कुसुम सौर कृषी पंप योजना | कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र 2021 | कुसुम योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन Maharashtra | PM Kusum Yojana 2021 | PM Kusum online | प्रधानमंत्री कुसुम योजना महाराष्ट्र 2022 | Pradhan Mantri Kusum Yojana Maharashtra
महाराष्ट्र हे एक कृषीप्रधान राज्य असून शेतकरी हा देशाच्या पाठीचा कणा आहे. त्याला बळ देण्याकरिता इतर सोयी-सवलती, विविध कृषी योजना सोबतच वीजदर सवलतीच्या माध्यमातुन अनुदान देण्यात येते. त्याला आणखी बळकट करण्याकरीता केंद्रीय अनुदान, राज्याचे अनुदान व लाभार्थीचा हिस्सा विचारात घेऊन कुसुम महाभियानाची Pradhan Mantri Kisan Urja Suraksha evem Utthan Mahabhiyan (PM KUSUM) अंमलबजावणीला सुरवात झाली.
राज्यातील कृषीपंप वीज जोडण्यांचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्याच्या अभियानांतर्गत केंद्रशासनाच्या ऊर्जा मंत्रालय, विभाग यांचेकडून शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवम उत्थान 'महाभियान (कुसुम) देशभरात राबविण्यात आले. या अभियानाची अमलबजावणी केंद्र शासनाने दिनांक २२ जुलै, २०१९ अन्वये प्रसिध्द केलेल्या व वेळोवेळी दिलेल्या महाभियानाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार उद्दिष्टे, कार्यपध्दती, अंमलबजावणी, निधीची तरतूद, आर्थिक अनुदान यांस राज्य शासनाची मान्यता देण्यात आली. Pradhan Mantri Kusum Yojana Maharashtra
कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र योजनेचे फायदे/लाभ:
• पारपरिक पद्धतीने कृषिपंप विज जोडणीसाठी कराव्या लागणाऱ्या खर्चात बदल.
• कृषिपंप वीज बिलापोटी शासनाकडून देण्यात येणाऱ्या क्रॉस सबसिडमध्ये बचत.
• कृषीपंप सौर ऊर्जेवर आधारित असल्याने पारंपरिक वीज निर्मिती खर्चात बचत.
• कृषिपंप सौर ऊर्जवर आधारित असल्याने शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा पिकाला पाणी देणे शक्य.
कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र लाभार्थी निकष/पात्रता:
कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र 2021 ( Pradhan Mantri Kusum Yojana Maharashtra ) साठी अर्ज करण्यासाठी कोणत्याही अतिरिक्त अटी नाहीत. राज्यातील शेतकरी किंवा शेतकर्यांचा गट, शेतकरी उत्पादक संस्था, सहकारी संस्था जल ग्राहक संघटना या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
• लाभार्थी भारताचा रहिवासी असावा.
• राज्यातील पारंपरिक ऊर्जेदद्वारे विद्युतीकरण न झालेले शेतकरी, विद्युतीकरणासाठी वनविभागाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसलेले शेतकरी, महावितरण कंपनीकडे पैसे भरूनही प्रलंबित असलेले शेतकरी, अतिदुर्गम व महाराष्ट्र शासनाच्या धडक सिंचन योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकरी इत्यादींना या योजनेमध्ये प्राधान्य देण्यात येते.
• सौर कृषिपंप योजनेचा लाभ शेतकरी असलेल्या व ज्यांच्याकडे शाश्वत जलस्त्रोत उपलब्ध आहे व पारंपरिक पद्धतीने विद्यूत जोडणी झालेली नसलेले सर्व शेतकरी घेऊ शकतील.
• ५ एकरापर्यंत शेतजमीन उपलबध असलेल्या शैतकऱ्यास या योजनेअंतंर्गत ३ अश्वशक्ती क्षमतेचा व ५ एकरापेक्षा जास्त शेतजमीन उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यास ५ अश्वशक्ती क्षमतेचा किंवा ७.५ अश्वशक्ती क्षमेटचा सौर कृषिपंप या योजनेअंतर्गत उपलब्ध होईल.
• वैयक्तिक किंवा सामुदायिय शेततळे बारमाही वाहणारे नदी, नाले या शेजारील शेतकरी या योजनेस पात्र राहतील.
