प्रधानमंत्री स्वनिधी योजना PM Svanidhi Scheme in Marathi

प्रधानमंत्री स्वनिधी योजना | स्वनिधी योजना मराठी Pm Svanidhi yojana | स्वनिधी योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन | PM स्वनिधी योजना Online Apply | PM स्वनिधी योजना App | PM Svanidhi Yojana Online Registration | स्वनिधी योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन Status | Svanidhi Yojana 2022 Apply online | PM Street Vendor AtmaNirbhar Nidhi Scheme Apply Online | प्रधानमंत्री स्वनिधी योजना online form | Svanidhi Scheme in Marathi | पीएम स्वनिधि योजना | PM Svanidhi Information in Marathi

प्रधानमंत्री स्वनिधी योजना | स्वनिधी योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन | PM स्वनिधी योजना Online Apply | PM स्वनिधी योजना App | PM Svanidhi Yojana Online Registration | स्वनिधी योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन status | स्वनिधी योजना मराठी Pm svanidhi yojana | Pm svanidhi login | Svanidhi yojana 2021 apply online | PM Street Vendor AtmaNirbhar Nidhi scheme apply online | PM svanidhi | PM svanidhi scheme | PM svanidhi portal | PM svanidhi mohua gov in | 10,000 Loan for street vendors apply online | प्रधानमंत्री स्वनिधी योजना online form | Svanidhi scheme in marathi | पीएम स्वनिधि योजना

रस्त्यावरील विक्रेते हे शहरी अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचे घटक असतात. शहरवासीयांच्या दारापाशी परवडणाऱ्या दरात वस्तू आणि सेवा पुरविण्यात ते महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांना वेगवेगळ्या भागात विक्रेते, फेरीवाले, थेलेवाला, इत्यादी म्हणून ओळखले जाते. त्यांच्याद्वारे पुरवल्या जाणार्‍या वस्तूंमध्ये भाज्या, फळे, रस्त्यावरील खाद्यपदार्थ, चहा, पकोडे, ब्रेड, अंडी, कापड, कपडे, पादत्राणे, कारागीर उत्पादने, पुस्तके इत्यादींचा समावेश असतो. सेवांमध्ये न्हाव्याची दुकाने, मोची, पान दुकाने, कपडे धुण्याची सेवा इत्यादींचा समावेश असतो.

कोविड-19 महामारी आणि परिणामी लॉकडाऊनचा रस्त्यावर विक्रेत्यांच्या जीवनमानावर विपरित परिणाम झाला आहे. ते सहसा लहान भांडवलसह काम करतात. त्यामुळे, रस्त्यावरील विक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी खेळत्या भांडवलासाठी कर्ज देण्याची नितांत गरज आहे.

हे देखील वाचा: पीएम किसान सन्मान निधी योजना लाभार्थी यादी


स्वनिधी योजना मराठी Pm svanidhi yojana:

देशातील दुर्बल घटकांचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र आणि शासनाकडून अनेक कर्ज योजना राबविल्या जातात. या योजना गरिबांना स्वस्तात कर्ज उपलब्ध करून दिले जाते. त्यापैकी प्रधानमंत्री स्वनिधी योजना ही देशातील रस्त्यावरील विक्रेत्यांना व्याजमुक्त कर्ज दिले जाते.

पंतप्रधान स्वनिधी योजनेअंतर्गत (PM Svanidhi Scheme), छोटे व्यवसायिक/व्यापारी/विक्रेते/फेरीवाले यांना खेळते भांडवल म्हणून रु.10,000 रुपयांचे असुरक्षित कर्ज दिले जाते. कर्जदाराने त्याची परतफेड जास्तीत -जास्त एका वर्षात करायची असते. कर्जाची वेळेवर परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना कर्जावर 7% व्याजाचे अनुदान दिले जाते. तसेच, लाभार्थींनी डिजिटल व्यवहार केल्यास त्यांना अतिरिक्त 1,200 रुपयांचा परतावा देखील मिळवता येतो. योजनेचा लाभ घेण्यासाठी वैध नोंदणी तसेच, व्यवसायिक प्रमाणपत्र/परवाना आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत, स्थानिक सरकारे, राष्ट्रीय बँका आणि वित्तीय संस्था फेरीवाल्यांना कर्ज उपलब्ध करून देतील. (PM Street Vendor AtmaNirbhar Nidhi).

प्रधानमंत्री स्वनिधी या योजनेअंतर्गत, प्रत्येक लाभार्थीला केंद्र सरकारकडून रु.10,000 चे आर्थिक कर्ज मिळते. हे कर्ज मिळवण्यासाठी अर्जदारांनी शासनाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. आतापर्यंत 27.33 लाख अर्ज नोंदणी झाली असून, त्यात त्यापैकी,14.34 अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. स्वनिधी योजनेंतर्गत आतापर्यंत, ७.८८ लाख रुपयांचे कर्ज वाटप केले गेले आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून लोकांची क्षमता वाढवण्यासाठी आणि कोरोना संकटाच्या वेळी व्यवसायाला पुनरुज्जीवित करून स्वावलंबी भारत मोहीम यशस्वी करण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली. (PM Svanidhi Information in Marathi).

हे देखील वाचा: प्रधानमंत्री आवास योजना सबसिडी किती मिळते?

प्रधानमंत्री स्वनिधी योजना लाभ/फायदा:

• प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा (PM Svanidhi Scheme) लाभ छोटे विक्रेते/फेरीवाले, रस्त्याच्या कडेला व्यवसाय/व्यापार करणाऱ्या व्यक्तींना देण्यात यतो.

