ऑनलाईन सातबारा उतारा कसा काढायचा? | How to check online satbara 7/12

  

online satbara 7/12


ऑनलाईन सातबारा उतारा कसा काढायचा? | How to check online satbara 7/12 जमिनीची खरेदी-विक्री किंवा जमिनीसंदर्भात कोणताही व्यवहार करण्यासाठी त्या जमिनीचा पूर्वइतिहास माहिती असणं आवश्यक असतं. म्हणजेच ती जमीन सध्या कोणाच्या नावे आहे? किंवा पूर्वी त्या जमिनीचा मूळ मालक कोण होता? जमिनीवर कोणते कर्ज घेतले आहे काय? वेळोवेळी त्यात कोणकोणते नवीन बदल होत गेले? इत्यादी. ही माहिती सातबारा, फेरफार बदल यांच्या स्वरुपात तहसिल कार्यालयात १८८० पासून उपलब्ध आहे. आता हीच माहिती शासनाने लोकांसाठी ऑनलाईन उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली. त्यामुळे सातबारा उतारा काढण्यासाठी आता तुम्हाला तलाठी कार्यालयात हेलपाटे घालण्याची गरज नाही. 

आता तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं तुमच्या मोबाईल फोन वरूनही डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा घरबसल्या काढू शकता किंवा वाचू शकता आणि तो विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी किंवा इतर जिमीन विषयक कामांसाठी वापरु शकता. यासंबंधीचा शासन निर्णय महाराष्ट्र महसूल व वन विभागानं २३ नोव्हेंबर, २०२० नव्याने जारी केला आहे. याआगोदर विना स्वाक्षरीत 'ऑनलाईन सातबारा' कोणत्याही शासकीय कामांसाठी वैध असा ग्राह्य धरला जात नव्हता. पण आता तो कायदेशीर ग्राह्य धरला जाणार आहे.

याचसंदर्भात आज आपण ऑनलाईन पद्धतीनं सातबारा उतारा (७/१२) कसा काढायचा? हे या लेखात सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

सातबारा उतारा (७/१२) म्हणजे काय?

महाराष्ट्र जमीन महसूल कायदा १९७१ या जमीनीच्या कायद्यामधील क्रमांक ७ व  क्रमांक १२ ही दोन महत्वाची कलमे आहेत. सातबाराचा उतारा हा जमिनीचा मालकी हक्क कोणाचा आहे ते दर्शवितो. याशिवाय जमीनधारकास/शेतकऱ्यास स्वतःच्या नावे असलेली जमीनी किती आहे? कोणती आहे? जमिनीचे सहहिस्सेदार कोण आहेत? जमिनीत झालेले फेरफार कधी व कोणते? इत्यादी जमिनीविषयक एकूण माहिती सातबारा उतारा वरून मिळते. त्यामुळे शेतात न जाता हा उतारा वाचून जमिनीचा संपूर्ण अंदाज तुम्हाला बसल्या जागी मिळतो. गावातील प्रत्येक जमिनींच्या नोंदी गावातील तलाठीकडे असतात. त्यापैकी ७ क्रमांक नुसार मालकी हक्क, हिस्सेदारांची नावे, जमिनीचे नाव, लागवड योग्य क्षेत्र इत्यादी उल्लेख असतात. तर बारा क्रमांकनुसार जमिनीत  घेण्यात येणाऱ्या पिकांच्या प्रकारांची माहिती असते. अश्या प्रकारे सातबारा बनतो. ७/१२ उतारा हा जमिनधारकाच्या जमिनमालकीचा अत्यंत महत्वाचा आणि एकमेव कागदोपत्री पुरावा असतो.




जमिनीचा ऑनलाईन सातबारा (७/१२) उतारा कसा काढायचा?

१. सर्वप्रथम https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/dslr  या महाराष्ट्र महसूल विभागाच्या वेबसाईट जावं. ऑनलाईन सातबारा Satbara utara काढण्यासाठी वेबसाईटवर दोन पद्धती दिसतील:

अ). Regular Login  

ब). OTP Login 


अ). Regular Login - म्हणजे तुम्हाला इथे नोंदणी करावी लागले. त्यात तुम्हाला OTP (One Time Password)  ची गरज लागत नाही. हा पर्याय जास्त सोईस्कर असतो.

ब). OTP Login - यामध्ये तुमच्या मोबाईलवर एक OTP येतो. तो प्रत्येक वेळेस तुम्हाला सातबारा काढण्यासाठी टाकावा लागतो.
जर तुम्ही आधीच या वेबसाईटवर नोंदणी केली असेल तर लॉग-इन आयडी आणि पासवर्ड वापरून तुम्ही या साईटवरील सेवांचा लाभ घेऊ शकता.