प्रधानमंत्री कुसुम योजना महाराष्ट्र 2021:
केंद्र शासनाच्या या 'कुसुम महाअभियानाची' अंमलबजावणी महाऊर्जामार्फत होत आहे. केंद्र शासनाच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय, नवी दिल्ली यांचेकडून शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवंम उत्थाण महाभियान (कुसुम) महाराष्ट्र राज्यात तीन घटकांतर्गत राबविण्यात येत आहे. (Pradhan Mantri Kusum Yojana Maharashtra).
१. कुसुम सोलर पंप योजना प्रकल्प घटक अ:
- विकेंद्रीत पारेषण संलग्न जमिनीवरील किंवा Still Mounted सौर ऊर्जा
२. कुसुम सोलर पंप योजना प्रकल्प घटक ब:
- पारेषण विरहीत सौर कृषीपंप आस्थापित करणे.
३. कुसुम सोलर पंप योजना प्रकल्प घटक क:
- पारेषण संलग्न सौर कृषीपंप संयंत्र आस्थापित करणे.
१. कुसुम सोलर पंप योजना प्रकल्प घटक अ:
• सदर अभियान घटक महावितरण कंपनीमार्फत राबविण्यात येत आहे.
• या अभियानांतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी उपकेंद्र पातळीवर ०.५ मेगावट ते २ मेगावॅट क्षमत्तेपर्यंत प्राप्त मंजूरीनुसार ३०० मेगावॅटचे सौर ऊर्जेचे प्रकल्प उभारणीचे उद्दिष्ट.
• अभियान कालावधीत एकूण ५००० मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे राज्याचे उदिष्ट.
• या अभियानामध्ये इच्छुक शेतकरी/सहकारी संस्था/पंचायत/शेतकरी उत्पादक संघटना/ जल उपभोक्ता संघटना/सौर ऊर्जा विकासकाद्वारे महावितरणच्या उपकेंद्राच्या ५ कि.मी. क्षेत्रातील त्यांच्या जमीनीवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारु शकतील.
• अशा प्रकल्पातून निर्माण होणारी वीज कमाल रु. ३.३०/- प्रती युनिट या दराने घेण्याचे प्रस्तावित.
• ज्या ठिकाणी उपकेंद्राच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रकल्प उभारणीची मागणी आल्यास स्पर्धात्मक निविदा प्रक्रियेद्वारे आलेल्या लघुत्तम दराने महावितरण कंपनी वीज खरेदी करारनाम्याद्वारे २५ वर्षांच्या कालावधीकरिता खरेदी करेल.
२. कुसुम सोलर पंप योजना प्रकल्प घटक ब :
• या अभियांनातर्गत पुढील ५ वर्षात ५ लक्ष पारेषण विरहीत सौर कृषीपंप आस्थापित करण्यास व त्यापैकी पहिल्या वर्षासाठी मंजूर १ लक्ष पारेषण विरहीत सौर कृषीपंप आस्थापित करण्यास मंजूरी.
• सदर अभियान घटक महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) मार्फत अर्जदारांचे ऑनलाईन अर्ज मागवून प्रथम अर्ज येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर अनुज्ञेयता तपासून राबविण्यात येणार आहे.
• यात २.५ एकर क्षेत्र घारण करणाऱ्या शेतकऱ्यास स ३ HP, ५ एकर क्षेत्र धारण करणा या दोतक यास ५ HP व त्यापेक्षा जास्त क्षेत्र घारण करणाऱ्या शेतकऱ्यास ७.५ HP DC पंप आस्थापित करण्याचे नियोजन केले आहे.
• सौर कृषीपपाची किंमत रु. १.५६ लाख (3 HP), रु. २.२२५ लाख (५ HP), रु. ३.४३५ लाख (७.५ HP) एवढी किंमत असणार आहे.
• पंपाच्या किंमतीच्या सर्वसाधारण गटाच्या लाभार्थ्याकडून सौर कृषीपंपाच्या किंमतीच्या १०% व अनुसूचीत जाती व जमातीच्या लाभार्थ्याकडून ५% या दराने लाभार्थी हिस्सा घेतला जातो.
• या योजनेंतर्गत केंद्र शासनाचे ३० टक्के वित्तीय सहाय्य व राज्य शासनाचे ६०/६५ टक्के अनुदान व लाभार्थ्यांचे १०/५ टक्के अनुदान लागणार.
