ निरर्ह ठरविले असल्यास,

३) नामनिर्देशनपत्र मुदतीमध्ये दाखल करण्यात आले नसल्यास,

४) नामनिदेशनपत्र निवडणुक निर्णय अधिकारी यांच्या व्यतिरिक्त अन्य व्यक्तीकडे सादर केले असल्यास,

५) नामनिर्देशनपत्र विहित नमुन्यामध्ये नसल्यास,

६) नियमानुसार अनामत रक्‍कम भरली नसल्यास,

७) जागा ज्या प्रवर्गाच्या व्यक्तीसाठी राखून ठेवली आहे त्या प्रवर्गातील व्यक्ती नसल्यास,

८) नामनिर्देशनपत्रामध्ये वय नमुद केले नसल्यास,

९) नामनिर्देशनपत्रासोबत विहित नमुन्यातील घोषणापत्र सादर करण्यास कसुर केला असल्यास,

१०) राखीव जागेवर निवडणुक लढविणाऱ्या उमेदवाराने जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणापत्राच्या मूळ प्रती दाखविल्या / उपस्थित केल्या नसल्यास ग्रामपंचायत निवडणूक उमेदवाराचे नामनिर्देशनपत्र फेटाळली/रद्द केले जाते.

संदर्भ: ग्रामप्रामपंचायत निवडणुक नियम १९५९ चे नियम ११.

या पोस्ट देखील तुम्हाला आवडू शकतात.

महाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक २०२२

महाराष्ट्र ग्रामपंचायत मतदार यादी

ग्रामपंचायत निवडणूक पात्रता, कागदपत्रे, प्रक्रिया

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या