अटल पेंशन योजना Atal Pension Yojana Marathi

 

अटल पेंशन योजना । Atal pension yojana in marathi । Atal pension yojana apply online । प्रधानमंत्री अटल पेंशन योजना । अटल pension योजना । अटल पेन्शन योजना माहिती । राष्ट्रीय पेन्शन योजना माहिती मराठी । अटल पेंशन योजना २०२२

भारत सरकारने कष्टकरी गरिबांच्या वृद्धापकाळाच्या आरोग्याबाबत विचार करता, आणि त्यांना नॅशनल पेन्शन सिस्टम - राष्ट्रीय पेन्शन योजना (National Pension System-NPS) मध्ये सामील होण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी प्रधानमंत्री अटल पेंशन योजना १, जून २०१५ देशभरात सुरु केली.

अटल पेंशन योजनेचे लाभ:

प्रधानमंत्री अटल पेंशन योजना वयाच्या ६० वर्षानंतर भारत शासनाकडून प्रतिमहिना १००० रुपये, २००० रुपये, ३००० रुपये आणि ५००० हजार रुपये मासिक पेंशन मिळण्याची हमी देते. (Atal pension Yojana Benefits) यासाठी लाभार्थी १८ ते ४० वयोगटातील असावा आणि त्याची योजनेसाठीचे ठराविक अंशदान (प्रीमियम) भरणे आवश्यक आहे. प्रत्येकाचे अंशदानाचे स्तर हे त्यांच्या वयोमानानुसार (१८ ते ४० वय) कमी-जास्त असतात.

अटल पेंशन योजना । Atal pension yojana in marathi । Atal pension yojana apply online । प्रधानमंत्री अटल पेंशन योजना । अटल pension योजना । अटल पेन्शन योजना माहिती । राष्ट्रीय पेन्शन योजना माहिती मराठी । अटल पेंशन योजना २०२२ । atal pension yojana online apply atal pension yojana online apply sbi । atal pension yojana online

• लाभार्थीचे काही कारणाने निधन झाल्यास तर त्याच्या जामिनाला पती किंवा पत्नीला तेवढीच पेंशन पूर्ण आयुष्यभरासाठी मिळेल.

• पती आणि पत्नी दोघांचे निधन झाल्यास तर त्यांच्या वारसदाराला १ लाख ७० हजार ते ८ लाख ५० हजार एवढी एक रकमी रक्कम मिळेल.

अटल पेंशन योजनेची पात्रता:

अटल पेंशन योजनेची पात्रता (Atal Pension Yojana eligibility) खालीलप्रमाणे आहे.

१. पंतप्रधान अटल पेंशन योजना सर्व बँक खातेदारांसाठी खुली आहे. मात्र, योजनेचा लाभ घेण्यासाठीचे निकष पात्रता खालीलप्रमाणे आहे.

२. लाभार्थीने इतर शासकीय पेंशन योजनेचा लाभ घेतलेला नसावा. तसेच, तो व्यक्ती आयकर भरणारा नसावा.

३. लाभार्थी शासकीय कर्मचारी नसावा.

४. अटल पेंशन योजनेमध्ये सामील होण्यासाठी, लाभ घेणारा व्यक्ती भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे आणि त्याचे वय १८ ते ४० वर्षे असावे (Atal pension yojana age limit).

५. कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखेमध्ये किंवा पोस्ट ऑफिसद्वारे सामील होता येते.

६. अटल पेंशन योजनेच्या बँक खात्यामध्ये नाव नोंदवणे आणि पती-पत्नीची माहिती देणे बंधनकारक आहे.

अटल पेंशन योजना ठळक वैशिष्ट्ये:

१. प्रधानमंत्री अटल पेंशन योजनेअंतर्गत (PM Atal Pension Yojana) लाभार्थी व्यक्तीद्वारे गुंतवणुकीचा कालावधी (प्रीमियम भरण्याचा कालावधी) कमीत कमी २० वर्ष किंवा त्याहुन अधिक असतो. हा कालावधी त्या व्यक्तीच्या वयावर अवलंबून असतो.

२. लाभार्थी व्यक्ती वर्षातुन एकदा पेंशनची मिळणारी रक्कम कमी किंवा जास्त (Upgrade or Downgrade)  करता येते.

३. लाभार्थीने वयाचे ६० वर्षे पूर्ण केल्यावर, मासिक पेंशन मिळवण्याच्या हेतूने, संबंधित बँकेमध्ये अर्ज देणे आवश्यक आहे. 

४. लाभार्थी व्यक्तीला ६० वर्षे पूर्ण होईपर्यंत, मध्येच योजनेतून बाहेर निघता येत नाही/रक्कम काढता येत नाही. केवळ अपवादात्मक परिस्थितीमध्ये म्हणजेच, लाभार्थीचा अकाली मृत्यू, अपघात किंवा गंभीर आजार झाल्यास शिल्लक रक्कम दिली जाते.

अटल पेंशन योजना अर्ज Atal pension yojana apply:

अटल पेंशन योजना २०२२ लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज online apply करण्यासाठी, https://enps.nsdl.com/eNPS/NationalPensionSystem.html या दुवावर भेट द्या. तसेच, ऑफलाईन अर्ज करण्यासाठी खालील पद्धतीने फॉर्म डाऊनलोड करा.

१. सर्वप्रथम www.npscra.nsdl.co.in या संकेतस्थळावर भेट देऊन, 'Forms' हा पर्याय निवडायचा आहे. 

२. 'Froms' मध्ये 'APY Subscriber Registration Form' डाऊनलोड करून त्यांची प्रिंट घ्यावी.

३. प्रिंट काढलेल्या फॉर्ममध्ये अर्जदाराची संपूर्ण माहिती भरायची आहे.

त्यानंतर, आवश्यक कागदपत्रे जसे कि- आधार कार्ड, पासपोर्ट, मतदार कार्ड, ड्रायव्हिन्ग लायसन्स, नरेगा जॉबकार्ड, UIDAI लेटर इत्यादी जे काही कागदपत्रे असतील, त्यांसह जवळच्या कोणत्याही बँकेत भेट द्यायची आहे.

अटल पेंशन योजना ऑनलाईन सुविधा:

अटल पेंशन योजनेच्या विविध ऑनलाईन सुविधा खालीलप्रमाणे:

१. अटल पेंशन योजनेअंतर्गत प्रान कार्ड (PRAN Card - Permanent Retirement Account Number ), भरलेले प्रीमियम आणि व्यवहार स्टेटमेंट ऑनलाईन योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन पाहता येऊ शकतात आणि प्रिंट करता येऊ शकतात.

२. लाभार्थी ऑनलाईन या संकेतस्थळावर विहित रक्कम भरल्यावर फिजिकल प्रान कार्ड जारी करण्यासाठी विनंती करू शकतात.

३. अटल पेंशन योजनेत नोंदणी केल्यानंतर फिजिकल व्यवहार स्टेटमेंट वर्षातून एकदा नोंदणीकृत पत्त्यावर पाठविण्यात येते.

४. अटल पेंशन योजनेच्या संबंधित सर्व माहिती संबंधित बँक शाखेकडून मिळवता येते.

५. लाभार्थींच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ठराविक कालवधीमध्ये SMS अलर्टद्वारे योगदानासंदर्भात माहिती मिळत असते.

अटल पेंशन योजनेअंतर्गत दिलेल्या वैयक्तिक माहितीमध्ये बदल:

लाभार्थींचा पत्ता, मोबाईल क्र. इत्यादी सारख्या वैयक्तिक माहितीमध्ये बदल करण्यासाठीचा फॉर्म https://www.npscra.nsdl.co.in/nsdl-forms.php येथून ऑनलाइन डाउनलोड करता येऊ शकतो. हा फॉर्म आवश्यक कागदपत्रांसह बँक शाखेकडे सादर करावा लागतो. त्याचप्रमाणे, लाभार्थी योगदानाच्या वारंवारतेत बदल जसे की, त्रैमासिक योगदानाचे मासिक योगदानामध्ये, किंवा सहामाही योगदानाचे तिमाही योगदानामध्ये बदल करण्यासाठी अटल पेंशन योजनेच्या बँकेच्या शाखेकडे निवेदन सादर करता येते.

अटल पेंशन योजना लाभार्थी योगदान/ प्रीमियम Atal Pension Yojana Chart:

खालीलप्रमाणे अटल पेंशन योजनेच्या चार्टमधे लाभार्थीचे मासिक, तिमाही व सहामाही योगदान (Atal pension monthly contribution) त्याच्या वयानुसार दिले आहे. त्याचबरोबर वयाचे ६० वर्ष पूर्ण झाल्यावर मासिक रु. १००० ते रु. ५००० पेंशननुसार एकूण पेंशन रक्कम Atal pension yojana maturity amount दिलेली आहे.

Atal Pension Yojana Chart Pdf  डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.


अटल पेंशनची रक्कम अपग्रेड/ डाऊनग्रेड करणे:

पेंशन रक्कम अपग्रेड करणे म्हणजे लाभार्थीच्या पेंशन रकमेमध्ये वाढ होते आणि पेंशन रक्कम डाऊनग्रेड करणे म्हणजे लाभार्थीच्या पेंशन रकमेमध्ये घट होते. अटल पेंशन योजनेचे लाभार्थी वर्षातून एकदा पेंशनची रक्कम अपग्रेड/डाऊनग्रेड करू शकतात. हे वैशिष्ट्य वापरकर्त्यास निवडलेल्या हमीपूर्ण पेंशन रक्कमेनुसार जमा/प्राप्त होणारी भिन्न रक्कम पाहण्याची सुविधा देते.

अपग्रेड झाल्यास अधिक रक्कम जमा करावी लागेल आणि डाऊनग्रेड झाल्यास अतिरिक्त रक्कम ग्राहकाला परत केली जाते. वर्षातून एकदा हा पर्याय बदलण्याची सुविधा उपलब्ध असते. त्यासाठी ऑनलाईन https://www.npscra.nsdl.co.in/nsdl-forms.php इथून फॉर्म (APY Subscriber Modification Form) डाऊनलोड करून अटल पेंशन बँक शाखेकडे सादर करावा लागतो.

बँके खात्यात प्रीमियम रक्कम शिल्लक नसल्यास काय होईल?

बचत बँक खात्यातून स्वयम् डेबिट सुविधा मासिक किंवा त्रैमासिक किंवा सहामाही आधारावर योगदान दिले जाते. प्रीमियमची पुरेशी रक्कम बँक खात्यात  उपलब्ध नसल्यास, किंवा उशिरा प्रीमियम भरल्यास कमीत कमी रु. १/- व जास्तीत जास्त रु.१० प्रतिमहिना खालीलप्रमाणे दंड म्हणून आकारली जाते.

१. १०० रुपये प्रतिमहिना प्रीमियम - १ रुपये प्रतिमहिना

२. १०१ रुपये ते ५०० रुपये  प्रतिमहिना प्रीमियम- २ रुपये प्रतिमहिना

३. ५०१ रुपये ते १००० रुपये प्रतिमहिना प्रीमियम- ५ रुपये प्रतिमहिना

४. १००१ रुपये किंवा त्यापेक्षा अधिक प्रतिमहिना प्रीमियम- १० रुपये प्रतिमहिना

• योजनेचा प्रीमियम नाही भरल्यास, ६ महिन्यानंतर योजनेचे खाते फ्रीज (Temporary Blocked) होईल.

• १२ महिन्यानंतर खाते निष्क्रिय (Inactive) होईल.

• २४ महिन्यानंतर खाते बंद (Closed) केले जाईल.

अटल पेंशन योजनेची समाप्ती/ निकास:

अटल पेंशन योजना ऐच्छिक निकास (लाभार्थीचे ६० वर्ष वय होण्यापूर्वी):

अटल पेंशन योजना योजनेची खाती बंद करण्यासाठी पूर्ण भरलेला 'Account Closure Form' आणि इतर संबधित कागदपत्रे संबधित बँकेच्या शाखेकडे सादर करावेत. हा फॉर्म (Voluntary exit APY withdrawal form) https://www.npscra.nsdl.co.in/nsdl-forms.php इथे उपलब्ध आहे आणि बँक शाखेमध्येही उपलब्ध असेल.

अटल पेंशन योजनेचे खाते बंद करण्याचा फॉर्म केल्यानंतर योजनेचे खाते झाले तरी लाभार्थींनी बँकेचे बचत खाते बंद करू नये. कारण लाभार्थ्यांना मुदत पूर्ण होण्यापूर्वी खाते बंद केल्यामुळे मिळणारी रक्कम योजनेच्या खात्यात ट्रान्सफर होते आणि बचत खाते बंद केल्यास ही रक्कम ट्रान्सफर करण्यामधे समस्या निर्माण होऊ शकते.

अटल पेंशन योजना मृत्यूमुळे निकास:

दावेदार पूर्ण भरलेला फॉर्म (APY Closure Form - Death) सोबत मृत्यू प्रमाणपत्राची प्रत संबंधित बँकेच्या शाखेकडे सादर करू शकतो.

६० वर्ष वय पूर्ण होण्यापूर्वी ग्राहकाचा मृत्यू झाल्यास, पती/पत्नीकडे ग्राहकाचे अटल योजनेचे खाते सुरू ठेवण्याचा पर्याय आहे. हे खाते मूळ ग्राहक वयाच्या ६० वर्षे वयापर्यंत सुरू ठेवणाऱ्या उर्वरित निहित मुदतीपर्यंत पती/पत्नीच्या नावे राखता येऊ शकते. जर पती/पत्नीला खाते सुरू ठेवायचे नसेल तर त्याला/तिला जमा पेंशन रक्कम, म्हणजेच ग्राहकाने योजनेमध्ये दिलेले योगदान आणि त्याच्या योगदानावरील निव्वळ प्रत्यक्ष व्याजाची परतफेड करण्यात येते.

६० वर्षे वय पूर्ण झाल्यानंतर ग्राहकाचा मृत्यू झाल्यास ग्राहकाच्या जोडीदारास (पती/पत्नी) मासिक हमी  दिलेली पेन्शन देय असेल आणि ग्राहकाचा जोडीदार नसेल किंवा जोडीदाराच्या मृत्यूनंतर पेंशन रक्कम  / पेंशन योजनेनुसार जमा झालेली रक्कम ग्राहकाच्या नॉमिनीला देय असेल. हा नॉमिनी ग्राहकाची पत्नी किंवा पतीपेक्षा वेगळी व्यक्ती असावी.

अटल पेंशन योजना मोबाईल एप्लिकेशन:

एपीवाय APY मोबाइल एप्लिकेशन (Atal pension yojana App), अटल योजनेच्या वापरकर्त्यांसाठी विनामूल्य उपलब्ध आहे, जेथे शेवटचे ५ योगदान पाहता येऊ शकतात आणि कोणतेही शुल्क न भरता कधीही व्यवहार स्टेटमेंट व ई -प्रान (Atal pension yojana Pran card Download) डाऊनलोड करू शकतात.

अटल पेंशन योजना तक्रार दाखल करणे:

अटल पेंशन योजना धारक http://www.npscra.nsdl.co.in या संकेतस्थळावर भेट देऊन ऑनलाईन तक्रार दाखल करता येऊ शकते. ऑनलाईन तक्रार केल्यानंतर ग्राहकांना तक्रारीचा टोकन क्रमांक देण्यात येतो. टोकन क्रमांकाच्या सहाय्याने तक्रारीचा मागोवा/सद्यस्थिती तपासता येते.

Atal pension yojana pdf अटल पेंशन योजना पीडीएफ:

• अटल पेंशन योजना वारंवार विचारले जाणारे प्रश्न (इंग्रजी-हिंदी).pdf  - डाउनलोड करा.

• अटल पेंशन योजना माहिती हिंदी.pdf - डाऊनलोड करा.

• अटल पेंशन योजना नोंदणी अर्ज फॉर्म - डाऊनलोड करा.


अटल पेंशन योजना बाबतीत नेहमी विचारले जाणारे प्रश्‍न:

१. निवृत्ती वेतन काय आहे आणि आपल्याला त्याची गरज काय?

जेव्हा कोणी कमावत नसते तेव्हा निवृत्ती वेतन त्याला मासिक प्राप्ती करून देत असते. 

निवृत्ती वेतनाची गरज:

- वयानुसार पैसे कमावण्याची घटणारी क्षमता 

- कमावत्या कौटुंबिक सदस्यांचे स्थानांतरण

- जीवनमानाची वाढती किंमत

 - दीर्घायुष्य

ठराविक मासिक उत्पन्नाची हमी म्हातारपणात अभिमानाने जगायला भाग पडते.

२. अटल पेंशन/पेन्शन योजना म्हणजे काय?

अटल पेंशन योजना ही भारतीय नागरिकांसाठी निवृत्ती योजना असून, त्याचे केंद्र हे असंघटीत क्षेत्रातील कामगार आहे. अटल पेंशन योजना यात वर्गणी दाराला त्याच्या वर्गणीच्या प्रमाणात १०० रुपये, २००० रुपये, ३००० रुपये, ४००० रुपये, ५००० रुपयेची कायम स्वरूपी वयाच्या ६० व्या वर्षापासून पेन्शन मिळेल. वर्गणी ही अटल पेंशन योजनेत सामील होण्याच्या वयावर अवलंबून असेल.

३. अटल पेंशन योजनेत कोण सहभागी होवू शकते?

कोणीही भारतीय नागरिक या योजनेत सहभागी होवू शकतो. पात्रता खालीलप्रमाणे:

१). या योजनेत सामील होण्याचे कमीत कमी वय १८ वर्षे आणि जास्तीत जास्त वय हे ४० वर्षे असेल.

२). त्या व्यक्ती चे कोणत्याही बँकेत बचत खाते असावे किवा त्यांनी कोणत्याही बँकेत बचत खाते उघडावे. 

३). सहभागी होवू इच्छिणाऱ्या व्यक्ती कडे मोबाईल असावा त्याचा तपशील बँकेत बचत खाते उघडताना त्याने बँकेला पुरवावा.

४. अटल पेंशन योजनेत सामील होवू न शकणारे, आणि इतर कोणत्याही सामाजिक सुरक्षा योजनेअंतर्गत सामील असणारे, असे कोण ज्यांना सरकारी मदत किवा वर्गणी मिळू शकणार नाही.

ज्या व्यक्ती इतर कोणत्याही वैधानिक सामाजिक सुरक्षा योजने अंतर्गत सामील आहेत त्यांना या योजनेचे लाभ मिळणार नाहीत. उदाहरणार्थ:

1. Employee Provident Fund and Miscellaneouse Act 1952

2. The CoalMines Provident Fund and Miscellaneouse Act 48

3. अन्य कोणतीही सामाजिक सुरक्षा योजना 

५. अटल पेंशन योजनेत किती रुपये निवृत्ती वेतन मिळेल? 

अटल पेंशन योजना यात वर्गणी दाराला त्याच्या वर्गणीच्या प्रमाणात १००० रुपये, २००० रुपये, ३००० रुपये, ४००० रुपये, ५००० रुपयेची कायम स्वरूपी वयाच्या ६० व्या वर्षापासून पेन्शन मिळेल.

६. अटल पेंशन योजनेत सामील होण्याचे काय फायदे आहेत?

अटल पेंशन योजना ही सर्व बँक खातेदारांसाठी खुली आहे. केंद्र सरकार कमीत कमी १००० रुपये किवा वार्षिक वर्गणी च्या ५०% आपल्या कडून खात्यात जमा करेल.

७. अटल पेंशन योजनेतील गुंतवणूक कुणी व कशी करावी याचा तपशील.

अटल पेंशन योजना ही भारत सरकारची योजना असून अर्थ मंत्रालय, भारत सरकार ती चालवते, त्याला पेन्शन निधी विनिमय आणि विकास प्राधिकरण द्वारे नियमित केले जाते. पेंशन निधी आणि त्याची गुंतवणूक ह्यावर वर्गणी दाराचे काहीही नियंत्रण नसेल.

८. अटल पेंशन योजनेत खाते कसे उघडावे?

अ). व्यक्तीचे बचत खाते ज्या बँकेत आहे त्या बँकेशी संपर्क करा.

ब) अटल पेंशन योजनेत सहभागी होण्याचा फॉर्म भरा.

क) तुमचा आधार कार्ड नंबर आणि मोबाईल नंबर बँकेला कळवा.

ड). बचत खात्यात दर महिन्याला ठराविक रककम असत्याची खात्री करा बँकेला ती रक्कम अटल पेंशन योजनेत अंतरण करायला सोपे जाईल.

९. अटल पेंशन योजनेत सामील होण्यासाठी आधार कार्ड क्रमांक अत्यावश्यक आहे काय?

अटल पेंशन योजनेत खाते उघडण्यासाठी आधार कार्ड क्रमांक गरजेचा नाही, परंतु बँकेत खाते उघडताना आधारकार्ड हे प्राथमिक KYC आहे. त्यामुळे पत्नी, नामांकित वारस यांची ओळख होण्यास मदत होते. आणि दीर्घ कालीन तंटा वाचतो.

१०. मी बचत खात्या शिवाय अटल पेंशन योजनेत खाते उघडू शकतो काय?

नाही, अटल पेंशन योजनेत सहभागी होण्यासाठी बचत खाते अत्यावशक आहे.

११. अटल पेंशन योजनेत खात्यात वर्गणी कशी भरू शकतो?

सर्व सहभागी वर्गणीदारांची वर्गणी ही बचत खात्यातून आपोआप रक्कम अंतरण करण्याच्या सुविधेने योजनेच्या  खात्यात जमा होतो.