• एकूण उद्दिष्टांपैकी प्रथम टप्प्यात ५० टक्के सौर कृषी पंप हे ३४ जिल्ह्यात त्या जिल्हयाच्या लोकसंख्येनुसार व प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर व त्यानंतर मागणीनुसार वितरण करण्याचे नियोजन.
• सौर कृषी पंपाव्दारे उपलब्ध होणार्या वीजेमुळे जर शेतकर्याला इतर वीज उपकरणांच्या वापरासाठी स्वखर्चाने युनिव्हर्सल सौर पंप कंट्रोलर लावण्याची सोय.
३. कुसुम सोलर पंप योजना प्रकल्प घटक 'क':
• सदर घटक अभियान महावितरण कंपनीमार्फत राबविण्यात येईल.
• शेतकऱ्यांना अस्तित्वात असणाऱ्या पारंपारीक पंपाऐवजी कृषि पंपाचे उर्जाकरण करुन शेतकऱ्यांना स्वतःच्या वीज वापराव्यतिरिक्त जादा वीज महावितरण कंपनीस विकून त्यांचे उत्पन्न वादिण्याची संधी उपलब्ध.
• सदर अतिरिक्त वीजेपोटी निश्चित केलेल्या दराने महावितरण कंपनीद्वारे मोबदला देण्यात येईल.
• शेतकऱ्याकडे सद्य:स्थितीत असणाऱ्या पारंपारिक पध्दतीच्या कृषी पंपाच्या क्षमतेच्या २ पटीपर्यंतच सौर ऊर्जा निर्मिती करता येईल.
• शेतकऱ्याने ग्रीडला केलेल्या अतिरिक्त वीज पुरवठा आकारणी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने ठरवून दिलेल्या "फिड इन टेरिफ" प्रमाणे करण्यात येईल.
• ग्रीडला निर्यात करण्यात येणारी वीज सौर ऊर्जा पॅनलद्वारे निर्मिती झालेल्या वीजेच्या ५० टक्के पर्यंत मर्यादित असेल.
• निर्यात होणारी वीज रोहित्र क्षमतेपेक्षा जास्त होऊ नये याकरिता रोहित्र क्षमतेच्या ७० टक्के एवढी सौर क्षमता मंजूर करण्यात येईल. यात प्रथम येणाऱ्या शेतकऱ्यास प्रथम प्राधान्य देण्यात येईल.
• सदर कुसुम घटक "क" ची अंमलबजावणी केवळ संमिश्र वाहिनीवर (Unsegregated Feeder) राबविण्यात येईल.
• या अभियानांतर्गत पारेषण संलग्न सौर कृषिपंप आस्थापित करण्यास प्रत्यक्षात आलेल्या खर्चाच्या रकमेच्या ३० टक्के रक्कम केंद्रे शासनामार्फत व ३० टक्के रक्कम राज्य शासनामार्फत संबंधित शेतकऱ्यास देण्यात येईल व लाभार्थी हिस्सा ४० टक्के राहील.
कुसुम सोलर पंप योजना सुकाणू समिती:
संपूर्ण अभियानाची अंमलबजावणी योग्यरित्या होण्यासाठी मा. मंत्री (ऊर्जा) यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय सुकाणू समिती गठीत करण्यात आली आहे. सदर अभियानाची अंमलबजावणी करताना उद्भवणाऱ्या अडीअडचणी व आवश्यकतेनुसार योजनेत सुधारणा व बदल करण्याचे अधिकार सदर समितीस असतात.
कुसुम योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन Maharashtra:
कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत (Pradhan Mantri Kusum Yojana Maharashtra) लाभ मिळवण्यासाठी महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा), महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन Kusum Online अर्ज करून लाभ मिळवता येतो.
१. सर्वप्रथम महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा), महाराष्ट्र शासनाच्या PM Kusum mahadiscom in या संकेतस्थळावर भेट द्या.
२. त्यामध्ये सर्वात वरीलबाजूस असलेल्या चार पर्यायांपैकी "महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा)-पारेषण विरहित सौर कृषि पंपाकरीता अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा" हा पर्याय निवडा.
३. थेट जाण्यासाठी येथे क्लिक करा.