• स्वानिधी योजनेंतर्गत, शहरी/ग्रामीण भागातील रस्त्यावर माल विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना लाभ मिळविता येतो.

• या योजनेअंतर्गत 50 लाखांहून अधिक व्यक्तींना लाभ देण्यात येणार आहे.

• व्यवसाय वाढीसाठी, खेळते भांडवल म्हणून रु.१०,००० ते २०,००० रुपयांचे असुरक्षित कर्ज दिले जाते.

• लाभार्थ्यांनी घेतलेल्या कर्जावर सरकारचे 7% व्याजाचे अनुदान.

• डिजिटल व्यवहार केल्यास लाभार्थींना अतिरिक्त 1,200 रुपयांचा परतावा.

प्रधानमंत्री स्वनिधी योजना पात्रता:

ही योजना 24 मार्च, 2020 रोजी किंवा त्यापूर्वी शहरी भागात विक्रीत गुंतलेल्या सर्व पथ विक्रेत्यांसाठी उपलब्ध आहे.

• रस्त्यावर विक्री करणारे योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत, ज्यांच्याकडे विक्रीचे अधिकृत प्रमाणपत्र/ ओळखपत्र आहे.

• शहरी स्थानिक संस्थेच्या भौगोलिक मर्यादेत विक्री करणारे विक्रेते.

• सर्वेक्षणात ज्या विक्रेत्यांची ओळख पटली आहे परंतु त्यांना ओळखीचा पुरावा देण्यात आलेला नाही असे विक्रेते.

• अशा सर्व विक्रेत्यांसाठी अंतिम व्हेंडिंग प्रमाणपत्र आयडी आधारित प्लॅटफॉर्मद्वारे तयार केले जाईल.

• शहरी/ग्रामीण भागातील विक्रेते ULB च्या भौगोलिक मर्यादेत विक्री करतात आणि त्यांना ULB/TVC (Urban Local Body/Town Vending Committee)  द्वारे शिफारस पत्र (LoR - Letter of Recommendation) जारी केले आहे.

नोंदणीकृत पथविक्रेत्यांची यादी पहा, जे या योजनेसाठी पात्र असतील.
https://pmsvanidhi.mohua.gov.in/Schemes/SearchVendor


प्रधानमंत्री स्वनिधी योजना कागदपत्रे:

प्रधानमंत्री स्वनिधी योजनेअंतर्गत (PM Svanidhi Scheme) खालील कागदपत्रे आवश्यक आहेत.

• मोबाईल क्रमांक

• पासपोर्ट आकाराचा फोटो

• आधार कार्ड

• मतदार ओळखपत्र

• बँक खाते पासबुक

हे देखील वाचा: प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना

PM स्वनिधी योजना App:

PM स्वनिधी योजना App (मोबाईल ॲप) 17 जुलै, 2020 रोजी PM स्वानिधी योजनेअंतर्गत घरगुती रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी प्रसिद्ध करण्यात आले. देशभरातील विक्रेते आता थेट लिंकद्वारे त्यांच्या स्मार्टफोनवर पीएम स्वानिधी मोबाइल ॲप डाउनलोड आणि स्थापित करू शकतात आणि या योजनेअंतर्गत तुम्ही सहजपणे अर्ज करू शकता आणि तुमचा स्वतःचा व्यवसाय वाढवू शकता. हे नवीन ॲप रस्त्यावर विक्रेत्यांकडून कर्ज अर्ज गोळा करण्यासाठी आणि त्यावर प्रक्रिया करण्यासाठी विकसित करण्यात आले आहे. विक्रेता शोध, अर्जदारांचे ई-केवायसी, कर्ज अर्जांची स्थिती जाणून घेणे ही PM स्वनिधी योजना App ची वैशिष्ट्ये आहेत.

PM स्वनिधी योजना Online Apply:

प्रधानमंत्री स्वनिधीयोजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी (PM Svanidhi Yojana Online Registration) योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या. https://pmsvanidhi.mohua.gov.in/ (Pm svanidhi login).

• वेबसाईटच्या होमपेजवर Apply for Loan 10k आणि Apply for Loan 20k हे दोन पर्याय दिसतील. त्यापैकी, जर पहिल्यांदा अर्ज करत असाल तर 'Apply for Loan १०k' हा पर्याय निवडा. दुसऱ्या वेळीस लाभ मिळविण्यासाठी 'Apply for Loan 20k' या पर्यायाची निवड करावी.

• त्यानंतर, तुमचा मोबाईल क्रमांक टाकून, 'I am not a Robot' वर टिक करा आणि 'request for OTP' वर क्लीक करा.

• मोबाईवर आलेला 'OTP' टाकून, 'Verify' क्लीक करा.

• यानंतर, तुमच्यासमोर स्वनिधी योजनेचा ऑनलाईन फॉर्म उघडेल, त्यामध्ये माहिती भरून, आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि 'Save' बटनवर क्लीक करून 'Submit बटणवर क्लीक करा.

• त्यानंतर, समोर आलेला Application क्रमांक जतन करून ठेवा.

केलेल्या फॉर्मची स्थिती तपासण्यासाठी https://pmsvanidhi.mohua.gov.in/Home/Search यावर क्लिक करा. (स्वनिधी योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन Status).

या पोस्ट देखील तुम्हाला आवडू शकतात

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना

बांधकाम कामगार योजना

प्रधानमंत्री जन धन योजना

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या