१२. मासिक वर्गणी भरावयाचा दिनांक कोणता?

अटल पेंशन योजनेत खात्यात प्रथमतः पैसे भरण्याच्या दिनांकावरच मासिक वर्गणीचा भरण्याचा दिनांक अवलंबून असेल.

१३. मासिक वर्गणीच हफ्ता देण्याच्या दिनांकाला जर बचत खात्यात पुरेशी रककम नसेल तर काय होईल?

अटल पेंशन योजनेत सदस्यांना त्यांची वर्गणी मासिक हफ्त्यात भरण्याची सुविधा राहील. महिन्याच्या ठराविक दिनांकाला बचत खात्यात पुरेशी रककम नसल्यास जर वर्गणी अंतरण करता आली नाही तर ती वार्षिक थकबाकी समजली जाईल. बँकांना वर्गणी जमा करण्यास उशीर झात्यास दंड घेण्यासाठीचे अधिकार राहतील. ही रककम १ रुपया ते १० रुपये प्रति महिना असू शकते.

१४. योजना घेताना नॉमिनेशन सादर करणे आवश्यक आहे का?

हो. नॉमिनेशन माहिती अटल निवृत्तीवेतन योजना खात्यात देणे आवश्यक आहे. जोडीदाराची माहितीही जिथे लागू आहे तिथे आवश्यक आहे. त्यांचे आधारची माहितीही दिली गेली पाहिजे.

१५. मी किती अटल निवृत्तीवेतन योजनेची खाती उघडू शकतो?

सदस्य फक्त एकच अटल निवृत्तीवेतन योजनेचे खाते उघडू शकतो जे एकमेव असेल.

१६. निवृत्तीवेतनाची रक्षम कमी अथवा जास्त करण्यासाठी मासिक कॉन्ट्रीबुशन वाढवायचा किंवा कमी करायचा पर्याय आहे का?

सदस्य उपलब्ध पेन्शनच्या रक्कमेनुसार जमा होण्याच्या काळात निवृत्तीवेतनाची रक्कम कमी अथवा जास्त करण्यासाठी निवड करु शकतो. स्विचिंग पर्याय हा वर्षातून एकदा एप्रिलमध्ये दिता जातो.

१७. अटल निवृत्तीवेतन योजनेतून पैसे काढायची व्यवस्था कशी आहे?

अ) ६० वर्षे पूर्ण केल्यावर:

अटल निवृत्तीवेतन योजनेतून ६० वर्षे पूर्ण केल्यावर १००% रकमेसह बाहेर पडता येते. बाहेर पडत्यावर सदस्याला निवृत्तीवेतन उपलब्ध होते.

ब) सदस्याचा मृत्यु इ. बाबतीत:

सदस्याचा मृत्यु झाल्यास निवृत्तीवेतन जोडीदारास उपलब्ध होईल आणि दोघांचाही मृत्यु झात्यास, निवृत्तीवेतन निधी नॉमिनीसला दिला जाईल.

क) ६० वर्षांआधी बाहेर पडल्यास

६० वर्षे वय पूर्ण होण्याआधी बाहेर पडणे अपवादात्मक परिस्थितीत शक्‍य आहे. म्हणजेच लाभार्थीचा मृत्यु अथवा ठराविक मुदतीचे आजार.

१८. माझ्या कॉन्ट्रीब्युशनची स्थिती मला कशी कळेल?

कॉन्ट्रीब्युशन ची स्थिती नोंदलेल्या मोबाईल नंबरवरून नियमित मेसेज द्वारा कळविली जाईल. सदस्याला प्रत्यक्ष स्टेटमेंट पण मिळेल.

१९. मला व्यवहारांचे स्टेटमेंट मिळेल का?

हो. सदस्याला नियमित अटल निवृत्तीवेतन योजनेचे स्टेटमेंट मिळेत.

२०. मी जर माझे राहण्याचे ठिकाण/ शहर बदलले तर मी कॉन्ट्रीब्वुशन्स कशी करेन?

जागा बदलली तरीही कॉन्ट्रीब्युशन्स काहीही अडथळे न येता, ऑटो डेबिट सुविधेद्वारा सदस्याच्या सेविंग खात्यातून भरले जातील.

अटल पेंशन योजनेच्या अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांक (Atal Pension Yojana Toll Free Number) 1800-110-069 यावर संपर्क करू शकता.

तुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना

प्रधानमंत्री वय वंदना योजना

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना

प्रधानमंत्री जन धन योजना

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या