४. समोर असलेल्या 'सौर कृषि पंप ऑनलाइन अर्ज (नमुना-ए१)' फॉर्म मध्ये अ. अर्जदाराचा आणि जागेचा तपशील, ब. अर्जदाराचा रहिवाशी पत्ता व ठिकाण, क. जलस्तोत्र प्रकार व लाभार्थीचे बँक तपशील भरा.
५. 'घोषणापत्र' वाचून त्यावर टिक करा.
त्यानंतर, वरील नमूद आवश्यक कागदपत्रे फॉर्ममध्ये अपलोड करा व अर्ज सादर करा.
कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र आवश्यक कागदपत्रे:
१. आधार कार्ड प्रत
२. ७/१२ उतारा (विहीर / कुपनलिका शेतात असल्यास ७/१२ उताऱ्यावर नोंद आवश्यक ) एकापेक्षा जास्त नावे असल्यास इतर भोगवटादाराचे ना-हरकत प्रमाणपत्र रु.२००/- च्या मुद्रांक कागदवर.
इतर कागदपत्रे (लागु असल्यास):
१. पाणी प्रभावित क्षेत्र असल्यास संबंधीत खात्याचा ना हरकत दाखला.
२. शेत जमिन/विहीर/पाण्याचा पंप सामाईक असल्यास इतर भागीदाराचे ना हरकत प्रतिज्ञापत्र.
३. अनुसुचित जाती/जमातीचे/इतर मागासवर्ग जातीचे प्रमाणपत्र.
कुसुम योजना टोल फ्री नंबर PM Kusum Official Website:
• कुसुम योजना राष्ट्रीय टोल फ्री नंबर - 1800-180-3333 आहे.
• तक्रारीसाठी क्रमांक KUSUM Yojana Complaint Number - (011) 2436-0707 / 2436-0404
• राष्ट्रीय संकेतस्थळ (PM kusum official website) - https://www.mnre.gov.in/
• महाराष्ट्र राज्य mahadiscom सोलर - https://www.mahadiscom.in/solar/AG_Policy/index_mr.php
कुसुम सोलर पंप योजनेच्या फर्जी/फेक संकेतस्थळ/वेबसाईटपासून सावधान:
मंत्रालयाच्या निदर्शनास आले आहे की, अर्जदारांकडून अनेक बनावट वेबसाईट आणि मोबाईल अँप्लिकेशनद्वारे प्रधानमंत्री किसान उर्जा सुरक्षा आणि उत्थान महाभियान (प्रधानमंत्री) यांच्या नावाने शेतकऱ्यांकडून सौर पंप बसवण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरण्यास सांगितले जात आहेत. तसेच, कुसुम योजना पंपाची नोंदणी फी आणि खर्चासह. ऑनलाइन पैसे भरण्यास सांगत आहे. यापैकी काही बनावट वेबसाईट .org, .in, .com या www.kusumyojanaonline.in.net, www.pmkisankusumyojana.co.in, www.onlinekusamyojana.org.in, आणि अशाच अनेक इतर वेबसाईट आहेत.
त्यामुळे प्रधानमंत्री-कुसुम योजनेसाठी अर्ज करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना फसव्या वेबसाईटला भेट देऊ नका आणि कोणतेही पैसे देऊ नका असा सल्ला दिला आहे. राज्य सरकारच्या विभागांकडून प्रधानमंत्री कुसुम योजना राबवली जात आहे.
योजनेच्या अधिक तपशीलांसाठी, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटला (MNRE PM KISAN) www.mnre.gov.in ला भेट द्या किंवा 1800-180-3333 टोल फ्री नंबर डायल करा.
कुसुम सोलर (सौर) पंप योजना महाराष्ट्र 2021 PM Kusum Solar Pump Yojana Maharashtra जातीनिहाय लाभार्थी हिस्सा, सौर कृषी पंप वितरण वर्गवारी संख्या, केंद्र व राज्य शासनाचा हिस्सा व योजनेच्या अधिक सविस्तर माहितीसाठी १२ मे, २०२१ रोजीचा ( उद्योग , ऊर्जा व कामगार विभाग, महाराष्ट्र शासन ) शासन निर्णय PDF मध्ये डाउनलोड करा. - Download Now.
• मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना २०२१
तुम्हाला या पोस्ट आवडू शकतात
• नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना २०२१
0 टिप्पण्या
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत.