पंतप्रधान आवास योजना सबसिडी pantpradhan awas yojana subsidy

पंतप्रधान आवास योजना सबसिडी pantpradhan awas yojana subsidy । पंतप्रधान आवास योजना नियम व अटी । प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) । प्रधानमंत्री आवास योजना मराठी फार्म Online । pradhan mantri awas yojana | pantpradhan awas yojana last date । pant pradhan awas yojana marathi । pantpradhan awas yojana gramin

सन २०२२ पर्यंत, सर्वांसाठी घर या अभियानातून, भारतातातील प्रत्येक व्यक्तींकडे स्वतःचे पक्के घर असावे या दृष्टिकोनातून पंतप्रधान आवास योजना देशभरात सुरु करण्यात आली. यामध्ये लाभार्थ्यास सर्वप्रथम बँकेतून किंवा वित्तीय संस्थेमधून कर्ज घ्यावे लागते, ज्या कर्जाच्या व्याजावर त्या व्यक्तीस सरकारकडून सबसिडी दिली जाते. प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये नवीन घरासाठी किंवा घर दुरुस्तीसाठी घेतलेल्या कर्जावर जास्तीत जास्त रुपये 2.67 लाखपर्यंत अनुदान (pantpradhan awas yojana subsidy) दिले जाते. हे अनुदान (सबसिडी) तुमच्या खालीलप्रमाणे उत्पन्नच्या गटावर अलंबून असते.

पंतप्रधान आवास योजना सबसिडी pantpradhan awas yojana subsidy । पंतप्रधान आवास योजना नियम व अटी । प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) । प्रधानमंत्री आवास योजना मराठी फार्म Online । pradhan mantri awas yojana | pantpradhan awas yojana last date । pant pradhan awas yojana marathi । pantpradhan awas yojana gramin

1. 3 लाख त्यापेक्षा पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न (Econ comically Weaker Section - EWS)

2. 3-6 लाख वार्षिक उत्पन्न (Lower Income Group- LIG)

3. 6-12 लाख वार्षिक उत्पन्न ( Medium Income Group 1 - MIG1)

4. 12- 18 लाख वार्षिक उत्पन्न ( Medium Income Group 2 - MIG2)


हे देखील वाचा: अण्णासाहेब पाटील मराठा कर्ज योजना

1. 3 लाख त्यापेक्षा पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न (Econ comically Weaker Section - EWS)

या गटामध्ये ज्या व्यक्तींचे वार्षिक उत्पन्न रुपये 3 लाखपर्यंत आहे. त्या व्यक्तींना 6 लाख रुपयांच्या कर्जावर, 6.50 % व्याजदराची सबसिडी दिली जाईल. उर्वरित व्याज हे लाभार्थीने भरावयाचे असते. यामध्ये, लाभार्थीना जास्तीत जास्त रुपये 2.67 लाख पर्यंतचा फायदा होईल. घराचा कार्पेट एरिया जास्तीत जास्त 30 चौ. मी. ते 60 चौ. मी. असावा. (Carpet Area Max sq.m.)

2. 3-6 लाख वार्षिक उत्पन्न (Lower Income Group- LIG)

या गटामध्ये ज्या व्यक्तींचे वार्षिक उत्पन्न रुपये ६ लाख पर्यंत आहे. त्या व्यक्तींना 6 लाख रुपयांच्या कर्जावर,  6.50 % व्याजदराची सबसिडी दिली जाईल. उर्वरित व्याज हे लाभार्थीने भरावयाचे असते. यामध्ये, लाभार्थीना जास्तीत जास्त रुपये 2.67 लाख पर्यंतचा फायदा होईल. घराचा कार्पेट एरिया जास्तीत जास्त 30 चौ. मी. ते 60 चौ. मी. असावा. (Carpet Area Max sq.m.)

उदा. समजा एका व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न ६ लाख रुपये आहे. त्याने स्वतःच्या घरासाठी 9.50 % च्या व्याजदरावर 10 लाख रुपयांचे कर्ज बँकेकडून घेतले आहे. त्या व्यक्तीला पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 10 लाखपैकी, 6 लाखाच्या किंमतीवर 6.50 % कॅलक्युलेट करून 2.67 लाख सबसिडी pantpradhan awas yojana subsidy देण्यात येईल. उर्वरित केवळ  ३ % व्याज हे लाभार्थीने भरावयाचे असते.

3. 6-12 लाख वार्षिक उत्पन्न (Medium Income Group 1 - MIG1):

या गटामध्ये ज्या व्यक्तींचे 6-12 लाख पर्यंत वार्षिक उत्पन्न आहे. त्या व्यक्तींना 9 लाख रुपयांच्या कर्जावर, 4% व्याजदराची सबसिडी दिली जाईल. उर्वरित व्याज हे लाभार्थीने भरावयाचे असते. यामध्ये, लाभार्थीना जास्तीत जास्त रुपये 2.35 लाख पर्यंतचा फायदा होईल. घराचा कार्पेट एरिया जास्तीत जास्त 160 चौ. मी. असावा. (Carpet Area Max sq.m.).

4. 12- 18 लाख वार्षिक उत्पन्न ( Medium Income Group 2 - MIG2)

या गटामध्ये ज्या व्यक्तींचे 12-18 लाख पर्यंत वार्षिक उत्पन्न आहे. त्या व्यक्तींना 12 लाख रुपयांच्या कर्जावर, 3% व्याजदराची सबसिडी दिली जाईल. उर्वरित व्याज हे लाभार्थीने भरावयाचे असते. यामध्ये, लाभार्थीना जास्तीत जास्त रुपये 2.30 लाख पर्यंतचा फायदा होईल. घराचा कार्पेट एरिया जास्तीत जास्त 190 चौ. मी. असावा. (Carpet Area Max sq.m.)

टीप: वर्ग गट 1 व 2 साठी अर्ज करण्याची मुदत 31 मार्च, 2022 पर्यंत आहे. (pantpradhan awas yojana last date) मात्र, वर्ग गट 3 व 4 साठी अर्ज करण्यासाठीची मुदत (31 मार्च, 2020) संपुष्टात आली असून पुढील काळात सरकारकडून मुदतवाढ देण्यात येऊ शकते. त्यामुळे, सदर लेखात वर्ग गट 1 व 2 बाबत सविस्तर माहिती दिली आहे.


हे देखील वाचा: प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना

पंतप्रधान आवास योजना नियम व अटी:

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत अनुदानित सबसिडीचा लाभ मिळवण्यासाठीच्या नियम, अटी, पात्रता व लाभ खालीलप्रमाणे: (वर्ग गट 1 व 2 साठी).

१. लाभार्थीचे वय 21 ते 55 या वयोगटातील असावे.

२. दुरुस्ती करण्याचे घर किंवा नवीन घर कर्ज घेण्यामध्ये पती -पत्नी मध्ये पत्नी /महिलाची भागीदारी आवश्यक आहे किंवा पूर्ण घर महिलेच्या नावे असावे.

३. पती- पत्नीच्या नावे मालिकेचे कोणतेही घर नसावे.

४. कमीत कमी 6 लाख कर्ज घेणे आवश्यक.

५. रुपये 6 लाख कर्जावर 6.50% एवढी म्हणजेच, 2.67 लाख सबसिडी मिळते.

६. कर्ज परतफेडीचा कालावधी कमीत कमी 20 वर्षाचा असावा.

७. अर्जदारांचे आधार कार्ड असणे अनिवार्य.

८. घराचा कार्पेट एरिया वर्ग गट 1 साठी जास्तीत जास्त 30 चौ. मी. ते 60 चौ. मी. एवढा असावा. (Carpet Area Max sq.m.)

९. अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 मार्च,2022.

प्रधानमंत्री आवास योजना (शहरी):

ग्रामीण भागाप्रमाणे शहरात देखील कित्येक लोकांकडे स्वतःची पक्की घरे नाहीत. यामुळे ग्रामीण भागासोबतच शहरी भागासाठीही (awas yojana urban) प्रधानमंत्री आवास योजना राबविण्यात येते. प्रधानमंत्री आवास योजना (शहरी-Urban) भागात प्रधानमंत्री आवास योजना खालील चार विभागात विभागली गेली आहे.

१. झोपडपट्टी पुनर्विकास In-situ Slum Redevelopment (ISSR):

२. क्रेडिट लिंक्ड सबसिडी योजना Credit Linked Subsidy Scheme (CLSS)

३. भागीदारीत परवडणारी घरे Affordable Housing in Partnership (AHP)

४. लाभार्थ्यांच्या नेतृत्वाखालील वैयक्तिक घर बांधणी Beneficiary-lead Individual House Construction/ Enhancement (BLC-N/ BLC-E)

१. झोपडपट्टी पुनर्विकास In-situ Slum Redevelopment (ISSR).

या गटामध्ये सरकारी, निम सरकारी किंवा वादग्रस्त जागेवर असलेली कच्ची घरे त्या किंवा इतर जागेवर बांधून देणे. 

२. क्रेडिट लिंक्ड सबसिडी योजना Credit Linked Subsidy Scheme (CLSS).

आर्थिकदृष्ट्या दुर्बल गट (EWS)/ कमी उत्पन्न गट (LIG), मध्यम उत्पन्न गट (MIG)-I आणि मध्यम उत्पन्न गट (MIG)-II मधील व्यक्तींना  बँका, गृहनिर्माण वित्त कंपन्या आणि इतर अशा संस्थांकडून गृहनिर्माण कर्ज घेतल्यानंतर  कर्जाच्या रकमेवर 6.5%, 4% आणि 3% व्याज अनुदान देण्यात येते. (EWS) आणि (LIG) गटांसाठी ३१ मार्च, २०२२ पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे.

३. भागीदारीत परवडणारी घरे Affordable Housing in Partnership (AHP).

ना नफा तत्वावर खाजगी हाऊसिंग कंपनी सोबत सरकार करार करून लाभार्थीला घरे उपलब्ध करून देण्यात येतात.

४. लाभार्थ्यांच्या नेतृत्वाखालील वैयक्तिक घर बांधणी Beneficiary-lead Individual House Construction/ Enhancement (BLC-N/ BLC-E).

लाभार्थी वैयक्तिक घर बांधणी किंवा दुरुस्तीसाठी सरकारी अनुदान मिळवून, स्वतःसाठी पक्के घर बांधून घेता येते. यामध्ये, लाभार्थी EWS - Econ comically Weaker Section गटातील असावा (3 लाख त्यापेक्षा पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न), स्वतःच्या नावे घर बांधणीसाठी जागा असावी व स्वतःचे नावे कोणतेही पक्के घर नसावे. तसेच, 390 चौ. की चा कार्पेट एरिया असावा. यासाठी, केंद्र शासनाकडून 1.5 लाख रुपये अनुदान मिळते. तसेच, राज्य शासनाचे अनुदान देखील लाभार्थ्यास प्राप्त होते.

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल विभाग (EWS)/ निम्न उत्पन्न गट (LIG)/ मध्यम उत्पन्न गट (MIG) घर खरेदी/बांधकाम तुमच्या गरजेप्रमाणे, पात्रतेप्रमाणे खालील कॅलक्युलेटरद्वारे व्याजदर, कर्ज आणि सबसिडी तपासा.

PM Awas Yojana Subsidy Calculator

प्रधानमंत्री आवास योजना मराठी फार्म Online:

प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी तसेच ऑनलाईन अर्ज करण्यासाठी, प्रधानमंत्री आवास योजना-शहरीच्या अधिकृत संकेतस्थळावर https://pmaymis.gov.in/default.aspx इथे भेट द्या.

- त्यानंतर, मुख्यपुष्ठवर 'Citizen Assessment' हा पर्याय निवडून, 'Apply Online' हा पर्याय निवडा.

-  'Apply Online' पर्यायमध्ये, तुमच्या पात्रतेप्रमाणे योग्य पर्याय निवडा. उदा. In-situ Slum Redevelopment (ISSR), Credit Linked Subsidy Scheme (CLSS), Affordable Housing in Partnership (AHP), Beneficiary-lead Individual House Construction/ Enhancement (BLC-N/ BLC-E) इत्यादी.

- योग्य पर्यायाची निवड केल्यावर, तुमचा आधार कार्ड क्रमांक व त्यावरील नाव जसेच्या तसे टाका.

- त्यानंतर, तुमच्या आधारशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकवर आलेला 'OTP' टाकून मोबाईल क्रमांक Verify करा आणि समोरील फॉर्ममध्ये माहिती भरून फॉर्म सबमिट करा.

टीप: प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) योजनेचा ऑफलाईन अर्ज करण्यासाठी Urban Local Bodies - महानगर पालिका  (Municipal Corporation) किंवा सरकारसोबत भागीदारी केलेल्या जवळच्या CSC किंवा संलग्न बँकेला भेट देऊ शकता.

अधिक माहितीसाठी प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) चे अधिकृत संकेतस्थळ https://pmaymis.gov.in/ इथे भेट द्या.

घरकुल योजना यादी महाराष्ट्र

या पोस्ट देखील तुम्हाला आवडू शकतात

बांधकाम कामगार योजना महाराष्ट्र 

पीएम किसान सम्मान निधी योजना

अटल पेन्शन योजना

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या