शेळी पालन ऑनलाईन अर्ज Sheli Palan Yojana 2021 Maharashtra Government

 

शेळी पालन ऑनलाईन अर्ज । Sheli Mendhi Palan Yojana । शेळी पालन योजना । Sheli Palan Yojana 2021 । Sheli Palan Yojana 2021 Maharashtra Government । Sheli Palan Yojana Online Form । Sheli Palan Online Application Maharashtra । Panchayat Samiti Sheli Palan Yojana 2021 । शेळी पालन माहिती । शेळी पालन अनुदान  । शेळी पालन माहिती मराठी Pdf |  Sheli Palan Yojana Pdf Download

राज्यात पशुपालनाला प्रेरणा देण्यासाठी तसेच रोजगार निर्मितीसाठी महाराष्ट्र शासन विविध योजना राबवित असते. त्यापैकी एक योजना म्हणजे शेळी पालन योजना २०२१-२२ (Maharashtra Sheli Palan Yojana In Marathi 2022). महाराष्ट्रात शेळी/मेंढी गटवाटप राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजना सन २०११-२०१२ पासून सुरू आहेत. शेळ्या-मेंढ्या तसेच बोकड - नर मेंढा यांच्या किंमतीत सतत वाढ होत असल्याने लाभधारक व लोकप्रतिनिधींकडून दर सुधारित करण्याची वारंवार मागणी येत होती. त्या अनुषंगाने दिनांक १२ मे, २०२१ रोजी झालेल्या मंत्री मंडळ बैठकीत मान्यतेनुसार शेळी पालन सुधारित योजना सन २०२१-२०२२ पासून राबविण्यास मान्यता देण्यात आली.

हे देखील वाचा: महाडीबीटी पोर्टल शेतकरी योजना

शेळी पालन ऑनलाईन अर्ज । Sheli Mendhi Palan Yojana । शेळी पालन योजना । Sheli Palan Yojana 2021 । Sheli Palan Yojana 2021 Maharashtra Government । Sheli Palan Yojana Online Form । Sheli Palan Online Application Maharashtra । Panchayat Samiti Sheli Palan Yojana 2021 । शेळी पालन माहिती । शेळी पालन अनुदान  । शेळी पालन माहिती मराठी Pdf |  Sheli Palan Yojana Pdf Download

शेळी पालना योजनेसोबतच खालीलप्रमाणे विविध पशुपालन योजना महाराष्ट्र राज्यात राबविल्या जात आहेत.

राज्यस्तरीय पशुपालन योजना:

१. दोन दुधाळ गाई /म्हशी चे वाटप करणे.

२. अंशतः ठानबंद पद्धतीने संगोपन कारण्यासाठी १० शेळ्या / मेंढ्या व १ बोकड / नर मेंढा याप्रमाणे लाभार्थींना शेळी / मेंढी वाटप करणे.

३. १००० मांसल कुक्कूट पक्षी संगोपनाद्वारे कुक्कूटपालन व्यवसाय सुरु करणे.

जिल्हास्तरीय पशुपालन योजना:

१. १० शेळ्या / मेंढ्या व १ बोकड / नर मेंढा याप्रमाणे अनुसूचीत जाती / जमातीचा लाभार्थींना शेळी / मेंढी वाटप करणे.

२. दोन दुधाळ गाई /म्हशीचे अनुसूचीत जाती / जमातीचा लाभार्थींना वाटप करणे.

३. ८ ते १० आठवडे वयाचा तलंगाच्या २५ माद्या आणि ३ नर वाटप करणे.

४. एकदिवशीय सुधारित कुक्कुट पक्षांच्या १०० पिल्लांचे वाटप करणे.

सदर लेखमध्ये शेळी/मेंढी पालन योजना व ऑनलाईन अर्ज कसा करता येईल, याबाबत सविस्तर माहिती पाहणार आहोत.

शेळी पालन योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना उस्मानाबादी/संगमणेरी/माडग्याळ/दख्खनी किंवा स्थानिक वातावरणात तग धरणाऱ्या १० शेळ्या व १ बोकड अथवा १० मेंढ्या व १ नर असा गट वाटप करण्यात येतो. महाराष्ट्र राज्यात शेळी पालन योजना राज्यस्तरीय शेळी/मेंढी गट वाटप योजना व जिल्हास्तरीय शेळी/मेंढी गट वाटप योजना अशी विभागणी केली आहे.

राज्यस्तरीय/जिल्हास्तरीय शेळी/मेंढी गट वाटप योजना ठळक मुद्दे:

१. सदर योजना ही या आर्थिक वर्षात मुंबई, मुंबई उपनगरे या जिल्ह्यात राबवली जाणार नाही.

२. योजनेअंतर्गत पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, आणि मराठवाडा विभागातील जिल्ह्यात उस्मानाबादी व संगमणेरी या जातीच्या शेळ्या व बोकड यांचे गट वाटप करण्यात येते.

३. योजनेअंतर्गत कोकण व विदर्भ विभागातील स्थानिक हवामानामध्ये तग धरणार्‍या व तसेच पैदासक्षम आणि उत्तम स्वास्थ असलेल्या स्थानिक जातीच्या शेळ्या व बोकड यांचे गट वाटप करण्यात येते.

४. शेळया-मेंढ्याच्या प्रजातींची निवड करण्याचे स्वातंत्र्य लाभार्थ्यांना आहे.

५. जिल्हास्तरीय शेळी/मेंढी गट वाटप करताना लाभार्थी निवडताना ३०% टक्के महिलाना प्राधान्य देण्यात येते.

शेळी पालन अनुदान:

शेळी पालन अनुदान योजनेमध्ये खुल्या व इतर प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी ५० टक्के हिस्सा राज्य शासनाचा असतो व ५० टक्के हिश्याची रक्कम लाभार्थ्यांने स्वतः किंवा बँकेकडून कर्ज घेऊन उभारणे आवश्यक आहे. (किमान ५ टक्के स्वहिस्सा व उर्वरित ४५% बँकेचे कर्ज). अनुसूचित जाती/जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी ७५ टक्के हिस्सा राज्य शासनाचा असेल व २५ टक्के हीश्याची रक्कम लाभार्थ्यांने स्वतः किंवा बँकेकडून कर्ज घेऊन उभारणे आवश्यक आहे. (किमान ५ टक्के स्वहिस्सा व उर्वरित २० टक्के बँकेचे कर्ज).


शेळीपालन योजना लाभार्थी निवडीचे निकष व पात्रता:

१) दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी

२) अत्यल्प भूधारक शेतकरी (१ हेक्टर पर्येंतचे भूधारक)

३) अल्प भूधारक शेतकरी (१ ते २ हेक्टर पर्येंतचे भूधारक)

४) सुशिक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असणे गरजेचे)

५) महिला बचत गटातील लाभार्थी (अंक १ ते ४ मधील)

टीप: शेळी-मेंढी गटाच्या खरेदीनंतर वाहतुकीचा सर्व खर्च लाभार्थ्यांने करणे आवश्यक राहील.

शेळी पालन योजना 2021 आवश्यक कागदपत्रे:

१) फोटो ओळखपत्राची सत्यप्रत

२) सातबारा उतारा

३) ८ - अ उतारा

४) अपत्य दाखला/स्वयंघोषणा पत्र

५) आधारकार्ड

६) रहिवासी प्रमाणपत्र

७) बँक खाते पासबुक सत्यपत्र

८) रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल).

९) ७-१२ मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र,अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर असल्यास करारनामा

१०) अनुसूचीत जाती / जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत

११) दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र

१२) दिव्यांग असल्यास दाखला

१३) बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत

१४) वय - जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत

१५) शैक्षणिक पात्रतेचा दाखला

१६) रोजगार ,स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत

१७) प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत.

