प्रधानमंत्री मुद्रा योजना मराठी | Pantpradhan mudra yojana in marathi

 

मुद्रा लोन योजना मराठी | पंतप्रधान मुद्रा लोन योजना मराठी | मुद्रा योजना महाराष्ट्र | pantpradhan mudra yojana | मुद्रा लोन व्याजदर | pradhan mantri mudra yojana in marathi

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना 2021 | देशातील लघु उद्योगांना सहज कर्ज पुरवठा उपलब्ध व्हावा या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिनांक ८ एप्रिल, २०१५ रोजी २०,००० करोड रुपये भांडवल असलेल्या मुद्रा बँकेचे उद्घाटन केले. या बँकेतून लघु उद्योगांना १० लाखांपर्यंतचे कर्ज सहज उपलब्ध होते. यासाठी सरकारने एकूण २० हजार कोटीची तरतूद केली आहे. या बँकेच्या माध्यमातून लघु उद्योगांना कर्ज देण्यासाठी देशातील इतर बँकाना प्रोत्साहनही देण्यात आले आहे. याशिवाय कर्ज योजनांच्या नियमांचे कामही मुद्रा बँकेच्या अंतर्गत सुरू असते.

मुद्रा लोन योजना मराठी | पंतप्रधान मुद्रा लोन योजना मराठी | मुद्रा योजना महाराष्ट्र | pantpradhan mudra yojana | मुद्रा लोन व्याजदर | pradhan mantri mudra yojana in marathi

पंतप्रधान मुद्रा लोन योजना (मुद्रा योजना महाराष्ट्र) ही 'सिडबी' म्हणजेच स्मॉल इंडस्ट्रीस डीव्हलोपमेंट Small Industries Development बँकेची उपकंपनी आहे. नॉन-कॉर्पोरेट अशा छोट्या व्यवसाय/लघुऊद्योग करणाऱ्या किंवा करू इच्छित असणाऱ्या व्यावसायिकांना वित्तीय सहाय्य करण्याच्या हेतूने पंतप्रधान मुद्रा लोन (कर्ज) योजना सुरू करण्यात आली.

छोटे उत्पादन उत्पादन करणारे उद्योग, दुकाने, फळ/भाजी विक्रेते, ट्रक आणि टॅक्सी व्यवसाय करणारे, अन्न सेवा देणारी केंद्रे, दुरुस्ती करून देणारी दुकाने, लघुउद्योग, घरगुती अन्न प्रक्रिया, फेरीवाले आणि अन्य असंख्य छोट्या व्यवसायिकांना (Small Bussiness/MSME) प्रोत्साहन देणे व बँकेमार्फत वित्तीय कर्ज मिळवून देणे हे पंतप्रधान मुद्रा लोन योजनेचे उद्दीष्ट आहे.

रु. १० लाखापेक्षा कमी गुंतवणुकीची गरज असलेले निर्मिती, प्रक्रिया किंवा सेवा क्षेत्रातील उद्योग (बिगरकृषी क्षेत्रे) सुरू करून उत्पन्न मिळवू इच्छिणारे कोणतेही भारतीय नागरिक पंतप्रधान मुद्रा लोन योजनेचा लाभ घेऊ शकतात.

प्रधानमंत्री मुद्रा योजनेतील कर्जाचे प्रकार / वर्गवारी:

मुद्रा योजनेत पुढील तीन श्रेणींचा समावेश होतो. 

१. मुद्रा योजना कर्ज शिशू श्रेणी

२. मुद्रा योजना कर्ज किशोर श्रेणी

३. मुद्रा योजना कर्ज तरुण श्रेणी

१. मुद्रा योजना कर्ज शिशु श्रेणी

शिशू श्रेणीअंर्तगत ५०,००० रुपयांचे कर्ज मिळू शकते. त्यावर प्रत्येक महिन्यासाठी ९ टक्का तर वार्षिक १२ टक्के व्याज आकारले जाते. कर्जाचा कालावधी ५ वर्षांपर्यंत असतो.

२. मुद्रा योजना कर्ज किशोर श्रेणी

किशोर श्रेणीत ५०,००० रुपयांपासून ५ लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते. या श्रेणीत व्याजाचा दर बँक मार्गदर्शक तत्त्वांनुसार निश्‍चित करते. कर्जाचा कालावधी हा कर्जदाराच्या नावलौकिकावर आधारित असतो. 

३. मुद्रा योजना तरुण श्रेणी

तरुण श्रेणीअर्तगत ५ लाख रुपयांपासून १० लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळते. या श्रेणीत व्याजाचा दर बँक मार्गदर्शक तत्त्वांनुसार निश्‍चित करते. कर्जाचा कालावधी कर्जदाराच्या नावलौकिकावर तसेच बँकेच्या धोरणावर आधारित असतो.

प्रधानमंत्री मुद्रा योजना 2021 ठळक वैशिष्ट्ये:

• मुद्रा योजनेअंतर्गत देशा-तील ५.७७ कोटी उद्योजकांना वित्तेसाहाय्य उपलब्ध झाले आहे. 

•  वार्षिक ७ टक्के दराने १० लाख रुपयांपर्यंत अर्थपुरवठा उपलब्ध आहे. 

• मुद्रा योजनेअंतर्गत २०,००० कोटीचे सरकारचे भक्कम भांडवली पाठबळ आहे. 

• सिडबीची ही कंपनी रिर्झव्ह बॅकेच्या अखत्यारित येणार आहे.

प्रधानमंत्री मुद्रा योजना 2021 ठळक मुद्दे:

• मुद्रा योजनेअंतर्गत कोणत्याही प्रकारच्या जामिनाची (Witness) आवश्यकता नाही. 

• मुद्रा योजनेअंतर्गत कोणत्याही प्रकारचे गहाण ठेवावे लागत नाही. 

• मुद्रा योजनेअंतर्गत स्वत.च्या १० टक्के भांडवलाची आवश्यकता नसते. 

• मुद्रा योजना ही फक्त सरकारी बँकेतच असणार आहे.

• मुद्रा योजनेअंतर्गत कर्जदाराचे वय १८ वर्षे पूर्ण असले पाहिजे असे नाही. 

• मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज मागणारा अर्जदार हा कोणत्याही बँकेचा थकबाकीदार नसावा.

प्रधानमंत्री मुद्रा योजना कर्ज घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:

• मतदान ओळख पत्र, आधार कार्ड, इत्यादी. 

• वीज बिल, घर खरेदी पावती. 

• अर्जदार जो व्यवसाय करणार आहे किंवा करत आहे त्याचा परवाना व स्थायी पत्ता.

• मागिल सहा महिन्यांचे बँक खात्याचे स्टेटमेंट (उपलब्ध असल्यास).

• विकत घ्यावयाच्या मशीनरी, वस्तूंचे इ. कोटेशन/बांधकामाचे अंदाजपत्रक.

• व्यवसायासाठी लागणारे मटेरियल किंवा यत्रसामुग्री, इत्यादी त्यांचे कोटेशन व बिले. 

• अर्जदाराने ज्या व्यापाऱ्याकडून माल घेतला त्याचे पूर्ण नाव व पत्ता.

• अर्जदाराचे फोटो.

प्रधानमंत्री मुद्रा योजनेची क्षेत्रानुसार माहिती:

प्रधानमंत्री मुद्रा योजनेत उत्तर क्षेत्रामध्ये - चंदिगड, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मु आणि काश्मीर, उत्तराखंड, पंजाब, राज्यस्थान या राज्यांचा समावेश होतो. 

पश्‍चिम क्षेत्रात - दादरा नगर हवेली, डेहराडून, गुजरात, लक्षद्विप, मध्य प्रदेश, महाराष्ट्र राज्य. 

पूर्व क्षेत्रात - पुर्व क्षेत्रातील राज्ये, पश्चिम बंगाल. ओडिसा, सिक्कीम, बिहार, झारखंड राज्य. 

दक्षिण क्षेत्रात - कर्नाटक, केरळ, पांडेचरी, तामिळनाडु. तेलंगणा, अरुणाचल प्रदेश, अंदमान आणि निकोबार या राज्यांचा समावेश होतो.

प्रधानमंत्री योजना मुद्रा कार्ड:

रोख पत (Cash Credit) स्वरुपात उद्योगासाठी खेळत्या भांडवलाची सुविधा पुरविणारे मुद्रा कार्ड हे एक नाविन्यपूर्ण उत्पादन आहे. मुद्रा कर्जांतर्गत खेळत्या भांडवलासाठी दिलेले डेबिट कार्ड आहे. कर्जदारास मुद्रा कार्डचा वापर हा गरजेनुरुप एकापेक्षा अधिक वेळा कर्ज रक्कम काढण्यासाठी करता येते. जेणेकरुन कर्ज रकमेचा उपयोग कार्यक्षम पध्दतीने व्यवस्थापित करुन व्याजाचा बोजा नियंत्रित करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. मुद्रा कार्ड वापरामुळे मुद्रा कर्ज व्यवहाराचे डिजिटायझेशन होण्यास व कर्ज पूर्वइतिहास जाणून घेण्यासाठी उपयुक्त आहे.


मुद्रा लोन व्याजदर: 

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेअंतर्गत pantpradhan mudra yojana interest लागू होणारे व्याजदर विविध बँकेमध्ये हे नेहमी अनिश्चित व बदलत असतात. शिवाय त्या अर्जदाराच्या प्रोफाइलवरही अवलंबून असतात. काही महत्वाच्या बँकेचे व्याजदर (मुद्रा लोन व्याजदर 2021) पुढीलप्रमाणे:

• स्टेट बँक ऑफ इंडीया - ९.७५% पासून

• ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स - ८.१५% पासून

• बँक ऑफ बडोदा- ८.१५% पासून

• कॉर्पोरेशन बँक - ९.३५% पासून

• बँक ऑफ महाराष्ट्र - ८.५५% पासून

• आंध्रा बँक - ८.२०% पासून

• पंजाब नॅशनल बँक - ९.६०% पासून

टीप: वरील व्याजदर RBI आरबीआयच्या अत्यारिख्यात येतात त्यामध्ये कधीही बदल होऊ शकतो. त्यावर जीएसटी व सर्व्हिस टॅक्स ( GST/Service Tax) सुद्धा लावला जाईल. सद्यस्थितील व्याजदर जाणून घेण्यासाठी संबंधित बँकेशी संपर्क करा.

प्रधानमंत्री मुद्रा लोन बँक यादी pradhan mantri mudra loan bank list:

• कॉर्पोरेशन बँक Corporation Bank 

• देना बँक Dena Bank

• फेडरल बँक Federal Bank

• एचडीएफसी HDFC Bank

• अलाहाबाद बँक Allahabad Bank

• आंध्रा बँक Andhra Bank

• ऍक्सिस बँक Axis Bank

• बँक ऑफ बरोदा Bank of Baroda

• जम्मू अँड कश्मीर बँक J&K Bank

• कर्नाटका बँक Karnataka Bank

• कोटक महिंद्रा बँक Kotak Mahindra Bank

• ओरिएण्टल बँक ऑफ कॉमर्स Oriental Bank of Commerce

• बँक ऑफ इंडिया Bank of India

• बँक ऑफ महाराष्ट्र Bank of Maharashtra

• कॅनरा बँक Canara Bank

• सेंट्रल बँक ऑफ इंडिया Central Bank of India

• आयडीबीआय बँक IDBI Bank

• इंडियन बँक Indian Bank

• इंडियन ओव्हरसीस बँक Indian Overseas Bank

• युनाइटेड बँक United Bank of India

• सिण्डिकॅटे बँक Syndicate Bank

• तमिलनाडु मर्सेनटाइल बँक  Tamilnad Mercantile Bank

• युको बँक UCO Bank

• युनिअन बँक ऑफ इंडिया Union Bank of India

• पंजाब अँड सिंध बँक Punjab and Sind Bank

• पंजाब नॅशनल बँक Punjab National Bank

• सारस्वत बँक Saraswat Bank

• स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) State Bank of India

• आयसीआयसीआय ICICI Bank

प्रधानमंत्री मुद्रा योजना ऑनलाईन अर्ज:

प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज (pradhan mantri mudra yojana application form online) करून जवळच्या वरील नमूद बँकेपैकी कोणत्याही शाखेमध्ये आवश्यक कागदपत्रांसह भेट द्या व अर्जाची हार्डकॉपी जमा करा. त्यानंतर संबंधित जिल्हा नियोजन अधिकारीद्वारे तुमच्या अर्जाचा मागोवा व बँकेकडे पाठपुरवठा केला जातो. किंवा हा ऑनलाईन अर्ज तुमच्या वतीने बँकेमार्फतही केला जातो. 

प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी -

१. महाराष्ट्र राज्याकरिता अर्ज करण्यासाठी https://mahamudra.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर भेट द्या.

२. त्यानंतर  'अर्जाचे स्वरूप' या पर्यायावर क्लिक करा. थेट जाण्यासाठी इथे क्लिक करा

३. 'योजनेचे वर्गीकरण' (शिशु, किशोर तरुण इ.) निवडा व तुमची इतर आवश्यक माहिती भरा. जसे की - नाव, पत्ता, ज्या बँकेत अर्ज दाखल करायचा आहे त्या बँकेचा तपशील, व्यवसायाचा तपशील, कर्जाचा तपशील इत्यादी.

४. यानंतर, 'Captcha' टाकून अर्ज दाखल केल्यावर तुमच्या मोबाईलवर ओटीपी येईल तो जतन करा व जवळच्या बँकेमध्ये भेट द्या.

पंतप्रधान मुद्रा कर्ज योजनेचा टोल फ्री नंबर:

महाराष्ट्रासाठी Mudra loan toll free number Maharashtra - १८००-१०२-२६३६ हा आहे. याशिवाय प्रत्येक राज्याचे स्वतंत्र टोल फ्री नंबर pdf  स्वरूपात पाहण्यासाठी इथे क्लिक करा. तर, मुद्रा योनजेचा राष्ट्रीय टोल फ्री नंबर १८००-१८०-१११११८००-११-०००१ हा आहे.

प्रधानमंत्री मुद्रा योजना 2021 वारंवार विचारले जाणारे प्रश्न:

१. 'मुद्रा' म्हणजे काय?

उत्तर: मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी लि. (मुद्रा ), भारत सरकारद्वारा स्थापन  केलेली एक वित्तीय संस्था आहे जी लघु उद्योगांना वित्त पुरवठा करणेसाठी कार्य करणाऱ्या वित्तीय संस्थांना पुनर्वित्त उपलब्ध करून देते.

२. प्रधानमंत्री मुद्रा योजनेचे संनियंत्रण कोण करते?

उत्तर: राज्यस्तरावर प्रधानमंत्री मुद्रा योजनेचे संनियंत्रण राज्यस्तरीय बँकर्स समितीकडून केले जाते. त्याचप्रमाणे देशपातळीवर या योजनेचे संनियंत्रण वित्तीय सेवा विभाग / मुद्रा कार्यालय, भारत सरकार यांचेकडून करण्यात येते.

३. प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेअंतर्गत जास्तीत जास्त किती कर्ज मिळू शकते.

उत्तर: प्रधानमंत्री मुद्रा लोन तरुण श्रेणी अंतर्गत जास्तीजास्त १० लाख पर्यंत कर्ज मिळू शकते. त्याचा उपयोग व्यवसाय/उद्योग सुरू किंवा वाढविण्यासाठी केला जाऊ शकतो.

४. मुद्रा लोन योजनेअंतर्गत लोन परत करण्याची कालावधी किती?

उत्तर: मुद्रा लोन योजनेअंतर्गत लोन परत करण्याची कालावधी ५ वर्ष इतकी आहे.

५. मुद्रा लोन मिळवण्यासाठी पात्रता व निकष कोणते?

उत्तर: कोणताही भारतीय नागरिकत्व असलेला व्यक्ती ज्याच्याकडे बिगर शेतकरी उत्पन्न निर्माण करण्याच्या व्यवसायाची योजना आहे जसे की, उत्पादन / प्रक्रीया / व्यापार किंवा सेवा क्षेत्रातील कोणताही उद्योग व्यवसाय ज्यासाठी रु.10 लाखापर्यंत कर्ज रकमेची गरज आहे, अशी व्यक्ती मुद्रा अंतर्गत कर्जासाठी पात्र आहे.  

६. 'मुद्रा कार्ड' म्हणजे काय?

उत्तर: मुद्रा कार्ड हे एक क्रेडिट कार्ड आहे.  ज्यामध्ये कर्जदार कोणत्याही अडथळ्याविना कर्जाचा लाभ घेऊ शकतो.  मुद्रा कार्ड व्यावसायिकास सी.सी (Cash Credit) / ओव्हरड्राफ्ट च्या स्वरुपात खेळते भांडवलासाठी उपयोगात येते.  मुद्रा कार्ड हे "रुपे डेबिट कार्ड" असल्याने एटीएममधून रोख रक्कम काढण्यासाठी किंवा विक्री पाँईंट (पी.एस.ओ.) मशीन वापरुन खरेदी करण्यासाठी मुद्रा कार्ड वापरात येते.

७. कर्ज नामंजूर झाल्यास बँक अधिकाऱ्याविरुद्ध तक्रार करता येते काय?

उत्तर: होय. बँकेच्या अधिकाऱ्यांकडून कर्ज मंजूरीमध्ये चूक झाल्यास त्याबाबत संबंधित बँकेच्या वरिष्ठांकडे उदा. संबंधित बँकेचे प्रादेशिक व्यवस्थापक / विभागीय व्यवस्थापक यांचेकडे तक्रार नोंदविता येऊ शकते.

प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या (Pantpradhan Mudra Yojana 2021) अधिक माहितीसाठी महाराष्ट्र शासनाच्या https://mahamudra.maharashtra.gov.in संकेतस्थळावर भेट द्या व राष्ट्रीय संकेथळावर भेट देण्यासाठी इथे क्लिक करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या