महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना Mahatma Phule Jan Arogya Yojana Covid In Marathi

Mahatma Phule Jivandayi Yojana in Marathi महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना महाराष्ट्र्र Mahatma Phule Jan Arogya Yojana For Covid In Marathi | महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना MJPJAY ही महाराष्ट्र सरकारची आरोग्य विमा Health Insurance योजना आहे. महाराष्ट्र राज्यात सध्या कोविड-19 (Covid - 19) महामारी संकटामध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतील (MJPJAY Information In Marathi) उपचारांचा लाभ, लाभार्थी रुग्णांबरोबर सर्वच नागरिकांना आरोग्य विषयक हमी व आर्थिक दिलासा मिळावा यासाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. याबद्दलची माहिती सदर लेखात तुम्हाला वाचायला मिळेल.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना महाराष्ट्र | Mahatma Phule Jan Arogya Yojana For Covid In Marathi |  MJPJAY Information In Marathi | महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना हॉस्पिटल लिस्ट । Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana Documents In Marathi । Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana Hospital List In Maharashtra । Mahatma Phule Jan Arogya Yojana Toll Free Number । Mahatma jyotiba phule jan arogya yojana eligibility marathi । Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana Disease List In Marathi

सार्वजनिक आरोग्य विभाग, शासन निर्णय क्र.रागांयो-२०१६/प्र.क्र.६४/ भाग १/ आरोग्य -६, दिनांक १३ एप्रिल २०१७ नुसार राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना दि.१ एप्रिल २०१७ पासून महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना या नावाने सुरु ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना महाराष्ट्र सरकारच्या वतीने संपूर्ण अर्थसहाय्यित आहे.


महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा कोविड -19 उपचारासाठी लाभ:

Mahatma Phule Jan Arogya Yojana For Covid -19 वर नमूद केल्याप्रमाणे कोविड - 19 उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा विचार करून महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्याकरिता लाभार्थी नसलेल्या इतर रुग्णांदेखील महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य अंतर्गत अंगीकृत खाजगी रुग्णालयामध्ये कोविड -19 साठी उपचार अनुज्ञेय राहील. याबाबत राज्य आरोग्य हमी सोसायटीने विहित कार्यपद्धती नुसार कार्यवाही करावी असे निर्देश शासनाने दिले आहेत. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार संयुक्तपणे 60:40 च्या प्रमाणात अर्थसहाय्यित आहेत. 

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना हॉस्पिटल लिस्ट:

Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana Hospital List In Maharashtra सध्या जगभर पसरलेल्या कोरोना विषाणूची लागण देशभरात झाली असून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्र राज्यात इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झालेली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना संशयित रुग्णांमध्ये वाढ लक्षात घेता अधिकाधिक रुग्णालयात उपचारांची सुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार राज्यामध्ये काही ठिकाणी शासकीय रुग्णालये कोविड-19 रुग्णालये म्हणून घोषित करण्यात आलेली आहेत.

कोविड-19 रुग्णालयांची यादी पाहण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या पुढील दुवावर जाऊन पाहू शकता किंवा पीडीफ डाऊनलोड करू शकता.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य रुग्णालयांची ऑनलाईन यादी: Click Here

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना हॉस्पिटल लिस्ट pdf: Click Here


महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या लाभासाठी लागणारी कागदपत्रे: 

Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana Documents In Marathi महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थींना रहिवासी पुरावा म्हणून वैध पिवळी, केशरी, शुभ्र शिधापत्रिका, तहसीलदार यांचा दाखला व अधिवास प्रमाणपत्र यापैकी कोणताही एक पुरावाजन्य कागदपत्र सादर करावे लागेल, त्याचबरोबर शासनमान्य फोटो ओळखपत्र (आधार कार्ड) देणे आवश्यक राहील.

कोरोनाच्या साथीचे गांभीर्य व रुग्णाच्या उपचाराची तातडी पाहता उपचारासाठी आवश्यक कागदपत्रांबाबत शिथिलता देण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी, राज्य आरोग्य हमी सोसायटी यांना देण्यात आले आहेत.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना Contact Number/Toll Free Number: 

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना मदतीसाठी (Mahatma Phule Jan Arogya Yojana Toll Free Number) खालील दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा.

टोल फ्री: १८००-२३२-२०० आणि १५५३८८

संकेतस्थळ: www.jeevandayee.gov.in

टीप: वरील महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा हेल्पलाईन क्रमांक २४ तास कार्यरत असतो. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेद्वारे कोविड -१९ साठी उपचार घेत असताना, संबंधित कोणतीही माहिती मिळवू शकता. 

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची पार्श्वभूमी : 

दिनांक १३ एप्रिल २०१७ अन्वये राजीव गांधी जीवनदायी आरोग्य ही योजना राज्यात दि.१ एप्रिल २०१७ पासून महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना या नावाने सुरु ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा उद्देश: 

राज्यातील जनतेला गंभीर आजारांवरील उपचार व शस्त्रक्रिया उपचारांसाठी पुर्णपणे नि:शुल्क गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधेचा लाभ अंगीकृत रुग्णालयांमधून उपलब्ध करून देणे ही आहे. राज्यात सध्या महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसह एकत्रितपणे राबवले जाते. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत लाभार्थी कुटुंबाला प्रति कुटुंब प्रति वर्ष 1.50 लाख रुपये पर्यंत विमा संरक्षण मिळते. मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी ही मर्यादा 2.50 लाख रुपये एवढी आहे.

या योजनेचा तपशील खालीलप्रमाणे:

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना : 

Mahatma jyotiba phule jan arogya yojana eligibility marathi अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून वितरीत करण्यात आलेल्या पिवळ्या, अंत्योदय, अन्नपूर्णा योजना व केशरी (रु.१ लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न) शिधापत्रिकाधारक कुटुंबे तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे तसेच नागपूर विभागातील वर्धा या शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शुभ्र शिधापत्रिकाधारक शेतकरी कुटुंबे या योजनेचे लाभार्थी आहेत. मात्र सध्याच्या कोविड -१९ प्रादुर्भावामुळे लाभार्थी नसलेल्या इतर रुग्णांदेखील महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेता येईल. 

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना विमा संरक्षण:

या योजनेंतर्गत लाभार्थी कुटुंबाला प्रतिवर्ष रुपये १.५० लाखापर्यंतचे विमा संरक्षण उपलब्ध करून देण्यात येत आहे.मूत्रपिंड प्रत्यारोपण ही मर्यादा प्रतिवर्ष २.५० लाखापर्यंत आहे. लाभार्थी कुटुंबासाठी कोणत्याही एका व्यक्तीला व अनेक व्यक्तीना वरील योजनेचा लाभ घेता येतो.


महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आजारांवर उपचार: 

Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana Disease List In Marathi महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत ३० विशेष सेवांतर्गत ९७१ उपचार व शस्त्रक्रिया तसेच १२१ पाठपुरावा सेवांचा समावेश आहे. सदर योजनेत खालीलप्रमाणे विशेष सेवांतर्गत उपचार/ सेवा देण्यात येत आहेत.

१) सर्वसाधारण शस्त्रक्रिया

२) काम, नाक घसा शस्त्रक्रिया

३) नेत्ररोग शस्त्रक्रिया

४) स्त्री रोग व प्रसूतिशास्त्र

५ )अस्थिरोग शस्त्रक्रिया व प्रक्रिया

६) पोठ व जठार शस्त्रक्रिया  

७) कार्डिओव्हॅस्क्युलर थोरॅसिक सर्जरी

८) बालरोग शस्त्रक्रिया

९) प्रजनन व मूत्र रोग शस्त्रक्रिया

१० )मज्जातंतूविकृती शास्त्र

११) कर्करोग शस्त्रक्रिया

१२) वैद्यकीय कर्करोग उपचार

१३) रेडीओथेरपी कर्करोग

१४) त्वचाप्रत्यारोपण शस्त्रक्रिया

१५) जळीत

१६ )पॉलिट्रामा

१७) प्रोस्थेसिस

१८) जोखिमी देखभाल

१९)जनरल मेडिसिन

२०) संसर्गजन्य रोग 

२१) बालरोग वैद्यकीय व्यवस्थापन

२२) हृदयरोग

२३) नेफ्रोलोजी

२४) न्युरोलोजी

२५) पल्मोनोलोजी

२६) चर्मरोग चिकित्सा

२७) रोमेटोलोजी

२८) इंडोक्रायनोलोजी

२९) मेडिकल गेस्ट्रोइंट्रोलोजी

३०) इंटरवेन्शनल रेडीओलोजी

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना विम्याचा हप्ता: 

या योजनेच्या लाभार्थी कुटुंबासाठी असणारा विमाच्या हप्ता राज्य आरोग्य हमी सोसायटीमार्फत नॅशनल इन्सुरंस कंपनीस अदा करण्यात येतो.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये समाविष्ट रुग्णालये: 

या योजनेमध्ये ३० पेक्षा अधिक खाटा असणाऱ्या शासकीय/निमशासकीय खाजगी तसेच धर्मादाय संस्थेच्या रूग्णालयांची निवड काही निकषांना अधीन राहून करण्यात आली आहे. लाभार्थी यांच्या मर्जीनुसार राज्यातील कोणत्याही अंगीकृत रुग्णालयात घेऊ शकतो. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना हॉस्पिटल यादी pdf: Click Here

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना नि:शुल्क (Cashless Medical Services):

सदर योजनेंतर्गत लाभार्थी रुग्णास अंगीकृत रूग्णालयातून निशुल्क वैद्यकीय सेवा देण्यात पूर्णतः संगणीकृत असून लाभार्थ्यास वैध शिधापत्रिका (पिवळी, अंत्योदय, अन्नपूर्णा व केशरी) व फोटो ओळखपत्राच्या आधारे अंगीकृत रुग्णालयांमधून उपचार अनुज्ञेय आहेत तसेच शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यातील शुभ्र शिधापत्रिका शेतकऱ्यांना त्यांचेकडील शुभ्र शिधापत्रिका व ७/१२  उतारा आणि फोटो ओळखपत्राच्या आधारे अंगीकृत रुग्णालयांमधून उपचार अनुज्ञेय आहेत. वैद्यकीय सेवांमध्ये रुग्णालयांतील उपचार निदान, आवश्यक औषधोपचार, शुश्रुषा व भोजन तसेच एक वेळेचा परतीचा प्रवास खर्च यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे या योजनेंतर्गत रुग्णालयातून मुक्त केल्यानंतर १० दिवसापर्यंतच्या सेवा पँकेज मध्ये समाविष्ट आहेत. Mahatma Phule Jivandayi Yojana in Marathi.

वाचक मित्रहो, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य ही योजना सध्याच्या काळात रुग्णांसाठी जीवनदायी आहे. कोविड - १९ च्या उपचारासाठी जनतेने या योजेनचा अवश्य लाभ घ्यावा. वरील माहिती सर्वांसोबत नक्कीच शेअर करा. मास्क लावा ! सुरक्षित रहा !

तुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात

पीएम किसान आठवा हप्ता तारीख?

गरीब कल्याण अन्न योजना, कोविड काळात मोफत रेशन धान्य. 

पॅन आधारशी लिंक का करावे ? असे लिंक करा पॅन - आधार कार्ड.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या