२. जर तुम्ही पहिल्यादांच सातबारा काढत असला तर,  'New User Registration'  इथे क्लिक करून, तुमची वैयक्तिक माहिती भरायची आहे. (नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक इ.) टाकून नोंदणी करायची आहे.

३. यानंतर खाली  'Please Check Availability of your Login Id' इथे क्लिक करून यूजर नेम आणि पासवर्ड निवडायचा आहे. त्यानंतर 'Submit' वर क्लिक केल्यांनतर तुम्हाला 'User Registration successful Click Here to Login'  म्हणून मेसेज दिसेल. म्हणजेच तुमची यशस्वीरित्या नोंदणी झाली आहे.

४. त्या मेसेजे वरील 'Click Here to 'Login'  यावर क्लीक करावं. यानंतर तुम्ही निवडलेला यूजरनेम, पासवर्ड आणि 'Captcha' टाकून त्यात लॉगिन व्हावे.

५. त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यात तुमचा जिल्हा, तालुका, गाव टाकून सातबाराचा सर्वे नंबर/गट नंबर टाकून, अंकित सातबारा हा पर्याय निवडावा.



जर तुम्हाला तुमच्या सातबाराचा सर्वे नंबर/ गट नंबर माहीत नसेल तर www.bhulekh.mahabhumi.gov.in या वेबसाईटवर जाऊन उजविकडे विनास्वाक्षरीत ७/१२ व ८ अ पाहण्यासाठी विभाग निवडा म्हणून पर्याय दिसेल. त्यामध्ये विभाग, जिल्हा, तालुका, गाव निवडा. त्यानंतर पहिले नाव, मधील नाव किंवा आडनाव यापैकी एक निवडून आपला मोबाइल क्रमांक टाका. त्यानंतर तुम्ही 'Captcha Text' टाकून विना स्वाक्षरीत ७/१२ सातबारा पाहू शकता. ज्यामध्ये वरच्या बाजूस डावीकडे 'गट क्रमांक व उपविभाग' पाहता येतो. (या वेबसाईट वरील सातबारा जमिनीच्या कोणत्याही कायदेशीर बाबींसाठी वापरता येत नाही. इथून फक्त सातबारा पाहू/वाचू शकता.)

६. त्यानंतर ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी प्रथम 'Recharge Account ' या पर्यायवर क्लीक करून अगोदर तुमच्या अकाउंटमध्ये काही रक्कम घ्यावी लागेल. (कमीत कमी रु.१५/- ते जास्तीत जास्त रु.१०००/-). प्रत्येक डिजिटल स्वाक्षरी सातबाराचे digital online satbara एक पान डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला रु. १५ इतकी किंमत आकारली जाते. ही रक्कम तुम्ही बनवलेल्या सातबारा डिजिटल स्वाक्षरी या ऑनलाईन अकाउंटमध्ये रिचार्ज केलेल्या रकमेतून कमी केली जाते.

ऑनलाईन सातबारा उतारा 7/12

या अकाउंटमध्ये रिचार्ज करण्यासाठी तुम्हाला दोन (SBI व Bank of India ) डिफिल्ट पर्याय दिसले तरीही, त्यापैकी कोणत्याही एका पर्यायावर क्लीक केल्यावर तुम्हाला इतर बँकेचे पेमेंट पर्याय दिसतील. त्यात तुम्ही इंटरनेट बँकिंग, डेबिट/क्रेडिट कार्ड, भिम UPI इत्यादी माध्यमातून रिचार्ज करू शकता. रिचार्ज यशस्वीपणे पूर्ण झाल्यावर डाऊनलोड या पर्यावर क्लीक करून सातबारा डाऊनलोड करा. हा सातबारा आता तुम्हाला कोणत्याही शासकिय किंवा कायदेशीर बाबींसाठी वापरता येऊ शकतो.

मित्रहो, वरील माहिती आवडल्यास इतरांसोबत नक्कीच शेअर करा. जेणेकरून ऑनलाईन सातबाराची माहिती इतरांनाही कळेल. माहिती मिळवण्यासंबंधित काही अडचण येत असल्यास संपर्क फॉर्म भरुन 'माझा गाव'  ला संपर्क करा किंवा टिप्पणी करून कळवा.

तुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात

•  महाराष्ट्रातील कोणत्याही ग्रामपंचायतची मतदारांची यादी - पहा तुमच्या मोबाईलवर




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या