शेळी पालन ऑनलाईन अर्ज:

शेळी पालन ऑनलाईन अर्ज Sheli Palan Yojana Online Application करण्यासाठी सर्वप्रथम महाराष्ट्र शासनच्या पशुसंवर्धन विभागाच्या https://ah.mahabms.com या संकेतस्थळावर भेट देऊन अर्जदार नोंदणी करणे आवश्यक आहे.

- अर्जदार नोंदणी करण्यासाठी, 'अर्जदार नोंदणी' हा पर्याय निवडल्यानंतर फॉर्म Sheli Palan Yojana Online Form उघडेल त्यात अर्जदाराची वैयक्तिक माहिती भरा. जसे की,

१. आधार क्रमांक

२. वय, पूर्ण नाव

४. लिंग, मोबाईल क्रमांक, इमेल आयडी

५. जिल्हा, तालुका, गाव

६. जात प्रवर्ग, जात

- दिव्यांग प्रवर्गातून अर्ज करीत असल्यास, तो पर्याय निवडा.

- त्यानंतर, अर्जदार दारिद्र रेषेखाली आहे कीव नाही ते भरा.

- शैक्षणिक पात्रात निवडा.

- नमुना ८ अ चे क्षेत्र हेक्टर मध्ये निवडा.

- रेशनकार्ड क्रमांक भरा.

- त्यानंतर, बँकेचा तपशील भरा. (बँक क्रमांक, IFSC कोड, बँक शाखा इ.)

- अर्जदाराचा फोटो अपलोड करा (फोटो साईझ ८० केबी पेक्षा जास्त नसावी). 

- अर्जदाराची स्वाक्षरी अपलोड करा ( फोटो साईझ ४० केबी पेक्षा जास्त नसावी). 

- त्यानंतर शेवटी, कुटुंब सदस्यांची माहिती रेशकार्ड नुसार भरावी. 

- 'नियम व अटी मान्य आहेत' हा पर्याय निवडा व 'फॉर्म पुढे चालू ठेवा' हा पर्याय निवडा.  

- भरलेली माहिती योग्य आहे कि नाही याची माहिती पडताळून अवश्य पहा आणि 'जतन करा' या पर्यायावर क्लिक करा.

- यानंतर तुमच्या मोबाईलवर एक 'OTP' पाठविला जाईल तो जतन करून ठेवा.

टीप: एकदा भरलेल्या माहितीमध्ये पुन्हा बदल करता येत नाही.

अशा प्रकारे तुमचा अर्ज ऑनलाईन पोर्टलमध्ये जतन होईल. म्हणजेच, तुमची अर्जदार नोंदणी यशश्वीरीत्या पूर्ण झाली आहे. त्यानंतर, फॉर्म पुढे पाठण्यासाठी/अर्ज करण्यासाठी -

शेळी पालन योजनेचा किंवा पशु संवर्धनाच्या कोणत्याही (जसे की - योजनेचा लाभ मिळण्याहेतू ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम लाभार्थाने वरीलप्रमाणे अर्जदार नोंदणी करणे आवश्यक असते. त्यानंतर संकेतस्थळावर 'योजनेसाठी अर्ज करा' हा पर्याय निवडा.

- तुमचा आधार क्रमांक लिहा.

- पासवर्डमध्ये, अर्जदार नोंदणी करतेवेळी तुमच्या मोबाईलवर आलेला 'OTP' टाकून लॉगिन करा.

- त्यानंतर, तुम्हाला खालील बाजूस सर्व योजनांची यादी पहायला मिळेल. 

-  शेळी पालन योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यस्तरीय योजना शेळी/मेंढी गटवाटप हा पर्याय निवडा. तो निवडल्यावर जिल्हास्तरीय शेळी/मेंढी गटवाटप योजना  आपोआप निवडली जाईल. (ज्या-ज्या योजनांचा तुम्हा लाभ घ्यायचा आहे, त्यांना एकत्रितपणे अर्ज करता येतो).

- त्याखाली शेळी पालन योजनेसंदर्भातील काही प्रश्न विचारले जातील, ते काळजीपूर्वक वाचून, त्याची उत्तरे 'हो' किंवा 'नाही' पयार्यांमध्ये द्या.

- त्यानंतर, 'पुढे चला' पर्याय निवडून 'जतन करा' हा पर्याय निवडा.

- यानंतर, पुन्हा जिल्हास्तरीय शेळी/मेंढी गटवाटप योजनेसाठी राज्यस्तरीय योजनेसंदर्भातील सारखे काही प्रश्न विचारले जातील, ते वाचून, त्याची उत्तरे 'हो' किंवा 'नाही' पयार्यांमध्ये द्या.

- त्यानंतर, 'पुढे चला' पर्याय निवडून 'जतन करा' हा पर्याय निवडा.

- पुढे, तुम्हाला 'केलेले अर्ज' याची माहिती अर्ज क्रमांकासहीत पहायला मिळतील.

संबंधित योजनेसाठी अर्ज केल्यानंतर राज्य/जिल्हा पशुसंवर्धन विभागातर्फे लाभार्थ्यांची प्राथमिक निवड केली जाते. पात्र लाभार्थी निवड झाल्यानंतर अर्जदारांनी आवश्यक कागदपत्रे अपलोड करावयाची असतात. त्यानंतर, अंतिम निवड केली जाते.

टीप: अर्ज करावयाचा कालावधी ४ डिसेम्बर २०२१ ते १८ डिसेम्बर २०२१ (या योजनेची अर्ज करण्यासाठीची मुदत वाढण्याची शक्यता आहे).

सदर योजनेमध्ये पात्र लाभार्थ्यांची निवड झाल्यानंतर -

- राष्ट्रीयकृत बँकेमध्ये बचत खाते उघडणे आवश्यक आहे. राष्ट्रीयकृत बँकेत खाते अगोदर पासूनच असल्यास सदर खाते योजनेशी संलग्न करणे आवश्यक राहील.

- लाभार्थांनी त्यांचा आधारकार्ड व पॅनकार्ड क्रमांक या बचत खात्याशी संलग्न करणे बंधनकारक राहील.

- लाभार्थ्यांने स्व:हिस्स्याची रक्क्म बचत खात्यात जमा केल्यानंतर, शासकीय अनुदानाची रक्कम डीबीटीद्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.

- शेळ्यांची/मेंढ्यांची खरेदी केल्यानंतर लाभार्थाने त्यांचा विमा लगेच उतरून घेणे बंधनकारक राहील. ५० टक्के विमा रक्कम लाभार्थाने भरणे आवश्यक आहे.

शेळी पालन माहिती मराठी Pdf । Sheli Palan Yojana Pdf Download:

१. शेळी/मेंढी गट वाटपाबाबत राज्यस्तर व जिल्हा स्तरावरून राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांमध्ये निश्चित केलेल्या शेळी/मेंढी यांच्या खरेदी किमतीसह योजनेमध्ये सुधारणा केलेला,  कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, महाराष्ट्र शासनाचा, दिनांक २५ मे, २०२१ चा शासन निर्णय. Pdf डाउनलोड करा.

२. पशुसंवर्धन विभागांतर्गत विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन. Pdf डाउनलोड करा.

पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन हेल्पलाईन क्रमांक:

कॉल सेंटर संपर्क क्रमांक: 1962 - टोल फ्री संपर्क (सकाळी ८ ते सायंकाळी ६ वा.) किंवा 18002330418 वर कॉल करु शकता किंवा जवळील पशुसंवर्धन Pashusavardhan Vibhag कार्यलयाशी संपर्क साधु शकता.

संकेतस्थळ: https://ah.mahabms.com

तुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात

पशुपालन शेड बांधणे - शरद पवार ग्रामसमृद्धी योजना

कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना

पीएम किसान ट्रॅक्टर योजना २०२१

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

  1. शेली पालन करना है हमारी सरकार से इस काम में मदत करे और हमे लोन दे यहीं विनती है

    उत्तर द्याहटवा

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत.